एक शोध वंचित जगताचा
एक शोध वंचित जगताचा
सध्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ची जोरदार चर्चा चालू आहे. वंचित आघाडी च्या महाराष्ट्रात लाखोंच्या सभा होत आहेत. सभेत वंचित घटकांच्या मुलभूत प्रश्नावर आवाज उठवला जातोय . परंतु या वंचित आघाडी चा खरेच सत्ता संपादनाचा हेतू आहे का ? असा विरोधकांचा प्रश्न आहे आणि ते त्यावर वंचित बहुजन आघाडी हि अप्रत्यक्षपणे बीजेपी ला सपोर्ट करत असल्याचा आरोप हि होत आहे प्रथम आपण आपण बाळासाहेब यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा प्रवास यश अपयश पाहू या
बाळासाहेब हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू त्यात आंबेडकर हे आडनाव सोबत आहे पण त्यांना जरा इतर महामानवांच्या वंशजाना जसा समाजातून सहकार्य मिळाले तसे बाळासाहेब यांना मिळाले नाही हे दुर्भाग्य आहे हे नाकारू शकत नाही बाळासाहेब यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकला तर नक्कीच यशस्वी अशी कारकीर्द आहे हे नाकारणे चुकीचे ठरते बाळासाहेब यांचा अकोला पॅटर्न हा महत्वाचा होता २००२ साली मायावती यांनी उत्तर प्रदेश मध्ये सोशल इंजिनियरिंग करून सत्ता संपादन केले व त्यांनी दिलेले सोशल इंजिनियरिंग म्हणजे बाळासाहेब यांचा हा अकोला पॅटर्न होय पण बाळासाहेब यांचा हा महत्वाचा विषय समाजाकडून च दुर्लक्षित राहिला हे समाजाचे दुर्दैव म्हणा कि समाजची भिकार मानसिकता म्हणा
बाळासाहेब हे बाबासाहेब यांचे वंशज आहेत आणि त्याच्याकडे समाजाची कमांड जावू नये म्हणून समाजात अनेक गद्दार हि निर्माण केले गेले बाबासाहेबांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबाकडे समाजाकडून झालेला विरोध हा विरोध त्या लोकांनी केला ज्यांच्यावर या कुटुंबाचे उपकार होते आणि आज हि आहेत
महत्वाचा विषय बाळासाहेब यांनी स्वतःहून कधी आपण बाबासाहेब यांचे नातू आहेत आणि लोकांनी आपणाला तसा दर्जा द्यावी अशी अपेक्षा केल्याचे आठवत नाही
बाळासाहेब यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला तो अकोल्यातून साधारण नव्वद च्या दशकाची सुरुवात आणि बाळासाहेब यांचा काही कार्यक्रमानिमित्त अकोल्याशी आलेला सबंध तिथल्या जनतेने दिलेले प्रेम साथ हीच पुढे अकोला पॅटर्न म्हणून समोर आला
कधी काळी अकोला हा कॉंग्रेस चा बालेकिल्ला असताना अकोल्यातून कॉंग्रेस हद्दपार झाली बाळासाहेबांच्या प्रयोगाने महत्वाचे म्हणजे बलाढ्य कॉंग्रेस अकोल्यातून हद्दपार होते याचा अर्थ हा पॅटर्न नक्कीच यशस्वी होता हे नाकारता येत नाही मग हा पॅटर्न बाहेर का आला नाही तर त्याची कारणे समाजाची मानसिकता
५ आणि ६ मी १९८४ रोजी बालासाहे यांचा भाषण हे त्यांच्या राजकीय कारकिर्दी चे सर्वात महत्वाचा भाग आहे कदाचित समाजातील अनेक लोकाना ते भाषण माहिती नाही हि वस्तुस्थिती कारण एकच समजतील लोक दुसऱ्याच्या दावणीला बांधलेले होते हे वास्तव
बाळासाहेब यांचा अकोला पॅटर्न हा एवढा जबरदस्त ठरला कि विधानसभा मध्ये हि आपले अस्तित्व निर्माण केले
२१ मार्च १९९३ रोजी मखराम पवार यांनी त्यांचा बहुजन महासंघ भारिप मध्ये विलीन केला आणि भारिप हि पुढे भारिप बहुजन महासंघ झाला १९८४ ला निर्माण झालेला भारिप १९९३ ला बहुजन महासंघ भारिप मध्ये विलीन झाला
