नामांतर

 
मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन आणि आंबेडकरी जनता
आज दिनांक १४ जानेवारी २०१४ नामविस्तार दिन म्हणजे बाबासाहेबांचे मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यात आले तो दिवस आणि त्या नामविस्तारानंतर काही क्रांतिगीते उदयास आली त्यातील एक गीत असे आहे
भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले  राव
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव
भीमरायाच्या नावासाठी रक्त सांडले राव .....
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....

पाहून भीमाची क्रांती, ती क्रांती सलत होती.....
ज्ञानाचे पेरले मोती त्याचे नावच नव्हते वरती ....
नामांतराने विद्यापीठाला जगात आला भाव ......
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....

गौतमने प्राण गमावला.....
पोचीरामने लढा लढविला ...
सुहासिनी आणि प्रतिभाने .....
जातिवाद्यांना धडा बडवला .....
बलिदानाचा महिमा गाईल इथले गाव अन गाव .....
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव .....

भीम नाव कमानी वरती ....
पाहून भटोबा झुरती .......
झुरता झुरता अर्धे मरती ....
दवाखान्यात होती भरती ....
नाव पुसाया येतील त्यांच्या वर्णी बसतील घाव ......
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ......

आनंदी किशोर झाला......
त्या नामांतर दिनाला आनंद भिडे गगनाला....
सांगे पटवून दिन जनाला .....
भीमरावांनी असा जिंकला हा नामांतर डाव .....
असेल कोणी माईचा लाल तर पुसून दावा नाव ...

असे क्रांती गीत पण जेव्हा आम्ही विचार करतो का बाबासाहेबांच्या लेकरांना त्यांच्या नावासाठी रक्त सांडावे लागते ज्या बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहून तमाम भारतावर एकाप्रकारे उपकार केले आहेत त्याच भारतात त्यांची उपेक्षा का व्हावी खर तर या नामांतरासाठी रक्त का सांडावे लागले हेच समजत  नव्हते कारण तेव्हा आम्ही लहान होतो पण जसे जसे शिक्षणाबरोबर इतिहासाची समज यायला लागली आणि या नामांतराचे गुपित समजले गेले नामांतराला या महाराष्ट्रात खूप विरोध झाला इतका कि काही हुतात्मा झाले काय गरज होती त्यांना आपले जीव गमवायची पण बापाच्या नावासाठी लढणारे हे शूर लढवय्ये होते त्यांची नावे अशी आहेत गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे, अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर, ज्ञानेश्वर साखरे, डोमाजी कुत्तरमारे, चंदर कांबळे, जनार्दन मवाळे, शब्बीर अली काजल हुसैन, रतन मेंढे, सुहासिनी बनसोड, नारायण गायकवाड, अब्दुल सत्तार, दिवाकर थोरात, जनार्दन मस्के, भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे, प्रतिभा तायडे, गोविंद भुरेवार, शरद पाटोळे, मनोज वाघमारे, कैलास पंडित, रतन परदेसी.  बाबांच्या या लेकरांना प्रथम त्रिवार
आज बाबासाहेबांच्या लेकरांना बाबांच्या नावासाठी संघर्ष करावा लागतो  काय दुर्भाग्य आहे या भारतभूमीचा  सुपुत्र ज्याने सारया  जगाला दाखवून दिले कि भारत देश या जगात किती महान देश आहे पण त्याचा महात्माच्या नावासाठी संघर्ष करावा लागणे हेच  मनाला पटत नाही इतिहास साक्षी आहे कि बाबासाहेबांनी किती यातना सहन केल्या केवल या भारत देशासाठी  पण या भारताने त्यांना काय दिले त्यांच्या लेकरांना त्यांच्या नावासाठी लढावे लागणे एकजूट हि खरी संघटना असते पण आम्हाला ती कधी समजली नाही
मध्यंतरी दलित पँथर  उदयास आले मोठी गर्जना केली बाबांच्या नावाने त्याकाळी पँथरच्या  डरकालीने  सारा भारत देश हादरला होता पण हाच पँथर शिवसेनेच्या जवळ गेला आणि मांजर होवून बसला नामांतराच्या वेळी सेनेच्या अध्यक्षाने विषारी फुत्कार टाकले त्याने ह्या बाबासाहेबांच्या समाजाला म्हटलं होत यांच्या घरी नाही पीठ ते कशाला मागतात विद्यापीठ आज ते हयातीत नाहीत पण आजला ते जिवंत असते तर मात्र नक्की कि आज त्यानाही वाटल असत तेव्हा मी चुकलो होतो आणि त्यांनी मरतेशेवति काबुल केल रामदास आठवलेला आपल्या युतीत घेतलं कारण जाणीव झाली कि बाबासाहेबांच्या लेकरांना जर साथ केली तर आपण सत्ता काबीज करू पण उद्धव नि त्यावर पाणी टाकले त्याला कारणीभूत  ठरली सध्याची महानगर पालिका निवडणूक आजही दादरच्या नामांतर होण्याला काहींचा विरोध  आहे पण ते जाहीरपणे विरोध नाही करत बाबांच्या लेकरांना आता गरज आहे एकमेकांची साथ देण्याची शेवट कसाही झाला तरी जेव्हा मराठवाडा विद्यापीठला बाबांचे नाव मिळाले त्याचीही एक गोष्ट आहे नामांतराच पहिली गोष्ट कुणी काढली असेल त ती शरद पवार यांनी पुण्यातील नवीन पेठेत असणाऱ्या समाजवादी भवनात असणाऱ्या कार्यक्रमात शरद पवार यांनी  नामांतराची पहली गोष्ट केली त्यावेळी मराठवाडा मध्ये गोविंद श्रॉफ यांचा प्रस्थ होत आणि ते समाजवादी विचाराचे होते त्यांना मराठवाड्यात शह देण्यासाठी पवारांनी त्या सभेत एक गुगली टाकली ती म्हणजे पवार त्या कार्यक्रमात भाषण करताना म्हणाले बाबासाहेबांच्या पद्पर्शने मराठवाडा भारावलेला आहे तर आपल्याला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांच नाव द्यायला काय हरकत आहे हे शरद  पवारांचं वक्तव्य आहे  त्यानंतर मात्र नामांतराची लाट उसळली आणि त्याच नामांतराला शरद पवारांनी विरोध केला ज्यांनी नाव सुचवले त्यांनीच नावाला वरोध केला जोडीला बाल ठाकरे यांनी तर कहरच केला म्हणे यांच्या घरात नाही पीठ हे कशाला मागतात विद्यापीठ जणू हे त्यावेळी बाबांच्या समाजाला पीठ पुरवत होते त्यांनी त्यावेळी पिठाची गिरणी चालू केली असावी म्हणून कदाचित त्यांना असे जाणवले असणार कि यांच्या घरी पीठ नाही आजही हाच मनुवादी चेहरा पांघरून काही लोक बसले आहेत अश्या लोकांना इशारा आहे येणारा काळ हा बाबांच्या लेकरांचा आहे हे धान्यात ठेवा मराठवाडा तर झालाच आता दादर हि करू चैत्यभूमी
मर्दानी चाल हि आमची आमच्या हाती तलवारीची पात
आडवे जर आलात तर वाघावानी फाडू हि जयभीमवाल्यांची जात


जय शिवराय

जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र