पोस्ट्स

लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले

जिंकण्या युद्ध हे लोकशाहीचे पक्ष सारे निघाले आज नेते पाच वर्षांनी तोंड दाखवायला आले लाज नाही वाटली भडव्यांना इथे सारेच माजले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले ।। धृ ।। लोकशाहीचा रणसंग्राम होतो आहे इथल्या भूमीवर कुत्र्यावानी भुंकत बसतात नेते इथल्या मैदानावर भिक मागती जनतेपुढे निवडणुकीच्या तोंडावर लाल गालत उभे राहती नेते सारे गल्ली गल्लीवर  जिंकून द्या म्हणती मला मी सारे तुमच्यासाठीच केले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले  ।। १ ।। राजावाणी अधिकार देवू केला तुम्हाला लाजवले तुम्ही त्या शरीर विकणाऱ्या बाईला इमानाने ती बाई सुख देते ग्राहकाला तुम्ही तर विकूनच टाकले स्वतःला तो तिचा धंदा तर हे  तुमचे व्यवसाय झाले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले  ।। २ ।। विकला स्वाभिमान पैस्याच्या आहारी जावून नेत्यांनी लुटले तुम्हाला घरात येवून अजून झोपला आहात जरा भूतकाळ घ्या पाहून संधी आहे आता द्या इमानी नेता निवडून देश हितासाठी लढा रे मतदान करणे तुम्ही सारे विसरून गेले लाचार आहात का तुम्ही कि तुम्ही नुसते पैसेच पहिले...

नवबौद्धयान : बौद्ध धम्माची खरी ओळख

इमेज
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धानंतर २५०० वर्षांनी बुद्ध धम्माचा प्रसार भारत देशात केला १४ ओक्टोंबर १९५६ साली नागपूरच्या भूमीत लाखो जनसागराला बुद्धाच्या  ओटीत टाकले रशियन क्रांतीपेक्षा बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती जगातील सर्वोत्तम धम्मक्रांती ठरली रक्ताचा एक हि थेंब न घालवता केलेली धम्मक्रांती म्हणून जगाच्या इतिहासात नोंद आहे  अश्या महापंडिताने या बौद्ध धम्माचा खरा इतिहास मांडला आणि बौद्ध धम्मात असणाऱ्या दोन पंथात नवबौद्ध यान हा नवीन पंथ निर्माण केला जो सर्वात जास्त प्रभावशाली ठरला आता नाकी काय आहे बौद्ध धम्म आणि त्याचे काय पंथ आहेत त्यांची निर्मिती कशी झाली यावर एक प्रकाश टाकूया प्रथम बौद्ध धम्मात असणारे पंथ एक महायान  जो बुद्धाच्या मृत्युनंतर उदयास आला दुसरा हीनयान तोही याच वेळी उदयास आला आणि तिसरा बुद्धा नंतर २५०० वर्षांनी उदयास आला तो नवबौद्धयान मुळात भगवान बुद्धाने ईश्वर नाकारल्यामुळे ईश्वरवादी धर्मांना मोठा धक्का बसला त्यामुळे बुद्ध व त्याच्या विचाराची नासाडी कशी  करता येईल हे प्रथम हिंदू धर्माने प्रयत्न केला पण बुद्ध स्वतः जिवंत...

मध्यम मार्ग

सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाने सारनाथ येथे आपल्या नाविन्यपूर्ण धम्माचा प्रथम उपदेश करून जगाला बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माचे चक्र घुमवले  त्यांचे ते भाषण धम्मचक्कप्पवत्तन सुत्त नावने प्रसिद्ध आहे . त्यामुळे हे सुत्त म्हणजे भगवान बुद्धाच्या जाहीरनामा होय धम्मचक्कप्पवत्तन सुत्त म्हणजे नेमक़्के की हे आपण जाणून घेवूया भगवान बुद्ध वाराणसीच्या ऋशिपतनात हरणांच्या बागेत विहार करत असताना ते आपल्या पंचवर्गीय भिक्खुणा उद्देशून ते म्हणाले भिक्खुनो प्रव्रज्जीताने या दोनटोकाने जावू नये १ विषय सुखात लोळत राहणे हा असून तो हीन नीच लोकांच्या लायकीचा अनर्थक आहे  २देह दंडण  करणे तो दुख्खादायक आणि अनर्थकारक आहे त मित्रानो या दोन्ही टोकांच्या स्वकाराबाबत एक वेगळा मार्ग शोधला त्याला मध्यम मार्ग असे म्हणतात तथागताने जो मध्यम मार्ग शोधला त्या मध्ये तो मार्ग जो दृष्ठीदायक व ज्ञानदायक असून उपशमाला शांततेला दिव्याज्ञानाला सम्बोधाला आणि निर्वाणाला पोहोचविणारा आहे यालाच परम अष्टांगिक मार्ग होय        १ सम्यक दृष्टी २ सम्यक संकल्प ३ सम्यक वाचा ४ सम्यक कर्मा...

भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा

जग मै है अंधियारा कहते है जग रहा है भारत सारा कहा गयी वो इंसानियत जिसको लगे ये भारत मेरा बुद्ध ने शिखायी करुणा मैत्री सन्देश दिया प्यारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा ॥ ध्रु ॥ अछुतो को न्याय दिलाने न आया कोई भगवान आज अछूतोंको न्याय दिलाया बाबा साहब कि पहचान जागो रे दलितो तुम्हे भीमजीका करना है सन्मान इस देश मै लाना है बाबासाहब का बुद्ध भगवान जग जाओ नहीं तो मनुवादी करेंगे पहले जैसा हाल तुम्हारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा   ॥ १ ॥ आज कल नौजवानो मै है सवार भुत प्यार का कभी तो याद करो वो कार्य हमारे भीमजी का पाया है तुमने आज अधिकार सारी खुशियोंका ये तो याद रखना ये एहसान है भीमजीका न डरना जीवन मै कभी क्योंकि तुम्हे है भीमजीका सहारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा  ॥ २  ॥ अन्याय के खिलाफ लढने तो भीमजीने सिखाया इसीलिए तो सारे अधिकार हमने भीमजीसे पाया इतने अत्याचार हुए तभी ना कोई भगवान आया बाबासाहब तो मसीहा हमारे उजाला हमारे जिंदगीमें लाया संविधान लिखकर बदला बाबासाहब ने नसीब हमारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा...

बुद्ध विहार

आली आली गड्यानो भीमजयंती आली काय सांगू बाई आज बौद्धवाडी सजली निळ्या पताक्याने सारी निळी निळी झाली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली ।। धृ ।। वर्षभर नाही पाहिलं त्या फोटोकडे कारण कधी आम्ही इकडे कधी तिकडे ज्यांनी तोडले आमच्या पायातील कडे आमची वाटचाल त्याच दिशेकडे खूप दिवसांनी विहाराची  सजावट झाली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली ।। १ ।। गावामध्ये बुद्ध विहार बौद्धावाडीत शोभते काय नशीब आमचे बुद्ध विहाराला कुलूप लागते गावोगावी मंदिरात आज रोषणाई दिसते आमच्या बुद्ध विहारात फक्त मेणबत्तीच विझते आज बऱ्याच  दिवसांनी मंदिरात वीज लागली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली  ।। २ ।। काय सांगावे आमच्या लोकांचा तो विचार ऐकतो बुद्ध  म्हणे आज आम्हाला कुठे पावतो बाकीचे देव कर्मकांड करायला लावतो बुद्ध मात्र कर्म करायला सांगतो तरी आज बुद्धाच्या मूर्तीची सजावट  केली पण काय सांगू दादा बाबांचा फोटोची आज तरी सफाई झाली  ।। ३ ।। जयंतीची धूम सार्या गावागावात दिसते बुद्ध विहारात तेव्हा कोणाच नसते रात्री कव्वालीला म...

जागतिक महिला दिन व आजची महिलांची मनस्थिती

भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हिन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले. स्त्रियांच्या या अवनतीस ब्राम्हणवादी व्यवस्था कारणीभूत आहे. स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य भगवान बुध्द, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे  स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. प्राचिन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढिल आलेखावरुन दिसून येईल. १. मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार  स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आ...

धम्माची भूक

सहा डिसेंबर ५६ साली बहुजनाची झोप उडाली वाली दिनांचा सोडूनी गेला जनता सारी पोरकी झाली चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा ।।धृ ।। बाबासाहेब वदले होते येईन मी मुंबईला धम्माची दीक्षा देईन म्हणाले तुम्हला तारीख हि निश्चित केली होती त्यांनी त्या समयाला पण क्रूर काळाने बघा कसा हा घात आमचा केला चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा   ।। १ ।। १६ डिसेंबर तारीख होती मुंबईच्या धर्मांतराची पण बातमी आली दिल्लीवरून बाबांच्या महापरीनिर्वाणाची जनता हि झाली अबोल करूण कहाणी त्यांची बाबांसाठी धावुनी गर्दी ती चैत्यभूमीवरची चैत्यभूमीच्या त्या जागेवर जनता म्हणे थांबा धम्माची दीक्षा द्या बाबा तुम्ही धम्माची दीक्षा द्या बाबा        ।। २ ।।  अंत्ययात्रा हि बाबांची चालली सोबत  लोटला जनसागर कोटी कोटी आसवांचा पूर आला दादरच्या भूमीवर झिजला चंदनापरी कोटी कोटी उपकार आम्हावर भीम पहिला मी तेव्हा चंदनाच्या चितेवर चैत्यभू...

