शिवाजी महाराजांचे जाती विच्छेदन काम

शिवाजी महाराजांचे जाती विच्छेदन काम
छत्रपती   शिवराय हे  लहान वयातच जातीयतेला छेद देण्यास सुरुवात केलि आणि  त्यासाठी त्यांना जिजाऊ मासाहेब यांनी प्रेरणा दिली होती त्यामुळे शिवराय हे मावळ खोऱ्यात अगदी सर्वसामान्य लोकांच्या घरी जावून मीठ चटणी भाकरी  खात असत असा त्यांचा दिनक्रम असे कोणत्या हि जातीचा किंवा कोणत्या धर्माचा भेदभाव नसे केवळ आपले सवंगडी हे एक मानव आहेत बस अन्य काही नाही त्यामुळे  त्यांच्या सोबत अठरा पगड जातीची  लोक जमा  झाली हा एक इतिहास आहे  आणि तो कोणी नाकारू शकत नाही तर शिवरायांचे जाती विच्छेदन कसे केले ते आपण पाहणार आहोत त्यासाठी त्यांच्या बालवयातील काही गोष्टी पाहू या
शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरझाला आणि हा किल्ला शक राजांच्या  च्या काळात बांधण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे शक   राजे  नागवंशी राजे  होते  हा किल्ला नागवंशी राजाने बांधला असल्याने किल्यावर आपणाला काही प्रवेश द्वारावर नाग चिन्ह दिसतात  या ठिकाणाहून खऱ्या  अर्थाने  जातीचे विच्छेदन सुरु झाले शिवरायांनी  सर्व जातीच्या लोकांना सोबत घेतले लहान पाणी राजे महार वस्ती मध्ये जास्त  रमत असत त्यांच्या घरातील चटणी भाकर आवडीने खायचे त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी आपुलकीची भावना निर्माण झाली महार  समाज त्याकाळी मुस्लिम शासकांच्या दरबारी होता आणि  शिवरायांनी या  समाजाला जवळ केले कारण मासाहेब जिजाऊ यांनी त्यांना वेगळे असे एक माहिती सांगितली हि माहिती शिवाजी राजे संभाजी राजांना सांगताना सांगत आहेत जेव्हा शिवरायांच्या कानावर संभाजी राजाबद्दल तक्रारी आली ब्राह्मण मंत्र्यांनी त्या तक्रारी शिवरायांना सांगितल्या कि बाळराजे हे अस्पृश्य लोकांच्या घरी जातात त्यांच्या घरी जेवतात वैगरे ब्राह्मण मंत्र्यांना चांगले माहित होते कि शिवराय सुद्धा लहानपणी तेच करायचे पण प्रयत्न करावा म्हणून त्यांनी राजांकडे तक्रार केली आणि राजे संभाजी राजे यांच्याकडे आले त्यांना सांगू लागले  बाळराजे आम्हाला अशी माहिती भेटली आहे कि आपण अस्पृश्य समजाच्या लोकांच्या घरी जाता जेवता खरे आहे का संभाजी राजे यांनी सुद्धा हो म्हटले व शिवराय आपल्या या भावी राजाच्या वाट चालीबद्दल खुश झाले . संभाजी राजे यांना वाटले कि राजे नाराज होतील म्हणून ते गंभीर होवून शांत उभे राहिले शिवरायांनी संभाजी राजे यांना जवळ घेतलं आणि म्हटले बाल राजे रयतेच्या राजाचे खरे स्थान हे रयतेत असते रयतेच्या सुखा दुःखात सहभागी होणे हे राजाचे काम असते जे राजे महालात राहतात आणि त्यांची रयत हि झोपडीत राहते आणि जे राजे रयतेच्या झोपडीपर्यंत जातात ते राजे रयतेला महालात नेवून बसतात आणि राजे रयतेचे अश्रू पुसणे हे राजाचे कर्तव्य असतेच पण त्या रयतेच्या डोळ्यात अश्रू येत कामा नये हे राजाचे आद्य कर्तव्य आहे हे नेहमी स्मरणी असावे राज्य करणे हा नंतरचा भाग आहे तुम्ही अस्पृश्य लोकांच्या घरी जाता अशा लोकांना आपले समजता त्यांना आपलेसे करता हि स्वराजाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे तुमचा हा जनसंपर्क वाढवणे हे राज्य सामान्य रयतेचे असून तुम्ही  आम्ही हे फक्त त्यांचे पालक आहोत मालक नाही रयतेमध्ये राजाप्रती विश्वास उत्पन्न करणारा रयतेला समानतेची वागणूक देणारा निर्भय  जीवनाची हमी देणारा तुमचा कार्यक्रम चालू ठेवा तुमचा अश्व योग्य दिशेने चालला आहे त्याचा वेग वाढवा
अजुन एक राजे आमच्या आऊसाहेब आणि आपल्या मोठ्या आऊसाहेब  यांनी आम्हास जे सांगितले होते राजे तुम्हास आम्ही तेच सांगतो आहोत या राज्यातील वतनदार आणि ब्राह्मण मंडळी प्रसंग आला तर धन्याशी बेईमानी करतात थोड्याश्या अमिषाला बळी पडतात परंतु मरेपर्यंत निष्ठेने साथ देतात ती हि लोक आज आपल्या स्वराज्यातील जे किल्ले बांधले ते याच लोकांनी किल्ले बांधताना कोणत्याही संपत्तीची आस न धरता घामाच्या धारा त्या किल्ल्यावर शिंपल्या त्या याच लोकांनी किल्ले बांधताना लागणारे पत्थर घडविताना छिन्नीने रक्ताळलेले हात याच कष्टकरी लोकांचे आहेत त्यांच्या बलिदानामुळे आज एक एक बुरुज अजिंक्य झालेला आहे
