आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ५

बाबासाहेबांच्या विविध पैलूंचा अभ्यास करताना अनेक पैलू समोर यातेत त्यात बाबासाहेबांचे हे रूप आम्हाला कधी माघीत नव्हते आज हि बाबासाहेबांचे हे रूप समजापुढे आले नाही म्हणून आज या महाविद्वान माणसाला इथला माणूस विसरत गेला हे आज आपण  बाबासाहेबांच्या शिल्पकलेची माहिती घेवू या
बाबासाहेब आणि शिल्पकला :
बाबासाहेबांचा ध्यास इतका मोठा  होता कि त्याचा व्यास शोधणे म्हणजे समुद्रात जावून पाण्याचा थेंब शोधण्यासारखे आहे बाबासाहेब यांचा हा पैलू जर वेगळाच आहे कारण बाबासाहेब आणि शिल्पकला थोड वेगळ वाटत कि जो माणूस  ह्या क्षेत्रात काहीच काम नाही असा आहे तरी देखील हा  मनुष्य या क्षेत्रात आपली कला अवगत करून घेतो म्हणजे खरच नवल आहे सार्या जणांना ते शक्य नसते आणि म्हणूनच बाबासाहेब यांचे हे रूप समजणे इतके सोपे नाही बाबासाहेबांना शिल्पकला अवगत करायची होती म्हणून त्यांनी आर बी मडिलगेकर  यांना बोलावले त्यांचे या विषयावर चांगले प्रभुत्व होते आणि जेव्हा ते मूर्ती घडवत असत तेव्हा बाबासाहेब अगदी काळजीपूर्वक पाहत असत आणि सर्व माहिती ते विचारात असत त्यांना या कलेबाबत कमालीची ओढ होती ते मडिलगेकर यांना बापू म्हणत बाबासाहेब म्हणायचे बापू मला भगवान बुद्धांचा पुतळा स्वतः तयार करता आला पाहिजे तसा बापू नि सुद्धा मूर्ती तयार करायचा चिखल आणि क्ले घेतला तो चिखल बाबासाहेबांच्या जवळ आणला आणि काही चिखल त्यांनी आपल्या  हातात घेवून त्यांनी त्याचा प्रथम एक गोला तयार केला आणि मग तो बाबासाहेबांच्या हाती देवून बाबासाहेब यांना ओंजळीत धरायला सांगितला बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या ओंजळीत तो चिखलाचा गोळा धरला अर्थात आता आकार कसा द्यायचे हे शिकायचे होते आणि त्या गोळ्याच्या मधल्या भागावर दोन्ही हाताचे अंगठे जवळ आणून ते ओंजळीतल्या गोळ्यावर दाबण्यास सांगितले आणि बाबासाहेब यांनी त्याच प्रमाणे कृती केली पुढे बापू बाबासाहेबांना म्हणाले बाबा आता त्या ज्या खाचा झाल्या आहेत ते डोळे समजा आणि ताच्या वरती भुवई तयार करा व त्याचा वरचा भाग हा कपाळ आहे असे समजा मग खाचांच्या खालचा भाग हा गाल व दोन्ही अंगठ्याच्या  मधला भाग म्हणजे नाक समजून तयार करावे नाकाच्या शेजारी खाली तोंडाची आकृती  तयार करावी आणि बापूंच्या सांगण्यावरून बाबासाहेबांनी केले आणि अवघ्या १५ मिनिटात बाबासाहेबांनी मुखवटा बनवण्याचे ज्ञान आत्मसात करून  घेतले आणि त्यांचे हे ज्ञान त्यांना खूप आनंद देवून गेला पुढे बाबासाहेब भगवान बुद्धाच्या मूर्ती तयार करण्याच्या कामात  गुंतले एकीकडे समाजकार्य दुसरीकडे देशाचे हित जपण्याचे कार्य अनेक कामे असताना देखील शिल्पकला जोपासणे आणि ती हि इतक्या सहज  कोणाला हि शक्य नाही पण बाबासाहेबांनी ती आत्मसात केली  कलेतील नेमकी कोणती सौंदर्यस्थळे असतात ते  बाबासाहेब जाणून होते त्यांनी   अनेक बुद्ध लेणी पहिली होती आणि त्यातूनच त्यांचा ध्यास लागला होता कि मी सुद्धा शिल्पकला आत्मसात करणार म्हणून आणि मग बुद्धाच्या मूर्तीसाठी त्यांनी जगभरातील सर्व बुद्धांच्या मूर्तीचे फोटो मागवले आणि मग जे चांगले वाटले ते मूर्तीसाठी निवडले व बाबासाहेब यांनी ती मूर्ती स्वतः तयार केली 
बाबासाहेबांनी निर्माण केलेलं औरंगाबाद येथील मिलिंद विद्यालयात त्यांना समोरच्या बागेत बुद्धांच्या विविध भावातील मुर्त्या बसवयायचे होते पण समजाच्या कामा पायी ते शक्य झाले नाही पण इतके नक्की कि बाबासाहेब स्वतः एक उत्कृष्ट शिल्पकार होते  म्हणून त्यांनी या देशाला सुद्धा घडवले हे विसरत कामा नये 
बाबासाहेबांचे अनेक पैलू असेच आहेत जे आजवर  भारताला माहित नाहीत आज आपल्याल ते सांगण्याची जबाबदारी आहे 
आता पुढील भागात बाबासाहेबांचे नवीन नवीन पैलू पाहत जावू 











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र