राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले


वकील डॉक्टर झाली मिनिस्टर फिराया लागलीस गाडीत
माझी सावित्रीबाई नसती असती गुरांच शेणकुड झाडीत
राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांची आज १८३ वि जयंती आहे जयंतीच्या निमित्ताने शाळामध्ये सावित्रीमाई यांची जयंती साजरी केली जाते पण पूजन मात्र सरस्वतीचे होते आजही आपल्या शिक्षण व्यवस्थेला ब्राह्मणी व्यवस्थेचा विळखा आहे किती कर्तुत्व आहे माझ्या सावित्रीमाईच पण त्यांच्या पेक्षा सरस्वती किती महान आहे हे सांगितलं जात शाळामध्ये तर स्वरस्वती पूजन केल्याशिवाय वर्गच  व्यवस्थेला हाणून पडले पाहिजे ज्या सावित्रीमाई यांनी उन वर पाऊस  याची तमा बाळगली नाही आणि मुलीना शिकवले त्यांना त्यांच्या लेकी विसरल्या असो आपण सावित्रीमाई यांच्या जीवनातील काही घटनावर प्रकाश टाकूया
माई  यांचा जन्म हा ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा  जिल्ह्यातील नायगाव ता खंडाला येथे खंडोजी नेवशे पाटील यांच्या घरी झाला माई  यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती त्यांच्या लहानपणाची एक प्रसिद्ध घटना आहे  त्यावेळी त्यांचे वय होते सात वर्षाचे त्या एकट्याच शिखल गावाच्या बाजाराला गेल्या होत्या बाजारातून परत असताना त्या काही तरी खात होत्या त्यांनी पहिले काही मिशनरी लोक एका झाडाखाली गाणी म्हणत होते सावित्रीमाई तेथे थांबल्या एका मिशनरी कार्याकार्याने हे पहिले व तो सावित्रीमाई यांना म्हणाला अशाप्रकारे रस्त्यात खाणे बरोबर नाही हे एकटाच सावित्रीमाई यांनी  हातातले खाद्यपदार्थ फेकून दिले आपले म्हणणे एकले म्हणून तो कार्यकर्ता खुश होवून त्यांना एक पुस्तक दुइले जे मिशनरी लोक आपल्या धर्म प्रचारासाठी वापरतात ते पुस्तक होत ते घरी आल्यावर त्यांनी ते पुस्तक  आपल्या पित्याला दाखवले वडिलांना राग आला त्यांनी ते पुस्तक दूर फेकून दिले नंतर वडिलांचा राग शांत झाल्यावर सावित्रीमाई नि ते पुस्तक जपून ठेवले यावरून त्यांना पुस्तकांचा किती जिव्हाळा आणि शिक्षणाची किती आवड होती हे दिसून येथे
आणि एकीकडे बहुजन लोकांच्या हितासाठी निसर्गाला महामानवाला जन्माला घालायचं होत म्हणून त्यांनी महात्मा फुले यांची निवड केली असावी त्यावेळी अस म्हटलं तर गैर नसाव अस मला वाटते महात्मा फुलेंच्या आयुष्यात खूप वाईट घटना आल्या घरदार चांगले असतानाही त्यांना शुद्र अतिशूद्र कल्पना सहन होत नव्हत्या त्यांना तरव त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नातून हाकलून दिले हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे ते घरी आले त्यांनी आपल्या पित्याला हि माहिती सांगितली कि बाबा मला असे का हाकलून दिले तेव्हा त्याचे वकील सांगतात बर झाल आता पेशवाई नाही नाहीतर तुला हत्तीच्या पायी दिल असत त्यावर फुले त्यांना उत्तर देतात बाबा आता हे मी सहन करणार नाही आणि त्याच्या क्रांतिकारी जीवनाला खरी सुरुवात येथून झाली ब्राह्मणवादाला विरोध  सुरुवात केली त्यांनी जाणले कि या समाजाला जोपर्यंत अज्ञानाच्या खाईतून वर काढत नाही तोपर्यंत या समाजाची उन्नती नाही