जागतिक महिला दिन व आजची महिलांची मनस्थिती

भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हिन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले. स्त्रियांच्या या अवनतीस ब्राम्हणवादी व्यवस्था कारणीभूत आहे.
स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य भगवान बुध्द, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे  स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही.
प्राचिन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढिल आलेखावरुन दिसून येईल.
१. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार  स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आपस्तंभ धर्मसुत्र ६-११ नुसार एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना स्त्री समोर आली असेल तर त्याने वेद वाचणे थांबवावे असे लिहीले आहे.
महात्मा फुलेंनी १ जानेवारी १८४८ रोजी मुलींसाठी देशात पुण्यात पहिली शाळा काढून स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम २९ नुसार  प्रत्येक स्त्रीस शिक्षणाचा मुलभूत अधिकार बहाल केला.
२. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार  स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारुन ती स्वातंत्र्यास लायक नाही असे सांगितले.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार  देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला.
३. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार  पतीला पत्‍नीची विक्री करण्याची मुभा देण्यात आले. याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील द्रोपदीला जुगारात हरण्याचे आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २३(१) नुसार  स्त्री-पुरुषांचा व्यापार व विक्री करण्यास मनाई केली आहे.
४. मनुस्मृतील श्लोक क्रमांक २-६६ नुसार  स्त्री ही अमंगल ठरविण्यात आले असून तिला धार्मिक विधी अथवा मंत्र म्हणता येत नाही. मनुस्मृतील श्लोक क्रमांक १६-३६-३७ नुसार  ती जर मंत्र म्हणत असेल तर नरकात जाते.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम २५ नुसार  धर्म स्वातंत्र्याचा व धार्मिक विधीत सहभागी होण्याचा स्त्री-पुरुषांना समान अधिकार आहे.
५. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४८ नुसार  स्त्रीला नवर्‍यापासून घटस्फोट घेण्यास मनाई केली आहे. नवरा कसाही असला तरी तिने नवर्‍यासोबतच राहावे असे तिच्यावर बंधन टाकले. पुरुषावर मात्र असे कोणतेही बंधन टाकले नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ६ अनुसूची ३ (झ) नुसार  नवरा जर अन्यायी असेल तर त्याच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे.
६. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-४१६ नुसार  पत्‍नीला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नाही. तिने जरी स्वकष्टाने संपत्ती मिळवली असली तरीही त्यात तिचा हक्क नाही.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ३०० (क) नुसार  स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कापासून वंचित करता येत नाही. तसेच बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाच्या आधारावर जो कायदा तयार करण्यात आला, त्यानूसार स्त्रिला कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क देण्यात आला आहे.
७. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ८-२९९ नुसार  स्त्रिला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला हक्क देण्यात आला. तसेच श्लोक क्रमांक ११-६७ नुसार  स्त्री हत्त्या झाली असेल तर मद्यपानाच्या अपराधाएवढा क्षुल्लक गुन्हा ठरविण्यात आला. एवढेच नव्हे तर, तुलशीदास यांनी रामचरित मानस मध्ये म्हटले आहे की, ‘ढोल गवॉर शुद्र पशु नारी, सब ताडन के आधिकारी।’
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची  ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार  स्त्रिला मारहान करणे व स्त्रीची हत्या करणे फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय स्त्रिला त्रास होवू नये म्हणून इंडियन माईन्स ऎक्ट १९४६ ची निर्मिती करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंत काम करण्यास व रात्रपाळीस बंदी घातली. तसेच माईन्स मॅटर्निटी बेनेफिट ऎक्ट तयार करुन स्त्रियांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस केली. पुढे घटनेने हा कायदा देशातील सर्व स्त्रियांसाठी लागू केला. त्याच प्रमाणे घटनेच्या कलम ४२ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी व सुरक्षित व्यवस्था देण्यात यावी असे बंधन मालकावर टाकण्यात आले.
८. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४७ नुसार  कुटुंबातील कोणत्याही स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार  स्त्री किंवा पुरुषाला समान अधिकार असल्यामुळे स्त्रिला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३९ (क) नुसार उपजिविकेचे पर्याप्त साधन मिळविण्याचा अधिकार दिला. तसेच घटनेच्या कलम ३२५ नुसार बाबासाहेबांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला. या महत्वपुर्ण अधिकारांमुळे लोकशाहीतील सर्वश्रेष्ट असं शस्त्र स्त्रियांच्या हातात देवून व त्यांना सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर करुन .बाबासाहेबांनी स्त्रियांवर अनंत उपकार केले आहे.
९. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९.१६ नुसार  स्त्रीच्या बाबतीत असे म्हटले की परमेश्वराने जन्मताच तिच्यात अत्यंत विघातक दुर्गुण घातले आहेत. श्रीकृष्णाने भगवतगिता श्लोक क्रमांक ९.३२ नुसार स्त्रियांना पापयोनी म्हटले आहे.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुसुची  ७ क्रमांक ३ (१)(२) नुसार  स्त्रियांची मानहानी करणे व कलम १४ नुसार  लिंगभेद करण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेच्या कलम ३९ (क) नुसार कायद्याने न्याय देतांना स्त्री पुरुष असा लिंगभेद करता येत नाही.
१०. विधवा स्त्रिचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्त्रिला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे ( मध्यप्रदेशात होळीच्या दिवशी शुद्र स्त्रीला नग्न नाचविण्याची प्रथा आहे.) इत्यादी स्त्रियांना हिनत्व आणणार्‍या कुप्रथा स्त्रियांवर हिंदूधर्माने लादल्या.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम ५१ (ड) नुसार  स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणार्‍या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आणली.
हिंदु धर्मातील ब्राम्हणी व्यवस्थेतील मनुच्या कायद्याने व इतर धर्मग्रंथाने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले. म्हणूनच महात्मा फुल्यांनी, ‘मनुस्मृती जाळली पाहिजे’ असे जळजळीत उद्‍गार काढले होते. बाबासाहेबांनी आपल्या गुरुची आज्ञा समजून प्रत्यक्षात दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी हा काळा कायदा जाळला. ते मनुस्मृती जाळून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायावर आधारित भारतीय घटना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला अर्पन करुन  तिची अंमलबजावनी दिनांक २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.
आज फुले-आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वामुळेच भारतीय स्त्री देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत. तेव्हा भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे द्वार उघडून देणार्‍या या महामानवा समोर समस्त स्त्रियांनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हायला पाहिजे.

तिथे आज स्त्री काल्पनिक देवापुढे वाकते आजही पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही ज्या स्त्रीला बाबासाहेबांचे संविधान पंतप्रधान करते त्या स्त्रीला हिंदू धर्म मंदिर प्रवेश करू देत नाही किती मानसिकता आहे त्यांची म्हणून महात्मा फुले यानाही वाटले कि स्त्री शिकली तरच समाजाचा उद्धार आहे   पण आज मुलगी शिकली पण तिने काय केले ज्यांनी तिला शिकवण्यासाठी अतोनात कष्ट केले त्या स्त्रीने त्यांचे उपकार विसरून देवाचे आभार मानते 
ज्या स्त्रीला हे देव आपले दर्शन घेण्याची परवानगी देत नाही ती स्त्री कशी काय त्या देवाला मानते ज्या मातेने यांचा जीवन  घडवले त्या मातेचा आपण परिचय करून देवू या 
म. ज्योतिबा फुलेंनी १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा पुण्यास काढली. या शाळेच्या सावित्रीबाई ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात.
१५ मे १८४८ ला अस्प्रृशांसाठी आणखी शाळा काढुन १८५२ पर्यंत अशा शाळांची संख्या १८ पर्यंत नेली.
हे कार्य चालवितांना त्यांना अतोनात श्रम, हाल-अपेष्टा भोगाव्या लागल्या. उच्च वर्णीयांकडुन अर्वाच्च शिव्या व शेणमातींचा मार सहन करावा लागला. त्यांना मारण्यासाठी उच्चवर्णीयांनी मारेकरी पाठविले होते. मुलींना व अस्प्रृशांना शिकविण्यासाठी कोणीही शिक्षक पुढे येत नव्हते. तेव्हा स्वत: सावित्रीबाई शिकून शिक्षिका बनल्या. अशा रितीने सावित्रीबाई भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका ठरल्या.
