बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

दलित म्हटलं कि एका जातीकडे पाहिलं जात त्यांच्या विशिष्ट बाबींकडे पहिले जाते सामाजिक आर्थिक घटकांचा विचार करता आजच्या युगात दलित समाज काही प्रमाणात उच्चवर्गीयांच्या प्रमाणात बसतो त्यांची संकृती बदलली विचार बदलले परंतु माणसाच्या मनी असणारे भाव मात्र तेच राहतात

बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाला नवसंजीवनी देणारे अमृत तसेच कोटी कोटी बहुजनांना उद्धारण्यासाठी जन्माला आलेला कोहिनूर हिरा प्रज्ञा शील करुणा ह्या मानवाने अंगीकारल्या पाहिजेत तरच या जणांचा उद्धार होईल पण आजही दलित बांधव परंपरेच्या जाळ्यात अडकलेले आपणाला पहावयाला दिसतात मानवाच्या सदविवेक बुद्धीला पटणारे विषय या समजत घेतले जात नाही मानवता हि आजच्या माणसात दिसतच नाही बौद्ध धम्माच्या विचारांचा पगडा सार्या जगावर असताना भारतातील दलित समाज आजही जुन्या रूढीना धरून जगात आहे सर्व प्रकारची नाहीती असतानाही जातीधर्माच्या बेड्या आपल्या पायी का बांधून घेत आहे हे समाजात नाही का त्या विषमतेच्या दरीत परत उडी मारत आहे आणि परिणाम काय तर परत त्यांना त्या नाहक हानीला सामोरे जावे लागत आहे आणि याला कारणीभूत हे दलित लोक आहे

प्रथमतः दलित समाजातील लोकांनी आपली विचार करण्याची व एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा कारण आजही काही लोक काही म्हणण्यापेक्षा बहुतांश बहुजन लोक हिंदू धर्माच्या जुन्या रूढीपरंपरा त्यांचे पालन करत आहे हिंदू धर्मातील काही अश्या रूढी आहेत कि मानवाला लाज वाटाव्या इतक्या भयानक आहे आणि त्यांची पुरेपूर जाणीव असतानाही परत त्याकडे का वळून पहिले जाते तेच समजत नाही बहुजनांना अश्यय जाचक रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाचा सम्यकशाली धम्म दिला जेणेकरून समाज या रूढी परंपरेतून बाहेर पडेल पण तसे होत नाही बहुजन समाज दिवसेंदिवस त्या परंपरेला चिकटून बसत आहेत प्रथम दलित समाजात असणारी न्यूनगंडता हि त्यांच्या विकासातील बाधा आहे शाळेत व कॉलेजात इतर धर्माची मुलेही असतात पण दलित समजतील काही मुल आपल्याला त्यांच्याहून कमी समजून घेतात आणि त्यामुळे त्यांना हव असणारे योग्य ते मार्गदर्शन त्यांना भेटत नाही मार्गदर्शन महत्वाचे असते पण दलित समाजाला त्याचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने नहुजन समाजातील मुल मागे पडतात दलित समाजातील मुल अभ्यासात नक्कीच मागे नाहीत त्यांना जोड हवी ती त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शनाची पण आजही हा समाज आपल्या मनात जी न्यूनगंडता ठेवतो त्यामुळे त्यांचे प्रगती होण्याऐवजी मनाचे खच्चीकरण होते मुलांचे खच्चीकरण होण्याला कारणीभूत त्याचे पालक ठरतात कारण त्यांनी आपल्या मुलाला कधी धम्म संगीतालाच नाही त्यामुळे त्या मुलाच्या मनात आपण हीन जातीचे आपण हीन समाजाचे असे काहीसे भेद मनात राहतात पण धम्म सांगितला असता तर त्या मुलालाही समजल असत कि आपण किती महान धम्मातील आहोत ते आम्ही आमच्या विचारांनी स्वतः कमजोर होत आहोत कारण बुद्ध म्हणतात कि स्वताचे विचार हे स्वताला तारणारे असतात त्यामुळे प्रथम बहुजनी आपले विचार बदलाने गरजेचे आहे

मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो मुंबईची गोष्ट आहे ट्रेन मध्ये भिख्खू सांगतील एक अर्हत भिख्खू होते ते प्रवास करत होते आणि त्याच डब्यात एक मुलगा आला तोही बौद्ध होता भन्तेना पाहताच त्यांना वंदन केल आता त्या मुलाच्या हातात हिंदू धर्माची काही धागे आणि काही लॉकेट होते भंते नि पाहिले आणि विचारले कि बाबारे तू बाबासाहेबांना मानतोस त्याने हो असे उत्तर दिले त्यावर भंते त्याला म्हणाले एक बाई होती तिचे लग्न झालेलं होत पण तिचा नवरा तिला रोज मारहाण करीत असे खूप त्रास देत असे त्याने ती वैतागून गेली होती शेवटी तिने त्या त्रासातून मुत्क्त होण्यासाठी त्या तिच्या पतीशी तिने काडीमोड घेतला आणि तिने दुसरे लग्न केले तिला पती तिला हवा तसा मिळाला तिला दररोज सिनेमाला घेवून जात असे तिला शॉपिंग ला घेवून जात असे तिच्या अगदी मनासारखे तो करत असे पण ती बाई आपल्या पहिल्या नवर्याला भेटायला परत जावू लागली आणि मग भन्ते त्या मुलाला विचारात कि आता तू सांग त्या बाई ला काय करायला पाहिजे त्यावर त्या मुलाने काही विचार न करता उत्तर दिले कि तिला चपलेने मारले पाहिजे त्यावर भन्ते शांतपणे त्याला म्हणाले मग तुला काय केले पाहिजे ज्या बाबासाहेबांनी त्या जाचक रूढी बंधनातून मुक्त केले आणि आपण जर परत त्या रूढी कडे जात असू तर त्याला काय केले पाहिजे आणि त्या मुलालाही लाज वाटली त्याने भन्ते ची माफी मागतली आणि हातातील त्या सार्या वस्तू चालत्या गाडीतून फेकून दिल्या आणि भन्ते सोबत चैत्यभुमित जावून बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून आला

