पुनर्जन्म कशाचा होतो

पुनर्जन्म कशाचा होतो  जेव्हा कि पुनर्जन्म घडवून आणणारी आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही अस्तित्वात असल्याचे सिद्ध होत नाही त्या अत्त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो हा ईश्वरवादी धर्माचा सिद्धांत मान्य करण्यासारखा नाही म्हणून भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी नाकारल्या आहेत म्हणून पुनर्जन्म कोणाचा आणि कशाचा होतो या दोन प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे म्हणून आपण प्रथम पुनर्जन्म कशाचा होतो यावर विचार करू
भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पृथ्वी जल तेज आणि वायू हे होत प्रश्न असा आहे कि मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय काही म्हणतात होय काही म्हणतात होय पण तथागत बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थ आकाशात तरंगणाऱ्या त्याच पदार्थाच्या समूहाला मिळतात तेव्हा विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली म्हणजे च्युतीचीत्त अंदाणु आणि शुक्राणू मिळाल्यावर नवा जन्म होतो
या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या घटक कुणीतरी एका विशिष्ट मृत शरीरातील आशु शकतील येथे एक गोष्ट लक्षात ठेवले पाहिजे कि शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक सदैव जगत असतात म्हणजेच चेतना जल उष्णता आणि विज्ञान या गोष्टी मृत शरीराला सोडून जातात मृत शरीरातील काया वाचा आणि मन यांच्या क्रिया थांबलेल्या असतात उष्णता म्हणजे उर्जा म्हणजेच शरीर उर्जा निर्माण करणे थांबवते
विज्ञान म्हणजे उर्जेचा कधीही नाश होत नाही मृत्युनंतर सर्व नाश पावते मागे काहीच उरत नाही हि विचारसरणी भौतिक शास्त्राच्या विरुद्ध आहे उर्जेचे सातत्य आहे अविनाशी आहे उर्जेसोबत विज्ञान असते
पुनर्जन्म कोणाचा होतो
या बाबतीत सर्वात बिकट प्रश्न आहे कि पुनर्जन्म कोणाचा होतो एकदा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो काय ? मृताच्या पुनर्जन्मावर बुद्धाचा विश्वास नव्हता मृत मनुष्याचे सर्व भौतिक घटक त्याच  प्रमाणात तेवढ्याच संखेने एकत्र आले आणि त्यांनी  नवा देह धारण केला तर त्याच मृत मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे म्हणता येईल पण तेवढ्याच संखेने घटक पुन्हा एकत्र येणे हि दुर्मिळ गोष्ट आहे
जसा नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणातून बनला असेल तर त्याला पुनर्जन्म म्हणता येत नाही आणि ते शक्य नाही परतू तो एकाच मनुष्याचा पुनर्जन्म आशु शकत नाही  आणि आता हे भौतिक घटक फक्त मानवाचेच असू शकतील असे नाही जेवढे सजीव प्राणी असो वा वनस्पती त्यांच्यातही हे गुणधर्म असतात त्यामुळे मानवाचा पुनर्जन्म शक्य नाही  बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात बाबासाहेब म्हणतात कि पित्याच्या शुक्राणू आईचे अंडानु यांच्या संयोगाने विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली कि एक नवा जन्मं होतो
पुनर्जन्म च्युतीचीत्ताचा होतो आत्मा वा मनुष्याचा नाही
च्युतीचीत्त म्हणजे decceased  conciousness  होय प्राण्याच्या मृत्युच्या वेळी शरीर एक सूक्ष्म कण बाहेर सोडते त्यालाच च्युतीचीत्त म्हणतात हे च्युतीचीत्त आस्त्रवाणी { ऋणात्मक चैतसिक स्थितीज उर्जा }युक्त असते आस्त्रावाचा अनुरूप हे च्युतीचीत्त जीव लोकात भ्रमण करून नवे शरीर धारण करण्याच्या स्थळी चैतसिक तरंगाच्या रुपात पोहचते तेथे नराचे शुक्राणू आणि मादीचे अंडानु यांच्याशी संपर्क करून नवीन रूप धारण करते
प्राणी शरीर शोडते वेळी सूक्ष्म कणाच्या रूपाने च्युतीचीत्त जे बाहेर पडते ते मृताच्या संचय केलेल्या कर्मविपाकाच्या परिणाम होय अंडानु आणि शुक्राणू च्या संयोगाने वेळी उपस्तीत असणारे च्युतीचीत्त तरंग रूप धारण करते त्याला गंधर्व चित्त म्हणतात हे गंधर्व चित्त जायगोटशी संपर्क केल्यावर निषेचन होते निषेचनाचेवेली संयोग करणाऱ्या गंधर्व चित्ताला संधी चित्त म्हणतात नवा जन्म देवून च्युतीचीत्त  मरून जाते जशे बीजातून अंकुर बाहेर पडले कि बीज तसेच च्युतीचीत्तचे आहे
च्युतीचीत्ताच्या  संयोगाने नवीन जन्म होतो तो च्युतीत्ताच्या पुनर्जन्म आहे मृत मनुष्याचा नाही नवीन येणाऱ्या बालकाचा तो जन्म आहे पुनर्जन्म नाही निषेचन हाच पुनर्जन्म आहे असे जगातील पहिले वैज्ञानिक भगवान बुद्ध म्हणतात यालाच भव म्हणतात भगवंताच्या ज्ञानाच्या वैज्ञानिक अनुसरण चित्त शुक्राणू अंडानु चा संयोग मिलन एकात्मता संयोजन यालाच निषेचन म्हटले जाते न कि अंडानु शुक्राणूच्या संयोगाला प्रत्येक सजीवाचे चित्त हे दुसर्यापेक्षा वेगळे असते म्हणून हे मान्य करावेच लागते कि प्रत्येक चित्ताचा आधार जीन आहेत
जीन आपल्या काही कर्म फळाचे वाहक आहेत विशेष प्रकारचे जीन चित्तासोबत संयोग करतात जीन माणसाच्या बर्याच गुणांचा आधार आहेत परंतु अमिरी  गरिबी आणि उच्च नीचतेचा आधार नाहीत म्हणून कर्म या गोष्ट्शी कोणताही सबंध ठेवत नाही काही बिमार्या मात्र माणसाच्या कर्मफलाच परिणाम असतात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र