हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची

 नालायाकांच्या देशात नाही जिद्द उरली लढण्याची
हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। धृ ।।
 बा भीमा का दिला तू अधिकार तुझ्या लेकीवर आज होतोय बलात्कार
आज लोकांच्या मनात भरलाय वासनेचा विकार लुटूनिया इज्जत तुझ्या लेकींची घेती वासनांध ढकार
वाटत मनाला माझ्या आता करावी तयांची शिकार  पण काय करणार बाबा इथे विचारच झालेत बेकार
मग येते चीढ त्या लाचार समाजाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। १ ।।
शिक्षण म्हणजे तिसरा डोळा मंत्र बाबा तू दिला घेवून शिक्षण आता तुझा समाज मोठ्या पदावर गेला
तुझ्या विचारांना त्यांनी जातीवाद्यांच्या दावणीला नेला आणि इथेच बाबा तुझा समाज जिवंतपणी मेला
सापडली नाही अजून यांना चावी हि विकासाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची।।१।।
शिका संघटीत व्हा संघर्ष करा शिकवण दिली बहुमोलाची शिकून गटातटात विभागलो हि नीती आहे आमची
संघर्ष करतो आपसाआपसात कमाल आहे आमच्या नेत्यांची दुर्दशा झाली इथे कोणी हि इज्जत लुटतो तुझ्या समाजाची
आस राहिलीच नाही त्यांना तुझ्या विचारांची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।।३।।
कोणी घरे जळती तर कोणी माणूसच जळतो आणि तुझा समाज फक्त उघड्या डोळ्यांनी पाहतो
लेकरांना तुझ्या जातीवादी भर गावात कापतो तरी तुझा समाज आज शांतच राहतो
आता तरी जागे व्हा लढाई लढा क्रांतीची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। ४ ।।
परवा परवा तुझ्या जयंती वर हल्ला केला नेता आमचा घरात शांत झोपी गेला
उतरला रस्त्यावर बाबा तुझ्या लेकरांचा मेळा नेत्यांनी मात्र तुझ्या विचारांचाच बलात्कार केला
वाटत या नेत्यांना भर चौकात आग लावायची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची।।५।।
आजला बाबा कोणी हि उठतो आणि तुझ्या समाजाला छळतो समाजच पडलाय लुला त्याला कोण उठवतो
अस्पृश्य म्हणुनी हा समाजच स्वतःला समजतो झोपलेत अजूनही यांना जागे कोण करतो
वेळ आली आहे आता क्रांती तुझी करायची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची।।६।।

जय शिवराय जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र