विद्यार्थ्यानो , तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात .

बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते, याचा थोडा भाग पाहू या हे संमेलन १०, ११, व १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यांचे भाषण पहा . 
 बाबासाहेब यांचे भाषण सुरु होते
'' आज मुंबई मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते सर्व परीने यशस्वी झाले आहे. या कार्यक्रमाबद्दल तुमचे व ज्या विद्यार्थ्यांनी हे संमेलन पार पाडण्यात भाग घेतला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. मी शनिवारी व रविवारी नाशिकला होतो . प्रवासातील दगदगीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे . माझ्यात काही त्राण नाही व भाषण करण्याची ताकद नाही मी इतके सांगू इच्छितो कि आजच्या प्रसंगी हजर राहता आले याबद्दल मला आनंद व धन्यता  वाटते.
अशाप्रकारची संमेलने फार होतात . त्याप्रसंगी कोणी अध्यक्ष आल - मी नेहमी पाहतो त्याने भाषण केले कि त्यात बिद्यार्थ्याना एक टोमणा मारलेला असतो . तुम्ही शिकून काय करणार ? सरकारी नोकरी ? त्यांना देश सेवा करण्याचा उपदेश करण्यात येतो . पण यात काही हशील नाही . विद्यार्थ्यासंबंधी मो जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे सांगू इच्छितो कि हा उपदेश खोटा  आहे आणि मी तसाच उपदेश करणार नाही. विद्यार्थ्याने शिकून नोकरी केली तर त्यात काय पाप आहे ? त्याला आयुष्य आहे, भावना आहेत. प्रत्येक मनुष्याचे अनित्म ध्येय काय आहे ? आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांचा परिपोष होवून त्यास गोड फळे यावीत . हेच ध्येय आहे . म्हणून मी तुम्हाला तो उपदेश करीत नाही . म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा . मला असा अनुभव आला आहे कि , सरकारी नोकरी हल्ली एकाच जातीचा मक्तेदारी होवून बसली आहे . कलेक्टर ओफिदात किंवा इतर प्रत्येक ऑफिस मध्ये एकाच  जातीची माणसे आहेत . पुष्कळ माणसे सांगतात : ' तुम्ही नोकरीसाठी का भांडता ? लायकी असली कि नोकरी मिळते, त्यात जातीचा कशाला प्रश्न ? परंतु सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास नोकरी केल्यावर काय फायदा आहे , असे विचारणारे मूर्खपणाचे आहे . या देशात जातीभेदाचे प्रस्थ  फार आहे . आज ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्या हाती खरी सत्ता  आहे . तो तिचा सदभावनेने उपयोग न करता आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतो . नोकरीमुळे पगार  हाती येतो . ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाहीत , जो समाज अधिकाराच्या जागेवर नाही त्याची उर्जितावस्था होणार नाही . ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत  गुंतलेला आहे . त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो . तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा पिच्छा पुरवल्यामुळे समाजाची उन्नती होईल . याचा तुम्ही काशोसीने प्रयत्न करा .
शिकलेल्या माणसात काही दोष असतात -  शिकल्यावर नोकरीच्या मागे लागणे हा धोश नव्हे . ते दोष व अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाही याची खबरदारी घ्या पहिली गोष्ट : शिक्षण पूर्ण झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो . मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे परंतु शिकलेला मनुष्य स्वतःच्या हिताची  काळजी ह्जेतो . मझिनि म्हणतो कि , ' लोकात पारतंत्र्य पसरले , माणसे शिकली तरी   त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्काची जाणीव जास्त उत्पन्न होते '' आपले कर्तव्य कोणते , याची भावना जागृत होत  नाही हा एक शिकलेल्या माणसाचा दोष आहे .
