नवबौद्धयान : बौद्ध धम्माची खरी ओळख
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धानंतर २५०० वर्षांनी बुद्ध धम्माचा प्रसार भारत देशात केला १४ ओक्टोंबर १९५६ साली नागपूरच्या भूमीत लाखो जनसागराला बुद्धाच्या ओटीत टाकले रशियन क्रांतीपेक्षा बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती जगातील सर्वोत्तम धम्मक्रांती ठरली रक्ताचा एक हि थेंब न घालवता केलेली धम्मक्रांती म्हणून जगाच्या इतिहासात नोंद आहे अश्या महापंडिताने या बौद्ध धम्माचा खरा इतिहास मांडला आणि बौद्ध धम्मात असणाऱ्या दोन पंथात नवबौद्ध यान हा नवीन पंथ निर्माण केला जो सर्वात जास्त प्रभावशाली ठरला आता नाकी काय आहे बौद्ध धम्म आणि त्याचे काय पंथ आहेत त्यांची निर्मिती कशी झाली यावर एक प्रकाश टाकूया प्रथम बौद्ध धम्मात असणारे पंथ एक महायान जो बुद्धाच्या मृत्युनंतर उदयास आला दुसरा हीनयान तोही याच वेळी उदयास आला आणि तिसरा बुद्धा नंतर २५०० वर्षांनी उदयास आला तो नवबौद्धयान
मुळात भगवान बुद्धाने ईश्वर नाकारल्यामुळे ईश्वरवादी धर्मांना मोठा धक्का बसला त्यामुळे बुद्ध व त्याच्या विचाराची नासाडी कशी करता येईल हे प्रथम हिंदू धर्माने प्रयत्न केला पण बुद्ध स्वतः जिवंत असेपर्यंत कोणाची हिम्मत झाली नाही आणि त्याच्या विचाराबाबत अपप्रचार हि कोणी करू शकले नाहीत पण बुद्धाच्या निर्वाणा नंतर हा प्रयत्न झाला त्यात महायान हीनयान हे पंथ उदयास आले ज्या भिक्षूला जसे वाटेल तसे तो करू लागला बुद्धाने सांगितले माझी शिकवण हाच धम्माचा प्रमुख असू द्या पण काहीभिक्षु यांनी त्याला तडा दिली आणि हे पंथ उदयास आले याचा मोठा फायदा झाला तो ब्राह्मणी वर्गाला त्यानंतर सम्राट अशोकाने बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धम्माला राजपद लाभले आणि सम्राट अशोकाने ईश्वरवादी लोकांच्या नाड्या आवळून धरल्या जगात प्रथम बौद्ध धम्म गेला असेल तर तो अशोकामुळे सम्राट अशोकापुढे बोलायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती कारण ब्राह्मणी लोकांनी कलिंग चा संग्राम आपल्या डोळ्यांनी पहिला होता त्यामुळे जो अशोक राजा अहिंसक झाला आहे त्याला परत हिंसक करण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही कारण जर अशोक हिंसक झाला असता तर आज कदाचित ब्राह्मण नावाचा प्राणीच या भूतलावर नसता अशोकाने बौद्ध धम्माला जगाच्या इतक्या उंचावर नेवून ठेवले कि आज जगातील पहिला विश्वधर्म म्हणून बौद्ध धम्माकडे पहिले जाते सम्राट अशोकानंतर मात्र बौद्ध धम्माची घसरण व्हायला लागली ब्राह्मणी शक्तींनी उचल खाल्ली ब्रुहदत्त राजाचा त्याच्या ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने कपटाने खून केला आणि राजसत्ता आपल्याकडे घेतली आणि मग बौद्ध धम्माचा जितका विनाश करता येईल तेवढा त्याने केला भिक्षूंची कत्तल विहारांची मोडतोड करून टाकली त्यांनतर हर्षवर्धन ने परत बौद्ध धम्माला राजपद दिले आणि बौद्ध धम्माला या देशात जिवंत ठेवले त्यानंतर मात्र