आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : २
डॉ बाबासाहेब आणि शेती
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी small holdings in india and their remedies हे पुस्तक लिहून शेती समस्यांचा विचार केला त्याचप्रमाणे on small holders relief bill वर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला इंग्रजांचे कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असताना दामोदर घाटी योजना महानदीवर धरण कार्यान्वित करून शेतीचा विचार केला states and miniorites मधूनही शेती व शेतकऱ्याच्या विचार केला प्रत्यक्षात त्यांना शेती करण्याचा योग आला नव्हता क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे त्यांना वाटत असे प्रत्यक्षात कृती हवी होती पण वेळ मिळत नव्हता हे दुःख कदाचित त्यांच्या मनात असेलही प्रत्यक्षात कृतीची बाबासाहेब वाट पाहत होते आणि ती संधी चालून आली
नानासाहेब डॉ आंबेडकर दि २० जुलै १९४२ ला इंग्रज कार्यकारी मंडळात रुजू झाले आणि त्यांच्याकडे मजूर खाते आले एका वर्षानंतर बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला संपूर्ण भारतात हि अनेकवेळा दुष्काळ पडले दुष्काळामुळे अन्न धान्याचा तुडवडा पडला अत्यावश्यक वस्तू गोरगरीबांना स्वस्त भावात मिळाव्या म्हणून बाबासाहेबांनी रेशनिंग सुरु केल यामध्ये अन्नधाण्याबरोबर घासलेट आणि साखरही होती
लोकांचा अन्नदाता शेतकरी फारच उपेक्षित होता बाबासाहेबांनी उत्तम प्रकारे शेती कशी करता येईल याबद्दल च्या ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून अधिक धान्य पिकवा हि मोहीम काढली
एवढेच नव्हे तर स्वतःहि त्याबद्दल प्रयोग केला दिल्लीमधील त्यावेळच्या त्यांच्या २२ पृथ्वीराज रोडवर सरकारी निवास्थान असलेल्या त्यांच्या बंगाल्याभोवतीच्या काही मोकळ्या जागेत शोभेची हिरवळ लावलेली होती ती काढून त्याच्यावर गव्हाचे उत्तम पिक काढले होते व भाज्या व पालेभाज्या लावल्या होत्या त्या पिकांचा त्यांनी पूर्ण हिशेब लिहून ठेवला होता किती बीज पेरले किती खात टाकले किती मजुरी झाली याबद्दलची आकडेवारी व पैश्याचा हिशोब आणि धन्य गोल होईपर्यंत चा सर्व खर्च सविस्तर लिहून ठेवला होता हा सर्व अनुभव घेवून ते त्याबद्दल भेटावयास येणाऱ्या कास्तकारांना सांगत असत
अशाप्रकारे बाबासाहेबांनी प्रत्यक्ष शेती करून आलेला अनुभव याची नोंद केलेली होती शेतीतज्ञ स्वतःला म्हणवून घ्यायचे असेल त्यांनी practical आणि theory याचा विचार करणे आवश्यक आहे ह्या दोनही बाबी बाबासाहेबांनी अंगीकारल्यामुळे ते खरेखुरे शेतीतज्ञ होते हे निर्विवाद सत्य आहे कोणी ते नाकारू शकत नाही आणि आजच्या शेतकऱ्याने बाबासाहेबांचे शेतीविषयक धोरण स्वीकारले तर शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही जर बाबासाहेब समजून घ्या
बाबासाहेब विश्वरत्न कसे आहेत याविषयीच्या अभ्यासात आलेला हा एक माहितीचा भाग आहे
जय शिवराय जय भिमाराय
टिप्पण्या