धम्मचक्र अनुवर्तन नव्हे धम्म चक्र प्रवर्तनच


१४ ऑक्टोबर १९५६ भारताच्याच नव्हे जगाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्रांती जी  जगातील सर्वच क्रांती मोडून काढीत नवा इतिहास घडवला गेला बाबासाहेबांच्या या क्रांतीचे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी  कोरला गेला हा इतिहास  रक्ताचा एक हि थेंब न सांडता केलेली धम्म क्रांती जगाच्या इतिहासात पहिलीच होती . धम्म स्वीकारला तेव्हा तारीख १४ ऑक्टोबर ची होती या दिवशी स्वीकारलेला धम्म भारताच्या इतिहासात बुद्ध धम्माल नवजीवन देणारे ठरले या भारतात बौद्ध लोक  असले तरी धम्म मात्र नामशेष होता हे मानावेच लागते महाबोधी विहार बुद्धाचे असून देखील बुद्धाचा धम्म नव्हता बुद्धाला या भारतात जिवंत  करून केलेली क्रांती हि बुद्धाच्या धम्म क्रांतीचेच रूप आहे 
सारनाथ इथे बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन केले तर बाबासाहेब यांनी नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन केले  माझे हे म्हणणे थोडे धाडसाचे आहे कारण एकीकडे बुद्धाने हि धम्मचक्र प्रवर्तन केले आणि बाबासाहेब यांनी हि धम्म चक्र प्रवर्तन केले तर ते कसे काय केले  अनेक विद्वानांचे मत असते कि धम्मचक्र हे फक्त सम्यक संबुद्ध च प्रवर्तित करू शकतात   इतर सामान्य लोकांना ते शक्य नसते आणि हेच कारण आपण पुढे घेऊन बाबासाहेबांच्या धम्म चक्र प्रवर्तन या विषयाशी जोडतो आहोत कारण सामान्य माणसाला धम्म चक्र प्रवर्तन करता येत नाही आणि बाबासाहेब काय सामान्य मानव नव्हते प्रकांड पांडित्याचा तेजोमय असा सूर्य होते जे स्वयं तेजाने परिपूर्ण होते ज्यांच्याकडे ज्ञानाचे भांडार होते असे  विश्वातील कोणता शास्त्र नाही जे बाबासाहेबांच्या अभ्यासात नाही अनेक कलांच्या कलागुणांनी परिपूर्ण असणारे बाबासाहेब नक्कीच एका धर्माचे धर्म संस्थापक म्हणून आज  या भारतात उदयास आले  असते पण  बाबासाहेबानी येशू ख्रिस्तासारखे  वागले नाहीत कारण त्यांनी   अभ्यासून पाहिले होते जी तत्वे सारा सार  हे बुद्धाच्या शिकवणीत आहे  जगाची सारी समस्यांचे उत्तर बुद्धाच्या शिकवणीत आहे म्हणून त्यांनी बुद्धच जवळ केला अन्यथा या  भारतात बाबासाहेब आंबेडकर प्रणित एक धर्म उदयास आला असता नि तो  या जगात आज पसरण्यास पाठी राहिला नसता  इतकी ताकद होती बाबासाहेबांच्या  नावात 
