शिवरायांचे गुरु रामदास : एक सत्य शोध

रामदास आणि शिवराय यांच्यात कोणता सबंध होता हे आज आम्हाला सांगताना इतिहासकार यांनी नेहमी गुरु शिष्याचे नाते आहे असेच सांगितले आहे पण इतिहासकार  यांनी जे पुरावे दिले त्यातच त्यांनी स्पष्ट करून सांगितले आहे कि रामदास याचा आणि शिवरायांचा कोणताच सबंध नाही म्हणून रामदासाचे जे पत्र सांगितले जाते ते काय आहे हे पाहूया
हे पत्र आहे दिनांक ४ एप्रिल १६७२ साली लिहिलेले म्हणजे या वर्षी शिवरायांचे वय हे ४२ वर्षाचे होते आणि तेव्हा रामदास याचे पत्र आले ते ऐसे आहे
निश्चयाचा महामेरू । बहुत जनाशी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।। १ ।।
परोपकाराचीया राशी । उदंड घडती जयासी ।
तयाच्या गुणमहत्वासी । तूळणा कैची ।। २ ।।
नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती ।
पुरंदर आणि आदिशक्ती । पृष्टभागी ।। ३ ।।
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।। ४ ।।
आचारशील विचारशील । दानशील धर्मसीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठाई ।। ५ ।।
धीर उदार आणि सुंदर ।सूर क्रियेशी तप्तर ।
सावधपणे नृपवार । तुच्छ केले ।। ६ ।।
तीर्थ क्षेत्रे ती मोडली । ब्राह्मण स्थानभ्रष्ट जाली ।
सकळ  पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ।। ७ ।।
देव धर्म गो ब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।। ८ ।।
शूर पंडित पुराणिक । कवीश्वर वैदिक याज्ञिक।
धूर्त तार्तिक सभानायेक । तुमचा ठायी ।। ९ ।।
या भूमंडाच्या ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
मऱ्हाष्टधर्म राहिला काही । तुम्हाकरिता ।। १० ।।
आणीकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कितेक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वी विस्तारला ।। ११ ।।
कितेक दृष्ट संव्हारीला । कितेकांसी धाक सुटला ।
कितेकांसी आश्रेय जाला । शिवकल्याण राजा ।। १२ ।।
तुमचे देसी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
रुणानुबंधे विस्मरण जाले । काय  नेणो ।। १३ ।।
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तया प्रती ।
धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ।। १४ ।।
राजकारण उदंट दाटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केले पाहिजे ।। १५ ।।
हे आहे रामदास स्वामी चे पत्र  आता या पत्राचा आशय स्पष्ट आहे कि यापूर्वी रामदास स्वामीचा आणि महाराजांचा कधीच सबंध आलेला नाही आणि कधी भेट हि न झाल्याचा आहे . आणि हे पत्र भेटले तेव्हा महाराजांचे वय हे ४२  वर्षाचे होते म्हणजे महाराजांनी तेव्हा स्वराज्याची घडी बसवली होती स्वराज्य कधीच उभारले होते म्हणजे  आता कोणी म्हनत असेल कि रामदासाच्या सल्ल्याने महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली तर ते मूर्खपणाचे ठरेल . आणि महत्वाचे म्हणजे रामदासाचे पत्र हे एकूण १५ कडव्यांचे आहे इतिहासकारांनी ते कधी समोर आणलेच नाही फक्त १२ कडवी लोकांसमोर आणली पुढची३ कडवी कधी लोकांना सांगितली नाही  आणि समाजाची नेहमीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ब्राह्मणी इतिहास कारणी केली आहे शिवरायांचा आणि रामदासाचा काही सबंध आलाच नाही पण जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहिण्यात हे ब्राह्मण इतिहासकार पटाईत होते . पण यांचा खोटे पण उघड झाला तो रामदासाच्या चाहत्या वर्गाच्या उतावळे पणामुळे त्यांनी सांगितले ले साल हे १६४९  याचा अर्थ हे कि रामदास हाच  शिवरायांचा गुरु आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी तारीख बदलण्याचा डाव केला पण यांचा खोटेपणा रामदासाच्या १२ कडव्याने उघडा पडला अगदि नंगाडे केले ते असे कि पहा काय आहे ते कडवे
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वी विस्तारला ।
कितेक दृष्ट संव्हारीला । कितेकांसी धाक सुटला ।
आता पहा गम्मत काय आहे ती १६४९ पर्यंत शिवरायांनी जी लढाई केली ती एकाच ती आहे पुरंदर ची त्यात आदिलशाही सरदार फतेहखान याने घातलेला वेढा फोडताना करण्यात आलेली लढाई आणि यात फक्त शिवरायांनी एकाच  फतेह खान याचा पराभव केला होता इतर कोणत्याच सरदार व  राजाशी त्यांची लढाई झाली नव्हती आणि  जर त्यावेळी हे पत्र लिहिले असेल तर रामदास असे का लिहेल कित्येक दृष्ट संव्हारीला असा अनेक वचनी शब्द का वापरेल तरी हि हे पत्र शिवरायांच्या अनेक लढाया झाल्या असतील तेव्हाच लिहिल्या गेल्याचे उत्तम उदाहरण आहे अजून पुढे असे हि लिहिले आहे कि कित्येकास धाक सुटला असे म्हणणे म्हणजे शिवरायांनी अनेक शत्रूला जरब बसवली असणार याचाच अर्थ असा हि होतो कि शिवरायांनी अफजलखान शाहिस्तेखान बहलोल खान बहादूर खान यांचा पराभव केल्यानंतर लिहिले असणार यात शंका नाही शिवाय या पत्राच्या ४ कडव्यात जे जाणता राजा म्हटले आहे ते शिवराय १६४९ पर्यंत १९ वर्षाचे आणि एक लढाई जिंकणारे होते त्यांना जाणता राजा हि उपाधी इतक्या लवकर लावणे शक्य नाही याचा अर्थ नक्की कि हे पत्र १६७२ सालचेच आहे म्हणून अजून काही गोष्ट्कडे लक्ष देवू या कसा फसवले जाते याचे उत्तम उदाहरणे आहेत या  मध्ये आज पर्यंत आम्हाला रामदासाच्या ह्या १३ ते १५ कडव्यांची माहिती इतिहासकार कधी सांगतच नाहीत का ? तर कारण आहे तसे प्रथम १३ वे कडवे काय आहे हे पहा
तुमचे देसी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
रुणानुबंधे विस्मरण जाले । काय  नेणो ।। १३ ।।
इथे काय  जाणवते अगदी स्पष्टपणे रामदास म्हणतो आहे कि महाराष्ट्रात राहत होतो आणि ते हि तुमच्या राज्यात वास्तव्य केले परन्तु स्वराज्याच्या उभारणीच्या वेळी काय काय झाले याची माहिती नाही घेतली तुम्ही एवढे ऐतिहासिक  काम केले स्वराज्याचे काम  केले नवे राष्ट्र निर्माण केल आणि मला  त्याचे विस्मरण झाले काय ? ते  कळत नाही याची खंत इथे रामदास शिवारायांपुढे व्यक्त  करीत आहे आणि याचे कारण हि तोच सांगत आहे पहा
राजकारण उदंट दाटले । तेणे चित्त विभागले ।