बौद्ध धम्माची घसरण झाली ते कायमची ठरली त्यानंतर बौद्ध धम्म भारतातून पार हद्दपार झाला ब्राह्मणी वर्चस्व आले बहुजन गुलाम झाला जगण्याचा हि अधिकार सापडेना मानवाला मानव म्हणून जगण्याची सुद्धा मुभा नव्हती पण १९ व्या शतकात उदयास आलेला जगातील एक तेजस्वी तारा आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माला या भारत देशात परत पुनरुजीवीत केल महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धानंतर २५०० वर्षांनी भारतात बुद्ध धम्माला जीवित करण्याचे काम केल आणि आणि बुद्धाला अनुसरीत बुद्धाची शिकवण या समाजाला दिली जगासमोर बाबासाहेबांनी खरा बुद्ध ठेवला प्रथम बुद्धाला देवाचे कल्याण अभिप्रेत नव्हते तर मानवाचे कल्याण अभिप्रेत होते याची सावधानता बाबासाहेबांनी घेतली होती बुध्द धम्माची जी नासाडी झाली त्या नासाडीला कारानिभूत हि बुद्ध धम्माची नंतरच्या काळात वेगळे पंथ पडले त्यामुळे झाले बुद्ध धम्मात महायान आणि हीनयान असे पंथ उदयास आले होते त्यापैकी महायान हा बुद्धाला देव मानणारा होता तर हीनयान बुद्धाला देव मानणारा नव्हता त्यामुळे बुद्ध धम्माची नासाडी झाली असे बाबासाहेब स्वतः म्हणत सम्राट अशोकाच्या काळी सारा भारत बौद्धमय होता त्यावेळी भारत हा सुवर्णकाळ म्हणून गणला जातो याच काळात भारत जगातील पहिले आर्थिक महासत्ता देश होता जगातील इतिहास कारांच्या मते बाबासाहेब हे बुद्ध धम्माचा अभ्यास करणारे जगातील एकमेव अभ्यासक होते त्यांनी जगाला खरा बुद्ध सांगितला जनतेला बुद्ध समजण्यासाठी बुद्ध साहित्य इतके आहे कि ते वाचण्यासाठी सामान्य जनतेला शक्य नाही म्हणून बाबासाहेबांनी स्वतः मेहनत करून सामान्य जनतेला बुद्ध समजावा म्हणून बुद्ध आणि त्यांच्या धम्म हा ग्रंथ लिहिला आणि आज तो ग्रंथ बुद्ध धामाचा धर्मग्रंथ बनला आहे यात बाबासाहेब खरा बुद्ध सांगतात
१९३५ साली बाबासाहेबांनी येवल्यात धर्मांतराची घोषणा केली आणि त्यानंतर जवळ जवळ दोन दशके त्यांनी बुध धम्माला विज्ञानच्या कसोटीवर पारखून पहिले बाबासाहेबांनी तब्बल २० वर्षे बुद्ध धम्माचा अभ्यास केला तसेच इतर धर्माला बुद्ध धम्माच्या तुलनेत तोलून पहिले कोणता धर्म विज्ञानच्या कसोटीवर टिकून राहतो यावर बाबांनी जास्त जोर दिला आणि शेवटी निष्कर्षावर आले कि बुद्धाचा धम्म हाच एकमेव मानवतावादी धम्म आहे आणि १९५६ साली बुद्धाच्या ओटीत सार्या बहुजनाला टाकले भारत देशात बुद्ध धम्माची स्थापना केली जगात आज बाबासाहेबांची हि क्रांती पहिल्या क्रमांकावर आहे आज भारतात बुद्ध धम्माचे अनुयायी दिसत आहेत त्यापैकीसर्वात जास्त अनुयायी हे महाराष्ट्रात पाहायला दिसतात बाबासाहेबांनी नवबौद्ध यान निर्माण केल आणि आज बाबासाहेब जगात आदराचे स्थान आहेत जे कोणताही धर्म पुसू शकनार नाही
