वेदांमध्ये स्त्रियांचे स्थान

वेद हे हिंदूंचे प्राचीन साहित्य आहे आणि त्यानुसार हिंदू समाजातील रूढीवादी वर्ग वेद हे ईश्वर निर्मित आहेत असे ठासून सांगत असला तरी त्यातील गोष्टीवरून विशेषतः अर्ध्या मनुष्य जातीविषयी म्हणजे स्त्रीयाविषयी वेदांची रचना करणाऱ्या ना अमानुष दृष्टीकोन दिसून येतो
वेदामध्ये पुत्र जन्मासाठी भरपूर प्रार्थना आहेत परंतु त्यातील कोणत्याही रुचेत मुलीच्या जन्मासाठी एकही प्रार्थना नाही उलट मुलीच्या जन्माबाबत शोक व्यक्त केलेला आहे मुलगी होवू नये म्हणून मुलाला गर्भात जपून ठेवण्याच्या अर्थाच्या प्रार्थना आपणास अथर्ववेदात {८/६/२५,६/११/३} आढळतात यजुर्वेदचा पोटग्रंथ असलेला शतप्रथ  ब्राह्मण यामध्ये {५/३/२/२} पुत्र नसलेल्या स्त्रीची निंदा करून तिला अभागिन म्हटले आहे या ग्रंथानुसार स्त्रिया शुद्र कुत्रे गाई मध्ये असत्य पाप व काळोख वसतो यजुर्वेद सांगतो कि स्त्रिया ह्या अबला व संपत्तीत वाटा मिळवण्यास अपात्र असतात आणि त्या दृष्ट माणसापेक्षाही नीच बोलतात { तैतरीया संहिता , ६/५/८/२} ऋग्वेदानुसार {८/३३/१७} स्त्रीचे मन डवने कठीण असते ती अल्प मती  असते स्त्रीयाबरोबर मैत्री होऊ शकत नाही त्यांची हृदये हडळनिची असतात {ऋग्वेद १०,९५-१५}
अश्वमेधाचा विधी करताना  यज्ञवेदीवर यांचा उघड अपमान करण्यात येई त्या जेव्हा घोड्याशी संभोग करीत तेव्हा श्रोत्यासमोर अश्लील भाषेत त्यांची थट्टामस्करी करण्याची पुरोहितांना परवानगी असे {पहा ऋग्वेद अध्याय २३ } वेदामध्ये आपणास बहुपत्नीत्वाची चाल आढळून येते आर्य हे आदिवाशियांवर हल्ले करीत व कधी कधी त्यांच्याच टोल्यावर  हल्ले करीत व अश्या मार्गाने पराजित लोकांच्या स्त्रिया त्यांना मिळत ह्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या स्त्रीयामुळे बहुपत्नीत्वाच्या चालीसारखी घृणास्पद चाल पडली श्रीमंत टोळीकडे जशी अनेक गाईगुरे असत त्याप्रमाणे सामर्थ्यशाली आर्याकडे अनेक स्त्रिया असत स्त्रियांचा अवमान करण्याचाही दुसरा मार्ग होता त्याची स्थती मालमत्तेपेक्षाही वेगळी नव्हती
ऋग्वेदात }१०८१५९} इंद्राच्या अनेक राण्या चा उल्लेख आहे ऋग्वेदाचे असलेल्या हरिश्चंद्राला शंभर बायका होत्या असे सांगितले आहे अनेक बायका एका पुरुषाची मालमत्ता असल्याचे मानले जाई  त्याच प्रमाणे एक स्त्री अनेक पुरुषांची सामाईक  मालमत्ता मानण्यात येई {पहा अथर्ववेद १४-१-६१-१४-२१४} हि घृणास्पद चाल बहुपत्नीत्वाची चाल या नावाने ओळखण्यात येते बहुपत्नीत्वाच्या चालीप्रमाणे स्त्रीला कसलेही महत्व आणि व्यक्तित्व नाही व तिला केवळ मालमत्ता याचा दर्जा देण्यात आलेला आहे याचे हि चाल निदर्शक आहे
जेंव्हा त्या स्त्रियांच्या पतीचा मृत्यू होई त्यांनी पुढील  जन्मी किंवा पती लोकात सेवा करावी म्हणून त्यांना त्यांच्या बरोबर मारण्याची जबरदस्ती करण्यात येई {अथर्ववेद १८/३/१} राजा राम मोहन रॉय  सारख्या समाजसुधारकाने सामाजिक लढा दिल्यानंतर गेल्या शतकात ह्या अमानुष चालीवर कायद्याने बंदी आणण्यात आली या चालीचा अर्थ होता मालकाच्या मृत्युनंतर गुलामगिरी कायम ठेवणे
वेदामध्ये आपणास आणखी एक अमानुष चाल आढळते तिला विधवेचा पुनर्विवाह असे म्हणतात ह्या अमानुष चालीनुसार विधवेला मृत पत्नीच्या भावाबरोबर लग्न करण्याची सक्ती करण्यात येई तीसुद्धा आधीच्या पतीचा मृतदेह हलवण्याच्या आधी व त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी { पहा ऋग्वेद १०/१८/८}
