कोडे राम कृष्णाचे
बाबासाहेबांनी लिहिलेला द रिडल्स इन हिंदूझम या ग्रंथात हिंदू धर्माचा बहुतेक सारा इतिहास मांडला आहे आणि विशेषतः बाबासाहेबांनी या ग्रंथात हिंदूच्या रीतीरिवाज व संस्कृतीची उकल करताना आपल्याला पाहायला मिळते बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक अभ्यास करून अनेक निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी राम आणि कृष्ण हे हिंदू धर्मातील महत्वाचे नायक मानले जाते अशा नायकांची कशा प्रकारे वागणूक होती याचा सारांश पाहायला भेटतो
रामाचे कोडे :
राम हा वाल्मिकीने लिहलेल्या रामायणाचा नायक रामायणाची कथा तशी लहानशी आहे पण साधी आणि सरळ आहे त्यात खळबळजनक असे काही नाही राम हा भक्तीचा विषय व्हावा असे या कथेत काहीच नाही तो आज्ञा पुत्र आहे एवढेच आहे पण वाल्मिकीने रामामध्ये काही असामान्य गोष्टी पहिल्या आणि म्हणूनच रामायणाची रचना त्याने केली आणि राम हा विष्णूचा अवतार आहे या गोष्टीवर भर देवून त्याने रामायणाची रचना केली आहे आता राजा म्हणूनरामाचे चरित्र कसे आहे याह विचार करूया एक व्यक्ती म्हणून मी रामाबद्दल बोलताना मी फक्त रामाच्या काही गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला पहिली रामाने वालिशी केलेलं वर्तन व दुसरी सीतेला दिलेली वागणूक रामाने वाली व सुग्रीव या दोन भावांच्या भांडणात जी शुद्र भूमिका वठवली तीच भूमिका त्याने लंकेत पार पडली पण राम एवढ्यावर थांबला नाही तो सोतेला पुढे जावून सांगतो हे जनक कन्ये तुझ्याशी मी कसलाही सबंध ठेवू इच्छित नाही तुका हवे तेथे निघून जाण्याची मुभा मी तुला देतो तुला परत जिंकून घेतली तेच माझे उद्दिष्ट्ये होते ते साध्य झाल्यावर मी समाधानी बनलो आहे तुझ्यासारख्या लावण्यवती स्त्रीचा उपभोग घेण्यात रावणाने कसलीच कसूर केली असेल असे मला वाटत नाही
हात जोडून नतमस्तक उभ्या असणाऱ्या सीतेने शपथ घेतली कि रामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पुरुषाचा विचार काठी मनात आणला नाही धरणीमाते मला पोटात घे काया वाचा मने सदैव मी रामावर प्रेम केले आहे धरणी माते मला पोटात घे सीतेने शपथ नुसती घेतली आणि धरणी दुभंगली सुवर्ण सिंहासनावर बसलेली सीता आत गेली याचा अर्थ सीतेने दृष्टाप्रमाणे वर्णन करणाऱ्या रामाकडे परत जाण्यापेक्षा मरण पत्करले तसेच रामाने राजा म्हणून राज्य केल्याचा पुरावाच रामायणात सापडत नाही कारण रामाने राजा म्हणून कधी राज्य केले नाही जनानखान्यात राम कसा आयुष्य जगायचं याचे वर्णन वाल्मिकीने केले आहे रामाने राज्याचा कारभार म्हणता येईल असा कधी केलाच नाही प्रजेची गाऱ्हाणी ऐकून घेवून ती दूर करण्याची भारतीय राजांची परंपरा त्याने पाळली नाही इतके अपराध स्वतः करून ठेवला
तपस्या करण्याचा अधिकार नसताना हि ती करून स्वागत येवू पाहणाऱ्या शूद्राला रामाने प्रतिबंध केला याचा देवतांना आनंद होतो रामापुढे अवतीर्ण होवून ते त्याच्या कृतीबद्दल त्याचे अभिनंदन करतात असा हा राम आहे
कृष्णाचे कोडे :
श्रीकृष्ण हा महाभारताचा प्रमुख नायक खर सांगायचं तर महाभारत हे मुख्यत्वे कौरव पांडव या चुलत भावंडांशी सबंधित आहे आपल्या पूर्वजाच्या राज्यावर हक्क कोणाचा यासाठी हे दोन्ही पक्ष युद्ध खेळले त्याची कथा महाभारतात मुख्यत्वे जाते दुसरी याहून चमत्कारिक गोष्ट म्हणजे कृष्ण हा पांडव कौरवांच्या समकालीन होता कि नाही याचीच शंका येते कृष्ण हा पांडवांचा मित्र होता व पांडव यांचे साम्राज्य होते तसाच तो कंसाचा शत्रू होता व कंसाचे हि साम्राज्य होते असे दोन साम्राज्य जवळ जवळ एकाचवेळी असणे शक्य नाही
याहून दुसरे महत्वाचे असे कि महाभारतात कुठेही या दोन साम्राज्याचा सबंध आलेला नाही कृषांची कथा व पांडवांची कथा या दोन्ही मागाहून एकमेकात घुसडल्या गेल्या असल्या पाहिजेत असे वाटते कृष्णाचे महत्व वाढविण्यासाठी त्याला विस्तृत असा रंगमंच मिळावा व त्यात त्याची प्रमुख भूमिका असावी म्हणून असे काही केले गेले असावे या दोन कथांची सरमिसळ करण्यामागे व्यासाचा मोठा हात असावा कृष्णाचे उदात्तीकरण त्याला सर्वोच्च स्थान मिळावे असा त्याचा हेतू असावा असे वाटते