बाबासाहेब एक महान व्यक्तिमत्व होते जे बुद्धांनंतर  बाबासाहेब अशी स्थिती आपणास पाहायला  मिळते  भारत भूमीत बुद्धांनंतर आधुनिक बुद्ध म्हणून बाबासाहेब यांच्याकडे  इथला आंबेडकरी समूह पाहतो कारण जगात बुद्धानंतर बाबासाहेब  मानले जातात  बाबासाहेबांचे अजून महत्वाचे विशेषण म्हणजे मानवाला माणूस म्हणून  जगण्याचा हक्क मिळावे म्हणून जगात पहिला महामानव आहे ज्याने लढा दिला या जगात अनेक संत साधू संन्याशी विचारवंत असे अनेक ना ना क्षेत्रात नावाजलेले महामानव होऊन  गेले पण मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार मागणारे बाबासाहेब हे यांच्यात पहिले आहेत हे नाकारता आणि बुद्धाच्या धम्माचे मूळ गाभाच हा मानवाशी जोडलेला आहे  गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे बाबासाहेब  खरे प्रज्ञासुर्य ठरले आजवर जी माणसे गुलामीत खितपत पडली होती अश्या लोकांसाठी बाबासाहेब हे क्रांतिसूर्य ठरले जसा सूर्य  सकाळी सोनेरी किरणे घेऊन येतो तसे बाबासाहेब यांच्यासाठी क्रांतीची किरणे घेऊन आले आणि  बघता बघता  त्या क्रांती किरणांतून असंख्य तारे  प्रकाशित झाले बुद्धांनंतर असंख्य ताऱ्यांना प्रकाशित करणारे बाबासाहेब च आहेत हे कोणी हि नाकारू शकत नाही 
आता आपण धम्मचक्र प्रवर्तन कि अनुवर्तन पाहू या 
या जगात बुद्धच धम्मचक्र प्रवर्तित करू शकतात असे सांगण्यात येते आणि हे सत्य देखील आहे  आपण बुद्धाच्या अजून एका महत्वपूर्ण गोष्टीकडे पाहू या कि बुद्ध म्हणतात कि  मी दिलेला मार्ग स्वीकारून त्याचे  योग्य ते आचरण केल्यास तुम्ही देखील बुद्धत्व प्राप्त करू शकता  बुद्धाने असे कुठे हि म्हटलेले नाही कि यापुढे कोणी हि बुद्ध होणार नाही किंवा बुद्ध फक्त मीच आहे  अजिबात नाही इतर धर्माच्या देवदेवतांप्रमाणे बुद्धाने कोणतीच गोष्ट लपवलेली नव्हती हे सत्य आहे बुद्धाने आपल्या भिक्खू संघाला स्पष्ट सांगितले कि माझ्याकडे जे  ज्ञान होते ते मी तुमच्यापासून काहीच लपवून ठेवलेले नाही याच अर्थ बुद्धाला पुढे देखील आपल्यासारखा अजून कोणी तरी घडला पाहिजे याची अपेक्षा होती पण ते आजवर झाले नाही  याचा अर्थ नक्कीच बुद्धाच्या दिलेल्या मार्गात काही तरी चुकीची भेसळ करण्यात  आली असणार हे मेनी करावेच लागते  बुद्धाने आपण धम्म चक्र प्रवर्तन केले व बाकीचे येणारे अनुवर्तन करतील असे बुद्धाने कदापि म्हटलेले नाही हे स्वयंमघोषीत विद्वानांनी घुसडलेल्या गोष्टी आहेत  अशोकाने बुद्ध स्वीकारला तो काळ बुद्ध धम्माचा भरभराटी चा काळ होता  बाबासाहेबानी बुद्ध स्वीकारला तो काळ बुद्धच नामशेष असल्याचा होता  व स्वतः बाबासाहेब त्या  एका धर्म संस्थापक होण्याच्या  क्षमतेचे होते  बुद्ध स्वीकारला नसता आणि बाबासाहेब यांनी दुसऱ्या धर्माची स्थापना केली असती तर आज आपण त्यांना धर्म संस्थापक म्हणून मान्यता दिली असती ना   मग बाबासाहेबांचे धम्मचक्र गतिमान केले त्याला अनुवर्तन का म्हणावे  आम्ही बाबासाहेब याना आधुनिक बुद्ध मानतो आणि तुम्ही देखील मानत असाल  तर  १४ ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन म्हणून साजरा करावाअन्यथा  अनुवर्तन म्हणून  साजरा करण्यात काहीच अर्थ नसणार आहे  बाबासाहेबांच्या प्रेमापोटी नसून एका महामानवाच्या कार्याचा  गौरव म्हणून आपल्याला या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे  
