महार आणि मराठा...................
मानववंश शास्त्रज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर मानववंश शास्त्राचा वापर करीत म्हणतात महार आणि मराठे दोन भिन्न नसून एकच आहेत त्यासाठी ते महार आणि मराठा यांच्या ज्ञातीची कुळे सारखीच असल्याचे सांगतात महार आणि मराठे यांच्या कुळात असणारे साम्य म्हणजे दोघांमध्ये सारखीच कुळे आहेत दोघांचे टोटेम देखील सारखेच आहे. आणि असे फक्त त्याच लोकांमध्ये असू शकते जे भिन्न नसून एकच कुळातील असणारे असू शकतात आणि बाबासाहेब म्हणतात कि हे भाऊबंद आहेत तरच ते एका वंशाचे सिद्ध होतात {द अनटॅचेबल १९४८ पेज ६४} यावरून निष्कर्ष काढता कसा येईल यासाठी पाहावे लागते मराठा समाजचे पूर्वीचे नाव काय होते ते यासाठी इसवी सणाच्या आधी आधी जावे लागते बुद्ध काळात या भूमीला गणसंघाचा दर्जा असल्याचे दिसते अंगुत्तर निकाय मध्ये रठ्ठीक शब्दाचा वापर हा गणराज्य प्रणालीतील राजाच्या पदांनंतर चा दर्जा असणारे पद मानले जाते यावरून रठ्ठीक रास्टिक राष्ट्रिक हे लोकांचे नाव नव्हते शिaaवाय अशोकाच्या काळात महारठ्ठ देश अस्तित्वात असल्याचा उल्लेख सापडतो त्यावेळी महारठ्ठ हे गणसंघ राज्य होते आणि रठ्ठीक पेत्तनिक व भोज यांचा उल्लेख अशोकाच्या अभिलेखात आलेलाआहे यावरून स्पष्ट दिसून येते महारठ्ठ हे गणराज्य नसून गणसंघ राज्य होते या महारठ्ठ गणसंघातील उच्च शासकीय पद रठ्ठीकाचे होते म्हणजेच रठ्ठीकाचे पद भूषवणारा महारट्ट गणसंघाचा महार हा महत्वाचा व प्रमुख गण घटक होता हे मान्यच करावे लागते त्यामुळे रठ्ठीक रठ्ठ हे दुसरे तिसरे कोणी नसून महार च होते तसेच गणसंघाचा दुसरा गण घटक हा भोज होते सातवाहन काळात महारठ्ठ गणसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महार गण प्रमुखांना महारठी अशी उपाधी लावली जायची तर भोज याना महाभोज उपाधी लावली जायची
या महाराष्ट्रात महत्वाच्या दोन लोकांची संख्या जास्त सापडते एक मराठा व दुसरे महार प्रांतानुसार संख्याबळ विभागलेले असते कुठे महार जास्त तर कुठे मराठे जास्त पण जेव्हा दोघांचे प्राचीनत्व सिद्ध करण्यास जावे तेव्हा मात्र ते दोघे भिन्न नसून एकच असल्याचे सिद्ध होते
आत दोघांच्या नावात विशेष महत्वाची गोष्ट सांगतो दोघांच्या नावात नाक शब्दाचा उल्लेख सापडतो आता महारथी आणि महारठी हे दोन नसून एकच आहेत हे त्यांच्या नावावरून सिद्ध होते भाजा बेडसा व कार्ले या लेण्यात अभिलेखात महारठी व महारठीनि अशी नावे सापडतात
आत भगवानलाल यांनी त्यांना महारथी म्हणजे महान योद्धा असे अर्थ लावला पण बेडसा लेण्यात २ नंबर च्या लेण्यात महारठीनि असा स्त्रीवाचक शब्द येतो त्यामुळे त्याला महायोद्धा असे काही शब्द प्रयोग करता येत नाही महारठी म्हणजे आजचे मराठे असे भांडारकर म्हणतात तर महाराष्ट्रातील कुडा येथील गुहालेखात महारठी व महाभोज यांच्यामध्ये विवाहसंबंध होत असत आणि महाभोज यांच्या स्त्रीवाचक नाव महाभोजीनि असे आहे तेव्हा महाभोज हे देखील जनवाचक नाव असल्याचे स्पष्ट होते
महारजनसंघाच्या राष्ट्रीकरणातून महाराष्ट्राची निर्मिती झाल्याचे स्पष्ट दिसते
आता महाराष्ट्रात कुलवंशावली या ग्रंथामुळे ९६ कुळी नावाचे नवे वादळ आपणास पाहायला मिळते वास्तविक यात काही फरक नाही महार व मराठे यांच्या मध्ये भिन्नता नसून एकाच घरातील दोन मुले असेच आहेत आता थोडे यांच्याकडे लोकांचे जास्त लक्ष न गेल्याने ते कुळामध्ये अडकले पण वास्तविक पाहता मराठे ह्यांच्यासाठी कुलवंशावली शब्द वापरते महाराष्ट्रिक महाराष्ट्रे म्हणजे मराठे तर इसवी सनाच्या चौथ्या शतकातील शक नृपती श्रीधरवर्म्याच्या एरन येथील शिलालेखात सत्यनाग हा महाराष्ट्रिक असल्याचे म्हणवतो { से } ना {प } तिसत्यनागेन म{हाराष्ट्रा} भिजणंनागप्रमुखन माहाराष्ट्रेन { ण }
यात श्रीधर वर्माचा सेनापती सत्यनाग हा महाराष्ट्राचा असल्याचे सांगितले जाते यावरून एक लक्षात येते कि सत्यनाग हा महार सेनापती असून त्याला महाराष्ट्रिक म्हटले जात असे त्यामुळे मराठे म्हणून ज्यांना महाराष्ट्रे म्हटले जाते ते वास्तवात महार असल्याचे स्पष्ट होते
