मध्यम मार्ग
सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाने सारनाथ येथे आपल्या नाविन्यपूर्ण धम्माचा प्रथम उपदेश करून जगाला बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माचे चक्र घुमवले त्यांचे ते भाषण धम्मचक्कप्पवत्तन सुत्त नावने प्रसिद्ध आहे . त्यामुळे हे सुत्त म्हणजे भगवान बुद्धाच्या जाहीरनामा होय धम्मचक्कप्पवत्तन सुत्त म्हणजे नेमक़्के की हे आपण जाणून घेवूया भगवान बुद्ध वाराणसीच्या ऋशिपतनात हरणांच्या बागेत विहार करत असताना ते आपल्या पंचवर्गीय भिक्खुणा उद्देशून ते म्हणाले भिक्खुनो प्रव्रज्जीताने या दोनटोकाने जावू नये १ विषय सुखात लोळत राहणे हा असून तो हीन नीच लोकांच्या लायकीचा अनर्थक आहे २देह दंडण करणे तो दुख्खादायक आणि अनर्थकारक आहे त मित्रानो या दोन्ही टोकांच्या स्वकाराबाबत एक वेगळा मार्ग शोधला त्याला मध्यम मार्ग असे म्हणतात
तथागताने जो मध्यम मार्ग शोधला त्या मध्ये तो मार्ग जो दृष्ठीदायक व ज्ञानदायक असून उपशमाला शांततेला दिव्याज्ञानाला सम्बोधाला आणि निर्वाणाला पोहोचविणारा आहे यालाच परम अष्टांगिक मार्ग होय १ सम्यक दृष्टी २ सम्यक संकल्प ३ सम्यक वाचा ४ सम्यक कर्मान्त ५ सम्यक आजीविका ६ सम्यक व्यायाम ७ सम्यक स्मृती ८ सम्यक समाधी यामध्ये मानवाला निर्वाण प्राप्त करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो तथागत बुद्धाने यापुढे जावून चार परम सत्ये सांगितली आहेत ती अशी
१ दु:ख परम सत्य : तथागत आपल्या शिष्यांना सांगतात कि भिक्खुनो या जगात दु:ख आहे हे परमसत्य आहे वृद्धत्व दु:खकारक आहे रोग दु:खकारक आहे मृत्यू दु:खकारक आहे थोडक्यात पाच उपादान स्कंधच दु:खकारक आहेत
२ दु:ख समुदय परमसत्य : भिक्खुनो दु:ख समुदय हे परम सत्य आहे पुन्हा पुन्हा जन्म घेणारी तृष्णा हि मोहयुक्त असते जी नेहमी सुखाच्या शोधत असते काम तृष्णा भवतृष्णा विभव तृष्णा
३ दु:ख निरोध परमसत्य: भिक्खुनो दु:ख निरोध हे परम सत्य आहे जेत्या तृष्णेच्या परम वैराग्याने निरोध त्याग प्रती निसर्ग मुक्ती आणि अनासक्ती आहे
४ दु:ख निरोधगामिनी मार्ग परमसत्य : भिक्खुनो आर्य अस्थांगिक मार्ग हाच दु:खाचे निरोधागामिनी मार्ग आहे
भगवान बुद्धाचा प्रतीत्य समुत्पाद हा सिद्धांत केंद्रबिंदू आहे कोणतीही गोष्ट कारणाशिवाय अस्तित्वात येत नाही कारणाशिवाय अन्य कुणी हि काल्पनिक शक्ती आपल्या तेजाने किंवा चमत्काराने काहीही निर्माण करू शकत नाही काल्पनिक शक्तीचा बागुलबुवा विशिष्ट वर्गाने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केला जादुगार काही गोष्टी जादूने निर्माण केल्याचा भास निर्माण करतात त्यात ते तीन गोष्टींचा उपयोग करतात हातचलाखी आणि रासायनिक पदार्थाचा उपयोग करूनच प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले जात जगात जादू नाही हे स्वतः जादूगाराला माहित असते आणि त्याला ते मान्य हि असते जादूगाराच्या बडबडी पेक्षा त्याच्या हाताकडे लक्ष दिले तर त्याचे पितळ उघडे करता येते
भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी स्पष्टपणे नाकारल्या आहेत म्हणूनच त्यांच्या सिद्धांतामधून प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत हे तत्व स्पष्ट तत्व सिद्ध होते कि कोणतेही गोष्ट कारणाशिवाय निर्माण होवू शकत नाही ज्या ज्या कारणांचा प्रभाव कार्याच्या रूपाने संपूर्ण ब्रह्मांडावर आणि जीवसृष्टीवर पडतो त्याचे कारण आत्मा किंवा ईश्वर नाही तर निसर्गनियम आहेत
म्हणूनच बुद्ध म्हणतात कि मनुष्यप्राणी जी कोणती कार्ये करतो ती मनाच्या द्वारे करतो सर्व कर्माचे मुल हे मन आहे मन हे स्वामी आहे मन हेच कारण आहेमनात दृष्ट विचार असतील तर माणसाचे विचार हे दृष्ट असतात ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याचप्रमाणे वाईट कर्मामुळे निर्माण झालेली दुःखे माणसाचा पाठपुरावा करीत असतात मन हे सर्व कर्माचे मुल आहे तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते मनात सदविचार असतील माणसाचे शब्द आणि कार्य दोन्ही चांगले असतात सदाचाराच्या आचरणाने उदभवणारे सुख मनुष्याच्या सावलीप्रमाणे सदोदित त्याच्या पाठीमागे जातात
मन घडविते तसा मनुष्य बनतो सत्याचा शोध करण्यासाठी मनच सांगत असतो हा संस्कार पुण्यामार्गातील पहिले पाऊल होय बौद्ध जीवनामार्गाचीहि मुख्य शिकवण आहे मन हे ओढाळ चंचल दुर्निवार आणि दुर्धर आहे बाण बनविणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान माणूस मनाला एकाग्र आणि सरळ करतो पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याचप्रमाणे माराच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकूळ असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखकारक असते पापापासून दूर राहा पुण्य करीत राहा स्वतःचे विचार शुद्ध करीत रहा हि भगवान बुद्धाची शिकवण आहे
मध्यम मार्गाचा अवलंब मनावरच अवलंबून आहे
१] भगवन्न बुद्धाचा मध्यम मार्ग हा ऐकायला सोपा वाटतो मात्र हा सोपा वाटणारा मध्यम मार्ग स्वीकारला तर सर्वच बाबतीत मनुष्य सुखी होवू शकतो हे सर्व सुख मनावरच आधारभूत आहे
२] वाल्मिकी रामायणात वानरराज वालीच्या मुखातून भगवान बुद्धाचा मध्यम मार्ग सांगितलेला आहे रामाने झाडाआड लपून मारलेल्या बनणे घायाळ होवून बहुजन राजा वानरराज वाली धरणीवर शेवटची घटका मोजीत असताना त्यावेळी त्याचे आप्तजन गोल झाले त्याचा तरुण पुत्र अंगद हि त्याच्याजवळ येवून बसला व शोक करू लागला तेव्हा वाली त्याला समजावताना वा रामायण श्लोक ४-२२-२३ मध्ये म्हणतो कोणालाही सोबत अतिशय प्रेम करू नकोस आणि प्रेमाचा पूर्णपणे अभावदेखील होवू देवू नकोस कारण हे दोन्ही महान दोष आहेत म्हणून सदैव मध्यम स्थितीवर दृष्टीठेव पहा श्लोक
'' न चातीप्रणय: कार्यः कर्तव्योप्रनयश्च ते ।
उभयं हि महादोषं तस्मादंतरदुग भव '' ।। वा रा ४-२२-२३
३] दुखाचे मुल कारण तृष्णा आहे म्हणून मध्यम मार्गाचा उपदेश करताना भगवान बुद्ध म्हणतात अतिशय प्रेम करणे हे देखील दुःखाच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे ते म्हणत कि आपण ज्याच्यावर अतिशय प्रेम करतो त्याचाजर अकस्मात मृत्यू झाला तर किंवा त्याचे काही बरेवाईट झाले तर आपल्याला दुःख होते म्हणून आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीवर प्रेम अतिशय जास्त करू नये किंवा अतिशय कमी हि करू नये कारण या दोन्ही गोष्टी महादोष आहे प्रेम जास्त किंवा कमी केरु नये पण त्या व्यक्तीच्या प्रती आपले कर्तव्य पूर्णपणे पारपडले पाहिजे