प्रथम बाबासाहेबांनी सामान्य जनतेला गुलामीतून काढण्यासाठी असा कोणता धर्म आहे जो मानवाला मानवता शिकवेल मानवाची ओळख देईल म्हणून साऱ्या धर्माचा अभ्यास करणारे बाबासाहेब जगातील पहिले विद्वान आहेत ज्यांनी जगातील सर्व धर्माचा अभ्यास करून बुद्धाला स्वीकारले बुद्धाचा धम्म त्यांनी स्वीकारला कारण हाच धम्म असा आहे यात जातीव्यवस्था नाही तो एक महासागर आहे त्यात आलेला मनुष्य कोणत्या जातींचा आहे हे सांगता येत नाही जसे सागरात आलेलं पाणी कोणत्या नदीचे आहे हे कोणी सांगू सांगू शकत नाही तसे बुद्ध धम्मात असलेला मनुष्य कोणत्या जातीचा आहे हे सांगू शकत नाही
बाबासाहेबांनी आपल्या मृतपाय समाजाला नवसंजीवनी दिली जगातील लोक म्हणत असत बाबासाहेब जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ते इतके घातक नाहीत पण बाबासाहेब ज्यावेळी मारतील तेव्हा ते सर्वात घातक ठरतील आणि ते सत्य ठरले आज बाबासाहेब इतके घातक ठरले कि आज जगात बुद्धानंतर बाबासाहेब स्वीकारावा लागत आहे जगात मानवता जपण्याच्या यादीत बुद्धानंतर ४ स्थानावर बाबासाहेब आहेत यात हिंदूंचे देव कोणताच नाही आज जो भारतात बौद्ध धम्म आहे तो बाबासाहेब प्रणीत आहे महायान प्रणीत नाही कारण इथे बुद्धाला देव म्हणून स्वीकारले नाही बुद्ध हा आदर्श महामानव म्हणून स्वीकारला आहे जगभरातील बुद्धापेक्षा इथला बुद्ध वेगळा आहे इथला बुद्ध ईश्वर नाकारतो आत्मा परमात्म अवतार ह्या गोष्टी नाकारतो इथला बुद्ध इतर बुद्धाप्रमाणे कोणताच चमत्कार करत नाही बाकीच्या बुद्धांच्या कथा खूप भयानक आहेत बुद्धाच्या आयुष्यात कधी त्याने असे पहिले नाही अशी त्याच्याच चरित्राची वाट लावण्यात आली पण बाबासाहेबांनी जगाला खरा बुद्ध दिला आणि मला खात्री आहे कि एक दिवस ह्या जगालाही बाबासाहेब प्रणीत बुद्ध स्वीकारावा लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही आता आपण पाहूया नवबौद्ध का महायानी बुद्ध स्वीकारत नाही तर
प्रथम पाहूया बुद्धाच्या पहिले झालेलं बुद्ध आणि त्यांचे आयुष्यमान आणि त्यांचे जीवन
१] दीपंकर बुद्ध उंची ८० हात आयुष्य १ लक्ष वर्षे ३ लाख बायका
२]कोण्डय्य बुद्ध उंची ८८ हात आयुष्य १ लक्ष वर्षे ३ ल लाख बायका
३]मंगल बुद्ध उंची ८८ हात आयुष्य ९० हजार वर्षे ३० हजार बायका
४] सुमन बुद्ध उंची ९० हात आयुष्य ९० हजार वर्षे ६३ हजार बायका
५] रेवत बुद्ध उंची ८० हात आयुष्य ६० हजर वर्षे ३३ हजार बायका
६]सोभित बुद्ध उंची ५८ हात आयुष्य ९० हजार वर्षे ४३ हजार बायका
७]अनोमदस्सी बुद्ध उंची ५८ हात आयुष्य १ लक्ष वर्षे २३ हजार बायका
८] पदुम बुद्ध उंची ५८ हात आयुष्य १ लक्ष वर्षे ३३ हजार बायका
९] नारद बुद्ध उंची ८८ हात आयुष्य ९० हजार वर्षे ४३ हजार बायका
१०] पदुमूत्तर बुद्ध उंची ५८ हात आयुष्य १ लक्ष वर्षे ४३ हजार बायका
११] सुमेध बुद्ध उंची ८८ हात आयुष्य ९० हजार वर्षे ४८ हजार बायका
१२] सुजात बुद्ध उंची ५० हात आयुष्य ९० हजार वर्षे २३ हजार बायका
१३] पियदस्सी बुद्ध उंची ८० हात आयुष्य ९० हजार वर्षे ३३ हजार बायका
१४] अत्थदस्सि बुद्ध उंची ८० हात आयुष्य १ लक्ष वर्षे ३० हजार बायका
१५] धम्मदस्सि बुद्ध उंची ८० हात आयुष्य १ लक्ष वर्षे ४० हजार बायका
१६] सिद्धत्थ बुद्ध उंची ६० हात आयुष्य १ लक्ष वर्षे ४८ हजार बायका
