थकलाय हा समाज

थकलाय हा समाज
अन्याय अत्याचारच समर्थन तर नक्कीच करणार नाही आणि कोणी करत असेल त्याला कधी पाठींबा हि देणार नाही अन्याय करणे चुकीचे आहे घटनेन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा धिकार बहाल केला आहे घटनेन माणसाला त्याच्या मुलभूत अधिकाराने जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे त्यामुळे एखाद्या समाजातील व्यक्तीवर त्याच्या अधिकारावर गदा आणून त्याच्यावर अत्याचार करणे खूप चुकीच आहे मुळात आम्ही एक  ध्यानात घेतलं पाहिजे कि अत्याचार अन्याय कसे केले जातात आणि का  केले जातात मुळात लोकांच्या भावना अश्या काही भडकावण्याची कामे केली हातात त्यामुळे  माणसात असणाती माणुसकी  कुठे तरी वजा होता दिसत आहे का असे घडते याच जर जास्त प्रमाणात शोध घेवू या 
इतिहासात जावून पाहिलं तर आज दोन समाजात जास्त संघर्ष पाहायला भेटेल मग कथाकल्पित असणाऱ्या गोष्टी आणि मग त्यात हिंदू धर्माचे  धर्मग्रंथ प्रथम पाहूया  त्यात दोन विशेष समाज दोन घटक यात लढाई आहे संघर्ष आहे एक देव आणि दुसरे दानव पण यात एक विचार करण्याची गोष्ट आहे दानव जे आहेत त्यांचे वर्तन हे सदाचारी दाखवले जाते व देवांचे वर्तन व्यभिचारी दुराचारी दाखवण्यात आले आहे यात त्यांनी स्वताच्या बुद्धीच्या जोरावर ज्या कथा रचल्या त्यावेळी त्यांना देवांचे कर्तुत्व जसे आहे ते योग्य वाटले पण त्यांचा भविष्यकाली विचार करण्याची  ताकद नसल्याने पुढे या देवांचे वर्तन  हे व्यभिचारी व दुराचारी असेल याची किंचित देखील  त्यांना समजले नाही यात दोन मतामध्ये संघर्ष होता एक चांगला एक वाईट पण यात वाईट असणारा चांगला दाखवण्यात आल आणि चांगला असणारा वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला पुढे बाकीचा इतिहास पाहत असताना भारताच्या इतिहासात मध्ये दोन समाजात संघर्ष एक   मुलनिवाशी  लोक आणि एक आर्य लोक यात बाहेरून येवून अत्याचार करण्यात येत होते त्यामुळे इथल्या भूमिपुत्र यांच्यात आणि आर्य यांच्यात लढाई होत हे देखील संघर्ष दोन संस्कृती मध्ये आहेत एक   निसर्गवादी आणि दुसरे  धार्मिकवादी असे दोन संघर्ष पुढे पुढे  असेच संघर्ष होत गेले दोन संस्कृती मध्ये एक मानवतावादी दुसरी दैववादी असाच संघर्ष होत गेला यां मानवतावादी लोकांना सहज जिंकणे दैववादी लोकांना कधी  जमले नाही म्हणून काही तरी कपटी कारस्थाने करून त्यांची हत्या करण्याची कामे करण्यात आली आज एक मुद्दा असा हि  येतो अत्याचार केला जाणारा समाज शोषित आहे पण हिंदू आहे त्यांच्याच अविभाज्य असणारा भाग त्यांच्याच धर्माची पूजा करणारा समाज त्यांच्याच धर्मग्रंथांची आज्ञा पाळणारा समाज अत्याचार सहन करतोय .
 अत्याचार मातंग समाजावर झाला कि पहा निदर्शन करण्यासाठी मातंग कधीच रस्त्यावर येणार नाही ज्या घरावर अत्याचार झालाय त्यांना कधी पाहणार नाही नुसता हिंदू म्हणून आहोत उद्या आपण यावर आवाज  उठवला तर दुसऱ्या दिवशी आपली घरे जळतील हि भीती मग त्यांच्या आण्यावर न्याय मागण्यासाठी आज वर्षानुवर्षे एक समाज एक मानवाचा समूह पुढे आवर्जून येतो बौद्ध समाज जिथे जात पहिलीच जात नाही पहा का येत असेल हो हा बौद्ध समाज रस्त्यावर   आज मातंग समाजावर अन्याय  बौद्ध रस्त्यावर चर्मकार समाजावर अन्याय बौद्ध रस्त्यावर कुणबी समाजावर अत्याचार बौद्ध रस्त्यावर हिंदुच्या अठरापगड जाती जमातीवर होणारा अत्याचार आणि त्याच्या निषेधार्थ बाहेर रस्त्यावर येवून  निषेध व्यक्त करणारा समाज एकाच इतक्या जाती आणि त्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर येणारा तरुण हा बौद्ध का पण असे कधी झाली का बौद्ध समाजावर अत्याचार झाला आणि इतर लोकांनी निषेधासाठी रस्त्यवर आले आहेत असे कधीच झाले नाही मग बौद्ध लोकच का येतात यावर  आपण प्रकाश टाकू या
