जिथे बुद्ध हसतो तिथेच समाज वसतो
पहाटेचा सूर्य माथ्यावर आला होता. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या क्षणभर विश्रांतीची गरज भासत असताना कंठ तहानेने व्याकुळ झाला होता. अश्यावेळी कुठे तरी निवारा शोधण्याची डोळ्यांची तळमळ चालू होती . क्षणात असे काही वाटू लागले कि आता जीवनाची यात्रा इथेच संपते कि काय ? आणि अचानक डोळ्यासमोर मंद झुळझुळ वाहणारा झरा नजरेस पडतो. आणि जीवाला हायसे वाटते . थंड गार पाण्याचे चार घोट घश्याखाली जाताच पोटामध्ये शांत वाटू लागते. थंडगार पाणी तोंडावर शिडकुन आलेला क्षीण दूर करण्यास प्रयत्न करतो. पुन्हा ताजेतवाने होऊन क्षणभर विश्रांती करण्याचा बेत करतो. निसर्गाच्या या कुशीत शांत दगडावर झाडाच्या सावलीखाली निपचित पडल्यागत झोप लागते. आणि जीवनातील सर्वोच्च सुखाला गवसणी घातल्याचे सुख मिळते. पुन्हा सायंकाळचा सूर्य अस्ताला निघालेला जाणवतो . आणि मग पावले नकळत गावाकडे वळू लागतात. थोडा थोडा अंधार पडू लागतो गावात येऊन थबकलेली पाऊले आता रात्रीचा निवारा शोधू लागतात. मंदिर मस्जिद विहारे सारी काही पाहतो घरे देखील पाहतो. पण माणसांच्या घरात आ...