शिकवण बुद्धाची नाव घेतलं ईश्वराच
बुद्ध तत्वांचा येशु ख्रिस्तावर प्रभाव
बुद्ध तत्व प्रणालीचा येशु ख्रिस्तावर प्रभाव असू शकेल का अशी कल्पना यापूर्वी हास्यास्पद वाटत असे परंतु आज अभ्यासांती असे स्पष्ट झाले आहे कि बुद्धाची तत्वे येशूने आपल्या शैलीत सांगितली बुद्धानंतर येशु ख्रिस्ताचा ५०० वर्षांनी झाला तर येशु नंतर ६०० वर्षांनी महमद पैगंबराचा जन्म झाला म्हणून बुद्धाचा प्रभाव येशूवर पडला तर येशूचा प्रभाव इस्लामवर पडला या दोन्ही विश्वधर्मावर बुद्धाच्या तत्वांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आपण प्रथम येशु ख्रिस्ताचा इतिहास पाहूया
येशूचा जन्म बौद्ध राष्ट्रात ; बायबल नुसार येशूचा जन्म पहिल्या शतकात यहुदी जमातीतील राज्यात झाला परंतु हेरोद राजाच्या भीतीमुळे येशूला मिस्र देशात गुप्तपणे न्यावे लागले मात्र राजा हेरोद मरण पावल्यावर येशु आपल्या आई सोबत इस्रायल मध्ये येवून नासेरंथ नावाच्या गावी राहिला आणि येशूचे जन्मकाळी युरोपात बौद्ध धम्माची आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञांची लाट होती येशूच्या जन्मकाळी बुद्ध धम्म हा एकमेव विश्वधर्म होता आणि बुद्धाचे तत्वज्ञान कोणालाही नवीन नव्हते कोणतेही नवीन पंथ निर्माण होते समयी बुद्धाच्या तत्वज्ञानाला वाट विचारीत मार्गक्रमण करावे लागत असे
बुद्धानंतर निर्माण झालेले अनेक धर्म पंथ आज आधुनिक काळात कालबाह्य ठरत आहेत काही धर्मग्रंथांचे पुनर्लेखन केले जात आहे काहींची तर मरगळलेली अवस्था आहे तर काहींची धर्ममते संपुष्टात येत आहेत मात्र २५०० वर्षानंतरही बुद्धाचे मुल तत्वज्ञान नवयुगाला अधिकच गरजेचे वाटू लागले आहे जसजसे वैज्ञानिक शोध लागत जातील आणि जग विनाशाकडे वाटचाल करील तसतशी बुद्धाच्या तत्वांची आवश्यकता सिद्ध होत जाईल हे माझे विधान मुल बुद्ध तत्वाशी संबंधित आहे बुद्ध तत्वे सर्वकालीन आहेत म्हणून तर २५०० वर्षापूर्वी निर्माण झालेल्या या धर्म्विचारांची तुलना कालच्या मार्क्सवादाशी करण्याचा मोह विद्वानांना सुटत नाही ख्यातनाम इतिहासकार आनंद कौशाल्यायन आपल्या दर्शन : वेदशे मार्क्सतक ग्रंथात म्हणतात मार्क्सवाद भी बौद्ध धम्म कि तरह दर्शन और धर्म दोनो है दर्शन हमने कि यद्यापि मार्क्सवाद बौद्ध धम्म नाही और बौद्ध धम्म मार्क्सवाद नाही लेकिन उनके दार्शनिक दृष्टीकोन कितना मिळता जुळता है दोनो अनीश्वरवादी दोनो अनात्मवादी दोनो प्रतिक्षम परिवर्तनवादी तसेच अलीकडे एक महान स्वामी रजनीश { ओशो } होवून गेले त्यांच्यावर बुद्ध धम्माचा इतका प्रभाव पडला होता कि ते स्वताला बुद्ध म्हणवून घेत याच्यापुर्वीही बौद्ध धम्माचे कट्टर शत्रू आद्य शंकराचार्य स्वताला प्रच्छन्न बुद्ध म्हणवून घेत थोडक्यात सांगायचे म्हणंजे २५०० वर्षानंतरही जी तत्वे गरजेची वाटत ती येशूच्या वेळी तितकीच महत्वाची असावी म्हणून तर येशु लहानपणापासून बौद्ध तत्वज्ञानाकडे झुकत गेला समता बंधुता मानवतावाद अहिंसा दया करुणा हि तत्वे प्रथम बुद्धाने सांगितली मग त्याची पाठीराखन येशूने केली असे स्पष्ट दिसते
