शिवश्री

शिवश्री शब्दाचा वापर सर्वप्रथम सातवाहन राजांच्या काळात वापरला गेल्याचे आढळते आजच्या  वर्तमान काळात अनेक लोकांच्या नावापुढे शिवश्री हे नाव लिहले जाते लोकांचे म्हणणे आहे कि ते शिवरायांच्या नाव आहे म्हणून आम्ही लावतो मात्र सत्य वेगळे आहे शिवरायांच्या नावाचा जयजयकार करणे वेगळे आणि शिवरायांच्या विचाराणा आचरणात आणणे वेगळे  आता मूळ विषयाकडे   येऊ या शिवश्री शब्द हा ऐतिहासिक पुरावे देऊन सिद्ध झालेला आहे तर या विषयी शिवश्री हा शब्द नेमका का आणि कशासाठी वापरला जातो याचे नेमके काय अर्थ आहेत  प्रथम आपण पाहिले तर शिव + श्री असा याचा फोड करून मांडता येईल आता शिव म्हणजे शंकर सुद्धा होऊ शकतो व शिव म्हणजे सातवाहनांचा  वंशज देखील सिमुक होऊ शकतो साधारण पाहिल्यास  सातवाहन राजे हे बौद्ध धम्माच्या प्रभावाखाली होते हे नाकारता येत नाही कारण तसा त्यांचा पुराव्यानिशी सिद्ध होणारा इतिहास आहे  म्हणून पहिला शिव हा मान्यता प्राप्त होऊ शकत नाही  दुसरा राजा सिमुक याला आद्य मानले जाते सातवाहनांच्या राजांमध्ये त्यामुळे त्याच्या नावाचा वापर  केला जाऊ शकतो हे नाकारता येत नाही  सातवाहन राजांपैकी पुळुमावी  याच्या नावापुढे जास्त वेळा शिवश्री  उपपद आहे तर अजून काही राजांची नाणी आहेत त्यात हि उल्लेख सापडतो तऱ्हाळा  येतील नाणी संग्रालयात हि नाणी उपलब्ध आहेत
 वनवासी इथे मिळालेला शिलालेख एका बसाल्ट खडकावर अगदी  हिरव्या गडद रंगाच्या शिलाखंडावर शीर्षभागी चैत्य आकृती असून त्यात प्रतिमायुक्त शिलालेख वनवासी येथील मधुकेश्वर देवालयाच्या  जागेची साफ सफाई करताना  हा शिलाखंड भेटला आहे यात दोन ओळींचा लेख आहे तो शिलाखंड राजा वाशिष्टीपुत्र शिवश्री पुळुमावी यांच्या पट्टराणीचा आहे  विशेष म्हणजे चैत्याची आकृती असणारा  शिलाखंड या मधुकेश्वर देवालयात सापडणे  हे मधुकेश्वर  देवालयावर  शंका निर्माण करणारा आहे कारण हे  मंदिर शंकराचे आहे आणि चैत्याची  आकृती असणारा शिलाखंड या जागी भेटणे म्हणजे मंदिर कुणाचे हा प्रश्न निर्माण होती शिवाय मंदिराच्या समोरील हत्ती असेल किंवा  नागांची प्रतिमा असतील शिवाय  हे मंदिर पूर्ण पाहिल्यास  शंका निर्माण होतात असो  महत्वाचे म्हणजे शिवश्री हे उपपद श्री देखील सातवाहनांच्या काळात वापरला जाणारा शब्द प्रयोग आहे  तसेच सातवाहन राजेंच्या नावापुढे आपल्या आईचे नाव आढळते जसे गौतमी पुत्र सातकर्णी  असेल किंवा मग  हा वाशिष्टीपुत्र शिवश्री पुळुमावी असेल  हि एक भारताची महत्वाची संस्कृती आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राची हि  मातृसत्ताक परंपरा आहे  सातवाहन यांच्या पुढे ते शिवश्री हे उपपद लावतात ते आदराचे व  अभिमानाचे प्रतीक समजले जायचे
 शिवश्री शब्दाबाबत आजचा चाललेला ट्रेंड हा काही वाईट नाही फक्त तो भरकटला जाऊ नये हि  भावना आहे  आता महत्वाचे म्हणजे  शिवश्री शब्द नेमका कोणत्या भाषेत आणि कोणत्या लिपीमध्ये आहे यातून भाषेच्या  जननी वाल्यानी जी  नको ती जननी करून ठेवली आहे त्यांना एक चपराक आहे कि  सातवाहन राजांनी आपले लेख लिहताना ब्राह्मी लिपीचा च वापर केला आहे  शिवाय विशेष म्हणजे पाली भाषा असो वा प्राकृत असो यांची लिपी मात्र  ब्राह्मि सापडते खरोष्टी म्हणजे आजची  मराठी  हिची प्रथम लिपी देखील ब्राह्मीच सापडते यात कमालीचे साम्य आहे  यातून स्पष्ट होते कि मराठीचा उगम कोणत्या भाषेतून आहे  यात संस्कृत ला जननी म्हणाऱ्या लोक  तोंडावर पडतात कारण एका हि  राजाने शिलालेख लिहताना या भाषेचा वापर केलेला नाही  जिजाऊपुत्र शिवाजी महाराज याना देखील शककर्ते म्हटले जाते या महाराष्ट्राचे दोनच असे राजे होऊन गेले ज्यांनी नव्या शकाची निर्मिती केली आहे   त्यामुळे  श्री हा शब्द देखील या शब्दकोशात  महत्वाचा आहे श्री म्हणजे कोणत्या मंदिरातील श्री अजिबात नाही तर एक  कर्तव्यदक्ष व्यक्तीस श्री म्हटले गेले आहे हे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा म्हणजे हि काही  ईश्वराची इच्छा असे शिवरायांचे म्हणणे नव्हते तर रयतेची इच्छा आहे हे राज्य व्हावे  असा काही  सा अर्थ  येतो आता शिवश्री मध्ये  श्री आहे पण शिवश्री हे राजपद आहे जे राजाच्या नावापुढे उपपद लावले जायचे कोणाला हि ते लावता येत नव्हते   सातवाहन राजांच्या राजांनी च लावले आहे जनतेच्या नावात शिवश्री आढळत नाही  
