बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर
बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर आपल्या शैलीत खालील प्रमाणे पहिला आक्षेपाचं खंडण बुद्धाने हिॅदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिॅदुच होता व मेलाही हिॅदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिॅदुच असेल. ह्याबबातीत उपराष्ट्रपती व एक विद्वान डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिॅदुच म्हणून जगला व मेला. भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇 Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization. अर्...