जिथे बुद्ध हसतो तिथेच समाज वसतो
पहाटेचा सूर्य माथ्यावर आला होता. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या क्षणभर विश्रांतीची गरज भासत असताना कंठ तहानेने व्याकुळ झाला होता. अश्यावेळी कुठे तरी निवारा शोधण्याची डोळ्यांची तळमळ चालू होती . क्षणात असे काही वाटू लागले कि आता जीवनाची यात्रा इथेच संपते कि काय ? आणि अचानक डोळ्यासमोर मंद झुळझुळ वाहणारा झरा नजरेस पडतो. आणि जीवाला हायसे वाटते . थंड गार पाण्याचे चार घोट घश्याखाली जाताच पोटामध्ये शांत वाटू लागते. थंडगार पाणी तोंडावर शिडकुन आलेला क्षीण दूर करण्यास प्रयत्न करतो. पुन्हा ताजेतवाने होऊन क्षणभर विश्रांती करण्याचा बेत करतो. निसर्गाच्या या कुशीत शांत दगडावर झाडाच्या सावलीखाली निपचित पडल्यागत झोप लागते. आणि जीवनातील सर्वोच्च सुखाला गवसणी घातल्याचे सुख मिळते.
पुन्हा सायंकाळचा सूर्य अस्ताला निघालेला जाणवतो . आणि मग पावले नकळत गावाकडे वळू लागतात. थोडा थोडा अंधार पडू लागतो गावात येऊन थबकलेली पाऊले आता रात्रीचा निवारा शोधू लागतात. मंदिर मस्जिद विहारे सारी काही पाहतो घरे देखील पाहतो. पण माणसांच्या घरात आजची वस्ती होईल कि नाही लोक आपणाला स्वीकारतील कि नाही या शंकेने मनात काहूर निर्माण होते. आता काळाकुट्ट अंधार पडला होता .समोर चे दिसेना झाले होते पोटात भुकेने आगडोंब झाला होता. चऊथभर भाकर कोणी देईल का अशी आस लावून बसले होते .आणि अचानक कोणी तरी हेटाळावे असा आवाज आला .आणि मन भीतीने गडबडून गेले क्षणभर असे वाटू लागले कि कसले हे जीवन जगतोय त्यापेक्षा मरण चांगले पण काय करणार ऐन पंचविशीतिल तरुण मन मानायला तयार नाही. असेच रात्र काढावी लागणार होती. शेवटी गावात कुणी मदत करणार नाही असे जाणून पुढे पावले मंदिराकडे वळली. पण मंदिरात आपला विटाळ होतो कि काय या भीतीने पावले माघारी च वळली. पुढे जाऊन मस्जिद कडे वळताच काफिर म्हणून तिथ मार तर खावा नाही ना लागणार या भीतीने पावले परत माघारी फिरली. शेवटी विहाराच्या लुकलुकणाऱ्या त्या लाईटीच्या दिशेनं पावले वळाली माहीतच नव्हत कि इथे काय होते असते ते दरवाजापाशी आल्यावर जाणवले कि हे बुद्धाचे बाबासाहेबांचे स्थान आहे. क्षणभर आशेचे किरण मनात दिसू लागले तोच समोरून एका स्त्रीच्या आवाजाने तो भानावर आला आणि ती त्याला विचारू लागली कुठून येन झाले म्हणून तेव्हा वाटसरू आहे म्हणून एका रात्रीची विश्रांती सांगून त्याला त्या विहारात विश्रांती मिळाली थोडे पोटापुरते जेवण हि झाले भूक शांत झाली निवाऱ्याची सोय झाली आता मात्र विचाराने मस्तकात गोंधळ निर्माण केला आणि क्षणभर बाबासाहेब नावाचे वादळ उभे राहिले .