आता संत राजकारण करत नाही हे सत्य आहे आणि ते आपण पहिलेच आहे तुकाराम महाराज असो वा नामदेव महाराज असो एकानेही राजकारण केले नाही पण रामदास म्हणतो आहे कि मी राजकारणात व्यस्त होतो आत कोणत्या राजकारणात होते हे हि पाहूया कारण रामदास याचे चार शिष्य आहेत त्यात एक अफजलखान दुसरा पंडित मुरार जगदेव आणि चौथा शिष्य आहे काशिपंत तिमाजी उर्फ दिनायत राव हे आहेत यात अफजल खानाने शिवरायांना मारण्यासाठी स्वराज्यावर चाल करुन आला आहे शिवरायांनी त्याचा बंदोबस्त केलाच आहे दुसरा मुरार जगदेव ह्याने याने शहाजी राजांची  जहागिरी पुणे जाळून काढले शिवाय तिसरा बाजी घोरपडे ह्याने तर शहाजी राजे यांना कैद करण्यापर्यंत मजल मारली होती स्वराज्याचा कट्टर वैरी होता आणि चौथा आहे काशिपंत ह्याने सिद्धी  जौहर ला स्वराज्याच्या विरोधात पाठवण्यासाठी कर्नुल ला जावून तयारी केली सारे स्वराज्य द्रोही होते आणि या लोकांचे गुरु रामदास स्वामी होते हे ते हि नाकारत नाहीत आणि हेच ते राजकारण आहे नाही का बर आता रामदास याने  शिवरायांना का बर पत्र लिहिले असेल त्यामागची काही पार्श्वभूमी असू शकेल कि नाही ती हि जाणून घेवू या तर ती पार्श्वभूमी अशी आहे   मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवून पुण्याची भूमी उधवस्त केली त्यात बाल शिवबाने सोन्याचा नांगर धरून सोन पिकवण्यास सुरुवात केली आणि ते पुन्हा वसवले पुणे दुसरा शहाजी राजांना पकडले असता अगदी मुत्सद्दीपणे शहाजी राजे यांची सुटका केली आणि शहाजी राजे यांस पकडून देणाऱ्या बाजी घोरपडे यांचा वंश हि खोडून टाकला शिवाय आपल्या थोरल्या भावाचा खून करणारा अफजल खान हि संपवला होता आणि पुढे तर शिवरायांची कीर्ती कुठवर पोहचली हे सांगायची गरज नाही
१६७२ च्या एके दिवशी महाराजांनी परळीचा किल्ला स्वराज्यात घेतला आहे  जिथून स्वराज्य द्रोहाची कामे व्हायची तो हा किल्ला याचे नाव हि दुर्जनगड होते आणि  स्वराज्यात हा किल्ला आल्याने रामदासाचे वास्तव्य धोक्यात आले शिवाय त्याच्या मातब्बर शिष्य शिवरायांनी पायी तुडवले होते आणि म्हणून मोठ्या हुशारीने रामदासाने हे पत्र शिवरायांना लिहिले आहे पहा पत्र जर नीट पहिले तर स्पष्ट कळते कि पहिल्या पाच  कडव्यात ते शिवरायांचे गोडवे  गात आहे . शिवरायांना खुश करण्यासाठी पण शिवराय काही त्याच्या ह्या गोडवे गाण्याचा अमिषाला बळी पडणार नव्हते पण शिवरायांच्या मनात ओलावा निर्माण व्हावा म्हणून आणि आपल्याला आश्रय  मिळेल यासाठी तो  शिवरायांना धर्माचे पालन  करणारे धर्मरक्षक सुद्धा म्हणतो आहे विशेष म्हणजे शिवरायांनी वैदिक धर्माचे कधी रक्षण केले हेच समजत नाही कारण वैदिक धर्म नेस्तनाभूत खरा शिवरायांनी केला आहे  स्त्रीसत्ताक समुद्र उल्लघन  शस्त्रबंदी असे अनेक कायदे मोडून काढले असताना देखील हा म्हणतो आहे तुम्ही धर्माचे रक्षक आहात हे केवळ आणी केवळ आश्रय मिळावा यासाठीच आहे हे नाकारता येत नाही  पहा त्यांचे हे कडवे
''या भूमंडाच्या ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।''
इथे अगदी सर्वात मोठ्या अलंकारी शब्दात तो महाराजांना धर्माचे तारणहार असल्याचे सांगत आहे इथे तो महाराजांचे गौरव गाथाच  सांगत  आहे आणि परत आपल्या मूळ  मुद्द्याकडे परत फिरत तो सांगतो आहे कि
''आणीकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कितेक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वी विस्तारला ।। ११ ।।''
इथे काय सांगत आहे अनेक लोकांकडून अशी कृत्ये घडली जी मी केली आहेत आणि तुम्ही त्यांना आश्रय देखील दिला आहात  आणि परत त्यांची कीर्ती गात आहे रामदास कि धन्य धन्य तुमची कीर्ती  असे म्हणून त्यांचा परत गौरव करत आहे इथे स्पष्ट सांगावे वाटते कि एखादा माणूस जास्त गोडवे गात असेल तर आपण लगेच म्हणतो कि नाही तुझे काही तरी काम आहे म्हणून इतका गोड बोलत आहेस हे असेच आहे यात रामदास याला भीती आहे कि आपल्या चार शिष्यांच्या नंतर आपला तर नंबर नाही न येणार शिवाजी राजे आता  आपल्यावर तर नाही न येणार या भीतीने सुद्धा हे पत्र लिहिले असावे अशी शंका    येते कारण त्यांच्या पुढच्या कडव्यात ते आश्रय मागत आहेत तो असा
''कितेक दृष्ट संव्हारीला । कितेकांसी धाक सुटला ।
कितेकांसी आश्रेय जाला । शिवकल्याण राजा ।। १२ ।।''
आता यात कित्येक दृष्ट संव्हारीला म्हणजे महाराजांनी त्याच्या चार हि शिष्यांचा बंदोबस्त केलेला होता हे त्याला चांगले माहित होते  म्हणून असे हि म्हणत आहे आणि महाराजांची कीर्ती हि गात आहे कि बऱ्याच लोकांना तुम्ही आश्रय देखील दिला आहे आणी त्यापुढे स्वतः दिलगिरी सुद्धा मागत आहे कि
''तुमचे देसी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
रुणानुबंधे विस्मरण जाले । काय  नेणो ।। १३ ।।''
तुमच्या राज्यात राहत होतो पन तुमचे कार्य मला समजले नाही आणि मोठ्या हुशारीने तो महाराजांना सर्वज्ञ धर्ममूर्ती अशी उपमा देखील देत आहे  शिवाय एक गुरु आपल्या शिष्याची माफी मागत आहे कि ती म्हणजे पत्र वाचल्यावर महाराज रागावू नये म्हणून कि कोणता प्रसंग न पाहता मी आपल्याला पत्र लिहिले तसदी बद्दल क्षमा मागत आहे यातून काय  बोध घ्यायचा हे सांगायची गरज नाही
'' राजकारण उदंट दाटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केले पाहिजे ।। १५ ।। ''
पहा आपण राजकारणात व्यस्त होतो माझे  लक्ष आपल्याकडे नव्हते असे म्हणणे आणि अगोदर त्यांची कीर्ती सुद्धा गात आहे म्हणजे किती दोगले पण आहे पहा एकीकडे मला माहित हि नव्हते म्हणत आहे आणि एकीकड राजे तुम्ही असे आहात तसे आहेत अश्या अनेक उपमा  हि देत आहे यावरून त्यास माहिती नसेल असे आहे का अजिबात नाही तर पूर्व कल्पना होती पण आता दुर्जनगड घेतला आपले न राहायचे ठिकाणच नाही म्हटल्यावर शरण जाने हेच योग्य होते न
शिवाय शिवरायांनी स्वराज्याच्या हितासाठी ह्या रामदासला सुद्धा आश्रय दिला एकाच दगडात दोन पक्षी मारले आपली कीर्ती हि राखली आणि स्वराज्यास कारणीभूत असणारा रामदास हि एका जागी कैद केला रामदास याला आदेश दिलेत शिवरायांनी
'' येथून पुढे स्वराज्य विरोधी आणि चुकीच्या कामात लक्ष देवू  नका राजकारण करू नका चित्त विभागू देवू नका अश्या अटीवर महाराजांनी  रामदास यास आश्रय दिला शिवाय दुर्जन गडाचे नाव बदलून सज्जन गड ठेवले आणि इशारा जणू दिला कि इथे सज्जना प्रमाणेच राहायचे  नाही तर साधू माणसाचे काम भ्रमंती करणे समाज प्रबोधन करणे पण  शिवरायांनी त्यांना एका गडावर स्थाईक का केले ?