१७] तिस्स बुद्ध उंची ६० हात आयुष्य १लक्ष वर्षे ३० हजार बायका
१८] पुस्स बुद्ध उंची ५८ हात आयुष्य ९० हजार वर्षे २३ हजार बायका
१९] विपस्सी बुद्ध उंची ८० हात आयुष्य ८० हजार वर्षे ४३ हजार बायका
२० ]सिखी बुद्ध उंची ७० हात आयुष्य ७० हजार वर्षे २४ हजार बायका
२१] वेस्सभु बुद्ध उंची ६० हात आयुष्य ६० हजार वर्षे ३० हजार बायका
२२] ककुसंध बुद्ध उंची ४० हात आयुष्य ४० हजार वर्षे ३० हजार बायका
२३ ] कोनागमन बुद्ध उंची ३० हात आयुष्य ३० हजार वर्षे १६ हजार बायका
२४ कस्सप बुद्ध उंची २० हात आयुष्य २० हजार वर्षे ४८ हजार बायका
२५] गौतम बुद्ध उंची ६ फुट आयुष्य ८० वर्षे ४० हजार बायका
हे मानाने अशक्य आहे कारण विज्ञाने मानवाच्या जन्माचा पुरावा काय दिलाय ते पहा मानव कसा बदलत गेला आहे त्याचे काही पुरावे इतर देशात लागले आहेत त्यासाबंधीचा एक पुरावा
आदिमानव :
१} जाव्हा मानव :- पुरातन तत्ववेत्त्याना आदिमानवाचा शोध लावण्याच्या कमी बरेचसे यश आलेले आहे अलीकडेच १८९४ साली जाव्हा द्वीप येथे डच लष्करी शल्यतज्ञांना उत्खननात अश्मास्थि सापडल्या त्यात आदिमानवाची कवटीचे कवच दोन दात आणि मांडीचे हाड हे भाग सापडते हे भाग जाव्हामध्ये सापडल्याने त्याला जाव्हामानव त्याच बरोबर कपिलता मानव असे म्हणतात ह्याच्या अवयवाचे संशोधन केल्यांनतर स्पष्ट झाले कि हा आदिमानव ताठ उभा राहू शकत होता म्हणून जीव शास्त्रज्ञांनी त्याला पिथे कन्थ्रोपस इसेक्टस असे नाव देण्यात आले ह्या मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्य ५ लक्ष वर्षापूर्वीचे होते हे स्पष्ट करण्यात आले म्हणून ५००० वर्षापूर्वी जन्मास आलेल्या व विश्व निर्मितीस कारण धरलेल्या हिंदूंच्या कृष्ण या देवाचा येथे पहिला बळी जातो
२} पेकिंग मानव :- पी नावाच्या चीनी जीवशास्त्रज्ञाला १९२५ ते १९२७ च्या काळात चीनची राजधानी पेकिंग येथील उत्खननात मानवी अवशेष सापडले हे अवशेष पुढे पेकिंग मानव या नावाने जीवशास्त्रात ओळखले गेले येथे सापडलेल्या आदिमानवाचा मेंदू लांबट होता व हा मानव जाव्हा मानवापेक्षा प्रगत वाटला म्हणजे जाव्हा मानवाच्या नंतरचा बदल असावा हे सिद्ध होते
डायडेलबर्ग मानव :- जर्मनीतील डायडेलबर्ग या ठिकाणी मानवी देहाचे भाग आढळून आले हा मानव आजच्या मानवाच्या आकाराने दुप्पट आहे त्याचे दात आजच्या मानवच्या दातासारखे काहीसे मिळते जुळते जोते परंतु त्याची हनुवटी मात्र चांगली वाढलेली नव्हती त्याच्या संशोधनावरून ह्या आदिमानवाला बोलण्याची कला अवगत नव्हती या निष्कर्षावर शास्त्रज्ञ पोहचले होते हा मानव ३ लक्ष वर्षापूर्वीचा मानला गेला आहे म्हणजे जाव्हा मानवाच्या पेक्षा २ लक्ष वर्षानंतर जन्मास आला होता येथे जेमतेम दोन हजार वर्षापूर्वी जन्मास आलेल्या येशु ख्रिस्ताचा दुसरा बळी जातो ज्याने अडम आणि इव्ह हि पृथ्वी वरील पहिले दोन मानव सांगितले त्याचा आणि तिसरा बळी जातो अल्लाचा ज्याने आदम आणि हव्वा निर्माण केली त्याचा