आज  त्रिपिटकाला भारतात वैभव कुणामुळे मिळाले भारतात बुद्ध धम्माला धमर्ग्रंथ लिहून देणारे बाबासाहेब  या बुद्धाच्या विशाल धम्माचे बुद्धांनंतर मार्गदाता ठरले तरी देखील बाबासाहेब यांनी स्वतःला कधी त्या ठिकाणी पाहिले नाही बुद्धालाच आपला गुरु मानून त्यांनी बुद्धापुढे मान झुकवली हीच बाबासाहेबांची  सर्वात मोठी बाजू आहे अन्यथा आजवर जे जे लोक बुद्ध तत्वज्ञान अभ्यासले त्यांनी त्यांनी आपले आपले पंथ धर्म निर्माण केले पण बाबासाहेब  यांनी मात्र बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे धम्मच तुमचा शास्ता आहे असे मानून या देशाला धम्म देऊन  नवा आयाम दिला 
शक्य आम्ही पटकन विसरून जातो पण आम्हाला हे माहित झाले पाहिजे या देशाला बुद्धाचा सत्य इतिहास जर कुणी दिला असेल तर तो बाबासाहेब यांनी अन्यथा आम्ही अध्यात्माच्या विळख्यात असे गुरफटून गेले असतो भविष्य काळ आमचा अंधारात असता  बाबासाहेब यांनी विज्ञाशी एकरूप होणारा बुद्ध आम्हाला दिला  अन्यथा आज बुद्ध  एखादी देवता बनून बौध्दांच्या देव्हाऱ्यात बसली असती आज जशी जगभरात आपण पाहतोय भारतात ते शक्य झाले नाही कारण भारतात बाबासाहेब नावाचा क्रांती सूर्य होता जे स्वतः स्वयंपूर्ण तेजोमय  होता जो स्वतः मध्ये स्वतः ऊर्जा निर्माण करणारा स्वयंप्रकाशित होते म्हणून या देशात बुद्धांनंतर बाबासाहेब धमचक्राच्या प्रवर्तनाचे हकदार ठरतात बाकीच्यांची काही मते असतील कि बुद्धाने हे सांगितले ते सांगितले त्रिपिटक मध्येप्रत्येक ठिकाणी मी असे ऐकले आहे कि बुद्धाने हे सांगितले असा उल्लेख वारंवार पाहायला मिळतो   यातून आपणास  कळेल सत्य शोधणे आवश्यक वाटेल आणि तेव्हाच बाबासाहेबांचा सांगितलेला बुद्ध आपणास  जास्त पटत जाईल 
अध्यात्माच्या आणि बुद्धाचा संबंध जो जोडला गेला तो मुळात चुकीचा वाटतो कारण बुद्धाने सरळ  आणि सोप्या भाषेत आपले तत्वज्ञान सांगितले अगदी सामान्य जनतेला पटेल असे समजेल असे  पण पुढे तेच तत्वज्ञान अवघड का होत गेले याचा शोध नक्कीच आपण घेतला पाहिजे  कारण स्पष्ट आहे कि सर्व सामान्य जनतेला बुद्धाच्या धम्माचे सत्य समजू नये हाच हेतू होता आणि बाबासाहेबानी त्या हेतूवर  पाणी फिरवले बुद्ध आणि त्याचा धम्म नावाचा ग्रंथ देऊन 
अश्या प्रकारे आपण  बाबासाहेब यांचे  स्वरूप पाहिले आता बाबासाहेबांच्या जीवनाचे पैलू हि पाहू या 
चला बाबासाहेबांच्या काही खास ज्या लोकांना काही प्रमाणात माहित नाहीत त्यावर प्रकाश टाकूया

