बौद्ध धम्म निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक आहे का ?



तथागत गौतम बुद्ध या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग देऊन गेलो तुम्ही त्याला मानवमुक्तीच्या मार्ग समजलात . मानवाची मुक्ती हि दुःखापासून केली असे समजायला हवे होते पण, तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलात. पुन्हा नवा जन्म नसतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण , तुम्ही त्याला  सोयीनुसार वापरता. अगदी तसेच बौद्ध धम्माबाबत लोकांचा गैरसमज झालेला आहे कि बौद्ध धम्म नास्तिक आहे . म्हणजे तो निरीश्वरवादी आहे. ईश्वर आहे कि, नाही यामध्ये बुद्धाने जरा हि रस दाखवलेला नाही. बुद्ध आपला मार्ग सांगतात  दुसऱ्यावर टीका करीत नाहीत. पण आजचे शिक्षित बौद्ध विचारवंत याना त्या २२  प्रतिज्ञांचा हि अर्थ कळलेला आहे कि नाही हे माहित नाही. अनेक मंडळी शहरात एखादा रविवार एक कार्यक्रम घेऊन धम्म प्रसार आणि प्रचार करीत असतात पण तो फक्त शहरात. गाव ओस पडलीत हे विदारक वास्तव समजण्यास हे असमर्थ ठरलेत तरी आज शोध घेऊ या प्रथम बुद्धाच्या धम्माबाबत असलेला हा गैरसमज .
काय बौद्ध धम्म निरीश्वरवादी आहे का  ?  काय बौद्ध धम्म नास्तिक आहे का ?
 आता हा गैरसमज का निर्माण झाला याचे उत्तर 'ईश्वर '   नामक शब्दातून मिळतेच या शब्दाच्या अर्थविषयीच्या मतभेदामुळे उत्पन्न झालेला हा गैरसमज आहे. ज्याच्या इच्छेमात्रेकरून हे सारे विश्व निर्माण झाले आहे अस्तित्वात आहे किंवा लय पावणार आहे असा जो कोणी आहे तो ईश्वर आहे अश्या अर्थाने बौद्ध  ईश्वराचे अस्तित्व मान्य करीत नाही हि गोष्ट कबूल केली पाहिजे बौद्ध धम्माचे विश्व निर्मिती बाबत चे वेगळी  आहे विश्वाची उत्पत्ती व क्षय या गोष्टी अनादी आहेत विश्वाचा कोणता तरी एक भाग नाश पावतो व नवे निर्माण होते  म्हणजे हे परिवर्तनाचा सिद्धांत बौद्ध धम्मात आहे कोणती हि गोष्ट चिरकाल टिकणारी नाही या विश्वात कोणती हो गोष्ट कायमस्वरूपी नाही   तिचे परिवर्तन अटळ आहे अगदी सरळ आणि सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कि बुद्ध धम्म यांची तत्वे नास्तिक मतांची नाहीत बुद्ध सजीवांचा जन्मं मृत्यू स्वीकार करतो त्यामध्ये संभोग काय निर्माण काय आणि कर्म  हे प्रमाण मानले जाते  कर्म  बदल हे असेच घडत नाहीत  तर त्याला कारण असते इथे बुद्धाचा कार्यकारण भाव सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे . बुद्धाने जो प्रतित्य समुत्पाद नावाचा सिद्धांत सांगितलंय त्यालाच कार्यकारण भाव म्हटले जाते म्हणजे कोणती हि घटना घडते तिला कारण असते . त्याच प्रमाणे हे विश्व निर्माण होण्यामागे कारण आहे याचा अर्थ भविष्याशी नसून वर्तमानाशी आहे कारणाशिवाय बदल होत नाही म्हणजे वर्तमान काळात यावे लागते लोकांना एखादी घटना घडते तिला कारण असते व तिचे नंतर परिणाम दिसून येतात. अगदी विश्व  निर्मितीशी ह्याच तत्वानुसार विचार केल्यास विश्वाची निर्मिती हि बदलातून  झालेली आहे. यासाठी कोणाच्या इच्छेची गरज नाही त्यामुळे ईश्वराची इच्छा वैगरे हि तत्वे बुद्ध मानत नाही म्हणून बुद्ध निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक आहे असे म्हणता कामा नये बुद्ध जगाच्या निर्मिती मध्ये सहभागी असणाऱ्या निसर्गतत्वाला   मान्यता देतात. फरक इतकाच कि निसर्गाच्या प्रजनन शक्तीला लोकांनी ईश्वराचे स्वरूप दिलय त्याला अवाढव्य केली नाही तर निसर्गाचे प्रजनन शक्ती निसर्गाची नष्ट करण्याची शक्ती हि मान्य करावीच लागते  ती बुद्धाने नाकारलेली नाही मग बुद्ध नास्तिक कसा काय ईश्वराचे  अस्तित्वच नाही ते मानाने न मानाने हा प्रश्न धम्मात येतच नाही तर लोक नास्तिक म्हणून धम्माकडे   पाहतात च कसे  ?