अशोकचक्रातील आरा व त्यांचे महत्व

इमेज
शोध अशोक चक्रातील चोवीस आरयाचा भारताच्या तिरंग्यात अशोक चक्र आपण पाहतो आणि त्या अशोक चक्रात चोवीसच आरया  आहेत आता त्या आरया  चोवीसच का ह्यामागचा शोध  घेणे आवश्यक आहे आणि त्या आरया चा अर्थ काय हे पाहणे आवश्यक आहे बाबासाहेबांनी अगदी जाणीवपूर्वक त्याचा शोध घेतला बाबासाहेबांचा त्याबाबतच संशोधन मी फक्त इथे मांडत आहे ते माझ वैयक्तित मत नाही आणि असा कोणता विचारही नाही कारण आज आपल्याला बरेच विचारवंत दिसतात जे बाबासाहेबांचे विचार स्वताच्या नावावर लावतात कारण या जगात असा कोणता विचार बाबासाहेबांनी केला नाही असे मला अजिबात वाटत नाही म्हणून मी  नेहमी बाबासाहेबांच्या विचाराची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो कारण मी कोणी प्रगल्भ ज्ञानी नाही एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आहे ज्याने फक्त बाबासाहेबांचा विचार आपल्या मनात कोरला आहे ह्याव्यतिरिक्त  काही नाही माझ्या बद्दल सांगायचं तर एक साधारण घरातील एक सामान्य मुलगा ज्याच शिक्षणही जास्त नाही जेमतेम बारावी पर्यंतच आहे पण बाबासाहेब आणि त्यांचे विचार हे माझ्या जीवनच सत्य आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही   आता आप...

पुनर्जन्म कशाचा होतो

पुनर्जन्म कशाचा होतो  जेव्हा कि पुनर्जन्म घडवून आणणारी आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नाही अस्तित्वात असल्याचे सिद्ध होत नाही त्या अत्त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो हा ईश्वरवादी धर्माचा सिद्धांत मान्य करण्यासारखा नाही म्हणून भगवान बुद्धाने ईश्वर आत्मा परमात्मा या गोष्टी नाकारल्या आहेत म्हणून पुनर्जन्म कोणाचा आणि कशाचा होतो या दोन प्रश्नावर लक्ष केंद्रित करावे लागते हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे म्हणून आपण प्रथम पुनर्जन्म कशाचा होतो यावर विचार करू भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक पदार्थ आहेत पृथ्वी जल तेज आणि वायू हे होत प्रश्न असा आहे कि मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या चार भौतिक घटकांचे काय होते मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय काही म्हणतात होय काही म्हणतात होय पण तथागत बुद्ध म्हणतात नाही ते घटक पदार्थ आकाशात तरंगणाऱ्या त्याच पदार्थाच्या समूहाला मिळतात तेव्हा विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली म्हणजे च्युतीचीत्त अंदाणु आणि शुक्राणू मिळाल्यावर नवा जन्म होतो या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या घटक कुणीतरी एका विशिष्ट मृत ...

आम्हाला चीड येत नाही

झाला आमच्या जीवनाचा अंधकार नाही प्रकाशाची आस जीवन आहे रसातळास  आम्हाला देवाचा ध्यास कधी कळणार जीवनाचे मर्म आम्हाला कळत नाही काय करणार त्याला कारण आम्हाला चीडच  येतच  नाही  ।। धृ ।। मारिले खैरलांजीत आमच्या बांधवाना करून बलात्कार केल बेइज्जत आमच्या बहिणींना तरी मोकाट सुटले गाव गुंड राजकारण्याची साथ त्यांना मरू  दे त्यांना जावू दे इज्जत आम्ही तर ठीक आहे ना अशी  विचार धारा आमची त्याला दोष त्यांचा म्हणूच शकत नाही काय करणार त्याला कारण आम्हाला चीडच  येतच  नाही  ।। १ ।। आमच्या बहिणीची इज्जत मंडळी त्यांनी रस्त्यावर आम्ही म्हणालो लुटू देणा इज्जत ती वेळ थोडी आहे आमच्यावर मेली तर मरेल ती ते संकट तिच्याच घरावर आम्ही कशाला उतरायचे त्यासाठी रस्त्यावर पण उद्या तुमचीच बहिण असेल तेव्हा अश्रू येतील कि नाही काय करणार त्याला कारण आम्हाला चीडच  येतच  नाही  ।। २ ।। दिवसा ढवल्या दलित वस्तीवर हल्ले करती जातीवादीगुंड आमच्या मनात अजून आहे जाती व्यवस्थेचा न्यूनगंड अजून अत्याचार होती आमच्यावर आमचे रक्त अजूनही थंड असे वाटते आहे आजला...