स्वतःचे निरीक्षण सुरु झाले शिक्षण चांगले होते परी गरिबी आणि जातीच्या विळख्याने पुरते घरदार नष्ट झाले होते गावातील लोकांचा रोष होता उच्च जातीच्या मुलीशी प्रेम केल्याचा त्या मुले आईवडील बहीण भाऊ सगे सोयरे सर्वच गमावून बसलेला बॅकवर्ड जातीचा तरुण म्ह्णून ओळख निर्माण झालेली त्यात गावातून कसाबसा जीव वाचवून आलेला विहारात रात्रभर विचार करता करता शांत झोप लागली सकाळी सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा विहारात बुद्ध वंदनेचे सूर निघत होते भंते जी बुद्धाच्या शिकवणीचे सार सांगत होते कदाचित तो दिवस पौर्णिमेचा असावा असे दिसत होते
लोकवस्ती फारशी नव्हती पण जेमतेमी होती वस्तीमधील प्रतिष्ठित लोक जवळ येऊन विचारपूस करू लागले नंतर कळाले कि जातीचे प्रकरण आहे म्हणून आता आपले असे काहीच नव्हते जिच्यावर प्रेम केले ती तरी आपल्या सोबत असेल कि नाही हे हि ठीक माहित नव्हते शेवटी लपून त्या दिवशी त्या मुलीला भेटला आणि त्या मुलीने मुलाला जिवंत पाहून क्षणाचा विलंब न करता मिठी मारून रडू लागली प्रेमाची साथ आहे म्हटल्यावर अंगात दहा हत्तीचे बळ आले होते राहण्याचा ठिकाणा नाही तरी मुलीकडे लग्नाची मागणी केली आणि भेटीस आलेली मुलगी तिथूनच मुलासोबत पळून गेली गावात मुलगी पळून गेल्याचे समजले आणि एकाच गोंधळ झाला मुलाने थेट मुंबई गाठली पण इकडे गावात मात्र विपरीत घडले जातीय मानसिकतेच्या लोकांनी त्या मुलाला ज्या लोकांनी निवारा दिला त्या व वस्तीला पेटवून दिले विहाराची तोडफोड केली बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना केली आणि एकच हाहाकार झाला गावात जातीय तणाव निर्माण झाला इकडे मुलगा मुंबईत आला राहण्याची सोया नाही मित्रपरिवार काही मदतीस आला नाही शेवटी निराश झालेला मुलगा आत्महत्या करण्याचा विचार करून निघाला असताना मुलीने जगण्याची आशा दाखवली मुंबईच्या शहरात यांचा संसार चालू झाला होता पण इकडे गावातील त्या वस्तीवर मात्र आलेले संकटाची जाणीव त्याला नव्हती गावातील हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले लोक रस्त्यावर उतरू लागली अखेर बातमी मुलापर्यंत येऊन धडकली आणि काळजात धस्स झाले माझ्यामुळे निरापधार लोकांना त्रास झाला म्हणून वाईट वाटले मुलाने जिद्द केली अपुरे शिक्षण पूर्ण केले मुलगी हि उच्च शिक्षित असल्याने दोघांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे निश्चित केले आणि दोघे हि सोबत आय पीएस ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले पण त्यांचे यश पाहण्यासाठी त्यांच्या घराचे कोणी नव्हते मुलाने आपली गाडी थेट त्या गावातील विहाराकडे वळवली आणि विहाराकडे येताच त्या विहाराची अवस्था पाहून वाईट वाटले पण पुढे जाऊन बाबासाहेबांच्या विटंबना केलेल्या मूर्तीपुढे दोघे हि नतमस्तक झाले गावात पोलीस तैनात होते अश्या वेळी एक मोठा अधिकारी या वस्तीत आल्याने गावातील सर्वच लोकांचे चर्चेचा विषय बनला होता विहारासमोर दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या उभ्या होत्या आणि आपल्यामुळे झालेल्या त्रासाची माफी तो तरुण त्या वस्तीतील लोकांकडे मागत होता पण त्याचे यश पाहून भारावलेल्या लोकांनी त्याच्या पाठीवर कौतुकाचे वर्षाव केले