बाबासाहेब हे जगातील सर्वात जास्त भाषा जाणणारे जगात दुसर्या क्रमांकावर आहेत कारण जास्त भाषा जाणणारे संभाजी राजे हे प्रथम स्थानी आहेत कारण त्यांना भाषा जास्त ज्ञात होत्या इतिहासाने फक्त १६ सांगितल्या त्यांना त्यापेक्षाही जास्त भाषा येत आहेत आणि बाबासाहेब हि त्यांच्या पाठोपाठ आहेत

आता बाबासाहेब कोण कोणत्या विद्या येत आहेत ते पाहूया

१}शिक्षणशास्त्र :बाबासाहेब शिक्षणशास्त्रात प्रवीण आहेत जगात असा कोणी नाही इतके प्रवीण म्हणजे जगात त्या गोष्टीची तुलना नाही

२} कृषिशास्त्र :बाबासाहेब हे उत्तम कृषिशास्त्र जाणकार होते आणि नुसते ज्ञान नव्हते असे नाही तर अनुभव हि होता स्वतः केल आणि मग दुसऱ्याला ते करायला सांगितलं प्रभावी अगदी प्रभावी नाही तर आजच्या आमच्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना शेतीत काय पिकवायचे याचे ज्ञान नसते

३} धर्मशास्त्र : बाबासाहेब धर्मशास्त्रात इतके प्रवीण होते कि धर्मपंडितला लाजवेल अशी त्यांची बुद्धी होते त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास करूनच बुद्धाकडे वळले हि जगात त्यांच्या इतकी महान विभूती दुसरी कोणीच नाही आणि होणारही नाही म्हणून मी त्यांना धर्मशास्त्राचा बाप म्हणतो

४} कायदेशास्त्र : या बाबतीत बाबासाहेबांचा पकडणे कोणालाच शक्य नाही कि बाबासाहेब आणि कायदे हे नात वेगळ आहे बाबासाहेब कायद्याचे खूप अभ्यासक होते शिवाय कायदेतज्ञ होते म्हणून या देशाला संविधानातून कायदे तयार केले आजपर्यंत बापाला ते जमले नाही

५} घटना शास्त्र : बाबासाहेबांना घटनाशास्त्र चांगले माहित होते म्हणून या देशाची घटना घटनाशात्राला जोडून बनवली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेबांना घटना लिहिली म्हणून कोलंबिया या विद्यापीठाने ५/०६/१९५२ साली एल एल डी हि पदवी देवून सन्मान केला शिवाय भारतातील उस्मानिया विद्यापीठाने १९५३ मधेव डी लिट हि पदवी घटना लिहिली म्हणून दिली यावरून तर बाबासाहेबांचे घटनाशास्त्र किती प्रबळ होते याची जाणीव होते

६} नीतिशास्त्र : बाबासाहेबांकडे असणारे हे एक खास आणि प्रभावी शास्त्र आहे ज्याचा अभ्यास भल्याभल्यांना जमत नाही बाबासाहेब यात प्रवीण होतेबाबासाहेबांचे धोरणे हि नीतीला धरून होती त्यामुळे बाबासाहेब हे के नीतिशास्त्राचे विद्वान समजले जाते

७} अर्थशास्त्र : हा तर बाबासाहेबांचा आवडता विषय बाबाहेबांच्या बहुतेक पदव्या ह्या अर्थशास्त्रावर आहेत त्यामुळे त्यांचे अर्थशास्त्र काय हे कोणाला सांगायची गरज नाही

८} समाजशास्त्र ; बाबासाहेब समाजशास्त्राचे सुद्धा अभ्यासक होते आणि समाज कसा घडवायचा हे उत्तम उदाहरण आहे त्यांच्याकडे त्यांनी बनवलेला समाज

९} राज्यशास्त्र : बाबासाहेब राज्यशास्त्राचे सुद्धा विद्वान आहेत कल्पना करा संघराज्य कशी तयार करायला पाहिजे आणि कसा विकास करायला पाहिजे हे बाबासाहेब खूप चांगले जाणून होते राज्यशास्त्र हा त्यांचा त्यावेळी सुद्धा आवडीचा विषय ठरलं आहे