विद्येची देवता ही सरस्वती आहे, असे पुराणातील कथा बहुजन समाजाच्या चिल्या-पिल्यांच्या संस्कारक्षम मनावर ठासून बिंबविले जाते. परंतु शिक्षणाचे महान कार्ये करणार्‍या सावित्रीबाईंना मात्र अनभिज्ञ ठेवल्या जाते. ही फार मोठी शोकांतिका आहे. सतीची चाल, देवदासी प्रथा, बालविवाह, विधवा केशवपण पध्दती, विधवा विवाहास बंदी, अस्प्रृशता इत्यादी सारख्या अनिष्ट रुढीवर व त्यांचे उदात्तीकरण करणार्‍या धर्मग्रंथावर फुले दांपत्यांनी प्रखर हल्ला चढविला.

बालपणीच लग्न झाल्यामुळे पतिनिधनानंतर मुली विधवा होत होत्या. सन १८९१ च्या खाने सुमारीनुसार महाराष्टात केवळ शुन्य ते चार वर्षे वयापर्यंतच्या विधवा झालेल्या, आईचे स्तनपान न सुटलेल्य़ा निरागस बालीकांची संख्या १३८७८ अशी होती. तर चार वर्षे वयानंतरच्या बालिका किती असतील याची कल्पना करता येणार नाही. अशा विधवा मुलींचे डोक्यावरील केस काढुन त्यांना विद्रृप केले जात होते. अशा मुक्या मुली आपल्या बापांना म्हणत असतील की, “ मी तुमची लाडकी, मला कां करता बोडकी ! ”विधवांचे संप होऊ नये म्हणून फुले दांपत्यांनी नाव्ह्यांचा संप घडवुन आणला होता.”
बाल विधवा वयात आल्यानंतर उच्चवर्णीय लोक त्यांच्या असहायतेचा फायदा घेवून त्यांचेवर अत्याचार करीत व त्यांना विधवा माता बनण्यास भाग पाडत होते. कित्येक विधवा स्त्रिया गर्भपात करुन घ्यायच्या किवा आत्महत्या करायच्या. बालकांची हत्या होऊ नये म्हणून फुले दांपत्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह १८६३ साली स्थापन केले होते. सावित्रीबाईं स्वत: विधवा मातेचे बाळंतपण करायच्या. अशाच एका काशीबाई नावाच्या ब्राम्हण विधवा मातेला आत्महत्येपासून परावृत केले. एवढेच नव्हे तर तिचे बाळंतपण करुन तिचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतले. त्यास डॉक्टर बनविले व आपला एकुलता एक वारस जाहिर करुन आपली संपत्ती त्याचे नावांने करुन दिली. केवढे कृतिशील उदात्त कार्य आहे हे !
सावित्रीबाई बहुजन समाजाचे प्रबोधन करतांना आपल्या ’उद्धोग’ ह्या विषयावरील भाषणात म्हणतात की, “दैव्य, प्रारब्ध ह्यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी व भिकारी असून त्यांचा वंश नेहमीच दुसर्‍यांच्या गुलामगिरीत राहतो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदूस्थान होय.”
सावित्रीबाईंनी ’काव्य फुले’ व ’बावन्नकशी सुबोध रत्‍नाकर’ नावांचे काव्यसंग्रह व इतर साहित्य निर्मिती केली. त्यांची काव्य संपदा कवी केशवसुतांच्या ३० वर्षे आधिची होती. त्यामुळे मराठी काव्यात क्रांती घडवून आणल्याबद्दल पहिला मान सावित्रीबाईंनाच जाते.
सावित्रीबाई आपल्या ’काव्य फुले’ या संग्रहात म्हणतात-
“ज्ञान नाही, विद्या नाही,
ते घेण्याची गोडी नाही,
बुध्दी असूनी चालत नाही,
तयास मानव म्हणावे का ?”
प्रारब्ध आणि दैवाचा फैलाव करणारा रामदास श्वामी यांचा श्‍लोक सावित्रीबाईं खालील प्रमाणे दुरुस्त करतात-
रामदासांचा श्‍लोक सावित्रीबाईंचा दुरुस्त श्‍लोक
जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा एक आहे
विचारी मना तूच शोधोनी पाहे ! विचारी मना तूच शोधोनी पाहे !