आता रामदास खरच महाराजांचा गुरु होता का हे कुणाला सांगायची गरजच भासणार नाही कारण त्याचाच  पत्राने त्याची पोलखोल केली आहे तरी मानले १६७२ नंतर महाराजांनी त्याला गुरु मानले असले तर महाराजांच्या राज्याभिषेकाचे साधे आमंत्रण देखील राजांनी त्याला दिलेले नाही आणी म्हणूनच रामदास राज्याभिषेकास आला  नाही त्याला चांगले ठावूक होते शिवाजीराजा आपला मुलाहीजाच ठेवत नाही उद्या मी आणखी काय केले तर मलाच ठेवणार नाही त्यापेक्षा मी लांबच असणे योग्य आहे शिवाय राज्याभिषेकाच्या वेळी करोडो रुपयांचा दानधर्म करणारे शिवराय साधा छोटासा नजराणा वा भेट सुद्धा रामदास यास देत नाहीत यावरून ते त्यांस गुर  मानत असतील असे कसे काय म्हणायचे परत सज्जन गडाच्या किल्लेदारास पत्र पाठवताना ते रामदास यास गोसावी हा शब्द का वापरतील यावरून स्पष्ट आहे कि रामदास हा त्यांचा गुरु असणे शक्यच नाही इथे अजून एक पुरावा म्हणजे खुद्द बाबासाहेब पुरंदरे याच्याच पुस्तकात आहे जेव्हा शिवरायांना हे पत्र येते तेव्हा शिवराय विचार करतात माझी एवढी सुती करणारा माझी कर्मयोगाचे आणि कर्तुत्वाची कौतक करणारा आणि विनयशील माफी मागणारा निर्गावी पुरुष कोण आहे महाराजांच्या हि लक्षात येईना कोण आहे या सत्पुरुषाचे दर्शन घडण्याचा सुयोग आल्याचे हि आठवेना आता शिवराय म्हणजे विसरभोळे राजे  नव्हते रयतेच्या  कल्याणाची काळजी वाहताना सर्व घटनांची तंतोतंत माहिती असणाऱ्या शिवरायांना रामदास कधी भेटल्याचे   आठवणार नाही असे म्हणजे म्हणजे सूर्यालाच आरसा दाखवण्यासारखे आहे .
आता शिवरायांचा गुरुपदी असणारा रामदास इथेच बरखास्त होतो पन हा माणूस शिवरायांच्या महापरीनिर्वाणा नंतर देखील कधी  रायगडावर गेला नाही साधे कुटुंबाचे सांत्वन देखील केले नाही  यावरून तर सिद्ध होतेच पण या महाशय यांनी १६८१ ला संभाजी राजे यांना पत्र पाठवलं आहे काय आहे हे पत्र आपण पाहू या
श्री शिवराज कैलासवासी यांचे वंशपरंपरेसी राज्यभोग बहुत आहे ।। १ ।।
वर्षेपाच पर्यंत अतिकठीण आहे दैवी प्रार्थना सावधानतेने रक्षिले पाहिजे ।। २ ।।
पूर्वी राजश्रीस राजधर्म व क्षात्र धर्म व अखंड सावधान ऐसी पत्रे पाठवली होती ती पत्रे प्रसंगानुसार वाचून मनासी आणून वर्तणूक होईल तरी वाचनाचा अभिमान देवासही आहे ।। ३ ।।
नळ संवत्सरि सिवथरि १८ शस्त्रे समर्पिली ते समई श्रीचे इच्छेने राजश्री यांसी कितेक आशीर्वाद वचने प्राप्त जाली तो अर्थ घडला असेल आणि कही द्वादश वर्षा उपरी उत्कट भाग्य आहे ते समईचा संकल्प वाक्य लेखी लेख होता स्मरण मात्र द्यावे  कोन्हे समई कोण्हासी काय घडणार ते सुखे घडेल ।। ४ ।।
संनिध  वस्त्रपात्रादिक जो पदार्थ आहे तो सर्व श्रीस समर्पिला चाफाली प्रसंगानुसार श्रींच्या देवळाच्या कार्यभाग घडोनी येईल हा हि पदार्थ राजाश्रींच्या विचारे त्या ची कार्यासी लावावा अथवा महाद्वारी दीपमाळ करावी ।। ५८।।
प्रमादी संवत्सरि सिंगणवाडीचे मठी राजाश्रीनी श्री च्या सर्व उत्तम कार्याचाआईकार केला त्या प्रमाणे त्यांनी नित्य उत्सव व यात्रा समारंभ उत्तम चालविला पुढे इमारतीचे स्मरण द्यावे हे त्यांनी मान्य केल्यावरही आपण सज्जन गडी सुखे वास्तव्य केले ।।६।।
श्री च्या भोग्मुर्ती आणविल्या आणि  त्यांची प्रतिष्टा मल्लारी निंबदेव त्यांच्या बंधूंच्या हस्ते  करावी  ।। ७ ।।