बघा बौद्ध समाजातील बहुतांश लोक हे  हिंदू धर्मात जे पूर्वाश्रमी महार म्हणून जीवन जात होते ते लोक आहेत मुळात त्यांचा पिंड लढवय्यांचा आहे पण मध्यंतरी त्यांच्यावर   बंधने टाकून त्यांना क्रियाहीन करून टाकले त्यांना गुलाम केले मग त्यांच्यात उर्जा भरण्याचे काम बाबासाहेब यांनी केले बघा आज हि बाबासाहेबांचे ते  धगधगते शब्द आज हि बौद्ध समाजाच्या तरुणांच्या  डोक्यात आहेत ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब समजले त्यांच्यात क्रांती करण्याची प्रेरणा जागी होते हे नक्की म्हणून आज तळागाळात असणारा बौद्ध समाज यांच्या निषेधार्थ रस्त्यावर येते न्यायासाठी लढतो पण आज असे वास्तव झालाय कि  बौद्ध समाजाकडे राजकीय  बाजू कमकुवत आहे त्यांची  बाजू संसदेत खंबीर आणि कणखर भाषेत मांडायला त्यांच्याकडे नेतृत्व नाही मग न्याय कसा भेटणार
बौद्ध समाज जागा आहे पण झोपेच कधी कधी सोंग घेतो जनता एक नाही अनेक भागात विभागली आहे त्यामुळे मोर्चे निदर्शने निषेध असे अनेक गटात होतात मग त्यांच्याकडे लक्ष देणार कोण असा प्रश्न आहे म्हणून जागतिक दर्जाचा धर्म असणारा बौद्ध समाज आज दलित गणला जातो कारण कोणावर हि अन्याय होवू द्या त्यांच्या मदतीला बौद्ध जातो हि त्याची कमजोरी समजायची का तर नाही हि त्याच्यातील असणारी बाबासाहेब यांची प्रेरणा आहे म्हणून आज जे असंख्य संघटना रस्त्यावर येतात त्याच मुलभूत कारण ते आहे
आत मुल मुद्दा पहा जातीवादी अन्याय अत्याचार करताना नेमका शोषित समाजावर का करतात कारण त्यांना माहित आहे जरी अन्याय आम्ही हिंदू धर्मातील शोषित समाजावर केला तरी त्यांच्यासाठी न्याय मागायला रस्त्यावर उतरणारा समाज हा बौद्ध असणार आणि त्यावेली आपल्याला आपले ध्येय साध्य करता येईल बाबासाहेब यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्यानंतर हा समाज प्रगती करू लागला आज एक भीषण वास्तव डोळ्यासमोर यायला लागले कि  बाबासाहेबांचा हा समाज आज हि काही ठिकाणी प्रगती पथावर नाही आज हि काही भागात बौद्ध म्हणून जगात असलेलेल लोक हिंदू म्हणून जीवनात जगत आहेत का  असे होत असेल याला कारणीभूत एक सांस्कृतिक दहशत आहे देवाची भीती दिल्याने आज हा समाज त्या  नाहक रूढी परंपरा यांच्यात जीवन जगात आहे आणि त्यामुळे विकास भकास झाला आहे
आज या जातीवादी लोकांचे एक मेव उद्दिष्ट आहे बौद्ध समाजातील  लोकांची प्रगती  होता कामा नये तर याची प्रगती कशी रोकता येईल तर अशी बुद्धी लढवली या महाभाग  लोकांनी  बघा अन्याय अत्याचार झाला कि न्यायासाठी बौद्ध तरुण रस्त्यावर येणार यांच्यावर पोलिस कारवाई करणार म्हणजे त्या तरुण मुलांवर केस झाली कि त्याचे करिअर संपले  त्याची प्रगती करण्याची क्षमता असणार पण त्याला एक क्रिमिनल प्रोफाईल तयार केली जाणार मग इतर नामांकित कंपनी मध्ये त्याच्यासाठी कोणतीच जागा नसणार  म्हणजे एकमेव काम शेती जी आज करण्यासाठी खूप पैसा लागतोच त्याबरोबर  निसर्गाची साथ हवी आजच्या स्थितीला ते शक्य नाही मग त्या लोकांचा प्रगती ची आशा असू शकेल का नाही मग प्रगती संपली  मनात नैराश्य असणार त्यातून आत्महत्या केली जाणार नाही तर त्याला मारून टाकले जाते असे यांचे ध्येय आहे मग हे अत्याचार करताना सुद्धा कदाचित बौद्ध व्यक्तीवर हल्ला करतील कारण त्यांना सुद्धा माहित आहे बौद्ध समाजाबर हल्ला करताना चुकून त्याने हातात शस्त्र घेतले तर आपला जीव वचने शक्य नाही म्हणून हे त्यांच्याच धर्मातील शोषित  समाजावर अन्याय करणार आणि त्यासामाजासाठी हा बौद्ध रस्त्यावर येणार मग  व्यवस्थेचा बळी पडणारा समाज असाच  पडला आहे त्याला वाली कोणी असा त्याची अवस्था  आहे  म्हणून जागरूक असा नाही तर विनाश आहे एवढे नक्की जातीव्यवस्था आज प्रबळ आहे त्यामुळे जाती नष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे
आज नुसती निदर्शने करून थकलाय हा समाज त्याला आता नवक्रांतीची  आवश्यकता आहे  तो चला नारा देवू नवक्रांतीचा  शिवरायांच्या शिवशाहीचा भीमरायाच्या भीमशाहीचा
जय शिवराय जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र