आता महत्वाचे म्हणजे बहुतांश महाराष्ट्रातील लोकांनी लेणी करण्यास मदतकेलेली आहेत आणि ती देखील बौद्ध लेण्या महाराष्ट्राचा वारसा हा बौद्ध धम्माच्या अगदी जवळ नेणारा आहे वास्तवात महाराष्ट्र हा बौद्धमय असल्याचे येथील लेण्या आणि त्यातील शिलालेख सांगतात सातवाहन यांच्या काळात बौद्ध लेण्यात याचे पुरावे सापडतात
भाजे लेण्यात १७ नंबरच्या विहारातील शिलालेखात नादसव नावाच्या नागाने विहारातील खोली दान केल्याचा उल्लेख सापडतो
सहाव्या सातव्या आठव्या आणि नवव्या दागोबावर छोटे छोटे शिलालेख आहेत त्यातील एकावर आदरणीय स्थविर अंपिनाक यांचा स्तूप असल्याचा उल्लेख आहे
कुडा येथील पाच नंबरच्या लेण्यातील शिलालेखात नागनिका हे नाव आलेले आहे लेणी २४ मध्ये नाग गृहस्थी आणि व्यापारी यांचे दान केलेली आहेत
व्यापारी वसूलनाक यांनी दान केलेली लेणी २५ व २६ क्रमांकाची आहे तर २७ क्रमांकाची लेणी हि वाहमीत याची बायको पुसनाक याची आई सिव दता हिने लेणी साठी दान केले आहे
बेडसा लेण्यात नासिक च्या सेठ आनंदाचा मुलगा पुष्पनाक याचे दान आहे तर चैत्यगृहाच्या पाण्याच्या टाकी च्या वर खडकांवर महारथींनी महादेवी समदिनीका हिचे आहेआणि हि महाभोजाची मुलगी आणि अपदेवनाकाची बायको आहे
कार्ले येथील लेण्यातील सुरुवातीचे शिलालेख आहेत त्यातील मोठ्या चैत्यगृहात सिंह स्तंभावर गोतीचा मुलगा महारथी अग्निमित्रनाक याने सिंहस्तंभ दान केल्याचा लेख आहे
शेलारवाडी येथील शिलालेखात घेनुकाकट येथे राहणारा कुणबी शेतकरी उसभनाक याची बायको सियागुणनिक आणि तिचा गृहस्थी मुलगा नंद यांनी लेण्याला दान केले आहे जुन्नर येथील पहिला लेख बराचसा नष्ट झाला असून शेवटचा भाग फक्त थंभूतीनाक असा आहे शिवनेरी येथील चैत्यगृहात वीर सेन नाक नावाच्या मुख्य गृहपती आणि सचोटीच्या व्यापाऱ्याने सर्व जगाच्या कल्याणासाठी व सुखासाठी दान केले आहे असा उल्लेख आहे
अजून बहुतांश लेण्यात अगदी सामान्य शेतकऱ्याचे नाव देखील कोरण्यात आलेले आहे यावरून स्पष्ट होते कि येथील लोकांचे मुख्य इतिहास हा महर गणातील लोकांचा आहे ज्यांना महाराष्ट्री मध्ये महार म्हटले जाते तर विविध भागात त्यांची नावे वेगळी आहेत
महाराष्ट्राच्या या दोन जाती आज प्रमुख मानल्या जातात तर यांचे कुल मात्र एकच आहेत
इतिहास मराठा लोकांचे कुल हे महार लोकांच्या मुळाशी नेवून सोडते तर महार हे एका गणाचे लोक आहेत असे इतिहास सांगतो अगदी पुराव्यानिशी आणि यांचा संबंध बौद्ध धम्माशी आल्याने आता हिंदुत्ववादी लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो कि आमचे अस्तित्व काय ?
महाराष्ट्राचे महार गण हे प्रामुख्याने प्रमुख मानले जाते नागपूर हि नागांची राजधानी होती अशोकाने महाधम्म रक्षितास महारठी देशात पाठवले असून दीपवंश महावंश मध्ये त्याचा उल्लेख सापडतो बौद्ध साहित्यात महाराष्ट्राचा उल्लेख सापडतो शिवाय सातवाहन राजांच्या इतिहासात महारठी आणि महाभोज यांचे संबंध दाखवले आहेत जे वारंवार येतात गणसंघ चा प्रमुख म्हणून महारठी पद महारांचे असायचे याचे दाखले सातवाहन राजांच्या इतिहासात मिळतात ते दाखले अशोकाच्या हि मिळतात ते शक राजांच्या लेखात हि मिळतात तर इतके सारे स्पष्ट असताना मराठ्यांनी स्वतःचे मूळ शोधण्यास काय हरकत आहे
तुमचा इतिहास हाच आहे कि तुमचा पूर्वज दुसरा तिसरा कोणी नसून महार नागगणातील नागवंशी लोक आहेत अन्यथा तुमची कुळे आणि टोटेम सारखी नसती
बौद्ध इतिहासात तुम्हाला स्वतःचे अस्तित्व आजवर ओळखता आलेले नाही तुम्ही इतरांच्या सांगण्यावरून स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले असले तरी इतिहासाच्या मुळापर्यंत जाताना महार शब्दापाशी येऊन च थांबावे लागेल
जय शिवराय जय भीमराय
{ टीप ; मानववंश शास्त्र अनुसार महार मराठे भिन्न नसून एकच आहेत }
टिप्पण्या