पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चिपळूण लेणी

इमेज
महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपलुन या तालुक्यात एक सुंदर गिरिशिल्प आपणास पाहायला मिळते सध्या चिपळूण च्या अगदी हाकेच्या अंतरावर हि लेणी आहेत या लेण्यांना पांडवलेणी म्हणून जनमानसात प्रचलित आहेत कारण बौद्ध लोकांचा यांच्याकडे असणारे दुर्लक्ष या ठिकाणी असणारी लेणी हि नवीन चिपळूण गुहागर बायपास रोड वरून पुढे आल्यावर पहिल्याच वळणावर डाव्या बाजूला महालक्ष्मी चा डोंगर आहे व याच डोंगरात हि लेणी कोरलेली आहेत हि लेणी साधारण इसवी सनापूर्वी ची वाटतात कारण एकूण स्तूप व त्यांचा बांधकाम पाहून हि लेणी इसवीसना पूर्व असू शकतात असे जाणवते कोणता हि शिलालेख नसून इथे फक्त लेण्यांचे अवशेष आहेत हि लेणी पाहण्यासाठी स्वतःची गाडी असणे उत्तम साधारण तीन लेण्यांचा समूह आहे हा लेणी क्रमांक १ यामध्ये हि अत्यंत छोटी खोली आहे इथे भिक्षु ना राहण्यासाठी कोरलेली असावी साधारण लहान आहेत इथे एक दगडी बाक आहे झोपण्यासाठी सध्या भग्न अवस्थेत आहे त्यांनतर लेणी क्रमांक २  हे पहिल्या लेण्यापेक्षा मोठे लेणे आहे परंतु इथे असे काही नाही इथे काही तरी खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला असावा असे वाटते एकूण लेणी पाहिल्य...

बौद्ध धम्माशी निगडीत असणारी शैलगृह

इमेज
शैलगृह वास्तविक शैलगृह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करू या डोंगरामध्ये वा पर्वतामध्ये खोदून वा कातळाला छेदून वास्तू निर्माण केल्या जायच्या त्यांना शैलगृह म्हणतात जसे घरे राजवाडे इमारती अश्या वास्तू तयार केल्या जायच्या त्याच पद्धतीने डोंगरात शैलगृह बांधली जायची आणि अशी शैलगृह बांधण्याची सुरुवात मौर्य सम्राट चक्रवती सम्राट अशोकाने सुरुवात केली आहे अशोकाने प्रथम बिहार राज्यातील बाराबार डोंगरावर अशी शैलगृह बांधलेली आहेत आणि हि शैलगृह केवळ बौद्ध भिक्षूंच्या पावसाळ्यातील राहण्याची वा निवासस्थानाची सोय व्हावी म्हणून कोरलेली आहेत याला वर्षावास हि म्हटले जाते पुढे याच शैलगृह यांना विहार म्हणू लागले डोंगरात कोरलेली शैलगृह प्रामुख्याने केवळ बौद्ध धम्माशीच निगडीत आहेत यामध्ये चैत्य स्तूप विहार स्तंभ आणि शैलगृह यांचा समावेश आहे मुळात शैलगृह हि बौद्ध धम्माशी निगडीत यासाठी कि सर्वात प्रथम धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अशोकाने धम्म दूत गावोगावी पाठवले होते व त्यांच्या निवासाची गैरसोय होवू ...

बळीराजा : एक काल्पनिक पात्र

बळीराजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळीराजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत पण त्याच्याबाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे शिवाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल बळींबाबत  संदर्भ सापडतात ते फक्त आणि फक्त पुराणकथेत च बाकी कोणतेही पुरावे नाहीत बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो . या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सणाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही को कुणाच्या मुखात नाही  बळीराजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन   हें तर शेतकरी राजा होता  त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात दुसरीकडे बळीराजा हा शेतकरी राजा आहे पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही बुद्ध इतिहासात नाही कि बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळीबाबत पुरावे नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यावा बळी हे पात्र इतिहासाती...