निळ्या तालिबान्यांनी चूक .........
सध्या काही लोकांनी बाबासाहेब याना बौद्धांनी बंदिस्त केलय असे म्हणून त्यांच्यावर निळे तालिबानी नावाचा ठपका मारला जातोय अश्या लोकांसाठी सांगणे हे कि हि आमची चूक आहे का जे आमच्या बापाने आम्हाला सांगितले तेच तुम्हाला सांगितले जातंय तर आमच्यावर तालिबानी असल्याचा ठपका ठेवणाऱ्या लोकांनी पूर्ण वाचा .....
बाबासाहेब सांगून गेले अस्पृशांनो तुम्हाला समतेसाठी बौद्ध धम्मच स्वीकारावा लागेल .आता हे बाबासाहेबांचे म्हणने मांडावे तर लोकांना आम्ही कट्टर का वाटतो जर आमचा बाप म्हणून आम्ही बाबासाहेब स्वीकारले तर त्यांच्यावर आमचा हक्कच नाही का त्यांचे संदेश सांगणे गुन्हा आहे का ?
आता समोरून प्रश्न असतात तू आजपर्यंत काय केलेस ?असा प्रश्न जेव्हा एखाद्या चळवळीत उतरणाऱ्या नवतरुणांना तुम्ही चळवळीपासून दूर करताय त्याने बाबासाहेब वाचलेत त्याला वाटतंय कि बाबासाहेबांच्या विचारांवर या समाजाचा समता रथ पुढे घेऊन जावा पण त्याला जेव्हा असे प्रश्न विचारले गेले तर नक्कीच तो माघार घेईल तेव्हा जे कोणी काम करत आहेत अश्यानी कोणता हि अहम पणा न ठेवता त्या तरुणाच्या मनातील भावना समजून घ्या त्याच्याकडे जर का कोणते ऍक्शन प्लॅन असतील तर ते समजूनसमजून घ्या तुला समजते असे म्हणून त्याला नाराज करू नका
आणि चळवळीत प्रत्येकाचे काम हे आपल्या कुवतीप्रमाणे असेल कोणी अपेक्षा करत नाही लगेच डोंगर उभा करा म्हणून छोट्या छोट्या गोष्टी समाजाला जागृत करण्यासाठी फायदेशीर असतात
आता आपण प्रथम बौद्ध लोकांचीच तपासणी करू ना बौद्ध लोकात तीन गट आहेत एक विपश्यना वाले जे बुद्धालाच बुद्ध मानायला तयार नाहीत त्यांनी अनेक बुद्धांची संकल्पना आणून विपश्यना हि अतिप्राचीन विद्या असून बुद्धाने तिचा पुन्हा शोध लावला असे म्हणून बुद्धाच्या अस्तित्वावर बोट ठेवले तर दुसरे पुरोगामी जे बाबासाहेबानाच मानायला तयार नाही डाव्या चळवळीमध्ये कम्युनिष्ट विचारधारा पकडून नव्या बहुजनवादी विचारांची चळवळ घेऊन खुद्द बाबासाहेब यांनाचसोडायला तयार होतात आणि तिसरा गट हा राजकीय ज्याला कशाचाच थांगपत्ता नाही स्वतःचे अस्तित्व म्हणजे कवडीमोल असे करून ठेवले ज्या बाबांचा विचारधारेवर उभा असणारा पक्ष देशात दुसऱ्या क्रमांकाचा होता त्यात पार चिंध्या चिंध्या करून टाकल्या
आणि बाकी बौद्ध समाज यांचे विचारूच नका बाबासाहेब यांच्या नंतर त्यांना बुद्धबुद्ध सांगणारासांगणारा कोणी भेटलंच नाही त्यामुळे आज घराघरात हिंदू देवतांचे काल्पनिक फोटोची आरास सापडते आणि याला दोषी कोण कारण याना सांगायला कोणी आलेच नाही जे शिकले त्या शहाण्यांनी हिंदू धर्मावर टीका करण्यात आयुष्य घालवले आणि स्वतःच्या सहित स्वतःच्या समाजाचे हे वाटोळे केले
आज जे वास्तव आहे ते पाहता बाबासाहेबांचे विचार कुणी सांगितले आहेत केवळ बाबासाहेबांच्या साहित्याचा वापर करून हिंदू धर्माचा तिरस्कार करून केवळ त्यांच्यावर टीका करण्यात आम्ही आमचा वेळ फुकट घालवला राजकीय सत्ता याशिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही धम्म चळवळ अडगळीत फेकून देऊन समाजाला आज चुकीच्या पथावर नेणाऱ्या त्या सर्वचसर्वच सुशिक्षितसुशिक्षित लोकांचा निषेध यामध्ये अनेक पिढ्या गमावल्या माणसे मारली गेली पण ज्यांच्यासाठी द्वेषाची बीजे रोवली त्या लोक मात्र हिंदू धर्मात च मारण्याची शपथ घेऊनघेऊन बसलेत अश्यावेळी तुम्ही बाबासाहेबांचे ते वाक्य सांगण्यास मात्र तुम्हाला कोणी तालिबानी म्हणत असेल तर मी म्हणेन मी आहे तालिबानी मी बाबासाहेबानी जे सांगितले ते आयुष्यभर सांगेन कि अस्पृश्यानो समतेसाठी बुद्धशिवाय पर्याय नाही
