बौद्ध धम्माशी निगडीत असणारी शैलगृह
वास्तविक शैलगृह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करू या
डोंगरामध्ये वा पर्वतामध्ये खोदून वा कातळाला छेदून वास्तू निर्माण केल्या जायच्या त्यांना शैलगृह म्हणतात जसे घरे राजवाडे इमारती अश्या वास्तू तयार केल्या जायच्या त्याच पद्धतीने डोंगरात शैलगृह बांधली जायची आणि अशी शैलगृह बांधण्याची सुरुवात मौर्य सम्राट चक्रवती सम्राट अशोकाने सुरुवात केली आहे अशोकाने प्रथम बिहार राज्यातील बाराबार डोंगरावर अशी शैलगृह बांधलेली आहेत आणि हि शैलगृह केवळ बौद्ध भिक्षूंच्या पावसाळ्यातील राहण्याची वा निवासस्थानाची सोय व्हावी म्हणून कोरलेली आहेत याला वर्षावास हि म्हटले जाते पुढे याच शैलगृह यांना विहार म्हणू लागले डोंगरात कोरलेली शैलगृह प्रामुख्याने केवळ बौद्ध धम्माशीच निगडीत आहेत यामध्ये चैत्य स्तूप विहार स्तंभ आणि शैलगृह यांचा समावेश आहे मुळात शैलगृह हि बौद्ध धम्माशी निगडीत यासाठी कि सर्वात प्रथम धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अशोकाने धम्म दूत गावोगावी पाठवले होते व त्यांच्या निवासाची गैरसोय होवू नये म्हणून त्यांच्यासाठी अशी शैलगृह निर्माण केली गेली
आता यांचा चुकीचा इतिहास काय सांगितला जातो ते पाहू या
बहुतांश अश्या शैलगृह यांना पाच पांडवानी एका रात्रीत खोदली अशी दंतकथा सर्रास सांगितली जाते हे सत्य आहे का हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला महाभारत पाहावे लागणार आहे
चला महाभारताचे काही पुरावे पाहू या
महाभारतात पांडवाचे कौरवांशी झालेले युद्ध याला ऐतिहासिक आधार नाही पण ते ग्रंथरूपी आहे याला खरे तर महाकाव्य म्हणतात मुळात हे काव्य आहे याचा अर्थ समजून घ्या काव्य म्हणजे कवीने रचलेल्या कवितांचा संग्रह असतो त्यात कवीच्या रचना असतात असो कवीच्या कल्पनाशक्ती ला वास्तव इतिहास समजला जात नसतो तरी हि आपण पांडवांचा संदर्भ पाहू या
महाभारत याचे पहिले स्वरूप हे जय संहिता जी व्यासांनी लिहिलेली आहे त्यांनतर या जय संहितांचे प्रत्येक यज्ञाच्या वेळी पठन केले जायचे आणि त्यामध्ये प्रत्येक जन त्यात भर टाकत टाकत एवढे मोठे केले कि त्याचे नाव भारत संहिता ठेवावे लागले पुढे त्याचे स्वरूप एवढे अवाढव्य झाले कि ते महाभारत नावापर्यंत आले
आता एक लक्षात घ्या सत्य कथा असती तर व्यासांनी ती एकट्यानेच लिहिली असती अश्या उचापती इतरांनी केल्या नसत्या
आता यात काय आहे तर पाच पांडव आणि १०० कौरव यांचा सत्तासंघर्ष आहे
यामध्ये कौरव व पांडव हे एकाच घरातील असून सत्तेसाठी कश्याप्रकारे स्त्रियांची इज्जत वेशीवर टांगतात हे सांगायला नको
आता पांडवाचा खरेच डोंगर दऱ्या शी काही सबंध होते असे सापडत नाही दिल्ली मध्ये आणि युपी मध्ये त्यांचा लोक उल्लेख करतात पण कोणते पुरावे सापडत नाहीत
