आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ४

बाबासाहेबांच्या या महत्वाच्या पैलूवर नजर टाकू या
बाबासाहेब आणि सैनिकी शास्त्र 
बाबासाहेब यांच्या दादर येथील निवास्थानी सैनिकी शास्त्रावर तब्बल ३०० पुस्तके  आहेत .  आणि ती पुस्तके नुसती शो साठी ती पुस्तके ठेवली नव्हती तर ती अभ्यासली होती बाबासाहेबांनी आणि सैनिकि शास्त्राचा सल्ला देणे म्हणजे सोपे काम नाही आणि असा सल्ला सहज कोणाला देत येत नाही बाबासाहेब ते नेहमी देत होते कारण ज्यावेळेस हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करायचे होते तेव्हा बाबासाहेबांचा सल्ला खूप महत्वाचा  मानला जातो त्यावेळी सरदार पटेल हे भारताचे गृहमंत्री होते त्यांनी बाबासाहेब यांना विचारले कि  काय करावे लागेल हैद्राबाद संस्थान हे भारतात विलीन करायचे आहे त्यावेळेस बाबासाहेबांनी सदर पटेल यांस सल्ला दिला होता सरळ पोलिस कारवाई करा . सरदार पटेल यांनी सरळ पोलिस   कारवाई करून संस्थान भारतात विलीन केले इथे सरदार पटेल यांनी परत एकदा बाबासाहेबांचा सल्ला  दिवस म्हणजे २२ /१०/१९४८ साली सीमाप्रांतातील टोळीवाल्यांनी काश्मिरी हद्दीतील खेड्यांवर छुपे हल्ले केले केले त्यावेळी सरदार पटेल बाबासाहेब यांच्याकडे आले बाबासाहेबांना विचारते झाले काय करावे म्हणून आणि त्यावेळेस बाबासाहेब यांनी टोळी वाल्यांशी कसा लढा द्यायचे ते सविस्तर सांगितले कारण उघड्या मैदानात टोळी वाल्यांशी लढता येणार नाही हे बाबासाहेब चांगले जाणून होते शेवटी बाबासाहेब सुद्धा ह्या सह्याद्रीचे वाघ ना आपल्या राजाचा इतिहास पुन्हा सांगितला कसा  गामिनी कावा वापरून  कसे लढता येईल याची पूर्ण माहिती सांगितली आणी हा गनिमी कावा कोण जास्त करू शकते तर महार बटालियन त्वरित करू शकते ह्याची सूचना त्यांनी पटेल यांना दिली आणि त्याच प्रमाणे कारवाई  करून काश्मीर मुक्तीचा लढा जिंकला गेला . पण इतिहास सांगताना बाबासाहेबांचे हे कार्य  कधी लोकांसमोर आणले नाही या लोकांनी
बाबासाहेब यांना army in india  हा ग्रंथ लिहायचा होता पण त्यांना आपल्या सामाजिक कामाच्या व्यापामुळे तो लिहला गेला नाही याचा अर्थ सरल आहे बाबासाहेब यांच्याकडे ते ज्ञान आहे बाबासाहेब यांची आर्मी संकल्पना नक्कीच वेगळी  होती आणि बाबासाहेबांना सैनिकी महाविद्यालय निर्माण सुद्धा करायचे होते आणि  एक भाग म्हणजे समता सैनिक दल निर्माण केले त्याची ध्येय उद्दिष्टे पहा बाबासाहेबांचा रीतसर अभ्यास  आहे याची जाणीव  करून देतो बाबासाहेबांचा हा विचार आजच्या समता सैनिक दल लक्ष न दिल्याने आज समता सैनिक दल  दुर्बल झाले आहे बाबासाहेबांच्या विचारांची लढाई लढण्यास असमर्थ आहे  बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी अभ्यास करत असताना आज  खरेच दुःख वाटते कि आमच्या लोकांनी बाबासाहेबांचे ध्येय धोरणे विसरले आणि शत्रूने बाबासाहेबांचे सर्व ध्येय आणि धोरणे स्वीकारली आणि आपली संघटने मजबूत केले 
आमच्या लोकांनी बाबासाहेबांचे सैनिकी शास्त्राचा वापर करून घेण्यात अपयशी ठरले आहेत याची खंत आहे बाबसाहेब हे उत्कृष संघटक होते यात कोणतीच शंका नाही  बाबासाहेब हे  आज या जगात माहित झाले आहेत पण त्यांच्या देशाने त्यांना किती स्वीकारले हे पाहणे आवश्यक आहे बाबासाहेबांच्या अजून अनेक पैलूंचा अभ्यास करायचा बाबासाहेबांचे सैनिकी शास्त्र किती प्रबळ होते हे समता सैनिक दलाच्या ध्येय आणि उद्दिष्ट पाहता ध्यानात येत या पेक्षा अजून कोणता पुरावा देण्याची आवश्यकता मला  वाटत नाही म्हणून बाबासाहेबांच्या पुढील पैलूचा अभ्यास आपण पुढच्या भागात पाहू या  




















टिप्पण्या

जितेंद्र माने म्हणाले…
रवींद्र सावंत आम्हला ह्या संध्राबत काही पुरावा भेटेल का?

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र