बाबासाहेब यांच्या मातृसंस्थांकडे दुर्लक्ष केलेत ते जरा लक्ष द्यावे बौद्धांनी बाबांच्या संघटना उभारी देऊन एकजुटीचे नवे पर्व उभे करता येईल
आता
हिंदू धर्मात राहून बुद्ध स्वीकारता येत नाही किंवा बाबासाहेब यांचे विचार आचरणात आणता हि येत नाही कोणी असे म्हणत असेल तो बाबासाहेबांच्या पेक्षा जास्त विद्वानविद्वान असेलअसेल असेच म्हणता येईल कारण बाबासाहेब आम्हाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही असे सांगून कृती करून दाखवली त्यामुळे जो कोणी म्हणत असेल कि बौद्ध धम्म न घेता बुद्ध आणि बाबासाहेब यांचे विचार तत्वे आचरणात आणली जाऊ शकतात तर ते महाशय नक्कीच बाबासाहेब यांच्यापेक्षा विद्वान असावेत
आता थोडे इतर जातीच्या महापुरुषांकडे येऊ या किती जणांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रयत्न केले ते हि महत्वाचे आहे असे म्हणून मी त्यांचा द्वेषद्वेष करतो असे नाही ते आम्हाला तितकेच प्रिय आहेत पण ते केवळ आदरणीय म्हणून आदर्श म्हणून नाही
आता बाबासाहेब यांच्यावर बौद्धांनी हक्क दाखवल्यास इतर जातीच्या लोकांना त्रास होतो कि बाबासाहेब याना तुम्ही तुमच्या जातीत बंदिस्त करून ठेवलाय हा आरोप करणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांनी स्वतःच्या डोळ्यावरील जातीचे झापड बाजूला काढून सम्यक दृष्टीने आमच्याकडे पहावे या बुद्धरूपी विशाल महासागरात आमच्या जातीचे अस्तित्व दिसणार नाही तुम्हाला बुद्धाचा महासागर च दिसेल तेव्हा तुमची जातीवादी दृष्टी बाजूला सारून आमच्या कडे पाहावे आता बाबासाहेब जे म्हणाले ते सांगणे गुन्हा असेल तर आम्ही तो गुन्हा पुन्हा पुन्हा करू आणि हो बाबासाहेब याना आम्ही मानने सोडून देऊ असल्या फाजील धमक्या देऊ नका बाबासाहेब काय तुम्ही मानले नाही तर त्यांना कोण विचारणार नाही असे वाटते का तुम्हाला ज्याला जगाने स्वीकारले त्याच्यासाठी नगण्य अश्या लोकसंख्या असणाऱ्या देशातील एका कोपऱ्यातील एका गावातील एका जातीच्या लोकांनी स्वीकारले नाही म्हणून फरक पडणार आहे का सूर्याचे तेजतेज कमी होत नसते ते तितक्याच प्रमाणात असते फक्त त्याची ऊर्जा कशी घ्यायची हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत प्रश्नआहे मध्यम मार्गाने घ्याल तरच जीवनसत्वे मिळतील नाही तर काहीच मिळणार नाही
तेव्हा बुद्ध शिवाय बाबासाहेब आणि बाबासाहेब यांच्याशिवाय बुद्ध सांगणे हे विसंगत आहे
आणि समतेसाठी बुद्ध स्वीकार करा हे सांगणे म्हणजे निळे तालिबानी होणे असे समजू नये आणि बाबासाहेब यांच्यावर हक्क सांगतोय असे समजू नये हे बाबासाहेब यांनीच साऱ्या जनतेला सांगितलेला संदेश आहे तो तुम्ही कसा घ्यावा हा तुमचा प्रश्न आहे
जयभीम
रविंद्र मिनाक्षी मनोहर
टिप्पण्या