पोस्ट्स

दीक्षाभूमी : बहुजनांचे पंढरपूर  बाबासाहेबांनी १४ ऑक्टोंबर १९५६ साली नागांच्या पवित्र भूमीत तथागत बुद्धाच्या चरणी लीन झाले धर्माला सोडून धम्मात प्रवेश केला तम्मा बहुजनांना मानवतावादी बुद्धाचा धम्म देवून सकळ बहुजनांचा उद्धार केला आज आपण पाहतो कि दीक्षाभूमीवर येणारे करोडो लोक बुद्धाचरणी लीन होतात कोणताही स्वार्थ मनी न ठेवता  बहुजनाने बुद्धाकडे यावे यातच त्यांचा उद्धार आहे कारण कर्मकांडात दिवस जगत राहण्यापेक्षा स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाच्या दुनियेत एकदा येवून पाहावे म्हणून बाबासाहेब यांनी दिलेला हा मार्ग आहे  मी यासाठी दीक्षाभूमीला बहुजनाचे पंढरपूर म्हटले आहे कि रमाई माता बाबासाह ेबांना ऐके दिवशी म्हणाल्या साहेब मला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन कराल का त्यावर बाबासाहेब म्हणतात अग रामू त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपले दर्शन घेण चालत नाही तो विठोबा आपल्या स्पर्शाने बाटतो तुला आत मंदिरात हि येवू देणार नाहीत पण रामू तू काळजी करू नको मी एक असा पंढरपूर वसविन कि जिथ कोणालाही बंदी नसणार आहे सारे समान मानले जातील अस पंढरपूर वसविन पण रमा मातेला आयुष्य कमी भेटलं बाबासाहेब ज्याव...

अस्पृश्यांना बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय कोणताच मुक्तीचा मार्ग नाही

अस्पृश्यांना बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय कोणताच मुक्तीचा मार्ग नाही   { दिनांक ६ जून १९५० - कोलंबो टाऊन हॉल मधील अखिल सिलोन दलित  फेडरेशनच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या संमेलनातील भाषण } इथे जमलेल्या समस्त लोकांना सकारात्मक उत्तरे देताना बाबासाहेब म्हणतात … **************बाबासाहेब यांचे भाषण ************* '' सिलोन हा देश बौद्ध धर्मियांचा आहे अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग बौद्ध धम्म स्वीकारण्यात आहे अशी माझी खात्री झाली असल्याने एज तऱ्हेने तुम्ही सुदैवी देशात आहात असे मला वाटते मला सिलोन मधील बौद्ध धर्मीय जनतेस सांगावेसे वाटते कि  दलित वर्गीय बंधूना त्यांनी दिलजमाई ने बौद्ध धम्मात समाविष्ट करून घ्यावे आणि मानीव पुत्राप्रमाणे त्यांच्या हितसंबंध संरक्षण   करावे सिलोन पुरते बोलावयाचे झाल्यास हा देश बौद्ध धर्मीय असल्यानेच ,मी असे म्हणेन कि अस्पृश्यांची संघटना म्हणून तुम्ही वेगळेपणाने संघटीत होण्याचे कारण नाही भारतात दलित फेडरेशन आहे म्हणून त्याचे तुम्ही अनुकरण करण्याची  आवश्यकता नाही  बौद्ध धर्मीय देशात तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानण्याची आवश्यकता ...

तिरंगा

आज काल बाबासाहेबांचे अनुयायी देखील भारताच्या तिरंगी झेंड्याला चौरंगा म्हणू लागलेत आणि यावर लिहीन म्हटले होते म्हणून आज लिहिण्याची गरज वाटली कि बाबासाहेब यांनी या ध्वजाला चक्रांकित तिरंगा का म्हटले होते याचे आज हि लोकांना माहित नाही या संबंधीचे सर्व पुरावे आपण पाहणार आहोत प्रथम हा तिरंगा निर्माण कसा झाला याचा विचार  करावा लागेल तर भारताच्या या झेंड्याची सुरुवात १८५७ ला झाली भारताचा प्रथम ध्वज : सन १८५७  ला निर्माण केला गेला हा  ध्वज रेशमी कापडाचा पोपटी रंगाचा चौकोनी आकाराचा होता त्याची किनार पिवळी व निळी होती यात वरच्या टोकाला लाल कमल आणि खाली लाल चंद्र अंकित होते  भारताचा दुसरा ध्वज : सन १९०६ हा ध्वज    भगव्या रंगाचा चौकोनी आकाराचा असून त्याच्या किनारी १०८ पिवळ्या रंगाच्या ज्योती छापल्या होत्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे इंद्राच्या वज्राचे चिन्ह असून बाजूला बंगाली भाषेत   वन्दे मातरम  लिहिले  होते  भारताचा तिसरा ध्वज : सन १९०६  हा ध्वज  रंगाच्या पट्ट्यांच्या चौकांनी आकाराचा व ३. २ प्रमाणाचा होता वर हिरवा  रंगाचा व त्या...

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

इमेज
स्वराज्य  कि रामराज्य : एक सत्य शोध   भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या देशात विविध संस्कृती विविध रीतींचा विविध परंपरांचा असा हा भारत देश  पण या देशात  शूरवीर राजे जन्माला आले त्यात कापोकाल्पित राज्य  हि आहे अवघे पुस्तकात प्रत्यक्षात  त्याचा पुरावाच नाही तरी सुद्धा लोकांच्या मनात असणारे एक पुस्तकी राज्य ज्याला लोक रामराज्य म्हणतात त्या रामराज्याचा राजा होता राम क्षत्रिय राजा पण या रामराज्य कुठे  होते त्याचा अजून शोध लागलेला नाही  तरीसुद्धा हे राज्य समृद्ध होते इथली जनता खुश होती असे काहींचे म्हणणे आहे पण त्याच बरोबर या देशात असे हि एक राज्य झाले त्याचा सम्राट होते छत्रपती शिवराय आणि त्यांच्या पुढे हे  रामराज्य म्हणजे अगदी नगण्य आहे काहीच अर्थ नाही या रामाराज्याला असे वाटते आणि म्हणून लोकांच्या भावनेची कदर करून आम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत कि तुमच्या देवलोकीचा राजा राम आणि आमच्या जीवनातील एक पराक्रमी सम्राट यांच्यात कोणता राजा सरस ठरतो कोणते राज्य कल्याणकारी होते कोणता राजा प्रजादक्ष होता म्हणून केलेला हा प्रयत्न आहे चला आता ...