दुसरी गोष्ट पांडवाच्या कथेत कुठे हि त्यांनी लेणी कोरल्याचे पुरावे नाहीत महाभारताच्या कोणत्याच अध्यायात पांडवानी लेणी कोरल्याचे पुरावे नाहीत असे असताना देखील लोक पांडवांची लेणी म्हणून वारंवार केला जाणारा उल्लेख यासाठीच आहे कि बौद्ध लेण्यांचे विकृतीकरण करणे
नाशिक च्या त्रीरश्मी लेण्याला याच लोकांनी पांडव लेणी म्हटले पण यात गडबड एक झाली कि पांडवलेणी आणि बुद्धाचे शिल्प कसे काय यामध्ये एक गोष्ट विशेष लक्ष देण्यासारखी आहे एक म्हणजे पांडवानी लेणी कोरली असतील ते पांडव हे बौद्ध असावेत कारण त्यांनी बुद्धाच्या लेण्या कोरल्या आणि जर ते बौद्ध नसतील तर नक्कीच ह्या लेण्या पांडवानी कोरलेल्या नाहीत
हे महत्वाचे आहे म्हणून मांडले आहे लोकांनी प्रत्येक लेण्याला पांडव लेणी म्हटले आहे
आता कोकणात पांडवाचा प्रश्न च येत नाही पांडव कोकणात आले असते तर त्यांचा उल्लेख महाभारताच्या कोणत्या ना कोणत्या अध्यायात असायला हवा पण तो सापडत नाही कारण पांडवांचे कोकणाशी काही सबंध नाही
शैलगृह हे बौद्ध धम्माशी निगडीत असणरी वास्तू आहे हे जगाच्या कोणत्याही इतिहासकार शिल्पकला तज्ञ व्यक्तींना विचारले तरी ते शैलगृह हे बौद्ध धम्माशी निगडीत आहेत असेच सांगणार
अश्या वेळी भारतात काही लोकांनी पांडवलेणी म्हणत बौद्ध लेण्या हडप करण्याचे षडयंत्र रचलेले आहे
पुरातन बौद्ध इतिहास ला वैदिक हिंदू लोकांनी पांडवलेणी म्हणून बौद्ध धम्माचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे
पांडवाचा आणि कोकणाचा सबंध नाहीच महाराष्ट्राचा हि सबंध नाही तरी देखील बौद्ध लेण्यांना पांडवलेणी म्हणण्याचे काम केले जाते
दुसरी गोष्ट पांडवाच्या लेण्या म्हणून म्हटले गेलेल्या लेण्या ह्या बौद्ध लेण्या म्हणून च पुढे आल्या पुरातत्व विभाग देखील सिद्ध करू शकलेला नाही कि पांडवानी लेण्या बांधल्या आहेत म्हणून त्यामुळे हा खुळचट पणा लोकांनी सोडून द्यावा व बौद्ध लेण्यांचे जतन करावे कारण हि लेणी बांधण्यासाठी तुमच्याच पूर्वजाने जागा दिलेली आहे दान केलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे तुमचे पूर्वज हे बौद्ध आहेत यात शंका नाही
पांडवानी लेणी बांधलेली नाही याचे पुरावे खुद्द महाभारत ग्रंथ देतो कारण पांडवांना राहण्यासाठी लागणारे जे घर होते ते देखील पांडवानी बांधलेले नाही मग पांडवानी लेणी बांधली असे म्हणण्यास काय अर्थ उरतो
आता दुसरी गोष्ट बघा पांडवानी स्वतः कोणती हि वास्तू बांधलेली नाही याचे उदाहरणे खुद्द महाभारतच आपल्याला देतो पांडवांना राहण्यासाठी चे घर स्वतः बांधलेले नाही किंवा त्यांनी इतर कोणते किल्ले वा अजून काही राजवाडे देखील बांधल्याचे महाभारतात पुरावे नाहीत
महाभारतात महाराष्ट्राचा उल्लेख सापडत नाही काही लोक जाणून बुजून म्हणण्याचा प्रयत्न करतील पण ते सापडत नाही त्यामुळे पांडवानी लेणी बांधली हा खोडसाळ प्रचार आहे लेण्यांना पांडव लेणी म्हणणे म्हणजे सर्वात मोठा मूर्खपणा होय
