ओबीसींचा धर्म कोणता ? ओबीसी हिंदू आहेत का ?



ओबीसी लोक अलीकडच्या काळात स्वताला हिंदू समजत असले तरी त्यांचा धर्म हिंदू नाही एखाद्या माणसाला त्याचा धर्म अमुक आहे असे केव्हा म्हणता येईल जेव्हा त्याच्यावर त्या धर्माचा काहीएक संस्कार विधी झालेला असेल जेवढे धर्म आहेत त्या धर्मात माणसाला त्या त्या धर्माचा अधिकृत सदस्य करण्यासाठी दीक्षा देण्याची पद्धत अवलंबली जाते जगातल्या सर्वच धर्मात असे नियम आहेत ख्रिश्चन धर्मात मुल विशिष्ट वयात आल्यावर त्यांना बाप्तिस्मा दली जाते मुस्लिमात सुंता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही शीख धर्माची दिक्ष घेतल्याशिवाय शीख होता येत नाही ज्यू पारशी जैन बौद्ध या धर्मातही असे संस्कारविधी केले जातात तरच माणूस अधिकृतपणे त्या धर्माचा मनाला जातो समाज हि तसे मानतो सरकारचा कायदाही तसे मानतो
या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मात काय दिसते ? हिंदू धर्मीय समाजात पाच मुख्य विभाग आहेत या विभागाला वर्ण म्हणतात हे या आधी आपण पहिले आहेच या वर्ण व्यवस्थेला हिंदू धर्माच्या सर्व धर्मग्रंथाचा अमी धर्म शास्त्राचा भक्कम आधार आहे या पाच पैकी फक्त ब्राह्मण वर्णातील मुलांनाच उपनयन विधी म्हणजे मुंज करण्याचा अधिकार आहे असे हिंदू शास्त्र सांगते हा विधी केला म्हणजे ती मुल हिंदू धर्मीय मानली जातात ब्राह्मणाला हा विधी अनिवार्य आहे काही ठिकाणी क्षत्रिय व वैश्य या वर्णातील मुलांची मुंज केली जाते शूद्रांना मात्र कोणत्याही परिस्थितीत उपनयन करण्याचा अधिकार हिंदू शास्त्र देत नाही शुद्र माणसाना मुंज करण्याची अनुमती नसते हिंदू धर्मात प्रवेश करण्यासाठी किंवा माणूस हिंदू आहे यावर शिक्कामोर्तब आवश्यक असलेला धार्मिक विधी करण्याची परवानगी शूद्रांना नाकारली आहे याचा अर्थ असा होतो कि गेल्या शेकडो वर्षात शुद्र समाज कधीच हिंदू नव्हता तसेच अतिशुद्रनाहि याचा अधिकार नव्हता म्हणजे हे दोन वर्ग हिंदू नाहीत
या ठिकाणी असे नमूद केले पाहिजे कि भारतीय समाजातील एकही स्त्री हिंदू नाही नकारान कुठल्याहि वर्णाच्या स्त्रीला मग ती ब्राह्मण असली तरी तिला मुंजीचा अधिकार नसतो किंबहुना त्याला पाप समजले जाते तात्पर्य स्त्री शुद्र अतिशूद्र यापैकी कुणीही हिंदू नाही हिंदू धर्म्शास्त्रानीच त्यांना हिंदू मानायला आणि बनायला नाकारले आहे
 गोष्ट म्हणजे शुद्र समाजातील माणूस स्वतःहून मी हिंदू आहे म्हणत असला तरी त्याला वेदासारखे हिंदू ग्रंथ वाचण्याची  हाताळण्याची परवानगी नाही गंमत  पहा माणूस स्वतःला हिंदू म्हणतो पण  आपल्या स्वतःच्या
धर्माचे शास्त्र हातात घेवू शकत नाही वचने दूरच राहिले कुठल्याही ओबिसीने सांगावे कि त्याने वेद उपनिषदे मनुस्मृती हि मुल धर्मशास्त्रे आजपर्यंत कधी हातात घेतली आहेत काय ? हातात राहूद्या डोळ्यांनी पहिली आहेत काय ? त्याने चुकून धर्मशास्त्रे हातात घेतली कि धर्म बुडतो आणि धर्म बुडाला म्हणून त्याला शिक्षा सुनावली जाते
आपण जर पहिले तर ओबीसी हा हिंदू होवू शकत नाही त्याने पाला मुय्ल धर्म शोधावा  असा कोणता धर्म आहे जो ओबीसींनी घेतला होता ओबीसी या शब्दात खूप मोठा विरोधाभास आहे जो लोकांनी करून ठेवला आहे
आता जागे होवून बदल घडवला पाहिजे
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र