पिल्टडाऊन मानव :- १९११ साली इंग्लंड मधील पिल्टडाऊन येथे काही मानवी अवशेष सापडले संशोधानंतर हा मानव १२५००० वर्षापूर्वीचा असल्याचा निष्कर्ष काढता आला हा आजच्या मानवाचा अगदी जवळचा ठरला कारण त्याच्या मेंदूची बऱ्यापैकी वाढ झालेली आढळली
निअंडरथळ मानव :- एक लाख चाळीस हजार वर्षापूर्वी जर्मनी बेल्जियम फ्रांस स्पेन ह्या देशात जेवढे मानव वावरत होते त्या साऱ्यांना निअंडरस्थळ मानव असे म्हणतात निअंडरस्थळ हे ठिकाण जर्मनीत आहे ह्या मानवाचा काळ पेकिंग मानवापेक्षा अगोदरचा आहे निअंडरस्थळ मानवांचे खोलगट व निमुळते वाढलेली हनूवटि व माकडासारखे बाहेर आलेला जबडा होता मोठे दात जड भुवया खोगात गेलेले डोळे लांबट पसरट गाल अशी त्याची ठेवण होती अत्यंत केसाळलेला हा मानव अंगाने जाड व उंचीने पाचफुट होता तो गुहेत राहत असे या मानवाला अग्नीचे ज्ञान होते शिकार करूनच ;तो आपले अन्न तयार करीत असे प्राण्यांची हाडे दगड लाकूड हत्यारे म्हणूनच तो वापरत असे मात्र बोलण्याची कला त्याला अजिबात अवगत नव्हती
क्रोमानोन मानव :- युरोपात संचार करत असणाऱ्या मानवाला क्रोमानोन मानव म्हटले आहे ह्या मानवाच्या २० हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर वावरत होता ज्यावेळी येथे धर्म व देव हा शब्द च अस्तित्वात नव्हता हा मानव बरासचा प्रवास करत होता ह्या मानवाच्या अगदी जुळते अवशेष १८६८ मध्ये आफ्रिकेत सुद्धा सापडले होते त्यावरून उत्खनन करते आशिया आफ्रिका मार्गाने हा मानव युरोप पर्यंत पोहचला आहे असा निष्कर्ष काढला जातो काही हि असले तरी सुद्धा मानव पृथ्वीवरील एकंदरीत मानवी संस्कृतीचा अद्याजनक ठरला कारण मानव आजच्या मानवाच्या अत्यंत जवळचा होता तो आजच्या माणसाला अगदी मिळताजुळता होता त्याची कवटी गळा दात आणि अंगठा हा आजच्या माणसासारखा होता हा माणूस गुहेत राहत होता त्याला गुहा मानव असे म्हणतात पृथ्वीवरील पहिला महाव युरोप जन्माला आल असे आजवर सांगितले जाते परंतु अलीकडच्या काळात आफ्रिका खंडात मिळालेला मानवी अवशेषांनी या सगळ्या प्रकाराला धक्क देवून टाकला केनिया राष्तार्त एक मानवी कवटी मानवी पुरातन तज्ञांना संशोधनात संशोधन केल्यानंतर हा मानव २८ लक्ष वर्षापूर्वी झाला होता हे सिद्ध झाले ह्या संशोधनामुळे लक्ष वर्षापूर्वी ज्याला मानव सदृश्य म्हणता येईल असा मानव युरोपातील होता हा सिद्धांत सरला गेला २८ लक्ष वर्षापूर्वीचा मानव हे संशोधन करण्याचे श्रेय जोहान्सबर्ग मिझीयम चे संशोधक अड्रीयन बोशिसे व पितर ब्युमा जाते
अश्वयुग मानवाच्या जीवअस्थी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी मिळत गेल्या आधुनिक मानवाने त्याचे शेवटपर्यंतचे संशोधन करून त्याचा कालखंड निश्चित केला शास्त्रज्ञाची मते हे वेगवेगळे प्रयोग करून बाहेर पडलेले सत्य असते ज्याला आपण विज्ञान म्हणतो येथे कल्पनेला थारा असतो परंतु हि कल्पना विचारांचा वैचारिक शोध असतो अशा या आधुनिक काळातल्या बुद्धिवंत मानवाने आपला अगदी निकटचा पूर्वज वय ३५ हजार वर्षे पूर्वी मानले जाते हा काळ जुन्या अश्मयुगात मोडतो येथेसुद्धा