आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ८
बाबासाहेबांचे पैलू पाहताना बाबासाहेबांचा महत्वाचा पैलू पाहूं या तो असा आहे कि बाबासाहेब यांच्या बाबतीत लोकांना पूर्ण कल्पना नसते त्याचे एकमेव कारण बाबासाहेब यांना लोकांनी समजून घेण्यात केलेली चूक आज बाबासाहेब यांचे शेतकरी आणि शेतमजूर यांचा उद्धार करण्यासाठी काय काय केले हे सांगणे आवश्यक आहे शेतकरी शेतमजुरांचे उद्धारक : बाबासाहेब आंबेडकर
भारत हा देश कृषिप्रधान म्हटले जाते पण आज या देशात शेतकरी वर्गाची खूप बिकट अवस्था आहे आज शेतकरी आत्महत्या करतो आहे सरकार निष्क्रिय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला वेगळे स्वरूप देवून त्याला विषयाच्या बाहेर फेकण्याचे काम केल जात आहे याच वेळी आपल्याला बाबासाहेब यांच्या तत्व ज्ञानाची आवश्यकता भासते ती अशी
बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील शेतकऱ्यांचा आणि शेतीचा विचार १९१८ मधेच केलेला आहे त्यांनी small holdings in india and their remedies नावाने पुस्तक लिहिले . जीवनाशी सबंधित असा शेती उद्योग असल्याने त्यांनी विशेष काळजी घेतलेली आहे गंभीरपणे शेतीचा विचार त्यांनी केलेला आहे भारतातील लहान धारण क्षेत्रे होण्याची कारणे कोणती याचा विचार केलेला आहे वारसा हक्क हि उपजीविकेचे साधन म्हणून लहान लहान तुकड्यात केले जाते याचीही चर्चा केली धारणाक्षेत्राचा आकार वाढविणे व तुकडे जोड करणे याचीही चर्चा केली आहे
उपभोगाचा निकष न लावता उत्पादनाचा निकष लावून किफायतशीर धारण क्षेत्रे ठरविणे योग्य आहे असे बाबासाहेब यांना वाटे लहान व मोठे धारण क्षेत्रे यांचा विचार करणे गौण आहे तर जमीन भांडवल व श्रम हे उत्पादक घटक महत्वाचे आहेत असे बाबासाहेब यांना वाटत होते आज हि जमीन श्रम आहे पण भांडवल नसल्याने शेतकरी शेती चांगली करू शकत नाही
there is danger of too much agriculture in india ला उत्तर म्हणून बाबासाहेब यांना औद्यागीकीरन हाच खात्रीचा उपाय वाटतो कारण यामुळे शेतकऱ्या बरोबर बेकारांचा हि प्रश्न सुटेल आणि देशाच्या आर्थिक विकास पण होईल
on small holder 's felilef bill '' अल्प भूधारक मदत विधेयक हे श्री अंडरसन यांनी दिनांक १०/१०/१९२७ ला मुंबई कायदे मंडळात मांडले problem of scatterd farms आणि problem ऑफ small farms ह्या दोन समस्यांचा विचार करण्यासाठी हे विधेयक होते ह्या दोन्ही समस्येवर अंडरसन यांनी दोन उपाय सुचवले सुचवले होते पहिला उपाय जमिनीच्या विभाजनावर नियंत्रण व दुसरा होता एकसंघ धारणक्षेत्राची विक्री
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या विधेयकावर जोरदार हल्ला चढविला आणि सांगितले कि केवळ धारणक्षेत्राचे आकारमान वाढवून शेती किफायतशीर करता येत नाही तर त्यासाठी भांडवलाचा योग्य पुरवठा होणे आवश्यक आहे भांडवलाचा तुटवडा हि खरी भारतीय शेतीची समस्या आहे हे आज हि तंतोतंत खरे आहे हे पटते ह्यामध्ये त्यांची दूरदृष्टी दिसून येते
भांडवला अभावी बी बियाणे औजारे औषधी इत्यादी घेत येत नाही यामुळे उत्पादनावर परिणाम होतो म्हणून भांडवल आवश्यक आहे तसेच इतर वाईट बाबी टाळण्यासाठी सहकार शेतीचा उपाय सुचवला