आता आपले घरदार सारे काही हीच वस्ती असे ठरवून निघालेला हा अधिकारी सरकारी पोलीस दलातील एक मोठ्या पदावर बसला आणि देशाप्रती असणारे कर्तव्य दोघे नवरा बायको बजावण्यासाठी कटिबद्ध झाले तो दिवस होता १४ एप्रिल बाबासाहेबांच्या जन्म दिनाचा गावोगावात भीमजयंती जल्लोषात साजरी होत होती अश्यावेळी मुलाने भीमजयंती साठी त्या वस्तीत येऊन साजरी केली जातीवादी माणसांच्या नाकावर टिचून त्या गावात जयंती सोहाळा पार पडला नाईलाजाने गावातील लोकांना यावे लागले कारण एक सरकारी अधिकारी आला म्हटल्यावर गावातील ग्रामपंचायत चे सरपंच सहित सर्वाना येणे भाग पडले
आता जयंतीचे भाषणे झाली अधिकारी बोलण्यास उभा राहिला तेव्हा सोबत असणाऱ्या आपल्या साथीदाराला सोबत घेऊन दोघे स्टेजवर उभे राहिले जातीमुळे ज्यांनी त्याचे सर्व संपवले होते त्याच जातीय मानसिकतेच्या लोकांमुळे त्याला खूप मोठा परिवार मिळाला होता त्याच दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेत जातीतून मुक्त होण्याची घोषणा केली आज पासून मी बौद्ध आहे जात कायमची नष्ट केली असे सांगून त्याने आपले भाषण थांबले धर्मांतर झाले गावातील लोक पाहतच राहिले
मुलीच्या आई वडिलांना आपली मुलगी इतकी मोठी अधिकारी होईल असे कधी वाटले नव्हते पण तिचे यश पाहून आनंद तर होत होता पण कौतुक करण्यासाठी तिची पाठ काही त्यांना भेटत नव्हती डोळ्यातील आसवांनी जे सांगायचे ते सांगून गेले एका जातीच्या घाणीमुळे उभा असणारा सारा डामडौल खाली पाडला गेला होता
फक्त जिद्द असणे महत्वाचे होते यंत्रणेत जाऊन जिद्दीने काम करणारा तरुण आणि ती तरुणी तरुणांचे आदर्श झाले अनेक शाळा कॉलेज अनेक आंबेडकरी स्टेज असतील किंवा इतर समाजाच्या मंचावर आदराने बसण्याची जागा निर्माण झाली
पुढे त्याच गावाने आदर्श अधिकारी म्हणून आपल्या गावातर्फे त्याच मुलाचा सत्कार केला जंगी मिरवणूक काढली
पण तेव्हा मात्र मुलाचे लक्ष त्या विहाराकडे गेले तेव्हा त्याने त्या विहारातील बुद्धाकडे पाहिले तेव्हा बुद्ध हसताना भासला
आणि गावात निर्माण झालेला एकोपा हेच सांगून गेला कि जिथे बुद्ध हसतो तिथेच समाज वसतो
भूतकाळात ज्यांच्या प्रेमाने गावात जातीय तणाव निर्माण केला त्याच प्रेमामुळे गावातील जातीवाद नष्ट झाला फक्त गरज होती ती एका जागेची जी जागा त्या मुलाने आणि मुलीने कमावली होती
म्हणतात ना दुनिया झुकती है बस झुकानेवाला चाहिए
{ टीप : कथा काल्पनिक असून सारांश रूपाने मांडणी केलेली आहे कथा लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार आहे समाजाशी संबंध आला तर केवळ योगायोग समजावा
आम्ही समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतो ज्याने त्याने आपली प्रतिमा स्वतः पारखून घ्यावी
विशेष बौद्ध विहाराचा उल्लेख केलेला आहे तो लेखकाच्या आजवर च्या संशोधनाच्या निष्कर्षावर केलेला आहे तेव्हा इतरांनी दुःख वा वाईट वाटून घेऊ नये }
टिप्पण्या