ईश्वरवादी पंथातील येशु पैगंबर कृष्ण यांचा जन्म सुद्धा झाला नव्हता अशा अवस्थेत ह्या विभूतींनी पृथ्वीवरील पहिल्या मानवांच्या सांगितलेली माहिती विज्ञानातून शोधून काढावी का तर हा विषय बाजूला सोडल्यास अश्मयुगाचे तीन विभाग पडले गेले एक म्हणजे आद्यअश्मयुग मध्य अश्मयुग आणि उत्तर अश्मयुग ह्या तीन युगात माकड जातीतून निर्माण होणार्या मानवाची झपाट्याने परंतु संथपणे उत्क्रांती होत गेलेली आहे
आद्यपुराश्मयुग आद्य:
आद्य पुराश्मयुगातील मानव बोलत नव्हता परंतु तो वन्य प्राण्यांना मारून आपला उदरनिर्वाह करत होता तो दिवसभर भटकत होता रात्र झाल्यावर मात्र कडा किंवा गुहेत आश्रय घेत होता भटकणे हा त्याचा नित्याचा क्रम होता केसाललेली त्याची अवस्था होती वस्त्राबाबत त्याच बरोबर अग्निबरोबर त्याला कोणतीच कल्पना नव्हती हात पायाने अल्पबुद्धीने तो हिंस्र श्वापदापासून स्वतःचे रक्षण करीत असे आणि आपले भक्ष मिळवत होता मेंदूची त्याच्या फारसी वाढ झालेली नव्हती या काळात प्राण्यांचा वावर जास्त होता त्यामुळे त्याला शस्त्र गरजेचे होते परंतु हाताला लागेल जे तेच त्याचे शस्त्र होते म्हणजे झाडाची फांदी किंवा दगड हाडे कंदमुळे उकरून काढण्यासाठी तो यांचा वापर करत असे हा माकड नसून मानव होता आता त्याला देव हि कल्पना सुचालि असेल का अशी शंका घेताच येत नाही
मध्य पुराश्मयुग :
हे युग सुमारे १५००० वर्षापूर्वी सुरु झाले आहे ह्यापूर्वी हिमयुग होते ते संपुष्टात आल्यावर ह्या युगाचा प्रारंभ झाला हिमयुगाच्या समाप्ती नंतर हवामान उष्ण आणि दमट होवून वातावरणात बदल होत गेला मग मात्र मानव गुहा सोडून उघड्यावर राहण्यासाठी बाहेर पडला जास्त तो पानथलि तळ्याकाठी राहू लागला पाण्यात त्याला जलचर प्राणी असत ते त्याच्याबरोबर उड्या मारताना दिसत मग मासे हे त्याचे अन्न बनत गेले येथून मच्छीमारी ला सुरुवात झाली याच मध्ययुगात कुत्रा हा आजचा मानसाललेला प्राणी प्रथम त्याच्याजवळ आला व तो त्याच्या बरोबर राहू लागला आता मानव आपल्या कोणता भाग झाकलेला असावा त्याचे ज्ञान त्याला येत गेले प्राण्यांच्या आल्याने तो मोकळ्या जागेतून फिरत असे पूस पडतो ते त्याला काळात होते ह्यातून शेती चा उदय झाला
सारा मानवाचा इतिहास जाणून घेण्यासाठी मानवाचा इतिहास आहे तो वाचवा
पुढे पाहिलं तर ह्या सार्या गोष्टी मनाला न पटणाऱ्या वाटतात म्हणून बाबासाहेब जगाचा बुद्ध स्वीकारत नाहीत हे मत आमचे नसून बाबासाहेबांचे आहे मी फक्त त्याला मांडत आहेत बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथातून ते वेळोवेळी मांडले आहे
म्हणून जेव्हा बुद्ध मांडतो तेव्हा बाबासाहेबांचा बुद्ध जास्त जवळचा वाटतो कारण या सृष्टीच्या निर्मितीची रहस्ये जशी जशी समजू लागली तशा तसा बाबासाहेबांचा मांडलेला बुद्ध पटत जातो एवढ नक्की म्हणून नवबौद्ध यान हे बौद्ध धम्माची खरी ओळख आहे मित्रानो
जय शिवराय जय भीमराय
रविंद्र सावंत
{ हि तपासनीस मुसाड ग्रामस्थ बौद्धजन परिवर्तन मंडळ {रजि . } मुंबई }
टिप्पण्या