१०}संख्याशास्त्र : हा विषय सहसा कोणाला जमत नाही पण बाबासाहेब ह्या विषयाचे उत्तम जाणकार होते हे सांगायला नको कारण सर्व भारताला माहित आहे

११} अनुवंशिकशास्त्र :बाबासाहेब या शास्त्रात हि प्रवीण होते अनुवांशिक शास्त्र सहज कोणालाही मिळवता येत नाही त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात

१२ युद्ध शास्त्र :युद्ध शास्त्र त्यावेळी राजा सरदार या लोकांना माहित होते संभाजी राजांचे युद्धशास्त्र सर्वात प्रभावी होते आणि बाबासाहेब हे संभाजी राजांच्या युद्ध नीतीचा अभ्यास करणारे जाणकार होते त्यांनी केलेलं नियोजन पाहिलं तर आपल्याला समजले असते बाबासाहेबांचा युद्धाशास्त्राचा सखोल अभ्यास होता

१३} मानसशास्त्र : मानसशास्त्राचा पहिला अभ्यासक आणि पहिला मनोवैज्ञानिक तथागत भगवन बुद्ध आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांचे मानसशास्त्र सर्वांना माहित आहे पण बाबासाहेब हे मानसशास्त्रात अतिशय हुशार होते त्यांचे मानसशास्त्र खूप प्रबळ होते आणि त्याचा अभ्यास करणारे बाबासाहेब हे बुद्ध शिवराय यांच्यानंतर बाबासाहेब मानावे लागतात

१४} दर्शनशास्त्र : दर्शन शास्त्र जाणण्यासाठी सम्यक दृष्टीची आवश्यकता असते आणि बाबासाहेब या शास्त्राचे प्रमुख दावेदार समजले जातात

१५} तर्कशास्त्र :तथागत बुद्धांनी तर्कशास्त्राचे प्रवर्तक आहेत शिवराय हे सुद्धा तर्कशास्त्रात प्रवीण होते आणि संभाजी राजे हे सुद्धा तर्कशास्त्र जाणून होते आणि बाबासाहेब सुद्धा तर्कशास्त्रात एक विद्वान होते हे सर्वाना चांगले माहित आहेत

१६} प्रशासन शास्त्र : बाबासाहेबांचे प्रशासन कसे असावे यावर विचार पहिले तर समजते कि त्यांचे ज्ञान किती होते ते सरावात यशस्वी प्रशासन निर्माण करण्याची क्षमता बाबासाहेब यांच्याकडे होती

१७} ग्रंथालय शास्त्र : बाबासाहेब या विषयात तर सर्वात पहिल्या क्रमांकवर आहेत कारण ग्रंथ म्हणजे त्यांचा जीव असे ग्रंथालय कशे असावे त्यात कोणते ग्रथ असावे हे बाबासाहेब यांना चांगले माहित आहे ग्रंथासाठी घर बांधणारा पहिला महामानव म्हणून बाबासाहेब गणले जातात

१८८ बागकाम शास्त्र : बागकाम हे बाबासाहेबांना खूप आवडायचे बाबास्हेब हे बागकामात अतिशय हुशार असे व्यक्तिमत्व आहे ज्याला जगात तोड नाही

१९}९वाणिज्यशास्त्र : वाणिज्य शास्त्राचा प्रखर अभ्यासक होते त्यांचे वानिज्याशास्त्राचे अनेक ग्रंथ बाबासाहेबांकडे होते आणि आजही ते आहेत

२०}पाकशास्त्र :बाबासाहेब हे उत्कृष्ट स्वयंपाक बनवायचे एखाद्या स्त्रीला हि बनवता न येणारे पदार्थ बाबासाहेब खूप चांगल्या पद्धतीने बनवायचे पाकशास्त्रात त्यांचा हात स्त्रीला हि धरता येण्यासारखा नव्हता