आता हा जो आपल्या समाजातील लोकांच्या मनात असणारा विचार बदलला तर नक्कीच आपण यशाचे किल्ले जिंकू आजच्या लोकशाही मध्ये बाबासाहेबांनी राजा केल आपल्याला पण हा राजा झुकतो काही नालायक लोकांपुढे दिवसेंदिवस अन्याय होत आहेत आणि ते आम्ही सहन करतोय बाबासाहेब म्हणाले कि अन्याय करणार्याला राक्षस म्हटले जाते म्हणून अन्याय सहन करणार्याला देव नाही म्हणत त्याला नपुंसक म्हटले जाते कधी समजणार आम्हाला खैरलांजी झाली आमच्या आया बहिणींची इज्जत उघड्यावर मंडळी जातीवाद्यानी तरी चीड येवू नये आम्हाला कधी अशी बातमी नाही कि कुठे दलितांवर अत्याचार झाला नाही बहुजन समाजावर अत्याचार होत आहे कारण हा समाज षंड होवून बसलाय ना आन त्या शिवरायांची न बाबासाहेबांची बस फक्त निपचित पडलाय ग्लानी आल्यासारखी त्यांना उठवावे लागते म्हणावे लागत उठ बहुजना उठ आणि जागा हो म्हणून किती दिवस सहन करणार सारे अत्याचार म्हणून म्हणती विचार बदला बाबासाहेबांना डोक्यात घाला बाबासाहेब म्हणजे डोक्यावर घेवून नाचायचा विषय नाही आहे कधी तरी समजा बाबासाहेब कधीतरी जाणा बाबासाहेब कसे जगले आणि का सोसल्या सार्या यातना का भोगला वनवास कुणासाठी स्वतःसाठी नाही त्यांनी सोसल्या सार्या यातना तुम्हाला आम्हाला माणूस बनवण्यासाठी आणि आम्ही काय दिल त्यांना१४ एप्रिल आल कि जयंती साजरी करायची सहा डिसेंबरला अभिवादन करायचे बस याव्यतिरिक्त आमचा काही सबंध नाही आम्ही काय करतो पहिला विचार माझ घर कस चालेल अर्थात सार्यांनी त्याला प्रथम प्राधान्य देन गरचेच आहे कारण तुम्ही ग्रहस्थ आहात पण त्याच बरोबर एक नागरिक आहात आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहात तुमच कर्तव्य आहे कि तुम्ही बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहचवल

आज बहुजन समाजात डोकावून पाहिलं तर त्यांच्यात चेतना दिसतच नाही ते धम्म काय समजावून घेणार पण आपल्या सदविवेक बुद्धीला पटेल असेच विचार अंगिकारले तर आपल्या मनातील न्यूनगंडता काढून टाकण्यास मदत होईल डोक्यातील असणाऱ्या जुन्या रूढी काढून बुद्धाला भरत जा येणारा काळ हा तुमचाच असेल अन उद्याची प्रेरणा हा बौद्ध समाज असेल एवढे नक्की क्षेत्र कोणतेही असो तिथे आपण नक्कीच मागे नाहीत मागे आहोत ते आर्थिक परिस्थितीने पण माघार घेईल ती बाबांची औलाद काय चिचार बदलले तर बदल हा नक्कीच घडेल म्हणून म्हणतो विचार बदला बाबासाहेब बुद्ध शिवराय महात्मा फुले शाहू महाराज यांना आपल्या डोक्यात घाला मी अगदी १००% सांगेन कि ज्याच्या मेंदूत फक्त याच महामानवांचे विचार असतील ते कोणापुढे कधीच झुकनार नाही कारण ज्याचं मस्तक सुधारलेल असत ते कुणापुढे झुकणार कधीच होत नसत

बाबासाहेबांच्या विचारांनी जेव्हा माणूस भारावून जातो तेव्हा त्याला यशाची चाहूल लागलेली असते एवढ नक्की

आणि मागत एक वेड मन कविता करत

बाबा तुझ्या पिलाला पंख फुटले रे ज्ञानाचे

घेत आहे भरारी अखंड यशाचे

मर्यादा राहिल्याच नाहीत त्या सीमा आकाशाच्या

बाबा तुझ्या पिलाला बंधन नाही त्या बेड्यांच्या

होती गुलामीत जगणारी काही लोक

आता जगतो स्वाभिमानाने घालतो सुत बूट कोट

केलास बदल तू या जनात

म्हणूनच बाबा तुम्ही विराजला कोटी कोटींच्या मनात

जय शिवराय जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र