जमिनीच्या विभाजनावर नियंत्रण आणले तर वारसा हक्काने जो छोटासा जमिनीचा तुकडा मुलांना मिळत होता तो हि बंद होवून भूमिहीन होण्याची पाळी येईल व दारिद्र्य अधिक वाढेल असे बाबासाहेब यांचे मत होते म्हणून त्यांनी त्यास विरोध केला एकंदरीत या विधेयकातील त्रुटी दाखवून व उपाय सुचवून छोट्या शेतकऱ्याचे हित कसे करता येईल याचा प्रयत्न बाबासाहेब यांनी केला आहे
महत्वाचे गोष्ट म्हणजे भारतातील अनेक लोकांनी फक्त त्रुटीच दाखवल्या केवळ उणीवच शोधल्या आजवर त्यावर कोणता उपाय केला पाहिजे हे आजवर कोणी सांगितले नव्हते पण बाबासाहेब असे एकमेव होते ज्यांनी ज्या ज्या गोष्टीस विरोध केला आहे त्यांनी ज्या ज्या गोष्टीमध्ये त्रुटी आहेत हे दाखविले आहे त्यावर त्यांनी उपाय देखील सुचविले आहे असे व्यक्तिमत्व दुर्लभच असते असे बाबासाहेब होते
स्वतंत्र मजूर पक्ष : बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ ला या पक्षाची स्थापना केली कि भारतातील सर्व जातीधर्माच्या श्रमजीवी जनतेच्या हक्काच्या लढ्यासाठी आणि त्यांनी यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही इथे सर्व जातीधर्माचे समूहाचे लोक सामील करता येतील असे धोरण त्यांनी त्या पक्षाचे होते
शेतकऱ्यांच्या हिताचे दृष्टीने खालील बाबींचा समावेश केला होता
१} शेतीची प्रगती होवून तो धंदा जास्त फलद्रूप व्हावा म्हणून landmarkej बँका उत्पादक शेतकरी वर्गाच्या सहकारी पतपेढ्या व खरेदी विक्री करणाऱ्या मार्केटिंग सोसायटीज यांची स्थापना या पक्षाचा कार्यक्रम आहे
२} शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान लहान तुकड्यात होणारी विभागणी असून त्यामुळे भांडवल गुंतविण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही असे या पक्षाचे मत आहे
३} सर्वसाधारण पणे जमीनदाराकडून होणारी शेतकरी कुळांची पिळवणूक अगर त्याजकडून जमिनीचे भागलेपण काढून घेण्याची जमीनदाराची प्रवृत्ती शेतकऱ्यांच्या हिताला विरोधी असल्यामुळे त्यापासून शेतकरी कुळांचे सरंक्षण व्हावे अश्या स्वरूपाचे कायदे करण्याचा प्रयत्न हा पक्ष करील
४} शेतकरी वर्ग व कामगार वर्ग यांना सुधारलेल्या राहणी प्रमाणे राहता यावे यासाठी त्यांच्या मुशाहिऱ्यांची किमान मर्यादा आवश्यक असा स्वरुपात हा पक्ष करील
५ } कारखान्यातील कामगारांच्या हिताला आवश्यक असे जे कार्य हा पक्ष करणार आहे तेच कार्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक अशा स्वरुपात हा पक्ष काम करील
६} जबर व्याज खोटे घोटाळ्याचे व्यवहार करणाऱ्या सावकारापासून गरीब व ऋणको चे सरंक्षण होण्यासाठी व शेतकऱ्याला ऋणमुक्त करण्यासाठी योग्य असे कायदे घडवून आणण्याचा प्रयत्न हा पक्ष करील
७} जमीन धरा पद्धती - करधारा पद्धती अत्य्नात आक्षेपार्ह असून ती सुधारण्याविषयी या पक्षाचे प्रयत्न होतील
अशा प्रकारचे बाबासाहेब यांनी आपल्या पक्षाच्या जाहीर नाम्यात ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्या त्यांनी घटनेच्या परीशिष्ट मध्ये समाविष्ट केले आहेत यासाठी घटनेतील {१ ,२,६,७,९,११ } हि परिशिष्टे पाहिल्यावर समजून येईल कि बाबासाहेब यांनी शेतकऱ्याच्या हिताकडे कसे लक्ष दिले आहे ते