आणि१८४० साली त्यांचा विवाह   सावित्रीमाई यांच्याशी झाला निसर्गाला जणू वाटल होत कि हीच दोन रत्ने आहेत ती मानवाचा उद्धार करू शकतील आणि लग्नानंतर फुलेंनी जाणले कि जरसमाजाला सुधारायचे असेल तर प्रथम त्या घरातील स्त्रीला सुधारले पाहिजे आणि १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली त्यावेळी मात्र ब्राह्मण वर्गात गोंधळ उडाला ब्राह्मणी वर्ग खवळला प्रलय झाला आपली संस्कृती बुडाली आपला धर्म बुडला म्हणून ब्राह्मण लोक आपली छाती बडवू लागले पण शाल तर काढली पण त्या वर्गात येणाऱ्या मुलीना शिकवणार कोण म्हणून फुलेंनी सावित्रीमाई यांना शिकवायला सुरुवात केली रास्त्री ते सावित्रीमाई यांना शिकवीत मग सावित्रीमाई ते मुलीना शाळेत शिकवीत असे चालले असताना  ब्राह्मणी लोकांनी त्यांना खूप विरोध केला सावित्रीमाई यांच्यावर कधी शेन तर कधी दगड तर कधी थुंकणे असे करत असत एक दिवस झाला सहन केले असे दोन तीन दिवस गेल्यावर त्या यातना असह्य झाले त्या फुलेना म्हणाल्या आता नाही सहन होत लोक मला शेन फेकून मारतात थुंकतात आणि त्याच कपड्यात नाही मी मुलीना शिकवू शकणार दुसरा तिसरा असता तर म्हणाला असता जावू इतका त्रास कशाला सहन करतेस राहा घरी आरामात पण महामानव ते त्यांनी सावित्रीमाई यांना सांगितले सावित्री अग या समाजाला या व्यवस्थेतून वर काढण्यासाठी आपल्याला हा संघर्ष करावाच लागेल तू तीन लुगडी घे एक जाताना घाल नंतर तू शाळेत गेल्यावर ते बदल आणि दुसरे घाल आणि मुलीना शिकव अग मिली शिकल्या तरच हा  सुधारणार आहे किती अनोखी विचार सारणी आहे फुलेंची
काही भाती पिलावळीने  गोविंद राव यांचे कान भरले तुमचा मुलगा आणि सून धर्म बुडवायला निघालेत आणि त्या वेळी महात्मा फुलेना आपल घर सोडव लागल त्यावेळी सावित्रीमाई यांनी आपल सासर सोडलं आणि त्याच समयी मुलींच्या शाळे पाठोपाठ १५ मी १८४८ साली शूद्रांच्या मुलामुलींसाठी पहिली शाळा पुणे येथे उघडली सावित्रीमाई यांनी शिक्षणाचे काम अगदी निर्भीडपणे सुरु ठेवले त्या अत्यंत खुल्या मनाच्या होत्या त्यांच्या मनात जराही अस्पृश्यतेला जागा नव्हती  त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद शुद्रासाठी खुला केला
आम्हाला सांगितले जाते कि सरस्वती विद्येची देवता पण जर आपण फोटो पाहिलं तर तिच्या हाती काय आहे वादनाच साधन मग थोडा विचार करा जी वादनाच साधन वापरते तिला शिक्षणाचा काय गण माहित असणार आणि त्यावेळी ती उत्पन्न झाली होती कशावरून पुरावा नाही म्हणजे ती काल्पनिक होती याला शंकाच नाही उलट पण पहिले तर सावित्रीमाई याचं जीवन पहा न वयाची बालपणाची ९ वर्षे सोडली तर ५७ रशे त्या समाजकार्य करत होत्या अचंबा वाटेल अरे नवव्या वर्षापासून समाजसेवा म्हणजे काय साधी घटना नाही महानायीकांचा जीवन संघर्ष हा असा आहे त्यांनी वयाची ५७ वर्षे समाजकार्यात वाहून घेतली
१८७६ ते १८७७ हा काळ त्यावेळी भीषण दुष्काळाचा होता त्यावेळी फुलेंनी अन्न छत्र उभारले सावित्रामाई स्वत स्वयंपाक करीत आणि त्यावेळी २००० लोकांपेक्षा जास्त लोक अन्न छात्रावर येत जेवण्यासाठी त्यांना जेवण देण्यास कधी दिरंगाई नाही केली
