त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट
सांगतोय तुम्हा हा भीमाचा लेक हाती धारा ह्या लेखणीचे टोक
त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।। धृ ।।
नको युद्ध हे जाणा मनी शांतीची वाणी
बुद्ध असे हि शांती मनाची गावी त्यांची गाणी
शिकवा जगाला बुद्ध करुणेची कहाणी
आज युद्ध नको हवा बुद्ध जगाला त्या तुम्ही पटवुनी
भीमराया चा सल्ला द्यावा जगाला छाती ठोक
त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।। १ ।।
बहुजननो आठवा दिवस त्या गुलामीचे
भिमरायाने जिने दिले रे तुम्हा सन्मानाचे
गुलामगिरीची तोडली बेडी बंध ते गुलामाचे
बुद्ध रुपी हे अमृत पाजले तुम्हाला बुद्ध ज्ञानाचे
जतन कराया कार्य भीमाचे करा एकीचा कोट
त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।। २ ।।
समता बंधुता शिकवण आहे बुद्धाची
स्वातंत्र्याची दिली ललकारी शिकवण छत्रपतींची
शिक्षण आहे तिसरा डोळा शिकवण महात्मा फुलेंची
बहुजन समाज शिक्षित व्हावा आरक्षण देवून किमया शाहू राजांची
संविधानात दिले रे सारे अधिकार अशी हुशारी बाबा भीमाची
बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर आहे एक तलवारीचे टोक
त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।।३।।
ईश्वर आत्मा व्यर्थ कल्पना
करती सारे झूट वल्गना
देवतांचा बाजार असा मांडला जिथे रासलीलांचा सामना
कर्मकांड होती रे घराघरात मांडुनी तुमच्या जीवना
जा बुद्धाच्या घरा जिथे आहे प्रज्ञा शील करुणा
नको मनी हि वासना कशाची होतो विनाश हा थेट
त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।। ४ ।।
जन्म पुनर्जन्माचे नाते सारे सांगती कोणी जन्माला बाप माझा येती
नाही समजे समाज आंधळा अंध श्रद्धेची झोप घेती
जागा करण्या समाजाला या कार्य घ्या रे हाती
बुद्ध चरणी नतमस्तक आज सारे जग जाती
बांधून चाललो बुद्धाच्या विचारांची मुठ
त्या बहुजनाला सार्या जनाला दाखवल भीमान बुद्धाकडे बोट ।। ५ ।।

टिप्पण्या