कर्नाटक रीतीचा रथ करून यास भोगमूर्ती आणून प्रतिवर्षी रथोत्सव केल्याने राजसी कल्याण आहे वार्षिक चिन्हे दिसोनि येईल विशेष चिन्ह दिसोनि येईल याउपरी श्रीचे इमारतीसी आरंभ करावा एक शत येकवीस खंडी धान्य संकल्पाची गती सांगावी ।। ८ ।।
श्रीचे देवालय अशक्त जाले नदी संनिध आहे ।। ९ ।।
पूर्वी एक प्रसंग जाला होता राजश्री श्रीच्या दर्शनासी सज्जनगडासी येणार म्हणोनी स्थळसिद्धीकारणे मनुष्य आले होते ते समई चे वर्तमान । उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन जाले म्हणोनी ऐकिले ते समयी आता काय आला म्हणोनी बोलिले परंतु या उपरीही ते प्रांत लोक अनुकूल करून घेतील तरी उभयता योगे कार्यसिद्धीच आहे परंतु त्वरा पाहिजे प्रतीवर्षी श्रींचे यात्रेसी राजगृहीतून एक भले मनुष्य संरक्षणासाठी पाठवीत जावे समारंभांदि रथोत्सव समई हस्ती २ कर्ने  २वाद्ये जोडे २ तीवाशे २ जमखाने  २ शामीने २ येणेप्रमाणे पाठवून श्रींचा यात्रासामारंभ संपादून पदार्थ फिरावून आणीत जावे हा हि निश्चय पूर्वीचाच आहे लेख हि होता . ।। १० ।।
श्रींचे पेठेचे पत्र दृश्य करावे कार्यकर्ते नीती वदावी श्री कार्यासी अतितत्पर ऐशा पुरुषाच्या योगे धर्मवृत्धी आहे धर्मवृद्धीने संजय वृद्धी आहे ।।  इतके बोलिलो स्वभावे यात मानेल तितुके घ्यावे श्रीती इदास न व्हावे बहु बोलिलो म्हणून ।।
असे हे संभाजी राजांना पाठवलेले पत्र आहे आता संभाजी महाराज हे काही आयते खाणारे नव्हते आणि त्यात ते समाधान हि मानणारे नव्हते तरी देखील रामदास त्यांना भोगवादी वृत्ती दाखवून दिली
आणि अजून संभाजी राजे यांना घाबरवण्यासाठी दुसर्या  कडव्यात म्हणतो आहे पाच वर्षापर्यंत चा काल हा अतिकठीण आहे त्यासाठी देवाची प्रार्थना करा असे हि सांगतो पण संभाजी राजे दैववादी बनवण्याचा प्रयत्न केले संभाजी महाराज  यांचे कार्य शिवरायांच्या वेळी सुद्धा होते हे   रामदास विसरलेला दिसतो आहे इथे देव धर्माच्या नादि लागावे देवाचे दास होवून राहावे स्वराज्य रयत याकडे लक्ष नसावे असा हि सांगण्याचा त्याचा प्रयत्न होता पण संभाजी राजे यांनी त्यांचा  मागणीचा पुरावा केलेला दिसत नाही आणि   रामदास याच्या काही घटना उघड होत गेल्या संभाजी राजे यांना त्याच्या या कहाण्या ऐकण्यात आणि पाहण्यात मुळीच वेळ नव्हता कारण स्वराज्यावर त्यावेळी १२ आघाड्या एकदम आल्या होत्या आणि त्या १२ आघाड्यांना  निकराचीझुंज देत राहिले संभाजी राजे आणि संभाजी राजांची हीच चुक म्हणावी लागेल कि त्यांनी रामदासाच्या ह्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि रामदासाच्या चेल्यांनी रामदासाच्या ह्या गोष्टीची पुनरावृत्ती केली आणि रंगनाथ स्वामी नावाच्या रामादास्या ने संभाजी राजांना पकडण्यास मुघलांना मदत केली आहे हे मी अगोदरच संभाजी राजे यांची हत्या मनुस्मृती प्रमाणेच या लेखात सांगितले आहे
आता आपल्याला रामदास शिवरायांचा किंवा संभाजी राजांचा गुरु होता हे सांगणे कितपत योग्य आहे हे दिसते इथे शिवरायांचे खरे गुरु हे मासाहेब जिजाऊ होत्या हे त्रिवार सत्य आहे आणि ते कोणी हि  खोडू शकत नाही याउपरी तुकाराम महाराज यांचे ते चाहते होते यात हि शंका नाही
आता काय तो बोध आपण घ्यायचा आमचा प्रयत्न आम्ही करीत राहूच
जय शिवराय जय भीमराय
















टिप्पण्या

Unknown म्हणाले…
हा सत्य लेख आहे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र