त्यावेळी एखाद्या स्त्रीचा नवरा मेल तर त्या स्त्रीला सती जावे लागे पण फुलेंनी स्त्रियांना आव्हाहन केल कि कुणीही सती जावू नका काही स्त्रिया तर गर्भवती असायच्या आणि त्यांच्यापुढे आत्महत्ये शिवाय पर्याय नसायचा अश्या स्त्रियांना फुलेंनी आसरा दिला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली त्यावेळी १०० स्त्रियांचे बाळंतपण सावित्रीमाई यांनी केल १०० बालकांचा सांभाळ त्यांनी केला किती थोर विचारांच्या होता माई  एवढ्यावर त्या थांबल्या नाही काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले ते १८७३ साली त्याला नुसत दत्तक नाही घेतलं त्याला आपल्या मुलाप्रमाणे जपल डॉक्टर केल त्यांना नंतर त्या मुलाने हि आपल्या मात्यापित्याप्रमाणे समाजसेवेसाठी स्वताला वाहून घेतलं सावित्रीमाई नुसत्या शिक्षिका किंव्हा समाजसेविका नव्हत्या तर उत्तम दर्जाच्या कवयित्री होत्या त्यांनी नुसते ट  ला ट  जोडून काव्य लिहिले असे नाही उत्तम दर्जाच्या भाषेत त्यांनी आपली काव्ये लिहिली त्यांची काव्ये फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यग्रंथ प्रसिद्ध आहेत
 विद्येविन गेले वये गेले पशु
स्वस्थ नका बसू विद्या घेणे
शुद्र अतिशूद्र दुःख निवाराया
 इंग्रजी शिकाया संधी आली
इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडा
भटजी भारुडा फेकुनिया
असे सावित्रीमाई यांचे विचार असत सावित्रीमाई आणि महात्मा फुले यांच समाज सेवा चालू होत्या आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळावा तसे घडले २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंच महापरीनिर्वाण झाल त्यांच्या अंत्यसंस्कार करतेसमयी काही लोकांनी अडथळा आणला इतिहासात अशी घटना पहिलीच घडली कि आपल्या पतीच्या शवाला पत्नीने अंत्यसंस्कार केले जिथे पतीसोबत पत्नी सती जायची तश्या प्रथा मोडीत काडल्या आणि १८९१ ते १८९७ पर्यंत सत्य शोधक समाज संघटनेचे नेतृत्व त्यांनी केल १८९७ साली महाराष्ट्रात प्लेग ची साथ आली त्यावेळी पुण्यात मोठ्या प्रमाणात होती या साथीमुळे कुटुंबाच्या कुटुंबे उधवस्त होत होती ती विदारक परिस्थिती नाही पाहवली त्याकाळी काही लोक आपल जीव वाचवण्यासाठी दुसरीकडे जात होत्या पण सावित्रीमाई रुग्णांना वाचवण्यासाठी झटत  होत्या घरोघरी जावून प्लेगचे रुग्ण शोधत असत आणि त्यांच्यावर इलाज करायला यशवंत याच्याकडे नेत असे करताना त्यानाही प्लेगची लागण झाली आणि त्यांची प्राणज्योत १० मार्च १८९७ साली मावळली खर्या अर्थाने अश्या युगाचा अंत होत होता जो या सृष्टीच्या नवनिर्माणाचा होता त्याने पेटवलेला शिक्षणाचा दिवा मात्र जळत राहिला तो आजपर्यंत आजही शिक्षणाचा दिव्बा तसाच जळत आहे फक्त परिस्थती बदलली काही लोकांनी विकृतीकरण करून या महानायीकेला अंधारात टाकण्याच प्रयत्न केला पण शेवटी तेजोमय तारा होत्या त्या त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याच आज आपल्याला पाहायला मुळात
पाहूया नक्की काय परिणाम झाला त्यांच्या विचारांचा या समाजावर तो