मना त्वाची ते पूर्व संचित केले मना त्वाची ते ज्ञान संचित केले
तया सारखे भोगणे प्राप्त झाले !! तया सारखे सौख्य प्राप्त झाले !!
२८ नोव्हेंबर १८९० ला ज्योतिबा फुले यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचे कार्य पुढे नेण्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईवर येवून पडली. म. ज्योतिबा फुलेंनी सुरु केलेली समाज परिवर्तनाची ’सत्यशोधक समाज’ ही चळवळ राबविण्यासाठी सार्वजनिक कार्यासाठी बाहेर पडणारी सावित्रीबाई भारतातील पहिल्याच स्त्री होत्या.
१८९७ साली प्लेग ग्रस्त लोकांना मदत करतांना स्वत: सावित्रीबाईंनाच त्या रोगाने पछाडले होते. त्यातच १० मार्च १८९७ रोजी सावित्रीबाईंची क्रांतीज्योत कायमची मालवली.
आता त्यांचे कार्य पहिले आणि त्यांचे शिकवण हि पहिली तरी जर स्त्री काल्पनिक देवाकडे जात असेल तर ती स्त्री गद्दार आहे काल्पनिक देवावर श्रद्धा आहे न मग आज जे स्त्रियांवर अत्याचार होतात तेव्हा दुर्गा कुठे लपून बसली आज राजरोसपणे एका स्त्रीवर बलात्कार होतो तेव्हा आंबा काळी दुर्गा भवानी जगदंबा या नारीशक्ती कोठे लपून बसतात यावरून समंजस स्त्रियांनी समजून घेतले पाहिजे आज जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो विचार करा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाच्या मुली न तुम्ही मग त्याच मुलींचे शोषण कशे करतो आणि आज भारत सोडला तर निदान बाकीच्या देशात स्त्री उच्च पदावर आहे भारतात आजही स्त्री कपडे आणि भांडीच धूत आहे शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी दिला त्यांना विसरून लागले खंडोबाची पूजा करायला काय झाले खंडोबाला पुजायला गेल्या आणि मुरल्या झाल्या देवाला पुजायला गेल्या आणि देवदासी झाल्या का असे आता देवदासी माहित नाही काही स्त्रियांना त्यांच्यासाठी देवदासी म्हणजे देवाला सोडलेली स्त्री आता  त्या स्त्री शी सारा गाव सबंध ठेवायचा तिला मग त्यातून स्त्रीला जे संतान होईल त्याला पोतराज केल आता स्त्री हिचे हिंदूच काय मुस्लिम यांच्यातही तेच आहे जशे अंबाबाई च्या मंदिरात  देवीच्या गाभाऱ्यात  स्त्रियांना जाण्याची अनुमती नाही म्हणे देवीचा कोप होतो  अशी कसली देवी  आहे जिला आपल्याच जातीचा द्वेष असावा  तसे मुस्लिमांच्या दर्ग्यात स्त्रियांना जाण्याची अनुमती नसते 
आजची स्त्री जागरूक आहे पण तिचा मेंदू हा गुलाम आहे स्त्रियांना वेदात काय स्थान आहे ते पाहूया 


वेदामध्ये पुत्र जन्मासाठी भरपूर प्रार्थना आहेत परंतु त्यातील कोणत्याही रुचेत मुलीच्या जन्मासाठी एकही प्रार्थना नाही उलट मुलीच्या जन्माबाबत शोक व्यक्त केलेला आहे मुलगी होवू नये म्हणून मुलाला गर्भात जपून ठेवण्याच्या अर्थाच्या प्रार्थना आपणास अथर्ववेदात {८/६/२५,६/११/३} आढळतात यजुर्वेदचा पोटग्रंथ असलेला शतप्रथ  ब्राह्मण यामध्ये {५/३/२/२} पुत्र नसलेल्या स्त्रीची निंदा करून तिला अभागिन म्हटले आहे या ग्रंथानुसार स्त्रिया शुद्र कुत्रे गाई मध्ये असत्य पाप व काळोख वसतो यजुर्वेद सांगतो कि स्त्रिया ह्या अबला व संपत्तीत वाटा मिळवण्यास अपात्र असतात आणि त्या दृष्ट माणसापेक्षाही नीच बोलतात { तैतरीया संहिता , ६/५/८/२} ऋग्वेदानुसार {८/३३/१७} स्त्रीचे मन डवने कठीण असते ती अल्प मती  असते स्त्रीयाबरोबर मैत्री होऊ शकत नाही त्यांची हृदये हडळनिची असतात {ऋग्वेद १०,९५-१५}
