आंधळे देवाचे भक्त

देव देव करती सारे देवाचे हे भक्त
देवाच्या साठी नाहक वाहते आहे मानवाचे रक्त
नका घालवू वाया जीवन देव नसे रे जगती 
मानवाच्या कल्याणासाठी हवी बुद्धाची शांती ।। धृ ।।
रामाचा जन्म नसे रे माहित कोणाला 
राम मंदिर बांधून फायदा काय तुम्हाला 
बडव्यांचे ते कारस्थान कधी कळणार या समाजाला 
आता तरी जागी होरे बहुजना नाही तर जावे लागेल तुला त्या रसातळाला 
जागी या कोणी नसे देवाचा अंश रे संत आपले सांगती 
मानवाच्या कल्याणासाठी हवी बुद्धाची शांती    ।। १ ।।
गीतेत सांगतो कृष्ण मीच या जगाचा दाता 
एवढे अत्याचार झाले तुला पाझर फुटेना आता 
आयुष्य घालवले समाजाने या नाव तुझे घेता 
कसा झुकेल तुझ्या चरणी बहुजनाचा माथा 
रासलीला पाहून लोक बलात्कार रे करती 
मानवाच्या कल्याणासाठी हवी बुद्धाची शांती  ।। २ ।।
महादेवाच्या लिंगाची पूजा करती इथे सारेजण 
साप कधी का दुध पितो रे जाणा हे विज्ञान 
ज्या देशाची परंपरा ऐशी कोणाला त्याची जान 
बलात्कार करण्याला हेच खर कारण
नाही शास्त्राला कोणाचा आधार ते बेवारश ठरती
मानवाच्या कल्याणासाठी हवी बुद्धाची शांती   ।। ३ ।।
देव देव नाही राहिले देवांचे शुद्ध आचरण
झाले पहा त्यांच्या राज्यात बलात्कार
इतिहासाला नाही कशाचा आधार
जागी आज सारे लोक आहेत निराधार
तरी लोक अंध होवुनी नाव त्यांचे जपती
मानवाच्या कल्याणासाठी हवी बुद्धाची शांती   ।। ४ ।।
या देशाची संस्कृती महान बुद्धाचीभूमी
आरे छातीठोक जगाला सांगतो आम्ही
नाही केला मोह कशाचा नाही पहा इतिहास तुम्ही
होवून गेले राजे इथले होते शूर पराक्रमी
म्हणूनच त्यांच्या चरणी माथा आपोआप हो झुकती
मानवाच्या कल्याणासाठी हवी बुद्धाची शांती    ।। ५ ।।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र