खोतीबील : बाबासाहेब यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे दिनांक १७ फेब्रुवारी १९३७ ला खोती पध्दत नष्ट करण्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात सदर केले खोती पद्धत मध्ये शेतसारा गोळा करण्यासाठी शासनाने खोतांची नियुकिती केलेली असे हा खोत गरीब कुळांकडून शेतसारा वसूल करीत असे व काही हिस्सा शासनाच्या तिजोरीत भरत असे व त्यांनतर हे खोत गरीब कुळांना त्रास देत जुलीम करीत निरनिराळे मोबदले न देता काम करून घेत यामुळे असंतोष निर्माण तीन खोताना ठार केले शांतता भंग होवू नये म्हणून हि पध्दत नष्ट करण्याची मागणी बाबासाहेब यांनी केली कुळ म्हणून जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याची गुलामिगिरी नष्ट व्हावी म्हणून विधेयक मांडणारे व हल्ला चढविणारे बाबासाहेब हे भारतातील पहिलेच लोकप्रतिनिधी होते हे लक्षात घेण्यासारखे आहे जमीनदाराणा योग्य अशी नुकसान भरपाई देणे आणि कुळांना वहितिचा अधिकार मिळवून देणे हे या विधेयकाचे उद्धिष्ट होते खोती पद्धत नष्ट करणे आणि ज्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात जमीन आहे त्या गरीब कुळांना land revenue code १८७९ नुसार वहिवाट दार म्हणून घोषित करून रयतवारी पद्धत सुरु करणे यासाठी हे विधेयक प्रस्तावित केले होते
सावकारी नियंत्रण : सावकाराकडून शेतकऱ्याची पिळवणूक होत होती याची बाबासाहेब यांना पूर्ण खात्री होती त्याची माहिती होती आणि बाबासाहेब यांना शेतकर्य बद्दल असलेला कळवला पाहण्यात येतोच कि बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत आणि या सावकाराच्या कर्जाच्या जाचातून शेतकऱ्याची मुक्तता व्हावी म्हणून १९३८ ला बाबासाहेब यांनी मुंबई सावकारी विधेयक तयार केले व या विधेयकात काही बाबी नमूद केल्या त्या अश्या
१ } सावकाराने आपला व्यवसाय करण्यासाठी परवाने द्यावेत या परवान्याची मुदत एक वर्षाची असावी दरवर्षी परवान्याचे नुतनीकरण केले जावे
२} सावकाराने गैरवर्तन केल्याचे सिद्ध झाल्यास हा परवाना रद्द केला जावा
३} कर्ज देण्याबाबत लेखी व्यवहार करावा धनको ऋणकोस या व्यवहाराची नोंद असलेले खाते पुस्तक द्यावे
वरील तरतुदी पाहिल्यास लक्षात येते कि आजच्या हि काळात याची गरज आहे असे जाणवते यावरून असलेली दूरदृष्टी आपल्याला दिसून येते
मोर्चा : बाबासाहेब यांना शेतकऱ्या विषयी असणारा जिव्हाळा त्यांच्याविषयी असणारे प्रेम किती होते याची जाणीव करून द्यावी लागते हेच आपल्या शेतकरी लोकांची शोकांतिका आहे बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वैधानिक मार्गाने त्या सोडवण्यासाठी त्यांनी दिनांक १० जानेवारी १९३८ रोजी मुंबई विधिमंडळ वर वीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावरून कौन्सिल हॉल कडे नेला होता यामध्ये मिरजकर आणि पेंडसे हे कम्युनिष्ट नेते सुद्धा सामील होते आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या काही मागण्या करण्यात आल्या त्या अश्या प्रकारे होत्या
१} जमीन कसणाऱ्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळालेच पाहिजे
२} खोत इनामदार यांच्यासारखे मध्यस्त नकोत
३} शेतकऱ्यावर कर अगर पट्टी बसवण्यापूर्वी त्याला चरीतार्थापुरती योग्य सोय करून दिली पाहिजे
४} शेतसारा बाक्याप्रमाणे थकलेल्या खंडाच्या बाक्याही माफ कराव्यात
५} जमिनीचे किमान उत्पन्न ठरवून त्यापेक्षा कमी उत्पन्नावर सारा अजिबात माफ करावा