मला खेद वाटतो कि शिकलेला मनुष्यास पदवी मिळाली आणी त्याला निकारी  लागली कि त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ सुटतो . विद्येचे महत्व खुंटले जाते . मी प्रवास करीत असताना मजजवळ नेहमी चार  पुस्तके व वर्तमान पत्रे असतात . परंतु प्रवासात जी शिकलेली  माणसे दिसतात.  त्यांच्या हातात पुस्तके, वर्तमान पत्रे यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात . मनुष्य बी. ए झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय ? बि.ए. किंवा एम. ए. झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले . हि भावना चुकीची आहे . अगस्ती   मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटते ! बडोदे संस्थानात एक ग्रहस्थ होता तो बि. ए झाला होता महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावात केली होती त्यावेळी बडोदे संस्थानचे दफ्तर गुजराथीतून चालत असे इंग्रजीतून चालत नसे .  मनुष्यफार आळशी ! कधी चुकून टाईम्स देखील वाचीत नसे . याचा परिणाम असा झाला कि काही वर्षांनी त्यास ए . बि. सि.ची देखील ओळख राहिली नाही हे अगदी सत्य आहे ; माझासुद्धा असाच अनुभव आहे पि.एच. डी . हि पदवी  मिळवण्यासाठी फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे त्यावेळी त्या भाषा मला अवगत होत्या . परंतु आत त्या भाषांचा व्यासंग नसल्याने त्या भाषातून बोलने मला कठीण जाते अलीकडे मी फ्रांस व जर्मनीत जेव्हा गेलो तेव्हा त्या भ्शेतून बोलण्याचा मला त्रास पडू लागला म्हणून विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे . ज्याप्रमाणे एखादा माणूस दारू प्यावयास लागला तो ती जन्मभर पीत राहतो त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे . झाले पाहिजे . विद्येची खरी गोडी कोणाला लागली ? परीक्षेनंतर जो आपली पुस्तके नळ  बाजारात विकतो त्याला ? बायकोपेक्षा , पोरापेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम असते त्याला विद्येची गोडली लागली , असे मि म्हणेन . माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जब्ती आली व बेलीगाने जर माझ्या  पुस्तकाला हात लावला तर मी त्याला गोळी घालून जगाच्या जागी ठार करीन .
मी तरी पाहतो तुम्हा शिकलेल्या मुलात सौंदर्याची गोडी दिसते लग्नात मुलगी सुंदर आहे काय ? ती आपणास पसंद आहे काय ? वैगरे गोष्टी तुम्ही पाहता . पण त्रोच हक्क मुलीना द्या . बऱ्याच सुंदर स्त्रिया कुरूप माणसाच्या स्वाधीन झालेल्या मी पहिल्या आहेत . या देशात  मला कंटाळा आलेला आहे . परन्तु मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे . म्हणून मला इथे राहणे भाग पडले यातील धर्म, सामाजिक रचना सुधारणा व संस्कृती यांचा मला फारच कंटाळा आला आहे . i am  at war with  civilization .
येथील कोट्याधीश मारवाड्यांच्या घरात काय दिसेल ? त्यांच्या घरात स्टच्यु , फर्निचर पेंटिंग व पुस्तके यापैकि एक हि वस्तू दिसणार नाही , हीच गोष्ट ब्राह्मणांची  . एखादा ब्राह्मण कारकुनास पगार झाल्यास तो आपल्या बायकोला एखादी सोन्याची पुतली करण्याच्या गडबडीत असतो . कारण सोने संकट समयी उपयोगी पडते न ! जगात फक्त जगणे हेच ध्येय असेल तर पशु आणि मनुष्य यात फरक काय ? मनुष्य सौदर्याची साठवण करू शकतो ; पशुला ते करता येत नाही . नुसती कॉलर ताठ करून आणि नेकटाय बांधून सौदर्य वाढत नाही मी आतापर्यंत दहा ते अठरावेला विलायतेला गेलो . माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेला आले होते . त्यांना आता मी पाहतो तो काय त्यांना वर्णाश्रम धर्म मान्य ! त्यांच्यावर काही एक परिणाम झालेला आढळत नाही . काय  त्यांचा जन्म !  हिंदू धर्मातील सर्व  घाण त्यांना मान्य आहे . तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात . अतंत्य घाणेरड्या पाण्यात अत्तराचा थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे . तुमच्या आईबापाना शिक्षण नाही . अठराविश्वे दारिद्र्य  तेव्हा हा मैल साफ करणे हे तुअम्चे कर्तव्य आहे . बायबलात मी वाचले आहे कि  मिठाच जर आळणी झाले तर बाकी पदार्थाला चव कशी येणार ! कोणतेही कार्य करण्याकरिता आपल्या अंगचे गुण स्थिरावले पाहिजे . स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकवणार ? सुधारणेचे मुल वंश परंपरा रुजले गेले पाहिजे . तुमच्यात या गुणांचा जर अभाव असेल तर आटोकाट प्रयत्नाने ते मिळवा.
