आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ३
बाबासाहेब यांच्या जीवन पैलू मधील काही घटक आजच्या लोकांना माहित नाहीत आणी तेच घटक जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत बाबासाहेब आज लोकांपुढे आले ते दलितांचे बाबा म्हणून पण खरे बाबासाहेब जाणून घेण्यासाठी माझा शोध विश्वरत्नचा या समग्र लेखात भागाभागातून बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यातील एक भाग म्हणजे आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग: ३
आता कोणते बाबासाहेब आम्हाला माहित नाहीत यावर लक्ष टाकू या . आम्हाला माहित नसलेले ज्योतिषीशास्त्र जाणणारे बाबासाहेब
बाबासाहेब आणि ज्योतिषीशास्त्र : बाबासाहेब यांना हे शास्त्र अवगत करून घेतले होते आणि म्हणून त्यांनी या शास्त्राला कडाडून विरोध केला बाबासाहेबांना हे शास्त्र जाणून घ्यायचे होते यासाठी बाबासाहेब यांनी भास्कर राव ;भोसले नावाचे ज्योतिषी शास्त्रावर काम करणारे ज्योतिषी बाबासाहेब येत त्यांना त्यांच्या हाताचे ठसे घेवून कसे शास्त्र पहिले जात असे याचा सराव केला जात असे बाबासाहेब हे विविध कला आत्मसात करून घेत होते त्यात त्यांनी अनेक कला शास्त्रे अवगत करून घेतली आणि मगच जे चुकीचे आहे त्याला विरोध केला बाबासाहेबांच्या या नव्या पैलूचे लोकांना नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे बाबासाहेब ज्योतिषी शास्त्र जाणत होते भास्करराव यांनी घेतलेलं त्यांच्या हाताचे ठसे याचे पुरावे देतात कि बाबासाहेब यांनी ते शास्त्र शिकून घेतले मगच ते थोतांड आहे असे सांगितले बाबासाहेबांच्या या ज्ञानाबाबत लेखक अज्ञानी होते असेच म्हणावे लागेल
आज आपण पहिले कि रस्त्यावर बसून ज्योतिषी सांगणारे अनेक लोक भेटतील पण आणि मुख्य म्हणजे त्यांचे सांगितले ले ज्योतिष्य हे खरे नसते कारण हाताच्या आधारावर कोणतेही भविष्य सांगता येत नसते ते भविष्य काय आहे हे सांगणारा आज पर्यंत कोणी नाही आहे म्हणून सांगावे वाटते कि बाबासाहेब यांनी ६या शास्त्राचा अभ्यास केला काय आहे ज्योतिषी शास्त्र हे पाहण्यासाठी बाबासाहेब यांनी दिलेलं हाताचे ठसे बाबासाहेबांच्या भविष्याचा कोणताच मागुस सापडत नाही पण इतके नक्की बाबासाहेब आम्हाला सांगतात कि आकाशातील ग्रह तारे जर माझे नशीब ठरवणार असतील तर माझ्या मनगटांचा काय उपयोग सरळ आहे बाबासाहेब ते शास्त्र खोटे आणि कल्पित वाटले त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही अवकाशात केवळ नऊ ग्रह नाहीत आपण ज्या ग्रह मालिकेत येतो त्या प्रत्यके ग्रहाला त्याचा उपग्रह आहे मग नऊ ग्रह कोणत्या आधारावर मांडले जातात हे न पटण्यासारखे आहे म्हणून बाबासाहेब स्पष्ट सांगतात आपल्या मनगट वर विश्वास ठेवा म्हणून आज इतकी दशके झाली बाबासाहेबांचे ते ज्ञान आज जगास आवश्यक आहे बाबासाहेबांनी सांगितले ते आज हि पटण्यासारखे आहे कोणी दैवी शक्ती तुमचा उद्धार करण्यास येणार नाही तुम्हाला तुमचा उद्धार स्वतः करायचा आहे तथागत बुद्धांचा हा संदेश बाबासाहेब देतात ना अत्त दीप भव तूच तुझ्या जीवनाचा आहेस शिल्पकार हीच बाबासाहेब यांचे सांगणे होते कोणत्याही ज्योतिषी शास्त्राला बळी पडू नका हे बाबासाहेबांचे सांगणे होते मुळात त्यांच्या लोकांनी बाबासाहेब जाणून न घेतल्याने आज अनेक जन याच भट बाबांच्या कारस्थानाल बळी पडत आहेत
आज बाबासाहेबांच्या या पैलूबाबत अनेक घटकांना हे माहित नाही कि नक्की बाबासाहेब कोणते ज्योतिषी शास्त्र जाणत होते कारण त्यात अनेक प्रकार आहेत बाबासाहेबांनी हे शास्त्र केवळ भूलथापा आहेत हे अभ्यास करून मांडले आहे म्हणून बाबासाहेब सांगतात कि ह्या अमिषाला बळी पडू नका
बाबासाहेब खुद्द हे शास्त्र जाणत होते
बाकीच्या पैलूवर नजर टाकू या पुढच्या भागात
टिप्पण्या