बुद्धाच्या शिकवणीत ईश्वर आहे कि नाही यावर बुद्ध काहीच सांगत नाही त्यामुळे ईश्वराला धरून बौद्ध धम्म आस्तिक कि नास्तिक यामध्ये का  अडकवावा तुम्हाला बुद्धाच्या एवढ्या सम्यक मार्गांचे विसर का पडतात जे तुम्ही नास्तिकांच्या रांगेत थेट बुद्धाला उभे करतात.
ईश्वर हा श्रद्धागम्य आहे असा बाकीच्या धर्माचा सिद्धांत आहे बौद्ध धम्मात  तर श्रद्धेला बिलकुल थाराच नाही देत फार काय पण बौद्ध धम्माचा स्वीकार करताना बुद्धाविषयी श्रद्धा असलीच पाहिजे असा साधा नियम देखील बुद्ध धम्मात नाही  किंवा तसा घातलेला नाहीं पण आता लोक असे म्हणतील तर मग बुद्ध शरनं गच्छामि हे  काय आहे  तर इथे बुद्धाला शरण जाणे नसून  ती एक प्रतिज्ञा आहे कि ती पदवी आम्ही देखील प्राप्त करू म्हणून कारण तथागत बुद्ध जेव्हा बुद्ध धम्म संघ काय हे सांगताना म्हणतात , कि मानवामध्ये जागृत होण्याची अवस्था बुद्ध आहे जागृत झाल्यावर  ज्या मार्गावर चालतो तो धम्म आहे व संपूर्ण मनाला एकत्रित करुवून मध्य साधला जातो तो संघ आहे त्यामुळे इतक्या सरळ आणि सोप्या भाषेत बुद्ध आपले तत्वज्ञान सांगतात. तरी तो कठीण व किचकट करून नास्तिकत्व का स्वीकारावे 
बौद्ध धम्मात ज्ञानाने श्रद्धेचे स्थान   घेतले आहे . या दृष्टीने पाहिले आणि ज्यात श्रद्धेला थारा नाही तो नास्तिक धर्म अशी मनाची समजूत केल्यास बुद्ध धम्म नास्तिक ठरेल पण तो ईश्वराचे अस्तित्व नाकबूल करणे हे खरे नास्तिक मताचे सर समजले तर बुद्ध धम्म नास्तिक आहे असे म्हणता येत नाही कारण ईश्वराचे अस्तित्व असण्याचा व नसण्याचा प्रश्नच धम्मात येत नाही त्यामुळे आस्तिक नास्तिक हे  धम्मात महत्वाचे नाही
जगात दुःख आहे त्या दुःखाचा नाश केला पाहिजे व तो नॅश करण्याचे उपाय मनुष्याच्या हातातले आहेत एवढेच बुद्धाने दाखवले आहे  त्यात ईश्वराचा संबंध कुठेच आला नाही त्यामुळे ईश्वराचे अस्तीत्व असणे नसणे हे सांगणायचा प्रश्न च निर्माण होत नाही निर्वाणप्राती चा मार्ग हा डोंगरावरच्या चढणीसारखा बिकट आहे तरी अमक्या  मार्गाने  गेले असता मनुष्याला आपल्या पायांनी  तो जढून जाता येईल एवढे एखाद्याने सांगितले म्हणजे मनुष्याला पंख लावून किंवा विमानात बसून जाता येण्याच्या विरुद्ध  त्याचेमत आहे हे सिद्ध होत नाही 
त्याच सारखा प्रकार इथे केला जातोय  कि बुद्ध नास्तिक आहे वैगरे वैगरे 
 नेमके  बुद्ध तत्व काय असावे ह्याबाबत लोक आज हि संभ्रमित आहेत ईश्वराचे धम्मात स्थानच नसताना अस्तक नास्तिक मानाने चुकीचे ठरते .
