धम्माची भूक


सहा डिसेंबर ५६ साली बहुजनाची झोप उडाली
वाली दिनांचा सोडूनी गेला जनता सारी पोरकी झाली
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।।धृ ।।
बाबासाहेब वदले होते येईन मी मुंबईला
धम्माची दीक्षा देईन म्हणाले तुम्हला
तारीख हि निश्चित केली होती त्यांनी त्या समयाला
पण क्रूर काळाने बघा कसा हा घात आमचा केला
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा   ।। १ ।।
१६ डिसेंबर तारीख होती मुंबईच्या धर्मांतराची
पण बातमी आली दिल्लीवरून बाबांच्या महापरीनिर्वाणाची
जनता हि झाली अबोल करूण कहाणी त्यांची
बाबांसाठी धावुनी गर्दी ती चैत्यभूमीवरची
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा        ।। २ ।।
 अंत्ययात्रा हि बाबांची चालली सोबत  लोटला जनसागर
कोटी कोटी आसवांचा पूर आला दादरच्या भूमीवर
झिजला चंदनापरी कोटी कोटी उपकार आम्हावर
भीम पहिला मी तेव्हा चंदनाच्या चितेवर
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा    ।। ३ ।।
जनतेची हि भूक धम्माची पहिली ना कधी आजवर
साक्ष ठेवून बाबासाहेबांना त्या चंदनाच्या चितेवर
बुद्धं शरणं गच्छामि जयघोष त्या सागरावर
अनुयायी बाबांचे आले बौद्ध धम्माच्या वाटेवर
चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा
धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा    ।। ४ ।।







 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र