सत्ताभोग

जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असणारा दश म्हणून भारतर देशाकडे पाहिले जाते भारत. भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला त्यानंतर या देशाची एक स्वातंत्र्य राज्य प्रणाली पाहिजे होती या देशातील तमाम विद्वान तयारीला लागले पण इतका महाज्ञानी असा विद्वान त्या विद्वानात नव्हता शेवटी गांधीनी जवाहर लाल नेहरू यांना सल्ला दिला कि तुम्हाला या देशाची घटना तयार करायची असेल तर एका विद्वानाशिवाय पर्याय नाही आणि ते तुम्हाला शक्य हि होणार नाही नेहरूंनी त्या समयाला विचारले होते कि आपल्या मंत्रिमंडळात असा कोणता विद्वान आहे जो या देशाची घटना लिहिण्यास मदत करेल त्यावर गांधी म्हणाले कि बंगाल प्रांतातून निवडून आलेले आंबडेकर  ह्यांना सोबत घ्याआणि त्या वेळेस बंगाल प्रांत भारताच्या बाहेर होता मग बाबासाहेबांना मुंबईच्या प्रांतातून संसदेत घेण्याचा सल्ला गांधीनी नेहरू यांना दिला आणि नेहरू नि बाबासाहेब यांना निमंत्रण दिले त्यानंतर बाबासाहेब मुंबई प्रांतातून परत संसदेत आले आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून या देशाची राज्य घटना बनवण्यात आली आणि ती या जगातील सर्वोत्तम घटना  ठरली
भारताच्या या नव्या घटनेत लोकशाही आणली गेली या नव्या लोकशाही युगात सामान्य जनतेला लोकमताचा अधिकार मिळाला लोकांच्या निवडीचा सरकार तयार झाल पण वातावरण पूर्णपणे बदलले आज जी परिस्थिती आपण पाहत आहोत ती खूप भयानक आहे बाबासाहेबांनी या देशाला लोकशाही दिली हुकुमशाही राजेशाही या देशातून घालवून दिली आणि जनतेच राज्य जनतेला अधिकार दिले पण राज्यघटना चालवणारे नालायक निघालेआज या देशाचे वास्तव खूप बदलले आहे आज इथे सामान्य जनतेला अंधारात ठेवून इथे लोकशाही राजकारण होण्याऐवजी फक्त सत्ताकारण होवू  लागले प्रत्येक माणसात स्वार्थ वाढला पैसा हे सर्वस्वी साधन झाले जनसामान्यात आपली सत्ता हि पैस्यावरयेवू शकते हीच भावना राजकीय नेत्यांची झाली आज भारत देशात श्रीमंत गरीब या दोन जीवनरेषा उदयाला आल्या गरीब गरीब होत गेला आणि श्रीमंत श्रीमंत होत गेला
आज देशात हि परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीला आजची राजकीय नेत्यांची मानसिकता कारणीभूत आहे आज राजकारण हे जनतेच्या हिताचे राहिले नसून स्वार्थी झाले आहे आज फक्त खुर्ची साठी राजकारण केल जाते आज आपल्या देशातील राजकारण्यांची मानसिकता हि आपस्वार्थी आणि घातक आहे आणि हि जनतेला खूप हानिकारक ठरते या देशात समाजाच्या हिताचे कार्य आज होत नाही आज चालतो तो सत्तेचा माज आज सत्तेत असणारे बिगरसत्तेत असणारे लोक मंत्री पदाचा उपयोग सामान्य जनतेच्या शोषण करण्यासाठी करत आहेत आणि या साऱ्या विघातक वृत्तीला आजची जनता जबाबदार ठरते
आज आपल्या देशाला परकीय आक्रमणापासून कमी धोका असून अंतर्गत राजकीय नेत्यांचा धोका जास्त आहे या देशातील बरीच जनता गरीब सांगितली जाते पण राजकीय नेत्यांची संपत्ती पाहता या देशाला गरीब कसा म्हणायचं या जगात सरावत श्रीमंत यादीत भारतीय नेत्यांची नावे आहेत आणि राजकीय नेत्यांनी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी राजकीय गुंड जोपासले आहेत आणि त्याचे परिणाम या देशात गुन्हेगारी वाढली आणि सत्ताकारणात या गुंड प्रवृत्तीला दुजोरा देण्यात आला आणि आजकाल जो उठतो तो नवनवीन राजकीय पक्ष निर्मात करीत आहेत आणि हे पाकसा