आता ईश्वरवादी   धर्माचा पायाच ईश्वरावर आहे त्यामुळे त्यांच्या  धर्म तत्वात आस्तिक नास्तिक येऊ शकते बुद्ध नास्तिक होते  म्हणून चुकीचा अर्थ लावू नका .
एक महत्वाची गोष्ट तथागथाच्या आयुष्यात घडलेली आहे जिथे बुद्धाने  धम्माबाबत अतिशय बोधीप्रिय असे शिकवण दिलीय महास्थवीर वक्कलि हे आजारपणामुळे मरणासन्न अवस्थेत असताना त्यांनी बुद्धांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली बुद्ध जेव्हा त्यांना  भेटण्यास आले तेव्हा ते म्हणतात अलम वक्कलि किम ते पूतिकायेन दिठ्ठेन . यो खो वक्कलि धम्म पस्सती सो मम पस्सती , यो मम पस्सती यो धम्म पस्सती. याचा अर्थ असा आहे कि वक्कलि या देहात पाहण्यासारखे काय आहे  ? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो जो मला पाहतो तो धम्माला पाहतो नंतर बुद्ध शरीराती पाच तत्वे कशी अनित्य आहेत हे सान्गुन धम्म पाहणे जास्त हितकारी आहे असे सांगतात  पुढे बुद्ध जेव्हा रस्त्यावरून चालताना कुठे तरी एका झाडाखाली बसत तेव्हा त्यांची बसण्याची छबी पाहून द्रोण नावाच्या ब्राह्मणाला कुतूहल वाटले त्याने विचारले आपण देव आहेत कि गंधर्व तेवहा बुद्ध म्हणतात कि  यापैकी मी कोणी नाही  मी बुद्ध आहे

आता बुद्धाचे वचन शोधण्यासाठी बाबासाहेब  यांनी तीन कसोट्या दिल्या आहेत १} जे बुद्धीला विसंगत व तर्काला सोडून आहे  ते बुद्ध वचन नाही २} जी चर्चा मनुष्याच्या कल्याणला पोषक नाही ते बुद्ध वचन नाही ३} भगवान  विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची वर्गवारी केली होती ज्या विषयासंबंधी ते  निश्चित होते त्या विषयी त्यांनी आपले विचार निश्चयात्मक रूपात मांडले आहे ज्या विषयी ते निश्चित नव्हते  ते विषय त्यांनी तात्पुरते म्हणजे नंतर बदल करता येण्यासारखे आहेत असे सांगितले आहेत.