पुढे जेव्हा या राजकीय पक्षाची कारकीर्द आपण पाहिली तर सत्ता संपदान करण्यास महत्वाचा वाटा आहे त्यांचा अकोला मध्ये त्यांचाच दबदबा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते विधानसभा पर्यंत
थोडक्यात भारिप बहुजन महासंघाला मिळालेले यश पाहू या
१९९० मध्ये बाळासाहेब संसदेत खासदार म्हणून निवड
१९९३ मध्ये नांदेड मधील किनवट येथून पोटनिवडणुकी मधून आदिवासी समाजातील भिमराव केराम यांना विधानसभेत आमदार म्हणून निवडून आणाले प्रस्थापित राजकीय पक्षाला धूळ चारत आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व दिले
१९९५ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मखराम पवार आमदार म्हणून निवडून आले तसेच इतर उमेदवार यांना हि लक्षणीय मते होते
१९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभेत बाळासाहेब आंबेडकर खासदार म्हणून संसदेत गेले
१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब यांचे तीन आमदार निवडून आले तसेच याच काळात कॉंग्रेस च्या सरकार मध्ये भारिप महासंघाला दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद होते
हि महत्वाची बाब आहे तिला आजवर कोणी समोर आणलेले नाही
२००४ , २००९ आणि २०१४ मध्ये भारिप चा एक एक आमदार निवडून आलेला आहे
अकोल जिल्हा परिषदेवर गेली २० वर्षे भारिप ची सत्ता आहे २०१२ साली अकोल्याचे महापौर पद हि त्यांनी काबीज केले अनेक पंचायत समित्यावर सत्ता आहे वाशीम जिल्यात अनेक नगर पालिकेवर सत्ता आहे
हा विजयी आलेख एका जिल्ह्यापुरता जरी असला तरी दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाही
व आताची एमआयएम सोबत युती करून जवळपास १०० पेक्षा जास्त पक्ष संघटनांना जोडत निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी हा पर्याय सत्ता संपादन मध्ये महत्वाचा भाग ठरणार एवढे नक्की
सध्या महाराष्ट्रात जुन्या आधारावर सध्याचे त्यांचे विश्लेषण केले तर कदाचित चुकीचे ठरेल असे मला वाटते त्यांचा जो अकोला पॅटर्न सारखी राजकीय खेळी यावेळी नक्कीच काम करू शकते
सध्याचे वंचित आघाडीचे सकारात्मक बाबी पाहू या
वंचित बहुजन आघाडी मध्ये जवळपास सर्व समाजातील लोक आज एकत्र आलेले आहे गेली वर्षभर चाललेल्या या प्रवासात अनोखा बदल पाहायला मिळतो तो म्हणजे जनतेचा भरघोस प्रतिसाद
राजकीय पक्षांची सभा म्हटली कि तिला गर्दी जमवावी लागते कार्यकर्त्यांना हे वास्तवरूपी सत्य नाकारता येत नाही इथे मात्र लाखो च्या सभा होत आहेत हे पाहून सकारात्क आहे का तर नक्कीच सकारात्मक आहे कारण जवळपास समाजातील सर्वच घटक बाळासाहेब यांच्या वंचित आघाडी ची चर्चा करत आहेत एक सोशल मिडिया रिपोर्ट जरी तपासून पहिला आपण तर वंचित आघाडीला चा बोलबाला जास्त आहे त्यात वंचित आघाडीने जाहीर केलेले उमेदवार यांची यादी महत्वाचे म्हणजे उमेदवार मिळणे आघाडी युती कडे आज हि उमेदवार नाहीत इकडे मात्र उमेदवार जाहीर झाले आणि हे उमेदवार हे चांगले सुशिक्षित असून प्रत्येक वंचित घटकासाठी काम करणारे आहेत हि जमेची बाजू आहे
आजवर आघाडी युती कडे वंचित म्हणजे जो असंख्य मोठ्या प्रमाणावर असणारा समूह यांच्या मताची देणगी असायची यावेळी मात्र त्यात बाधा नक्कीच असेल वंचित आघाडी हि या दोन्ही युती आघाडी ला त्रासदायक ठरणार एवढे नक्की