भगवान बुद्ध स्वतः कोणावर प्रेम करीत नव्हते पण पण ते सर्वावर करुन दृष्टी ठेवीत असत
४]भगवान बुद्ध २४ - २४ तास समाधी लावून बसत असत म्हणून कुणी शिष्य त्यांना विचारीत असे कि भन्ते आम्ही ४-५ तास समाधी लावली तरी आमची कंबर दुखायला लागते पण आपण २४ तास समाधी लावून बसता तरी आपली कंबर का दुखत नाही यावर तथागत म्हणतात
५] माणसाचे शरीर हे खूप साऱ्या धातूंचे बनलेले असते म्हणून माणसाचे शरीर धर्म कसे असतील याचा निर्णय त्याच्या शरीरातील धातू करतात शरीर पातळ कि लठ्ठ आळशी कि स्पुर्तीदायक विद्वान कि कमी विद्वान चंचल कि कमी चंचल या सर्व गोष्टी शरीराला मिळणाऱ्या धातूवर अवलंबून असते
६] भगवान बुद्धाने शरीराची रचना पुष्कळशा धातूपासून बनली असल्याचे सांगितले त्यांनी शरीराच्या स्वभावावर धातूंचा प्रभाव असल्याचे सांगितले आणि त्यावेळचे तथागातांचे धातूविषयक असणारे विचार हे आज विज्ञान मान्य करत आहे
७] वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले आहे कि शरीर निरनिराळ्या तत्वांचे बनलेले आहे यात कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नाइट्रोजन लोह कल्शियम फॉस्फोरस हे मुख्य आहेत तथागताच्या संशोधनाप्रमाणे विज्ञान देखील शोध केला आहे कि वरील तत्व आवश्यक मात्रेत शरीरात पोहचले पाहिजे या तत्वांची कमी किंवा अधिकता निश्चितपणे शरीराला प्रभावित करते विज्ञानाची हि मान्यता बुद्धाने मध्यम मार्गातून अगोदर सांगितली आहे
८] विज्ञानाने म्हटले आहे कि कोणत्या तत्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कोणकोणते रोग होवू शकतात आणि त्या धातूंची शरीरातील कमतरता दूर केली तर कोणते रोग बरे केले जातात आणि कोण्या धातूंची मात्रा वाढली तर कोणते रोग होतात आणि त्यासाठी विज्ञान माणसाला संतुलित आहार घ्यायला सांगते विज्ञानाचा हा साल बुद्धाने अडीच हजार वर्षापूवी मध्यम मार्गातून मानवाला दिला आहे
कमी किंवा अधिकच वापर शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे करावा
भगवान बुद्धाने जीवन सुखी करण्यासाठी मध्यम मार्ग सांगितला आहे कमी किंवा जास्त या दोन्ही गोष्टीचा अतिरेकि आहे म्हणून दोन्ही गोष्टीच्या अतिरेकापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे जसे एखादे तंतू वाड्याचे तार कमी जास्त अधिक आवरल्यास त्यातून गोड आवाज निघणार नाही शरीराचे किंवा जीवनाचे हि असेच आहे कोणाला जेवणात कोणता पदार्थ जास्त आवडतो तर कोणाला आवडत नाही पण त्या आवडलेल्या पदार्थात योग्य तत्व आहेच असे नाही आणि काही जास्त प्रमाणात तत्वे असतील तर त्याचा परिणाम वेगळा होतो
बौद्ध धम्म हि जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे जिच्यात मानवास अत्मानियमन करण्याची शिकवण देते ह्यासाठी प्रगतीशील जगाला हि सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे
जय शिवराय जय भीमराय
टिप्पण्या