६} ७५ रुपये अगर त्यापेक्षा हि कमी शेतसारा देणाऱ्यांचा सारा ५०% नि कमी करावा
७} तीन वर्षे जमीन करणाऱ्या कुळाला कायम कुळ समजले जावे
८} जमिनीविषयक प्रश्नांची पाहणी करण्यासाठी आयोग नेमावा
९} लहान शेतकऱ्यांची पाणीपट्टी ५०% नि कमी करावी
१०} सर्व खेड्यात मोफत चराई राणे असावीत
११} कर्ज निवारण कायदा लागू होईपर्यंत कर्ज तहकुबी जाहीर करावी
अश्या प्रकारे बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या विधिमंडळ समोर ठेवून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे
२० जुलै १९४२ ला बाबासाहेब इंग्रजांच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री म्हणून चार वर्षे कामकाज केले आणि या कालावधी मध्ये बाबासाहेब यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या काही योजना पार पडण्याचा प्रयत्न केला आहे
१} अधिक धान्य पिकवा मोहीम : बाबासाहेब इंग्रजांच्या कार्यकारी मंडळात असताना भारतामध्ये दुष्काळ पडला होता गरिबी बरोबर शेतकऱ्यांचे हि उपासमारीने मरण येणार म्हणून बाबासाहेब यांनी अधिक धान्य पिकवा मोहीम राबविली शेती उत्तम प्रकारे कशी करावी याबाबतचा प्रसार या मोहिमेद्वारे करण्यात आला प्रत्यक्ष अनुभवातून प्रसार यावा म्हणून बाबासाहेब यांनी दिल्लीच्या निवासस्थानी रिकाम्या जागेतील हिरवळ काढून तिथे गव्हाचे उत्तम पिक काढले अनेक भाज्या पालेभाज्या लावल्या होत्या आणि त्याचा संपूर्ण हिशेब सविस्तर लिहून ठेवला होता आणि भेटण्यास येणाऱ्या कास्तकार लोकांना ते अनुभव सांगत
२} दामोदर घाटी योजना : शेतीला उपयुक्त ज्या ज्या योजना आहेत त्याचीही जान बबहेब यांना होती म्हणून त्यांनी शेतीचा विकास होवून शेतकरी सुखी व्हावा म्हणून दामोदर घाटी योजना कार्यान्वित करण्याचे ठरविले दामोदर नदीच्या पुराने पिके घरदार संपत्ती व जीवित्ताहणी होत असे पुराचा तडाका बंगाल बिहार आणि आसाम मधील नद्यांमुळे बसत असे दामोदर नदीचाही अनुभव तोच होता बाबासाहेब यांनी दामोदर घाटी योजना तयार त्याची ब्लू प्रिंट तयार केली होती त्याचा उद्देश होता
The Damodar river is the first river project along this line it will be a multipurpose project it will have the object of not only preventing floods in the damodar river but also have the object of irrigation navigation and the production of electricity
हा दामोदर घाटी चा प्रकल्प करते वेळी हुशार इंजिनिअर ची गरज होती ब्रिटीश सरकारला पटवून देवून ब्रिटीश इंजिनिअर न घेता अमेरिकेतील टेनेसी व्हलि authority येथे असलेले वूरदुईन इंजिनिअर ला घेतले व हे काम त्यांच्याकडे सोपवले या योजनेचे प्रमुख म्हणून एन एन खोसला या भारतीय इंजिनिअर ची नियुक्ती महत्वाचे म्हणजे भारतीय लोकांना प्रथम प्राधान्य देणारे बाबासाहेब कधी लोकांच्या पुढे आणले नाही हे वास्तव आहे
त्याच प्रमाणे बाबासाहेब यांनी दुसरा एक प्रकल्प घेतला महानदी वर धरन बांधण्याची योजना तयार केली याही योजनेचा उद्देश एकाच होता कि शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे तसेच त्यातून वीजनिर्मिती सुद्ध व्हावी यासाठी व यातून जीवित हानी वित्तहानी टाळावी म्हणून केलेल्या योजना पाहिल्यावर मुख्य इंजिनिअर बी के गोखले यांनी देखील या योजना बरोबर असल्याचे सांगितले आहे