बाळासाहेब यांची सकारात्मक बाब म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलणे आज त्यांनी बाबासाहेब यांची संकल्पना जे बाबासाहेब यांना वाटत होते कि सर्व समाज घटकातून लोक एकत्र आले पाहिजेत आणी आज जवळपास चित्र असे दिसत आहे कि वंचित बहुजन आघाडी च्या सभेत सर्व घटक एकत्र येत आहेत हि महत्वाची आणि सकारात्मक बाब आहे
वंचित बहुजन आघाडी साठी अजून महत्वाची जमेची बाजू ती अशी आहे कि आजवर इथल्या मुस्लीम समाजाच्या वोट बँकेवर कॉंग्रेस ची चलती होती पण एमआयएम ने मात्र कॉंग्रेस ची हि वोट बँक फिरावलि आहे एवढे नक्की भायखळा मधुन आमदार येणे औरंगाबाद मधून आमदार शिवाय नगर सेवक असणे हे एक वंचित बहुजन आघाडी ला तारक गोष्ट आहे
समाजाच्या ग्रामीण भागात चित्र बाळासाहेब यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे चित्र दिसते कारण प्रत्येक ठिकाणी गावागावात वंचित बहुजन आघाडीची चर्चा आहे अगदी शत्रू पक्षात देखील हा वंचित बहूजन आघाडी चा धाक आहे हे मात्र मानले पाहिजे
जवळपास सकारात्मक बाजू आहे हे आपण पाहतो पण यात नकारात्मक काय आहे म्हणजे काय चुका होत आहेत ते हि पाहू या
बाळासाहेब यांनी एमआयएम सोबत युती केल्याने अनेक जणांना वाटते कि बाळासाहेब चुकीचे पाऊल टाकले पण हि जमेची बाजू आहे यात मुल्सिम वोट बँक म्हणून मुस्लीम लोकांचे मतदान हे महत्वाची भूमिका बजावणार आहे
परंतु ग्राउंड लेवल ला गावागावात लोक मजबूत करणे अजून काम झालेले नाही हि बाब नकारात्मक आहे जी वंचित आघाडी ला फटका देवू शकते
कारण प्रस्थापित लोक ग्रामीण भागातील लोकांच्या जीवावर निवडून येतात
आजवर महाराष्ट्राचे मतदार जे नोंदणीकृत आहेत त्याची सध्याची संख्या किती आहे पहा
पुरुष : 4,57,02,579 स्त्रिया : 4,16,25,819 तृतीय पंथी : 2,086 एकूण ८,७३,३०,८४७ एवढी लोकसंख्या नोंदणी कृत आहे मागच्या मतदार यादीत पुरुष 4,27,70,991 स्त्रिया 3,80,26,914 तृतीय पंथी 918
एकूण ८,०७,९८,८२३
एवढी लोकांची मतदार यातीत नाव होती २०१९ मध्ये मतदार यादीत लोकांची संख्या वाढली आहे महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ११,२३,७२,९७२ इतकी आहे त्यामध्ये आता ८,७३,३०,८४७ लोकांची नावे मतदार यादीत आहेत म्हणजे जवळपास अडीच कोटी पेक्षा वाढ झालेली आहे कदाचित हि मते निर्णायक ठरणार हे मात्र नक्की
आता महाराष्ट्रातील असे काही घटक आहेत ज्यांना वंचित बहुजन आघाडी ने राजकीय प्रवाहात नेतृत्वात आणलेले आहे त्यामध्ये
आदिवासी या समाजाला तर आपल्या पक्षाचा पहिला आमदार तो हि प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात उभी करून निवडून आणलेले आहे
कोळी समाज मावळ मधून राजाराम पाटील या आगरी कोळी लोकांचा राजकीय प्रतिनिधित्व दिले आहे शिवाय कोळी लोकांच्या गावठाण प्रश्न देखील सोडवण्यासाठी स्वतः बाळासाहेब पुढाकार घेऊन आहेत महाराष्ट्राच्या प्रत्येक जातीचा प्रतिनिधित्व लोकसभे साठी उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडी चा आहे त्यामुळे आजवर जे उपेक्षित होते ते उमेदवार म्हणून उभे आहेत शिवाय प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात जावून या वंचित लोकांना निवडून आणण्याचे काम बाळासाहेब यांनी मोठ्या हिमतीने करून दाखवलेलं आहे त्यामुळे कदाचित यावेळचे त्यांचे सोशल इंजिनियरिंग महत्वाची ठरेल एवढे मात्र नक्की