सत्तेत कसे येवू यासाठी निवडणुकांच्या वेळी जनतेच्या भावनिक मुद्द्याला हात घालतात जनतेला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला जातो आणि सामान्य जनता त्यांच्या ह्या भावनिक राजकारणाला भुलते आणि आपले अधिकार ते विसरून जातात व आपले अधिकार गमावून बसतात आणि स्वार्थी लोकांना सत्तेवर बसवतात आणि मग आपल्या कर्माला दोष देत बसतात आता जनतेचे अधिकार त्यांचे राहिलेत का हाच प्रश्न पडतो खर तर ते अधिकार राजकारणीच वापरत आहेत आणि जनता मात्र शांत निपचित पडलेली आहे ना जगण्याची आस आहे अन स्वाभिमानाची चाढ आहे कस तरी या राजकीय नेत्यापुढे आपल्या माना झुकावलेल्या दिसतात मग प्रगती नसल्याने गरिबी आणि गरिबी म्हटले कि कर्जाचा बोजा आलाच आणि मग त्यातून सुटण्यासाठी जनता आत्महत्येचा मार्ग अवलंबते असे हे वास्तव आम्हाला स्वीकारलेच पाहिजे
 आजच्या युगात सत्याला थारा राहिला नाही ज्या मातीत शूरवीर जन्माला आले महान संत महात्मे महामानव  युगपुरुष जन्माला आले त्यांच्या विचारांनी  इथली माती पवित्र झाली आणि त्याच मातीत आज हे इतके घाणेरडे राजकारण व्हावे केवढी मोठी शोकांतिका आहे सामान्य जनतेला फसवून त्यांच्यावर अन्याय केला जातो मग अश्या राजकारण्यांची गरज काय जिथे सामान्य जनतेच्या हितासाठी जनतेचे तयार केलेलं सरकार जर जनतेच्या जीवावर उठत असेल तर असले सरकार काय कामाचे आपल्या देशात निवडणुका होतात सरकार आणि या जनता ह्या दोन महत्वाच्या प्रमुख पात्र  आपल्याला एका चित्रपटासारखे दिसतात पण ह्या बदलत्या राजकारणाला आता घरी बसवले पाहिजे क्रांती करण्याची गरज आहे आज सत्तेचा भोग घेणाऱ्या या नालायक लोकांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे अन्यथा आज जसे राजकारण चालले आहे त्यावरून भारत हा एका विनाशाकडे चालला आहे असे दिसते बाबासाहेब यांनी या देशात लोकशाहीची बीजे रोवली तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर छत्रपतींचे स्वराज्य होते आणि छत्रपतींचे स्वराज्य हे राजेशाहीत लोकशाही नांदत होती मानवाला मानवाधिकार देणारे ते पहिले राजे ठरले कि ज्यांनी प्रथम जनतेला अधिकार दिले त्याचं पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी या घटनेत स्वराज्याची सारी कमान उतरवली आणि सारे मुलभूत अधिकार घटनेत जनतेला दिले पण त्याचा वापर करणात जनता सुद्धा कमी पडली
आता राजकारण इतके बदलले आहे कि सावधानता बाळगण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही इतके भयाण कि मी २०१४ मध्ये या राजकारणी लोकांच्या उदासीनतेमुळे ८ महिन्यात २५० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले शेकडो आयाबहिणी ना आपल्या इज्जतीचे रक्षण हि करता आले नाही  केवळ राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे आज या देशाची विकासाची गातो कायम मागे राहिली आहे बाबासाहेब वैतागून म्हटले होते जर या देशात समता नाही नांदू शकली तर मी माझ्या हाताने तयार केलेली घटना जालेन पण आज त्याच घटनेमुळे इतके धर्मसंप्रदाय असताना हि भारत एकसंध आहे हे  त्या घटनेचे कौशल्य आहे पण वापरणारी लोक नालायक ठरली हेच खेदाने म्हणावे लागते
आजच्या ह्या बदलत्या राजकारणाला आला घालायचा असेल तर जनतेने आपले अधिकार आपला राजा होण्याचा अधिकार वापरण्याची आवश्यकता आहे
जय शिवराय जय भीमराय 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र