अश्वमेधाचा विधी करताना  यज्ञवेदीवर यांचा उघड अपमान करण्यात येई त्या जेव्हा घोड्याशी संभोग करीत तेव्हा श्रोत्यासमोर अश्लील भाषेत त्यांची थट्टामस्करी करण्याची पुरोहितांना परवानगी असे {पहा ऋग्वेद अध्याय २३ } वेदामध्ये आपणास बहुपत्नीत्वाची चाल आढळून येते आर्य हे आदिवाशियांवर हल्ले करीत व कधी कधी त्यांच्याच टोल्यावर  हल्ले करीत व अश्या मार्गाने पराजित लोकांच्या स्त्रिया त्यांना मिळत ह्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या स्त्रीयामुळे बहुपत्नीत्वाच्या चालीसारखी घृणास्पद चाल पडली श्रीमंत टोळीकडे जशी अनेक गाईगुरे असत त्याप्रमाणे सामर्थ्यशाली आर्याकडे अनेक स्त्रिया असत स्त्रियांचा अवमान करण्याचाही दुसरा मार्ग होता त्याची स्थती मालमत्तेपेक्षाही वेगळी नव्हती
ऋग्वेदात }१०८१५९} इंद्राच्या अनेक राण्या चा उल्लेख आहे ऋग्वेदाचे असलेल्या हरिश्चंद्राला शंभर बायका होत्या असे सांगितले आहे अनेक बायका एका पुरुषाची मालमत्ता असल्याचे मानले जाई  त्याच प्रमाणे एक स्त्री अनेक पुरुषांची सामाईक  मालमत्ता मानण्यात येई {पहा अथर्ववेद १४-१-६१-१४-२१४} हि घृणास्पद चाल बहुपत्नीत्वाची चाल या नावाने ओळखण्यात येते बहुपत्नीत्वाच्या चालीप्रमाणे स्त्रीला कसलेही महत्व आणि व्यक्तित्व नाही व तिला केवळ मालमत्ता याचा दर्जा देण्यात आलेला आहे याचे हि चाल निदर्शक आहे
जेंव्हा त्या स्त्रियांच्या पतीचा मृत्यू होई त्यांनी पुढील  जन्मी किंवा पती लोकात सेवा करावी म्हणून त्यांना त्यांच्या बरोबर मारण्याची जबरदस्ती करण्यात येई {अथर्ववेद १८/३/१} राजा राम मोहन रॉय  सारख्या समाजसुधारकाने सामाजिक लढा दिल्यानंतर गेल्या शतकात ह्या अमानुष चालीवर कायद्याने बंदी आणण्यात आली या चालीचा अर्थ होता मालकाच्या मृत्युनंतर गुलामगिरी कायम ठेवणे
वेदामध्ये आपणास आणखी एक अमानुष चाल आढळते तिला विधवेचा पुनर्विवाह असे म्हणतात ह्या अमानुष  चालीनुसार विधवेला मृत पत्नीच्या भावाबरोबर लग्न करण्याची सक्ती करण्यात येई तीसुद्धा आधीच्या पतीचा मृतदेह हलवण्याच्या आधी व त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी { पहा ऋग्वेद १०/१८/८}
जर मृत पतीला भावू नसेल तर तिला अविवाहित विधवा राहू देण्यात येई परंतु तेव्हा  तिला दुसरा विवाह करण्यास बंदी असे परंतु तिची स्थिती अत्यंत दुःखद असे तिचे मुंडण करण्यात येई तिला वेगळी काढण्यात येई व अपशकुन मानण्यात येई तिच्या उपस्थितीत संकटे येतील म्हणून सर्व  आनंदाच्या प्रसंगी तिला टाळण्यात येई शत्रूच्या व कमजोर टोळ्यांच्या अनेक स्त्रिया आर्यांनी लुटल्या होत्या त्यामुळे