अस्पृश्यांना बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय कोणताच मुक्तीचा मार्ग नाही

{ दिनांक ६ जून १९५० - कोलंबो टाऊन हॉल मधील अखिल सिलोन दलित फेडरेशनच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या संमेलनातील भाषण }
इथे जमलेल्या समस्त लोकांना सकारात्मक उत्तरे देताना बाबासाहेब म्हणतात …
**************बाबासाहेब यांचे भाषण *************
'' सिलोन हा देश बौद्ध धर्मियांचा आहे अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग बौद्ध धम्म स्वीकारण्यात आहे अशी माझी खात्री झाली असल्याने एज तऱ्हेने तुम्ही सुदैवी देशात आहात असे मला वाटते मला सिलोन मधील बौद्ध धर्मीय जनतेस सांगावेसे वाटते कि दलित वर्गीय बंधूना त्यांनी दिलजमाई ने बौद्ध धम्मात समाविष्ट करून घ्यावे आणि मानीव पुत्राप्रमाणे त्यांच्या हितसंबंध संरक्षण करावे
सिलोन पुरते बोलावयाचे झाल्यास हा देश बौद्ध धर्मीय असल्यानेच ,मी असे म्हणेन कि अस्पृश्यांची संघटना म्हणून तुम्ही वेगळेपणाने संघटीत होण्याचे कारण नाही भारतात दलित फेडरेशन आहे म्हणून त्याचे तुम्ही अनुकरण करण्याची आवश्यकता नाही बौद्ध धर्मीय देशात तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानावे काय व त्याप्रमाणे ओळखिले जावे काय प्रश्नच विचार करण्याची आज परिस्थिती निर्माण झाली आहे
आम्हास राजकीय हक्क प्राप्त व्हावेत कायदेमंडळात जागा मिळाव्यात आणि समाजाने समतेने वागवावे म्हणून भारतात आम्ही एक प्रदीर्घ राजकीय युद्ध खेळीत आहोत तथापि आम्ही अद्यापि यशस्वी झालो नाही या गोष्टीचा अर्थ असा कि राजकीय संग्रमातून आम्हास मुक्ती मिळालेली नाही
गेली ३५ वर्षे मी राजकीय लढाई चालवली आहे या लढाईत मोठमोठ्या व उच्च हिंदूंच्या तलवारी बरोबर तलवार मला भिडवावी लागली याच काळात जगातील सर्व धर्माचा मी अभ्यासही केला आणि शेवटी एका अपरिहार्य निर्णयास मी येवून पोहचलो आहे तो निर्णय हाच कि बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणातच मुक्तीचा मार्ग नाही फक्त बौद्ध धम्माच अस्पृश्य निवारणाचा चिरकालीन उपाय आहे जर तुम्हास समतेचे तत्व हवे असेल आणि आर्थिक दास्यातून मुक्तता करावयाची असेल तर बौद्ध वादाशिवाय कोठेच दुसरा पर्याय नाही सिलोनचे मानाय्वर नागरिक बनण्याची संधी तुम्हास कायद्याने मिळालेली आहे या कायद्यातील काही कलमा विरुद्ध तक्रार करण्यास पुष्कळ जागा आहे हे खरे आहे परंतु मला खात्री आहे कि भारत सरकार आणि सिलोन सरकार यांच्या सलोख्याने व स्नेहभावाने अन्यायी तरतुदीचे निराकरण करता येईल
जनता दिनांक १० जून १९५० चा अंक
वक्ते ; बाबासाहेब आंबेडकर

टिप्पण्या