व्यासाच्या प्रतिभेचे कृष्ण हा मानवातील परमेश्वर ठरला म्हणूनच महाभारताचा महानायक बनवला गेला कृष्ण खरोखर मानवातील परमेश्वर होण्याच्या लायकीचा होता का ? त्याच्या आयुष्याची रूप रेषा काढूनच आपल्याला खरे उत्तर मिळण्याची शक्यता आहे
पूतनेचा वध हि कृष्णाची कथेतील पहिली अदभूत घटना होय कृष्णाने तिचे स्तन इतक्या जोराने ओढले कि त्यातून रक्ताची धार लागली दुःख वेगाने भयंकर किंकाळी फोडली व जमिनीवर कोसळून तिओ ठारझाली जेव्हा पुतनेचे व शंकटासुराचे कृष्णाला मारण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा तृणावत नावाच्या राक्षस कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवण्यात आला त्याने पक्षाचे रूप घेवून कृष्णाला आकाशात घेवून गेला पण कृष्णाने आपल्या तील उग्र रूप दाखवले व त्याची मन मोडून टाकली वृंदावन या नव्या जागेत राहिल्यावर तर कृष्णाला अनेक राक्षसानं माराव लागले आणि त्यात कालीयाचा वध तर महत्वाचा होता पुराणातील कृष्णाच्या आयुष्यातील कालियाचे संकट दूर करण्याच्या प्रसंगानंतर वस्त्रहरणाचा प्रसंग येतो कृष्णाच्या खोडसाळ पणामुळे गवळणीना विवस्त्र अवस्थेत झाडाखाली यावे लागे तेव्हा कृष्ण त्यांची वस्त्रे परत करत असे
कृष्णाच्या तारुण्यातील सर्वकाळ वृंदावनातील गोपिंशी निषिद्ध असे प्रेमाचे चाले करण्यात गेला त्याला रासलीला असे म्हणतात कृष्ण बारा वर्षाचा होता तेव्हापासून एक मुरब्बी राजकारणी योद्धा म्हणून प्रसिद्ध झाला असे पुराने त्याच्या बाबतीत आवर्जून सांगतात योद्धा व राजकारणी म्हणून त्याने जी कृत्ये केली ती देखील अनैतिक होती आपला चुलत मामा कंस युअच वाढ हे त्याचे पहिले कृत्य होय
कृष्णाच्या जीवनातील पुढील हकीगत म्हणजे मगध चा राजा जरासंध व कालीयावन यांच्याशी त्याचे झालेले युद्ध होय हा जरासंध कंसाचा सासरा होता
वैदिक देवामध्ये इंद्र जरी देवांचा राजा असला तरी त्याच्या मदतीसाठी कृष्ण सदा धावून गेला आहे त्याचे झाड कृष्णाने पळवले व इंद्र बघत राहिला यावरून तो देवांचा राजा होता हे पटत नाही कृष्णाने आठ बायका कश्या पटवल्या त्याच्या कथा फार मनोरंजक आहेत अर्जुनाने सुभद्राला पळवून नेले तिच्याशी लग्न केले व या कृत्यात कृष्णाचा मोठा हात होता सुभद्रा बळीराम याची सख्खी आणि कृष्णाची चुलत बहिण होती
आता कृष्णाने महाभारतात जी दुष्कृत्ये केली ती अशी
१] कृष्णाच्या सूचनेवरून अर्जुनाने भूश्रीवाचे दोन्ही हात तोडले व त्यामुळे सात्यकीला त्याचा वध करणे सोपे गेले
२] सूर्य मावळायला आला तरी जयद्रथ याचा वध करणे जमेना तेव्हा कृष्णाने आपल्या दैवी सामर्थ्याने सूर्याला ढगाआड शकले सूर्यास्त झाला म्हणून जयद्रथ बाहेर आला कृष्णाने सूर्याला पूर्वीप्रमाणे केले व तो क्षण साधून अर्जुनाने जयद्रथाला ठार मारले
३] भीमाने अश्वत्थामा हत्तीला ठार व द्रोणाला अश्वत्थामा मेल्याचे सांगितले जेव्हा द्रोणाचा वाढ होईना तेव्हा त्याला कपटाने मारण्याचा सल्ला कृष्णाने पांडवांना दिला ४] दैवपायना तलावाजवळ भीम व दुर्योधनाचे शेवटचे युद्ध चालू होते तेव्हा कृष्णाने भीमाला अनैतिक सल्ला दिला व त्याप्रमाणे भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहर करून त्याला ठार मारले
हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ ब्राह्मण व सनातनी धर्म मार्तंड आज ज्या गोष्टीना नाक मुरडतात ते सर्व कृष्ण आपल्या सहकाऱ्या सोबत अगदी धुंद बेहोष होवून करत असतात यावरून यादव हे किती निरोगी आणि हौसी आनंदी प्रवृत्तीचे होते हे सिद्ध होते दारू पिवून वाढेल तशी चैनबाजी करण्यामुळेच यादवांचा सर्वनाश झाला
शेवटी कृष्णाचा हि करून अंत कसा झाला हे आपल्याला पाहायला मिळते एका शिकाऱ्याच्या बाणाने अंत होतो असे हे आपण पाहत असतो यावरून पहा विचार करा
लेखक : डॉ . बाबासाहेब आंबेडकर
सादरीकरण : रविंद्र सावंत
टिप्पण्या