त्यांच्याजवळ पुष्कळ स्त्रिया होत्या त्यांनी त्या सर्व स्त्रियांना बायका करून घेतल्या नाहीत त्यांच्यापैकी काही बायका झाल्या तर काही गुलाम स्त्रिया  म्हणून ठेवण्यात आल्या तरीही त्या कसलाही विधीनिषेध न पाळता वैषयिक प्रयोजनार्थ वापरण्यात येवू शकत होत्या ह्या गुलाम स्त्रिया पुरोहितांना अर्पण केल्या जात असत किंवा त्या हुंड्याचा एक भाग म्हणून देण्यात येत असे  { पहा ऋग्वेद ६/२७/८/८/६८/१७}
गुलाम स्त्रियांपैकी काही स्त्रिया टोळीच्या सर्व सभासदांची किंवा वस्तीच्या किंवा गावाच्या सर्व रहिवाशांची भागीदारी असलेली सामायिक संपत्ती मानण्यात येई  त्या वैदिक काळातील वेश्या होत्या वेदामध्ये व वैदिक साहित्यात त्याचा उल्लेख अतितवादी अतिशकत्वरि आणि अपशकत्वरि असा करण्यात आला आहे { पहा यजुर्वेद ३०/१५ , तैतरिया  ब्राह्मण ३/४/११/१ }
ती वेश्यप्रथा धंदेवाईक वेश्या देवदासींच्या रूपाने आजतागायत चालू आहेत स्त्रीचा अवमान करणाऱ्या ह्या सर्व अमानुष चालीव्यतिरिक्त वेदामध्ये आणखी एक पाशवी चाल आढळून येते तिला नियोग प्रथा म्हणतात {हि प्रथा पती जर आजारी असेल नपुंसक असेल किंवा कामानिमित्त पत्नीपासून दूर असेल तर पतिव्यतिरिक्त दुसर्या कोणत्याही पुरुषांकडून स्त्रीने गर्भ धारणा करावी अशे सांगते } अगोदरच्या काळात प्रथा  स्त्रीला पुरुषाच्या विषय वासना तृप्त करणाऱ्या जंगम मालमत्ता समजले जायचे तर हि प्रथा स्त्री म्हणजे मुलास जन्म देणारी यंत्र यापेक्षा कसलेही  महत्व देत नाही हि जंगम मालमत्ता किंवा मुलास जन्म देणारे यंत्र  बनविल्यामुळे तिला कसलेही महत्व व व्यक्तिमत्व नव्हते वादिक काळात स्त्रीचा संपत्तीचा हक्क हिरावून घेण्यात आलेला होता डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन्हीचे निरीक्षण केलेलं होत
विवाहित हिंदू स्त्रीने एका पुरुषाशी विवाह केला असला तरीही सर्व कुटुंबाची मालमत्ता होत असे परंतु तिला स्वतः संपत्तीचा कोणताही अधिकार नसे
वेदावरुन हे अगदी स्पष्ट होते कि मुलीना आणि बहिणींना देखील अनुक्रमे वडील भावाकडून वैषयिक उपभोगाचे साधन म्हणून मानण्यात येई {पहा ऋग्वेद १०/६१/७  } बापाने स्वतःच्या मुलीशी संभोग केल्याचे सांगितले आहे त्याच प्रमाणे अथर्ववेदात {८/६/७} बापाने व भावाने मुलीशी व बहिणीशी संभोग केल्याचा उल्लेख आहे अथर्ववेदात {२०/१६/१५} भावाने बहिणीवर बलात्कार केल्याचा उल्लेख सापडतो
यावरून आपल्याला एक निश्चित सांगता येईल कि ईश्वराने निर्माण केलेल्या या वेदात स्त्री जातीचा दर्जा अतिशय खालच्या पातळीचा आहे त्यांना स्वतंत्र असे व्यक्तिमत्व देण्यास वेद नाकारते त्यांना जंगम मालमत्ता आणि मुलास जन्म देणारे यंत्र समजते
खर तर उपकार बाबासाहेबांचे माना  ज्यांनी संविधानातून तुम्हाला या पुरुषांच्या समांतर जागेवर बसवले 
चल ज्यांना समजेल त्यांनी समजवून घ्यावे आणि ज्यांना नसेल समजल त्यांनी अजून देवाची  पूजा करावी 

जय शिवराय  
जय भीमराय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र