पांडवानी लेणी कोरलेली नाहीत हे सांगण्यास एवढे खूप आहे
जर असे कोण म्हणत असतील कि पांडवानी लेणी कोरली तर त्यांनी पांडव बौद्ध होते हे मान्य करावे आणि विषय संपवावा आम्हाला काहीच अडचण नाही पांडवानी लेणी कोरल्याचे
आता एकूण शैलगृह कशी असतात याचे काही पुरावे आपणास पाहायला हवेत तर त्यासाठी महत्वाच्या गोष्टी वास्तुकेलेत पाहायला मिळतात
लेण्याचे द्वार हे कोरीव काम केलेलं असतात साधारण तीन चिन्ह अथवा पाच अथवा अष्ट अशी चिन्ह असतात याचा सबंध थेट बुद्ध तत्वांशी आहे तीन चिन्ह त्रिशरण पाच चिन्ह हि पंचशील तर आठ चिन्ह हि अष्टांग मार्गाचे प्रतिनिधित्व लेण्यावर करतात यांना विहार म्हणण्याची पुढे पद्धत आली काहीना संघाराम हि हि म्हटले जाते लेण्यामध्ये खास करून हि शैलगृह भिक्षूच्या राहण्यासाठी असतील तर तिथे कोणत्याही प्रकारचे शिल्प नसते
दुसरी गोष्ट काही शैलगृह मध्ये चैत्य असेल तर त्याला चैत्यगृह म्हटले जाते मूर्ती असतात स्तूप असतात अश्यांना विहार म्हटले जाते शिवाय यांच्या स्तंभ तुम्हाला अष्टकोनी वा षटकोनी पाहायला मिळतात बर्याच बौद्ध लेण्यावर तुम्हाला भिक्षु न राहण्यासाठी ची लेणी साम्यता साधणारी सापडतात
त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सापडणारी बहुतांश लेणी साम्यता दर्शवणारी आहेत
विशेष हि लेणी तुम्हाला प्रवासी रस्त्यावर पाहायला मिळतात यामध्ये दोन महत्वाचे फायदे असतात एक भिक्षु ना प्रचार प्रसार करण्यासाठी व दुसरी व्यापारी लोकांना व्यापार करण्यासाठी लेण्यांचा वापर केला जातो
त्यामुळे आजपर्यंत ची असणरी सर्वच शैलगृह हि बौद्ध धम्माशी निगडीत आहेत ह्यासाठी वेगेळे पुरावे देण्याची गरज नाही
आणि बहुतांश लेणी हि इसवी सन पाचव्या शतकाच्या आधी ची आहेत मुळात लेण्यांची डेटिंग करणे आवश्यक आहे
आजकाल लेण्यांचा कालावधी हा चुकीचा सांगितला जातो एखाद्या शिलालेख नसेल तर त्या लेण्यांना थेट लोक शैवलेणी करून टाकतात एखाद्या शैलगृह असेच पडलेले असेल तर त्यात पिंडी ठेवून त्याचे शैवलेणी त रुपांतर केले जाते
कोणी जैन लेण्यात रुपांतर करते अश्या प्रकारे बौद्ध इतिहास पुसण्याची काम केली असली तरी बौद्ध कालीन शैली चा अभ्यास केल्यास ती लेणी बौध्द धम्माशी निगडीत आहेत हे स्पष्ट सांगता येते
तूर्तास हा लेखप्रपंच यासाठी च कि लोकांनी बौद्ध लेण्यांचे केलेलं विकृतीकरण केवळ धर्माचे स्तोम माजवण्यासाठी काल्पनिक दगडांना बौद्ध लेण्यात बसून त्या लेण्यांचे महत्व कमी करण्याचे काम केले जात आहे तुम्ही आम्ही पाहू शकता कश्या पद्धतीने बौद्ध धम्माशी निगडीत असणारी गोष्ट इतर धर्माशी वळवली जाते
सर्वसामान्य लोकांना याबाबत जागृती व्हावी यासाठी एक प्रयत्न
जयभीम नमो बुद्धाय
रविंद्र मिनाक्षी मनोहर
गडकोट लेणी संशोधक
इतिहास अभ्यासक

टिप्पण्या