भारतीय धार्मिक ग्रंथांनी स्त्रियांना अतिशय हीन दर्जा दिला आहे मग ती स्त्री ब्राह्मण असली तरी तिला कसलाही अधिकार नव्हता आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केल्यावर अगदी स्पष्ट दिसुन येते कि स्त्री हि त्यावेळी पुरुषांची एक भोगवस्तू होती जिला कोणताच दर्जा नव्हता स्वताची अशी कोणतीच ओळख नव्हती शिक्षण तर दूरच राहील अश्या अवस्थेत सावित्रीमाई यांनी स्त्रीशिक्षानामध्ये स्वताला झोकून दिले स्त्रीला शिक्षण मिळावे म्हणून फुले दांपत्य  अहोरात्र जातात होते त्याचा परिणाम आज असा झाला कि एका भारतीय विधवेला या देशाची पंतप्रधान होता आल कुणामुळ झाल बाबासाहेबांनी घटना लिहिताना महात्मा फुले यांच्या विचारणा समोर ठेवले अनिओ स्त्रियांना सर्व क्षेत्रात आरक्षण मिळवून दिले आज ब्राहाम्न स्त्री असो अब बहुजन स्त्री जी उच्च झेप घेते न त्यामागे महामानव  आणि महानायीकांचे बलिदान आहेत आज ब्राहाम्न स्त्रीला सुद्धा गुलामीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी कोणती देवी किंवा देवता नव्हती आली तेव्हा सावित्रीमाई यांनी ब्राह्मण स्त्रियांना सहारा दिला होता स्त्रीला मुक्ती प्रदान केली स्त्री जन्मा तुझी काय कहाणी असे कोणी विचारले आणि इतिहास पहिला तर डोळ्यात अश्रू उभे राहतात आणि आज त्याच स्त्रिया सावित्रीमाई यांना मानायला तयार नाहीत अश्या नालायक स्त्रियांना लाज वाटायला पाहिजे तुम्ही हिंदू असा नाहीतर बौद्ध असा तुम्ही कोणत्याही धर्माच्या स्त्री असा पण तुमचा उद्धार हा मत सावित्रीमाई मुले झाला हे विसरू नका कोण कुठली सरस्वती आणली आणि तिला विद्येची देवता केली
विद्येची खरी देवता हि माता सावित्रीमाई आहे हे निर्विवाद सत्य आहे त्याला कोणत्या पुराव्याची गरज नाही लागत आज स्त्रिया मोठ मोठ्या पदावर आहेत त्या कुणामुळे जर या मातेने स्त्री शिक्षणासाठी त्रास यातना सहन केल्या नसत्या तर कुठे असती स्त्री अरे ज्यावेळी त्यांच्यावर चिखलफेक शेणफेक थुंकण्याचे प्रकार घडले तेव्हा आताची स्त्री म्हटली असती मला काही गघेण देन नाही तुमचा लढा तुम्ही लढा मी माझ घर सांभाळते पण त्यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समाज सेवा केली
म्हणून म्हणाव लागत
तू शिकलीस बाई  खरी तुझा मेंदू नाही घरी तू गुलामीत ग बरी तुझी बुद्धी ब्राह्मणा घरी
तू शकलीस बाई  खरी
जिने मुक्त केले ग तुला तू विसरली त्यांच्या कुळा  का जावूनी परत भेटते गुलामीला लाज नाही वाटे ग तुला
शिक्षण घेतले तू जरी तरी अडाणी का राहिली तरी तू शिकलीस बाई  खरी
होत जीवन तुझ ग नरकापरी तुला समाजात आणल माणसापरी
सोडून देग गुलामी सारी जा बुद्धाच्या तू दरी
कर वंदन फुलेंच्या पायी तू आठव सावित्री माई जन्मभरी
तुला दिले हक्क मानावापारी बाई  वंदन कर त्या बाबासाहेबांच्या चरणी
तुला दिला मातेचा दर्जा त्या वीरांनी  करवंदन तू माझ्या शिवबा चरणी
तुला रक्षिले बहिनिपारी कर वंदन त्या शंभूराजेंच्या चरणी
म्हणून म्हणतो ग स्त्री जन्मा तुझी कहाणी
आठव आता तू सावित्रीमाई
तमाम बहुजन बांधव भगिनींना सावित्रीमाई  यांच्या जयंतीच्या बुद्धमय सुभेच्छा
जय शिवराय
जय भीमराय



रविंद्र  सावंत
हि तपासनीस
मुसाड  ग्रामस्थ बौद्धजन परिवर्तन मंडळ [रजि ] मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र