 आता महत्वाचा विषय   लक्षात घ्या बुद्धाला नास्तिकांच्या रांगेत उभे करू नका बुद्ध विज्ञानवादी आहे निसर्गाच्या प्रत्येक बदलला बुद्धाने स्वीकारले आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम मानून बुद्धाने धम्म देखील परिवर्तन वादी आहे जे जे बदल घडतील ते  ते धम्म स्वीकारू शकतो एवढा लवचिक धम्म आहे त्याला नास्तिकांच्या रांगेत केवळ ईश्वरामुळे बसवणे  निश्चित च चुकीचे आहे
आता बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा लोकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतल्या आहेत काय अर्थ लोकांना लागले नाहीत असेच म्हणावे लागेल कारण सुरुवातीच्या प्रतिज्ञा सोडल्या तर बाकीच्या प्रतिज्ञावर पाणी सोडले इथल्या विचारवंतांनी 
केवळ त्यांचा इव्हेंट करून टाकला बाकी    काही नाही कदाचित माझे मत तुम्हाला खटकू शकते पण  २२ प्रतिज्ञांचे सार मात्र समाजाला पटवून देण्यात कमी पडल्याची लक्षणे आहेत हि दीक्षाभूमीवर दिलेल्या या प्रतिज्ञांची  आजची स्थिती काय एवढ्या वर्षांनी हि आम्हाला ईश्वराच्या प्रतिज्ञा हव्याश्या वाटतात याचा अर्थ आम्ही बुद्ध सांगण्यात कमी पडलो एवढी वर्षे आम्ही त्या सुरुवातीच्याच प्रतिज्ञा सांगत बसलो मुख्य गाभा च विसरून गेलो  जनमानसात धम्म रुजवणे आम्हाला जमले नाही  कारण तिथे प्रसिद्धी नसते एहे वास्तव समजून घ्या सामान्य जनतेत प्रसिद्धी मिळत नाही म्हणून तिथे लोक जात नाही त सामान्य लोकांमध्ये मोठाले स्टेज नसतात शोबाजी नसते माईक वैगरे काहीच नसते अश्या लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष धम्म सांगणे केवढे कठीण काम असते हे फक्त त्याच व्यक्तीला माहिती असते ती व्यक्ती शो प्रसिद्धी ह्यांच्याशिवाय समाजात जातो त्यालाच  जो त्या स्थितीतून वरती आलेला आहे त्याला बाकीच्या शहरात राहून कोणी म्हणत असेल कि चळवळ आम्हाला कळाली  तर गैरसमजातून लवकर बाहेर या गावखेड्यातला अंधार अजून पाहिलेला नाही  तुमची तत्वे तुमची विचारधारा गावामध्ये पाणी कुठे भरते ते जाऊन पहावे 
आज हे सांगण्याचा का प्रयत्न करतोय कि नास्तिक बनून लोकांना चुकीच्या प्रवाहात नेऊ नका धम्म नास्तिक नसून  परिवर्तनशील आहे निसर्गाच्या प्रत्येक बदलला सामावून घेण्याची त्याची क्षमता असताना ईश्वर नावाच्या संकल्पनेत धम्म अडकवून ठेवून धम्म प्रसार काय काय करणार
वास्तविक लोकांचा धम्म प्रसार कमीच आणि स्वतःचा प्रचार च जास्त चालू आहे  बाबासाहेबांच्या नजरेतून बुद्ध अभ्यासावा  असेच मी म्हणेन कारण तोच एकमेव मार्ग आहे धम्म समजून घेण्याचा
शक्य झाल्यास २२ प्रतिज्ञा अभ्यासण्याची नितांत गरज आहे  आणि दुसरे गोष्ट नास्तिकांच्या रांगेतून बाहेर या हि विनाशाकडे घेऊन जाणारी विचारधारा आहे बुद्ध दुःखमुक्तीचा निर्वाणाचा मार्ग आहे  विनाशाचा नाही तेव्हा जितके शक्य होईल तितके लवकर ईश्वर  परमेश्वर अश्या संकल्पनेतून कायमचे बाहेर या व निसर्गाच्या प्रत्येक घटकांचा अभ्यास करा ज्यामुळे तुम्हाला धम्म अधिक समजण्यास मदत होईल

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असणे त्या व्यक्तीला आस्तिक म्हणावे व ज्याचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही अश्या व्यक्तीला नास्तिक म्हणावे असे मी  स्वतः समजतो बाकीच्यांचे ईश्वरपुराण तुमचे तुमच्याकडेच राहू द्या व जमल्यास विज्ञानवादी बना नास्तिक नव्हे कारण निसर्गाच्या अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचा बोध मानवाला  झालेला नाही म्हणून त्याला मानायचे नाही असे नसते अनेक गोष्टी विज्ञानाला उघड करता आलेल्या नाही म्हणून त्या होणार नाहींत असे नाही त्यांचा हि उलगडा होणार त्यामुळे नास्तिकत्व स्वीकारू नका तर परिवर्तनवादी विचारधारा स्वीकारावी हीच बुद्धाची शिकवण आहे

जयभीम नमो बुध्दाय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र