आदरांजली या भिमसैनिकाची
गुलामीची बंधने तोडण्य निघाली रणरागिणी तो सह्याद्रीची
शूर जातीच्या घरी जन्मली वाघिणी त्या जाधवांची
दिली शौर्याची गाथा या भूमीला ती मर्दानी राणी भोसल्यांची
अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। धृ ।।
पुण्याच्या त्या ओसाड वाळवंटात पेरल बीज समतेच
उभ्या जगाला दिल दान एका महान शूरवीराच
गाढवाच्या नांगराने नांगरलेल्या त्या मातीच
पिक आणल जिजाऊ नि त्या भूमीवर स्वातंत्र्यच
नांगरून माती कथा तिची होती गुलामीची
अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। १ ।।
केले जवळ गोरगरीब जनतेला जवळ केल माणुसकीला
अन्यायाच्या खाईत पडलेल्या हीनदिनाला
स्वाभिमानाची पेटवली ज्योत त्यांच्या अंतकरणाला
शिवबाच्या रूपाने नवा राजा दिला या रयतेला
म्हणूनच गावी त्यांची कीर्ती अनमोल तयांची
अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। २ ।।
बांधले शिवरायांनी तोरण स्वराज्याचे
साकार केले स्वप्न जिजाऊ मातेचे
अन्यायाचा करून खात्मा राज्य आणले जनतेचे
स्वराज्य केल निर्माण हीन दिन समाजाचे
म्हणून गातो नेहमी कवने त्यांच्या यशकिर्तिचि
अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। ३ ।।
अनेक संकट झेलत होते राजे या दिनाचे
आशीर्वाद होते त्यांच्या पाठीशी या स्वाभिमानी मातेचे
साकार केल स्वप्न त्यांनी जिजाऊ आऊसाहेबांचे
कल्याण केले त्यांनी या कोतो कोतो जनतेचे
निर्मिले बहुजनाचे राज्य केवळ हि किमया त्या मातेची
अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। ४
आनंदला रायगड हि आनंदली जनता सारी
रागडावर चालू होतो राज्याभिषेकाची तयारी
शेकडो वर्षाचा घनदाट अंधार सारुनी
बहुजनांचे राज्य आले महाराष्ट्राच्या दरी
झाला जयजयकार त्यांचा काय कथा त्या सोहळ्याची
अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। ५ ।।
आनंदाच्या त्या सोहळ्याच्या नंतर दुःखाची काळी छाया पसरली
अवघ्या अकरा दिवसांनी कालानेही घाई केली
जिजाऊ मातेचे निर्वाण झाले शोककळा अवघ्या स्वराज्यावर आली
कोटी कोटी दीनांची माता आम्हा बहुजनांना सोडून गेली
दुःख मनाने आज हि आठवण करतो त्यांच्या स्मृतिदिनाची
अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। ६ ।।

टिप्पण्या