आता आपण या इंग्रजांच्या मध्ये राहून भारतीय शेतकऱ्यासाठी बाबासाहेब यांनी केलेले कार्य पाहता बाबासाहेब हे देशद्रोही होते हे बोलणाऱ्या बोलघेवड्या लोकांच्या तुलनेत आजच्या शेकरी वर्गाला समजेल कि बाबासाहेब यांचे त्यावेळच विचार किती महत्वाचे आहेत ते आणि भारताला स्वातंत्र्य ,मिळाल्यावर बाबासाहेब यांनी घटना समितीला जो मसुदा दिला होता राज्ये आणि अल्पसंख्यांक म्हणून यामध्ये शेती आणि शेतकऱ्या बाबत जे विचार त्यांनी स्पष्ट केले होते ते असे होते
१} शेती हा राज्याचा उद्योग असावा
२} मालक कुळ किंवा गहाण वर घेणारा धनको या नात्याने खाजगी व्यक्तीच्या ताब्यात असलेले उद्योगधंदे विमा आणि शेतीची जमीन यांच्या वहीवाटीचे हक्क राज्याकडे असावेत या खाजगी व्यक्तींना जमिनीच्या मुल्याइतकी भरपाई सरकारी कर्जरोख्याच्या रूपात दिले जावी सक्तीने ताब्यात घेण्यासाठी या कारखाना यांचे मुली निश्चित करताना आणीबाणी मुले येणारी वाढ भावी काळातील संभाव्य किंवा अनर्जित मुल्य किंवा सक्तीने ताब्यात घेण्यासाठीचे कोणतेही मुल्य यांची दाखल राज्याने घ्यायची गरज नाही
३} कर्जरोखा धारण करणाराला रोख रक्कम मिळवण्याचा हक्क कोणत्याप्रकारे आणि केव्हा असेल हे राज्य ठरवील
४} सदर रोख्याचा विनिमय करता येईल आणि त्यावर वारसाहक्क राहील तरी मुल रोखाधारकाकडून ज्याला रोखा मिळाला ती व्यक्ती मूळ रोखाधारकाचा वारस यांना सरकारने ताब्यात घेतलेली जमीन किंवा कोणत्याही औद्यागिक कंपनीस हितसंबंध परत मिळण्याची मागणी करता येणार नाही अथवा त्या मालमत्तेबाबत कोणताही व्यवहार करता येणार नाही
५} कायद्याने ठरविल्यानुसार रोखाधारकास रोख्यावर व्याज मिळवण्याचा हक्क राहील हे व्याज रोख रूपाने या वस्तुरूपाने व योग्य वाटले त्या पद्धतीने सरकार घेईल
६}शेती उद्योग कोणत्या पायावर उभा केला जाईल हे बाबासाहेब सांगतात i } ताब्यात घेतलेल्या जमिनीची प्रमाणबद्ध आकाराच्या शेतामध्ये सरकार विभागणी करील खेड्यातील कुळांना म्हणजे कुटुंबाच्या गटांना पुढील अटीवर शेते लागवडी साठी दिली जाइल अ } शेतीची लागवड सामुदायिक पद्धतीने केली जाईल ब } सरकारने जारी केलेल्या नियमानुसार आणी आदेशानुसार शेतीची लागवड केली जाईल क} शेतीवर निश्चित केलेई आकारणी दिल्यांनतर शेती उर्वरत उत्पन्न राज्याने ठरविलेल्या कुटुंबाने वाटून घेतील
ii } जात पंथ असा भेद न करता गावातील रहिवाश्यांना जमीन भाड्याने दिली जाईल या पद्धतीत कुणी जमीनदार असणार नाही कुणी जमीनदार यांचे कुळ असणार नाही आणि उणी भूमिहीन व मजूर असणार नाही iii }शेतीसाठी पाणी जनावरे अवजारे खत बियाणे इ चा पुरवठा करून सामुदायिक शेतांची लागवड करण्यासाठी आर्थिक तरदूत करणे राज्यावर बंधनकारक राहील iv } राज्याला पुढील बाबतीत हक्क राहतील अ} शेती उत्पन्नावर पुढीलप्रमाणे आकारणी करता येईल १ } जमीन महासुलीसाठी एक भाग २ } कर्जरोखे धारकांना परतफेड करण्यासाठी एक भाग ३} पुरवठा केलेल्या भांडवल वस्तूच्या वापरासाठी एक भाग ब } जी कुळे कुळ कायद्याच्या नियमांचा भंग करतील किंवा राज्याने दिलेल्या लागवडीच्या साधनांचा योग्य वापर न करता हेळसांड करत असतील किंवा सामुदायिक शेती योजनेला बाधा येईल अशी कृती करतील त्यांना राज्य योग्य ती शिक्षा करून शकेल