यावेळी महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवीन राजकीय बदल घडण्याचे संकेत असावेत अशी परिस्थिती आहे हे कोणता हि राजकीय विश्लेषक नाकारणार नाही
आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्याचे काम आजवर कोणी केलेले नाही पण बाळासाहेब यांनी आदिवासी धनगर होकार कुणबी मराठा बौद्ध वंजारी कैकाडी माली धीवर अश्या अनेक समाजातील लोकांना लोकसभेसाठी उभे करून त्या समाजातील लोकांना आपला प्रतिनिधित्व देण्याची संधी निर्माण केलेली आहे हा सर्वात सकारात्मक बदल आहे असे म्हणायला हरकत नाही
हा समाज वंचित आहे का तर नक्कीच वंचीत आहे राजकीय प्रस्थापित पक्षांचा विचार केला असता आजवर
सर्व समाजाला कधीच प्रतिनिधित्व मिळालेले नाही आणि महत्वाचे गडगंज श्रीमंत व्यक्ती च राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे आजवर सर्वसामान्य वर्गात हि राजकीय प्रतिनिधित्व कधी गेलेले नाही त्यांना आपल्या समस्या सांगण्यासाठी आपला हक्काचा लोक्प्रतीधीत्व देता आलेला नाही त्यामुळे त्यांचे प्रश्न हे प्रश्न च राहिले आजवर
आज संविधान देवून इतकी दशके झाली तरी हा घटक वंचित च आहे
महाराष्ट्रात या वंचित घटकांसाठी अनेक योजना असताना त्या त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत कारण सरकार मध्ये त्यांचे प्रतीनिधीत्व नाही हे वास्तव आज आम्ही स्वीकारले पाहिजे
केवळ rss बीजेपी हे यातले मुख्य आरोपी आहेत असे नाही तर प्रस्थापित राजकीय पक्ष हे या घटकांना दुर्बल करणारे लोक आहेत त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा त्यांना मिळत नाहीत त्याचे एकमेव कारण हे त्यांचा स्वतःचा प्रतिनिधित्व नसल्याने आहे
हि प्रस्थापित राजकीय मंडळी शे पाचशे रुपयाला या वंचित लोकांची मते विकत घेते हे सत्य निवडणूक आयोग का झाकून ठेवतो आहे अश्यावेळी निवडणूक आयोगाकडून अश्या पक्षावर कारवाई का करत नाही
निवडणुका मध्ये नोटांची सरबत्ती होते हे निवडणूक आयोगाला माहिती आहे निवडणूक म्हणजे खर्चाची बाब हे समीकरण करून ठेवले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला प्रतिनिधित्व मिळत नाही कारण त्याच्याकडे तेवढा पैसा नाही भाजप जे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी किती खर्च करावा लागत होता याचे जाहीर सभेतून मांडणे होते हि महत्वाची बाब लोक दुर्लक्षित करतात या कारणामुळे च सर्वसमान्य घटकातील लोकांना प्रस्थापित लोकांच्या विरोधात निवडणुका लढता येत नाही त्यामुळे हि प्रस्थापित राजकीय मंडळी या सामान्य लोकांवर अधिकार गाजवून असते पण ते विसरतात कि या देशाचे संविधान एकदा का या सर्वसामान्य लोकांच्या डोक्यात गेले तर हा सामान्य वर्ग हि आपले प्रतिनिधी संसदेत पाठवू शकतो
येणाऱ्या काळात हा बदल होताना दिसत आहे आणि बाबासाहेब यांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी यासाठी घेतेलेला पुढाकार पुन्हा एकदा आंबेडकर म्हणून सर्व लोकांच्या तोंडी भाषा आहे आणि हि भाषा मात्र काही तथाकथित विचारवंत वक्ते संपादक लोकांना तीरासारखी टोचते आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून विरोधाची भूमिका समोर येते आहे
आता वंचित आघाडी बीजेपी ला मदत करते का यावर भाष्य करू या
