आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ८
सम्यक समाधी : ह्या मध्ये माणसाच्या मनातील विकार शांत होऊन मन एककेंद्रित होणे आवश्यक असते. कायिक क्लेशांना न जुमानता साधकाने मन एकाग्र केले पाहिजे. त्यामुळे कायम चित्तशुद्धी होते व चित्तकायशुद्धीतून प्रज्ञा प्रकाशमान होते.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे मानवाचा स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे हे होय. मानवाने मनावर नियंत्रण ठेवल्यास त्याच्या वागण्या बोलण्यावर व त्याच्या कृतीमध्ये खूप बदल जाणवतो यालाच त्याची प्रज्ञा जागृत होणे म्हणतात हा अष्टांग मार्गातील शेवटचा मार्ग आहे कारण ज्याच्या अंगी प्रज्ञा जागृत झाली असेल तोच व्यक्ती शील करुणा अंगी धारण करून निर्वाणाकडे झुकलेला असतो म्हणून हा मार्ग बुद्धाच्या शिकवणीत शेवटचा आहे. प्रथम हे लक्षात घ्यावे कि समाधी मार्ग बुद्धाने शेवटचा मार्ग सांगण्यामागे सुद्धा कारण आहे इतर लोकांनी समाधी प्रथम सांगितली आहे ध्यान प्रथम सांगितले आहे पण बुद्ध मात्र ते शेवटचा मार्ग सांगतात.
आता याचा संतांवर किती प्रभाव आहे तो पाहू या.
बहुतांश संतांचा एकांतात बसून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि सर्वच संतांनी यावर भर दिलेला आहे
ध्यानी योगीराज बैसले कपाटी । लागे पोटपाठी तयाचिया ।।
तान भूक त्यांचे राखे शीत उष्ण । झाले उदासीन देहभावा ।।
कोण सुख त्यांच्या जीवाशी आनंद । नाही राज्यपद आवडी तया ।।
बैसोनि निश्चल करी त्याचे ध्यान ।
कीर्तन हीच समाधी, साधन ते मुद्रा ।।
काम करताना राम म्हणताना समाधान लाभते
राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधी त्या सदा ।।
न लागती सायास जावे वनांतरा । ठायींच बैसोनि करा एकचित्त ।।
बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाही ।।
तोचि घ्यावा एकचित्तें ।।।
तुका म्हणे लागो अखंड समाधी । जावे प्रेमबोधी बुडोनिया ।।
संत एकनाथ म्हणतात
उन्मनी समाधी ठेविली चरणी ।
चंचळत्वं मनाचे मोडे । दृष्टिचे स्थिरत्व जोडे ।।
सहज समाधी घडे हरिकृपेने पाहे पां ।।
संत रामदास म्हणतात
दृढ करोनिया बुद्धी । आधी घ्यावी आपशुद्धी ।।
तेणे लागे समाधी । अकस्मात ।।
सम्यक समाधीचा प्रभाव असणे काही नवल नाही कारण कारण ध्यान साधना हि श्रमण आणि वैदिक परंपरेत होतीच परंतु सम्यक समाधी जे बुद्धाने वेगळ्या मार्गाने सांगितली तिचा प्रभाव मात्र जाणवतो संतांवर.
बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास सरळ केलेला नसला तरी बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव मात्र जाणवतो एकंदरीत भारतातून बुद्ध तत्वज्ञान हटवण्यात अपयशी ठरले लोक हे मात्र नक्की
बुद्धाने आपल्या मार्गात कुठे हि कठोरता आणलेली नाही कट्टरता आणलेली नाही बुद्धाने लवचिक मार्गाने च मध्यम मार्गानेच
तेव्हा हा बुद्धाचा मार्ग अनेक संत महात्म्यांनी आपल्या शिकवणीतून सांगण्याचा प्रयत्न केला . त्यांच्या शिकवणीवर व त्यांच्या अभ्यासावर बुद्धाच्या तत्वाचा प्रभाव जाणवतो आणि तो आहे इतके नक्की
हजारो वर्षांपूर्वीच्या येशू ख्रिस्तावर हि होता महम्मद पैगंबर यांच्यवर हि तो दिसून येतो आणि तोच प्रभाव हिंदू धर्मातील लोकांवर हि दिसून येतो अन्यथा यांच्यामध्ये जी लोकसुधारणेची मोहीम एक चळवळ उभी राहिली ती राहिलीच नसती कारण बुद्ध असा मार्गदाता आहे ज्यामुळे जगात एक नवा मार्ग सापडला आहे.
शेवटी बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव सर्वच जगावर पडलेला आहे हे नाकारता येत नाही.
बुद्ध तत्वज्ञानाचा असाच प्रभाव आपण यापुढच्या लेख मालिकांमध्ये पाहत जाऊ द्या.
लवकरच प्रभाव बुद्धाच्या या नावाखाली लेखमालिका आपल्या ब्लॉग वर चालू करत आहे .
जय भीम नमो बुध्दाय जय शिवराय

टिप्पण्या