जर मृत पतीला भावू नसेल तर तिला अविवाहित विधवा राहू देण्यात येई परंतु तेव्हा  तिला दुसरा विवाह करण्यास बंदी असे परंतु तिची स्थिती अत्यंत दुःखद असे तिचे मुंडण करण्यात येई तिला वेगळी काढण्यात येई व अपशकुन मानण्यात येई तिच्या उपस्थितीत संकटे येतील म्हणून सर्व  आनंदाच्या प्रसंगी तिला टाळण्यात येई शत्रूच्या व कमजोर टोळ्यांच्या अनेक स्त्रिया आर्यांनी लुटल्या होत्या त्यामुळे त्यांच्याजवळ पुष्कळ स्त्रिया होत्या त्यांनी त्या सर्व स्त्रियांना बायका करून घेतल्या नाहीत त्यांच्यापैकी काही बायका झाल्या तर काही गुलाम स्त्रिया  म्हणून ठेवण्यात आल्या तरीही त्या कसलाही विधीनिषेध न पाळता वैषयिक प्रयोजनार्थ वापरण्यात येवू शकत होत्या ह्या गुलाम स्त्रिया पुरोहितांना अर्पण केल्या जात असत किंवा त्या हुंड्याचा एक भाग म्हणून देण्यात येत असे  { पहा ऋग्वेद ६/२७/८/८/६८/१७}
गुलाम स्त्रियांपैकी काही स्त्रिया टोळीच्या सर्व सभासदांची किंवा वस्तीच्या किंवा गावाच्या सर्व रहिवाशांची भागीदारी असलेली सामायिक संपत्ती मानण्यात येई  त्या वैदिक काळातील वेश्या होत्या वेदामध्ये व वैदिक साहित्यात त्याचा उल्लेख अतितवादी अतिशकत्वरि आणि अपशकत्वरि असा करण्यात आला आहे { पहा यजुर्वेद ३०/१५ , तैतरिया  ब्राह्मण ३/४/११/१ }
ती वेश्यप्रथा धंदेवाईक वेश्या देवदासींच्या रूपाने आजतागायत चालू आहेत स्त्रीचा अवमान करणाऱ्या ह्या सर्व अमानुष चालीव्यतिरिक्त वेदामध्ये आणखी एक पाशवी चाल आढळून येते तिला नियोग प्रथा म्हणतात {हि प्रथा पती जर आजारी असेल नपुंसक असेल किंवा कामानिमित्त पत्नीपासून दूर असेल तर पतिव्यतिरिक्त दुसर्या कोणत्याही पुरुषांकडून स्त्रीने गर्भ धारणा करावी अशे सांगते } अगोदरच्या काळात प्रथा  स्त्रीला पुरुषाच्या विषय वासना तृप्त करणाऱ्या जंगम मालमत्ता समजले जायचे तर हि प्रथा स्त्री म्हणजे मुलास जन्म देणारी यंत्र यापेक्षा कसलेही  महत्व देत नाही हि जंगम मालमत्ता किंवा मुलास जन्म देणारे यंत्र  बनविल्यामुळे तिला कसलेही महत्व व व्यक्तिमत्व नव्हते वादिक काळात स्त्रीचा संपत्तीचा हक्क हिरावून घेण्यात आलेला होता डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन्हीचे निरीक्षण केलेलं होत
विवाहित हिंदू स्त्रीने एका पुरुषाशी विवाह केला असला तरीही सर्व कुटुंबाची मालमत्ता होत असे परंतु तिला स्वतः संपत्तीचा कोणताही अधिकार नसे
वेदावरुन हे अगदी स्पष्ट होते कि मुलीना आणि बहिणींना देखील अनुक्रमे वडील भावाकडून वैषयिक उपभोगाचे साधन म्हणून मानण्यात येई {पहा ऋग्वेद १०/६१/७  } बापाने स्वतःच्या मुलीशी संभोग केल्याचे सांगितले आहे त्याच प्रमाणे अथर्ववेदात {८/६/७} बापाने व भावाने मुलीशी व बहिणीशी संभोग केल्याचा उल्लेख आहे अथर्ववेदात {२०/१६/१५} भावाने बहिणीवर बलात्कार केल्याचा उल्लेख सापडतो
यावरून आपल्याला एक निश्चित सांगता येईल कि ईश्वराने निर्माण केलेल्या या वेदात स्त्री जातीचा दर्जा अतिशय खालच्या पातळीचा आहे त्यांना स्वतंत्र असे व्यक्तिमत्व देण्यास वेद नाकारते त्यांना जंगम मालमत्ता आणि मुलास जन्म देणारे यंत्र समजते
याउलट भारतचे संविधान पहा ते एक मानवनिर्मित आहे पण त्यात स्त्रीला स्वतंत्र अधिकार दिले आहेत समान हक्क दिले कुटुंबात संपत्तीत समान वाटा देण्याचा हक्क दिला  तरीही स्त्री त्या महामानवाला का विसरते आज तिने त्यांचे उपकार मानायला पाहिजे पण हिंदू स्त्री मात्र आपल्या त्याच कर्मकांडात अडकून बसली आहे  त्यातून बाहेर येण्यासाठी तिने प्रयत्न केला तर कदाचित या देशाने महिला पंतप्रधान पहिला राष्टपती पाहिला आज या स्त्र्ल असे कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही कोणामुळे ते फक्त आणि फक्त केवळ बाबासाहेबांमुळे
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र