बाळासाहेब यांचे अकोला मधील राजकीय प्रवास पाहता त्यांनी आपले प्रतिनिधित्व उभे केले कोणत्याच प्रस्थापित पक्षाला त्याची मदत झाली नाही मग आताच का होवू शकते हे पाहू या
महाराष्ट्रात असणाऱ्या लोकसंखेच्या आधारावर पाहिले तर हे प्रस्थापित लोक मतांची खरेदी करतात आणि एकदा चा उमेदवार तिकडे पळवत असतात अश्यावेळी राज्यात दोन च पर्याय होते एक कॉंग्रेस आघाडी आणि भाजप सेना युती या दोघांना आजवर कडवा प्रतिस्पर्धी नव्हता तो वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून उभा राहिलेंला आहे
निवडणुकीत जाहीर आहे कि मतांची विभागणी आहे पण ती दोन्ही प्रस्थापित पक्षांची मतांची विभागणी होणार आहे हे मात्र नक्की कुणा एकाचीच होईल असे अजिबात नाही कारण हा वंचित घटक बीजेपी युती वकॉंग्रेस आघाडी चा मतदार राहिलेला आहे तो जर का वंचित आघाडीला मिळाला तर दोन्ही प्रस्थापित राजकीय पक्षांना भारी पडणार आहे कारण या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्य कोणाची असेल तर या वंचित घटकाची आहे या घटकाती ५० टक्के मतदार जरी वंचित आघाडी चा मतदार झाला तर राज्यातून कॉंग्रेस आघाडी व बीजेपी युती चे प्रस्थापित पक्ष हद्दपार होतील कारण एवढी लोकसंख्या आहे आणि ग्रामीण भागात मधील मतदान केंद्र कमी करून शहरातील मतदान केंद्र वाढवलेली आहेत या निवडणूक आयोगाने यावर कुणी लक्ष दिलेले नाही
२०१४ ला ग्रामीण मतदार केंद्र हि 61,816 एवढी होती आज २०१९ ला ती 55,814 एवढी आहेत म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील मतदान केंद्र ६००० मतदान केंद्र कमी करून शहरात मतदान केंद्र हि २०१४ ला २७६६३ एवढी होती आज २०१९ ला ती ३९६५९ एवढी आहेत म्हणजे शहरात ११९९६ एवढी वाढ आहे वंचित घटक यामधला महत्वाचा भाग आहे आणि हा ग्रामीण भागातील आहे तिकडे मतदान केंद्रे कमी करून शहरात वाढवलि आहेत तेव्हा वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना गावाकडील मतदान केंद्र मजबूत करा
सत्ता संपादन करणे सहज शक्य ठरेल महाराष्ट्रात लोकसभे चा विचार करता महाराष्ट्रात वंचित आघाडीला वंचित घटकाने स्वतःला विकले नाही तर वंचित बहुजन आघाडीचे विजयाचे विश्लेषण करण्यास अनेक राजकीय विश्लेषक उभे राहतील
आता यात बीजेपी ला सपोर्ट मिलेले असे जे बाष्कळ बोलणे आहे ते मुळात मूर्खपणाचे लक्षण आहे असे मला वाटते मात्र निवडणुका जिंकण्यासाठी ग्राउंड वर काम करावे लागेल केवळ सोशल मिडिया वर नाही तर ग्राउंड वर काम करावे लागेल तरवंचित जनतेला आशेचा किरण पुन्हा एकदा आंबेडकर
टीप १ : माझ्या लेख वाचून मला अंधभक्त ठरवण्याचा मूर्खपणा करू नका मी निपक्षपाती या महाराष्ट्राचा आलेख पुढे ठेवलेला आहे महाराष्ट्रातील असंख्य गाव स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहेत त्यांची वस्तुस्थिती जवळून पाहिलेलि आहे तेव्हा मला अंधभक्त बोलून तुमची मूर्खपणाची पातळी दाखवून देवू नये
कारण समाजाचे गद्दार समाजाने ओळखलेले आहेत आणि तेच मला अंधभक्त म्हणू शकतात
टीप २ : मी कोणत्याच राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही कि समर्थक नाही मी भारताच्या ऐतिहासिक प्राचीन इतिहासाचा वारसदार आहे तेव्हा माझा विषय जरी नसला तरी मी या देशाचा नागरिक आहे संविधानाने मला मताचा अधिकार दिला आहे त्यामुळे त्यावर भाष्य करणे मी माझे कर्तव्य समजतो
जयभीम नमो बुद्धाय

टिप्पण्या