भारतरत्न : सर्वोच्च नागरी पुरस्कार

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत.
सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतिकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात सद्ध्या दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के करण्यात आले. सध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे शब्द व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये स्थान मिळते. 

 सन्मानित व्यक्तींची यादी


नाव वर्ष
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १९५४
चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२) १९५४
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०) १९५४
डॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) १९५५
जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४) १९५५
गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७
डॉ. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८
डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२) १९६१
पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२) १९६१
डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२
डॉ. झाकिर हुसेन(१८९७-१९६९) १९६३
डॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) १९६३
लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (१९०४-१९६६) १९६६
इंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१
वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १९७५
के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) १९७६
मदर तेरेसा (१९१०-१९९७) १९८०
आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३
खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७
एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७) १९८८
भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९०
नेल्सन मंडेला (जन्म १९१८) १९९०
राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१
सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१
मोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२
जे. आर. डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२
सत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२
सुभाषचंद्र बोस (१८९७-१९४५) (नंतर परत घेतले) १९९२
ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१) १९९७
गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७
अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)(१९०६-१९९५) १९९७
एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८
चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८
जयप्रकाश नारायण (१९०२-१९७९) १९९८
रवी शंकर (जन्म १९२०) १९९९
अमर्त्य सेन (जन्म १९३३) १९९९
गोपीनाथ बोरदोलोई‎ (जन्म १९२७) १९९९
लता मंगेशकर (जन्म १९२९) २००१
बिसमिल्ला खान (१९१६-२००६) २००१
भीमसेन जोशी (१९२२-२०११) २००८  

 आता या भारत रत्न पुरस्कारात काही अश्या व्यक्तीही आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्याची सरकारने का घाई केली कारण भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार खर हे पुरस्कार ज्यांना भेटायला हवे त्यांना भेटलेच नाही आज सचिनला भारत रत्न देवून यांनी सिद्ध केल कि भारत रात्नासाठी फक्त त्याच नाव मोठ असं अवश्यक आहे तसे पाहता सचिनची क्रीडा क्षेत्रातली कामगिरी चांगली आहे पण ती त्याची कामगिरी हा त्याच व्यवसाय होता असे म्हटले तर वावगे ठरू नये आज आपण पहिले तर लता मंगेशकर यांना दिलेले भारतरत्न कशासाठी एक गायिका म्हणून त्यांचे सामाजिक कार्य कोणते आहे का ज्यांनी कधी समाज हिताची कामच केली  नाही त्यांना भारतरत्न देवून नागरी सन्मानाचा अपमान केला जातो याला काय म्हणायचे उद्या काही लोक म्हणतील कि बाल ठाकरेंना हि भारतरत्न द्या शिवसैनिक ते करू शकतात कारण शिवाजी राजांच्या फोटोला बाळासाहेब करणारे तेही करतील मग काय त्यानाही भारतरत्न देणार का ? ज्यांची लायकी नाही अश्या लोकांना भारतरत्न दिला जातो
बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न दिला जातो याचीच खंत आहे पाहिलं भारतरत्न खर तर बाबासाहेबांना दिला पाहिजे होता कारण राधाकृष्णन यांनी आयुष्यात  गमावलं नाही जितक माझ्या बाबांनी गमावलं या सार्यांनी आपले संसार पहिले पण बाबांनी समाज पाहिलं देश हित पाहिलं तरीही त्यांना १९९०साली भारतरत्न दिल हि खेदाची बाब आहे ज्यांनी आयुष्यभर देश हित जपल त्यांना या देशात उपेक्षा मिळाली लाज वाटायला पाहिजे भारतीयांना कि अमेरिकेसारखा देश त्यांचा गौरव करतो आणि आपल्या जगविख्यात महाविद्यापिठात बाबासाहेबांचा पुतळा उभारून त्याला ज्ञानच प्रतिक या शब्दात गौरव केला जातो जे आज देश आर्थिक महासत्ता आहेत ते देश बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासावर त्यांनी केलेल्या शोधावर चालतो
खरच खंत वाटते अशी उपेक्षा जेव्हा केली जाते तेव्हा वाटत कि बाबासाहेब ब्राह्मण असते तर पाहिलं भारतरत्न त्यांनाच दिले असते पण दुर्दैव ते अस्पृश्य जातीत जन्माला आले आज या देशाची आर्थिक अवस्था खूप वाईट आहे
बाबासाहेबांच्या जीवनात किती वाईट प्रसंग घडले याची जाणीव इथल्या लोकांना नाही आजही बाबासाहेबांना काही लोक शिव्या देतात कि त्यांनी जातीवाचक घटना लिहिली म्हणून पण कुठेच जातिवाद दिसत नाही तरीही काही लोक त्यांना दुषणे देत असतात आज सारे विश्व या घटनेला सलाम करतो तिथे भारतातील काही मनुवादी पिलावळ त्यांना दुषणे देतात
भारतरत्न हा किताब ज्यांना ज्यांना मिळाला त्यांची नावे लिहिली आहेत पण एकही पुरस्कार भेटलेला व्यक्ती बाबासाहेबांच्या तुलनेत खूप छोटे आहेत त्याचं व्यक्तिमत्व हि खूप छोट आहे म्हणू या देशाचा खरा भारतरत्न हे बाबासाहेबच आहेत कोणी मन अथवा नका माणू बाबासाहेब हेच खरे भारत रत्न
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र