सातवाहनांच्या नाण्यामध्ये देखील शिवश्री चा उल्लेख हे तसेच अनेक ठिकाणी  लेखामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे    वाशिष्टीपुत्र पुळुमावी च्या नावापुढे नेहमी हे  उपपद लावताना आपल्याला पाहायला मिळते तसेच  काही ठिकाणी श्री असा उल्लेख आहे
अमरावती च्या स्तूपामध्ये असणाऱ्या लेखात वाशिष्टीपुत्र श्री पुळुमावी असा उल्लेख आहे  तसेच कार्ला येथील चैत्य लेण्याच्या उत्तरेकडील विहार लेण्याच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला  असणाऱ्या २ नंबरच्या खोलीच्या वरच्या भिंतीवर चार ओळींचा  शिलालेख आहे  तसेच नाशिक येतील लेण्यांमध्ये पुळुमावी चा लेख आहे लेणी   क्रमांक ३ च्या व्हरांड्यात मागील भिंतीवर आहे यात वैशिष्ट्य म्हणजे स्वस्तिक चिन्ह वापरले असून बौद्ध लेणी  कोरण्याचे दान बाबत हा लेख आहे  यात एक लक्षात आणणारी बाब अशी कि पांडवांनी लेणी खोदली म्हणाऱ्या लोकांचा जीव इथेच जातो आहे  कारण हि लेणी खोदण्यात योगदान  दिल्याचे शिलालेख  सापडतात त्यावेळी हि भाषा सहज कुणाला  वाचता  येत नसल्यानी हिदुत्ववादयनी म्हणून टाकले कि पांडवांनी  खोदली म्हणून पण सत्य  मात्र या शिलालेखांतून असे बाहेर पडू लागले आहे
कार्ला आणि नाशिक या ठिकाणी पुळुमावी चे अनेक  शिलालेख आहे  विशेष म्हणजे बौद्ध धम्माचा प्रभाव या राजांवर जास्त पाहायला मिळतो अनेक राजे बौद्ध हि झाल्याचे  पाहायला  मिळते विशेष म्हणजे सातवाहन राजांची लग्न हि   नाग लोकात झालेली दिसतात नाग हे त्या  काळाचे प्रचंड शक्तिशाली लोक मानले जायचे  
विशेष सांगण्यासारखे म्हणजे शिवश्री हे उपपद आहे  ते राजांच्या नावापुढे  लावले जाते  तसेच यात अजून महत्वाचे म्हणजे सातवाहन घराण्यातील लोकांची नवे देखील अशीच काहीशी  आपल्याला पाहायला मिळतात ती अशी  गौतमी बलश्री  वेदश्री शक्तिश्री चंडश्री अशी बरीच नवे पाहायला मिळतात  त्यामुळे हा श्री शब्द कोणत्या  ईश्वराशी नसून राजांच्या नावाशी जोडला जातो आणि कदाचित राजा  हाच ईश्वर  मानला जायचा इजिप्त या  संस्कृती मध्ये आणि पुढे हे भारतात सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते कालांतराने ईश्वराला दैवी स्वरूप देऊन  दैवतीकरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते
सातवाहन यांच्या काळात वापरले जाणारे शिवश्री हे उपपद नंतर मात्र पुढे वापरताना दिसले नाहीत   आता
शिवश्री हा शब्द प्रयोग शिवरायांचे नाव घेऊन सर्रास लावले  जाते काही लोक आपल्या नावापुढे लागतात    चुकीचे आहे असे म्हणणार नाही पण शिवरायांच्या विचार आचरणात आणणे जास्त महत्वाचे आहे शिवाय शिवरायांना एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याचे प्रयोजन न करावे   इतकेच सांगणे आहे कारण शिवश्री हा बौद्ध राजांच्या  काळात  उगम झालेला शब्द प्रयोग आहे आणि हे एक उपपद आहे राजाला दिलेलं     बाकी सातवाहन वंश हा महाराष्ट्राचा ज्ञात पहिला वंश  मानतात याचे मूळ काही आंध्रात सांगतात पण सातवाहन हे महाराष्ट्रात जास्त  पाहायला मिळतात त्यामुळे त्यांचा नेमका वंश कोणत्या भागातील आहेत यावर शंका निर्माण करतात आणि ह्यासाठी सविस्तर सातवाहन वंश प्रकरणात पाहता येईल

धन्यवाद

जय शिवराय जय भीमराय  

टिप्पण्या

satish म्हणाले…
छान माहीती आहे.पण शिवश्री आज शिवरायांच्या नवाने खपवली जाते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र