तुमच्या पैकी बहुतेक अविवाहित असतिल. क्रीत्येकांची लग्ने झाली असतील . पण लग्नानंतर तुम्ही काय करणार आहात ? या बाबतीत तुम्हावर फार मोठी जबाबदारी आहे. मी तुमच्या वडिलांच्या उदाहरन घेता माझ्याच वडिलांचे उदाहरण घेतो . त्यांना एकंदर चौदा मुले झाली आणि त्यातले मी चौदावे रत्न परंतु मी एलिफ़िस्टन कॉलेज मध्ये असताना माझी काय दशा होती ? माझ्या पायात वाहणा नव्हत्या !अंगात माजरपाठाचे शर्ट आणि वडिलांचा फाटका कोट ! तुम्ही एलिफ़िस्टन कॉलेजात गेलात म्हणजे तुम्हाला तेथे मुल्लर सहिएबनचे तसबीर दिसेल . त्यांनी मला शेवटच्या वर्षात दोन शर्ट  पुरवली . मी विचार करीत असे , माझ्या वडिलांना चौदा ऐवजी चार मुले असती तर माझी किती चंगळ झाली असती . माझ्या या दुःखाला माझे वडिलच कारणीभूत होते . एकदा मी कॉलेजात जात असताना रेल्वेचा पास घरी विसरलो आणि त्याच दिवशी पासाची तपासणी होती . तिकीट घेणाऱ्या मास्तराने मला अडविले ज़वल तर दिडकी नव्हती चार वाजेपर्यंत चर्चगेट च्या स्टेशनवर बसून राहिलो होतो नंतर कैकिण नावाचा माझ्या वर्गातील विद्यार्थी तेथे आला . त्याने विचार ; '' काय रे येथे का बसलात ? मी त्याला सर्व हकीगत सांगितली त्याने चार आणे भरून माझी सुटका केली व त्याच्याच पैशाने तिकीट काढून त्याने मला घरी पाठवून दिले . तेव्हा या  बाबतीत मी वडिलांना दोष देतो. कारण त्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही . वडिलांचे चुकत असताना त्यांना सांगणे गैर  आहे , असे मला वाटत नाही .  तुमच्यावर आता जबाबदारी आहे त्याचप्रमाणे स्त्रियांवर पण आहे मी बोलतो ते केवळ पुरुषांकरिता नव्हे स्त्रियांनी सुद्धा याची जबाबदारी ओळखली पाहिजे याचा तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही नोकरीवर जाल मला   वाटते तुम्हापैकी बहुतेक कारकून हितील तर काही ५०-६० रुपये तुम्हास पगार मिळेल आणि त्यात तुम्हाला चौदा पोरे झाली तर त्या पोरांचे काय होणार ? याची जबाबदारी समाजावर टाकणार ? याचा तुम्ही चांगला विचार करा तुम्ही सन्यास घ्यावयास तयार नसाल पण त्यातूनही कोणी घेतला तर फारच चांगले { हशा } हसू नका हि फार महत्वाची गोष्ट आहे . मला पाच मुले झाली त्यापैकी चार मेली याबद्दल आता वाईट वाटत नाही  तर उलट आनंदच वाटतो हि मुले जर जगली असती तर त्याचे शिक्षण खाणे राहणे यांचा बोजा माझ्यावर पडला असता व ते मला त्रासाचे झाले असते मला एकच  मुलगा आहे  माझ्यावर त्याची फार जबाबदारी आहे . त्याच्या एकशतांश जरी जबाबदारी तुम्ही आपल्या मुलाबद्दल दाखवली तरी फार उत्तम हि समजाच्या  कल्याणाची गोष्ट आहे तुम्हाला  पाच सहा मुले झाली तर त्यांना शिक्षण कसे देणार . त्यांची काळजी कशी घेणार ? मला वाटते हि चढती भाजणीच्या ऐवजी उतरती भाजणी आहे तेव्हा स्त्री पुरुषांचे पशुप्रमाणे जीवन घालवणे माणुसकीला सोडून आहे या गोष्टींचे तुम्ही अवश्य विचार करा .

बाबासाहेबांचे मुंबई येथील भाषण

 सादरीकरण   :  भिमरत्न  धम्मप्रिय  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र