आता यातून बाबासाहेब यांचा शेतीविषय किती महत्वाचा हेतू आपल्याला स्पष्ट दिसेल शेतकरी भूमिहीन कधी होता कामा नये म्हणून बाबासाहेबांचे विचार पाहता शेतकऱ्यांनी त्यावर विचार करण्याची गरज आहे कारण बाबासाहेब यांनी शेतकऱ्याला खरा मार्ग दिला आहे यशस्वी होण्याचा शेती आणि शेतकरी यांचा विचार बाबासाहेब यांनी राज्य समाजवादाच्या दृष्टीकोनातून पाहिले आहे आपण देखील त्याचा विचार केला पाहिजे
आता यांचा संविधानात काय तरदूत आहे ते पाहणे आहे पहा काय आहे ती
भारतीय संविधान कलम ४८ मध्ये लिहिले आहे कि आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषी व पशुसवर्धन याची सुस्त्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणी चि गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्याच्या कत्तलीस मनाई करणे या करता उपाय योजना करील
सातवी अनुसूची मध्ये शेतकऱ्याच्या हिताच्या बाबी या सूचीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत काळजीपूर्वक पाहिल्यास शेतकऱ्यांचे हिताच्या बाबी लक्षात येईल
आता आपण पाहू शकता कि बाबासाहेब यांनी नुसता शेतकरी यांचा विचार केला नाही तर त्यांच्या सोबत राबणाऱ्या जनावरांच्या कत्तली होणार नाही याची देखील खबरदारी घेतली आहे आज जे लोक धर्माच्या नावाने राजकारण करत आहेत त्यांना हि मोठी चपराक आहे कि बाबासाहेब यांच्या धोरणांचा विचार केला असता तर आज बाबासाहेब यांच्या दृष्टीने पहिले असते तर इतके नक्की आज या देशाची प्रगती इतर राष्ट्रांच्या तुलनेत खूप पुढे असती बाबासाहेब यांनी पाहिलेली हि दूरदृष्टी होती पण या देशाने बाबासाहेब यांच्याकडे पाहिले ते या देशाचा दलितांचा नेता म्हणूनच पण बाबासाहेब यांच्यातील काही गुण पाहिले असते तर आज या देशाने खरे बाबासाहेब कोण होते हे पाहणे आवश्यक आहे बाबासाहेब यांच्या कोणत्याही अभ्यासाचा भाग पाहता बाबासाहेब यांनी शेतकरी वर्गाला दिलेला महत्वाचा इशारा आज या शेतकरी वर्गाने समजून घेतला असता तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यास नसत्या
दुसरी गोष्ट बाबासाहेब यांचे सामुदायिक शेती हा काय प्रकार आहे हा आज हि शेतकऱ्याला समजलेला नाही बाबासाहेब यांच्या या महत्वाच्या विषयावर कोणी आजवर ना विचार केला ना त्यांचा आचार केला पण बाबासाहेब यांच्या नावाचा फक्त राजकारण केले आणि बाबासाहेब यांना एका जातीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आज आम्ही करतच आहोत बाबासाहेब हे शेतकरी मजुरांचे किती विचार करीत होते याची प्रचीती येते पण हे बाबासाहेब आमच्यापुढे कधी आलेच नाही कारण आम्ही ते पुढे येवू दिलेच नाही
शेती व शेतमजूर यांच्या हिताचा विचार करणारे बाबासाहेब इथल्या शेतकरी व शेतमजुराला आज हि माहित नाही म्हणून त्यांच्या माहितीसाठी आम्ही एक प्रयत्न करतो आहे कि बाबासाहेब यांचे हे रूप समजून घ्या त्यांना फक्त संविधान निर्माते म्हणून किंवा अश्पृश्यांचे पुढारी म्हणून न पाहता दूरदृष्टी असणारा नेता म्हणून बघा त्यांच्या विविध पैलू अभ्यासून घ्या मग समजेल बाबासाहेब या भारतातील एक महामानव आहेत म्हणून जातीमध्ये न पाहता देशाच्या सर्वोकृष्ट भूमिपुत्रापैकी एक भूमिपुत्र ,म्हणून बाबासाहेब यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे उर्वरित पैलू पुढील भागात पाहू
जय शिवराय जय भीमराय

टिप्पण्या