२१} वैद्यकशास्त्र : बाबासाहेबांना वैदिक क्षेत्रातले ज्ञान हि होते त्याचे त्यासबंधी बाबासाहेबांना त्याविषयीचे सखोल ज्ञान होते

२२} ज्योतिषशास्त्र : आश्चर्य वाटेल लोकांना कि बाबासाहेब सुद्धा जोतिष्यशास्त्र हि माहित होते याची साधी काही लोकांना कल्पना पण नाही बाबासाहेब स्वतः या विद्येत पारंगत होते म्हणून त्यांचा त्या विषयावर विश्वास नव्हता हे वास्तव आहे आणि ते समजून घेतले पाहिजे

२३} कामगारशास्त्र : कामगारांचे कार्य काय असावे हे बाबासाहेबांना चांगले माहित होते शिवाय बाबासाहेब कामगारानाचे नेते होते कामगार क्षेत्रात खूप मोठे काम आहे

२४} लोकसंख्याशास्त्र :आज लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे बाबासाहेबांचे ध्येय आणि धोरणे पाहता लगेच समजून येत कि त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करून भारताला एक सक्षमता देणारा आणि तसे धोरण बाबासाहेबांनी राबण्याचा प्रयत्न केला आहे हे घटनेत आपल्याला दिसून येत

२५} शरीर शास्त्र :शरीराच्या अवयावायांचे आणि त्यासबंधी सर्व माहिती बाबासाहेबांना होती कोणत्या गोष्टी कोणत्या भागास पूरक आहेत हे बाबासाहेबांना चांगले माहित होते कारण बाबासाहेब हे वैदिकशास्त्र सुद्धा चांगले जाणत होते

२६} रक्तसंकर शास्त्र : मानवाच्या शरीरात होत असलेला रक्त प्रवाह आणि त्याविषयी चे ज्ञान हे सर्व लोकांना माहित असते असे नाही बाबासाहेब या विषयी जाणकार होते बाबासाहेबांना या संबंधीची चांगली माहिती होती

२७} जलशास्त्र: बाबासाहेबाचे पानिविशाय्क धोरणे खूप चांगली आहेत शिवरायांचा हाच मुद्दा बाबासाहेबांच्या अभ्यासात आहे बाबासाहेबांना त्याविषयी सखोल ज्ञान आहे बाबासाहेबांनी धरणे बांधून पाण्याचा साठ कसा करता येईल आणि त्याचा वापर कसा करता येईल याचे ध्येय आणि धोरणे पाहताना त्यांच्या ज्ञानाची महती समजते

इतकेच काय बाबासाहेबांचे इतर कार्य पाहता त्यांच्यातील असणारा ज्ञानी आणि कर्तव्यदक्ष नेता आज शोधून सापडनार नाही निस्वार्थी नेतृत्व हे बाबासाहेबांचे होते 
बाबासाहेबांचे असणारे अगाध ज्ञान पाहून कोणता मनुष्य बाबासाहेबांच्या  धम्मक्रांतीचा उल्लेख हा अनुवर्तनाशी करेल  
बुद्धांनंतर बाबासाहेबच  आणि बाबासाहेबानी केलेलं धम्मक्रांती ला जगात तोड नाही केवळ बाबासाहेबांच्या एका शब्दावर लाखोंचा जनसागर बुद्धाकडे येणे साधी गोष्ट नाही. 
बाबासाहेबांना आधुनिक बुद्ध समजणार समाज  बाबासाहेबांच्या बुद्ध धर्मांतराच्या घटनेला अनुवर्तन म्हणून म्हणणार नाही  कारण तेच लोक असतात जे धम्मचक्र  प्रवर्तन करतात जे स्वयंपूर्ण असतात आणि बुद्धाप्रमाणे च बाबासाहेब देखील स्वयंपूर्ण  तेजोमय सूर्य होते 
आणि धम्मचक्र प्रवर्तन होते  आहे आणि राहील  याबाबत कोणताही संदेह नाही 

जय शिवराय जय भीमराय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र