येशूचे अज्ञात जीवन : बौद्ध विहारात येशूचे बायबल मध्ये १३ वर्षापासून ३० व्या वर्षापर्यंतचा जीवन काळ पाहायला भेटत नाही आणि या काळात येशु कुठे होता हेही बायबल मध्ये सापडत नाही कारण याचा पुरावा भारतात लदाख मधील हिमस गुफेत सापडतो येशूच्या १७ वर्षाच्या अज्ञात काळाचा उल्लेख इथे सापडतो भारतात येशूचा अज्ञातवास काढल्याच स्पष्ट होत आणि हिमस गिफ हि बुद्धीस्म गुफा होती येशूने वयाची १७ वर्ष्जे बुद्धाचे तत्वज्ञान शिकण्यासाठी घालवली हे आपल्याला हिमस गुफेत येशूने लिहिलेले पुस्तक पाहिल्यावर स्पष्ट होत तसेच नेतोवीच हा रशियन विद्वान तिबेटात हिंडत असताना भारतच्या लदाख भागात हिमस गुफेत आला तिथे त्यांना एक पोथी मिळाली तिच्यात येशूने स्वतः लिहिलेले पुस्तक मिळाले त्यात येशूने भारत निवासाचे वृत्त ग्रंथित केले होते तसेच या आधारावर नेतोवीच यांनी एक पुस्तक लिहिले दि अन्योन लाइफ ऑफ जिजस ख्रिस्त यात येशूच्या जन्माचा सर इतिहास लिहिला पण अमेरिका सरकारने हे पुस्तक बंद पडले ते जप्त करण्यात आले पोपने तर त्याची छायाप्रत जाळूनच टाकली येशूचा मृत्यू समयी काश्मीर मध्ये होता असा तारीख इ अंजाम या अरबी ग्रंथात मौ महमद अलीने उल्लेख केला आहे इ सन १८७३ साली आय विटनेस नावाचे येशूच्या जीवनावरील एका इंग्रजी पत्र फ्रेंच संशोधकाने अमेरिकेत प्रसिद्ध करून खूप मोठी खळबळ उडवून दिली होती
बुद्धाचीच तत्वे येशूने सांगितली : येशु ख्रिस्ताने बुद्धाची सारी तत्वे आपल्या शैलीत सांगितली आणि येशु म्हणतो सुद्धा कि मी जुने मोडण्यासाठी आलो नाही प्रेषित आपले जीवित कार्य म्हणून धार्मिक सिद्धांत जाहीर करतो किंवा दैवी आज्ञा लोकांना कळवितो प्रेषित हा पूर्णतः नवे सिद्धांत मांडत नसून तो केवळ धर्माचे नुतानिकरण करणारा असतो तथागत बुद्धाची बहुतेक मुलभूत तत्वे येशूने आपल्या पद्धैने नव्या अर्थाने सांगितली बुद्धाने आशियातील लोकांना पचेल रुचेल अश्या तऱ्हेने तत्वज्ञान निर्माण केले ते जसेच्या तसे युरोपियन समाजाला लागू पडणे शक्य नव्हते म्हणून बुद्धाची तत्वे येशूने युरोपियन माणसाच्या भूमिकेतून युरोपियाना सांगितली आता फरक एवढाच बुद्धाने सांगितले मी मार्गदाता आहे येशूने मात्र मी मोक्षदाता सांगितले बुद्धाचे पंचशील जसेच्या तसे त्याने सांगितले आणि येशूने जगाला ईश्वर सांगितला बुद्धाने मात्र ईश्वर नाकारला म्हणून येशूचा धर्म आज जास्त आहे जर येशूने जगाला बुद्ध सांगितला असता तर तो स्वत खोटारडा झाला असता कारण चमत्कार हा त्याच्या जीवनाचा पाया होता येशूचा जन्माचा चमत्कारातून झाला आहे त्यामुळे त्याने जर जगाला बुद्ध सांगितला असता तर लोकांनी त्याला फसवा म्हटले असते दुसरी गोष्ट त्याच्या आईला लोकांनी व्यभिचारी म्हटले असते कारण येशूचा जन्म हा पवित्र आत्म्यापासून झाल्याच बायबल सांगते त्यामुळे कदाचित त्याने जगाला ईश्वर सांगितला
येशूने जगाला ईश्वर का सांगितला याच एक कारण आहे ते म्हणजे जर त्याने जगाला बुद्ध सांगितला असता तर त्याला एक अर्हत भिख्खू म्हणून नावलौकिक मिळाला असता पण ईश्वर सांगितल्याने त्याला लोक ईश्वराचा पुत्र माणू लागले हा एक महत्वाचा मुद्दा ठरतो त्यामुळे य्शुने जगाला बुद्ध ऐवजी ईश्वर सांगितला आज सर्व ख्रिश्चन लोकामध्ये जी शिकवण आहे ती म्हणजे बुद्धाची आहे मात्र नाव भेटलं ईश्वराचे बुद्धाने जगाला ईश्वर सांगितला असता तर आज सारे विश्व बुद्धमय असते पण सत्यवादी धम्म भलेही थोडा कमी आहे पण नक्कीच जगात पहिल्या क्रमांकावर आहे
वाचकांनी याचा विचार करावा काही जन ख्रिस्ती धर्म प्रसाराकांच्या जाळ्यात अडकतात पैस्याच्या मोहाला बळी पडून बुद्धाला सोडून येशूकडे जातात पण त्या लोकांनी हेही ध्यंत घ्यावे कि जगात येशु अगोदर बुद्ध आले होते जर बुद्ध स्वताला मानवतावादी मनात असतील दैवी येशु कसा होवू शकतो चिंतन करा मनन करा आणि बुद्धालाच शरण जा कारण निर्वाणाचा महान मार्ग फक्त बौद्ध धम्मातच सापडतो
जय शिवराय
जय भीमराय
टिप्पण्या