बाळराजे अजून एक आऊसाहेब नेहमी सांगतात कि इमानाने काम करणे हे यांच्या स्वभावातील एक दोष आहे राजे या स्वराज्यासाठी जास्त कष्ट करणारा समाज हा महार आहे ह्या लोकांचे इमान कोणालाच विकत घेता आले नाही अजून याच लोकांच्या नावाने हा महाराष्ट्र आहे राजे या लोकांची निष्टा वादातीत आणि पराक्रम अतुलनीय आहे आणि म्हणून राजे आमच्या किल्ल्याची किल्लेदारी जास्त हि याच समाजातील लोकांना आहे  कारण राजे   ब्राह्मण किल्लेदार एकवेळ आमिषापोटी या भीतीपोटी किल्ला देवून टाकतील पण राजे हे लोक ना हि संपत्तीला आपले मानतात आणि नाही भीती भयाला नाही मरणाला त्यामुल राजे आज आपले गड किल्ले मजबूत आहेत आणि राजे आपल्या गोदर सुद्धा जे किल्ले  बांधले गेलेत ते सुद्धा याच लोकांनी बांधले आहेत म्हणून प्रत्येक किल्ल्यावर नागाचे चिन्ह कोरलेले असते आणि राजे आपण हि याच नागाचे चिन्ह गडावर कोरत असतो राजे जेव्हा जेव्हा या स्वराज्याचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा तेव्हा प्रथम महार लोकांचा गौरव होईल मग इतर लोकांचा राजे हे लोक थेट नाग लोकांच्या वंशाची आहेत  राजे या महाराष्ट्रावर एक वेळी या लोकांचेच राज्य होते त्यांची राजधानी आज हि नागपूर म्हणून आहे राजे पण या पराक्रमी नागवंशीय लोकांना इथल्या स्वार्थी धर्मपंडितांनी अस्पृश्यतेचा शिक्का माथी मारून इतिहास कलंकित केला
राजे  तो कलंक पुसून काढण्याची जबाबदारी तुम्हा आम्हावर आहे आऊसाहेब सुद्धा आम्हाला अनेकवेळा हि गोष्ट सांगितली आहे ज्यांनी या देशातून समतेचा अहिंसेचा संदेश देणारा बुद्धाचा धम्म संपवला राजे ते लोक आपले स्वराज्य हि संपवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत यांची निष्टा या मातीवर येथील लोकांवर नसून त्यांना गुलाम करण्यात आणि त्यांचे शोषण करण्यात राहिलेली आहे म्हणून ते येन केन प्रकारे स्वराज्याला विरोध  करत आले आहेत कोण ;कोठले आदिलशाह मोगल इंग्रज पोर्तुगीज यांना आपले वाटत आहेत आणि इथली लोक यांना परकीय वाटत आहेत यांच्या विरोधाची पर्वा आपण करू नये  राजे यांच्या प्रतीक्रांतीवादी हालचाली बाबत मात्र दक्ष रहा व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी हे रयतेचे राज्य बुडवण्याचा प्रयत्न करतील वेळ आली तर सर्वसामान्य स्वराज्यासाठी प्राण देतील पण हे स्वार्थी लोक गनिमाला सामील होवून आपला स्वार्थ साधतील आणि आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतील
राजे सर्व सामान्य रयतेच्या भरवश्यावर आदर्श कारभार करू शकता आणि हे राज्य राखू शकता जैसा आम्हास आमच्या आऊसाहेब यांचा पूर्ण पाठींबा होता तैसेच आमचासुद्धा ठाम पाठींबा आहे आपण वेगाने हे काम वाढवावे आम्ही सर्व सैन्यास मावळा म्हणतो कारण जातीचा उल्लेख नामोनिशान मिटवणारा हाच तो शब्द इतिहास घडावेल मानवमुक्तीचा संदेश देईल मानवाला गुलामीतून मुक्त होण्यास अखंड प्रेरणा देईल
शिवरायांचा अजून एक दाखला देता येईल ती  म्हणजे प्रतापगड चे बांधकाम पूर्ण झाल्यावर हिरोजी इंदुलकर यांनी गडावर तुळजा भवानीचे मंदिर बांधण्यास घेतले मंदिर बांधून पूर्ण हि झाले आणि मंदिराच्या उद्घाटनाची वेळ आलि होती ते शिवरायांच्या हातून झाले पाहिजे म्हणून शिवराय यांना उद्घाटना साठी बोलावण्यात आले गडावर मंदिर बांधले ते फक्त श्रद्धेसाठी सैनिकांची श्रद्धा होती म्हणून महाराजांनी  कधी त्याला सार्वजनिक महत्व दिले नाही किंवा तसा कोणता उत्सव देखील केला नाही महाराज मावळ्यांना त्यांच्या श्रद्धा पाळावयास त=देत असत मात्र अंधश्रद्धेला अजिबात थारा देत नव्हते महाराज पक्के विज्ञानवादी आणि तर्कवादी होते
या उद्घाटन दिनाच्या दिवशी महाराज मासाहेब यांना घेवून प्रतापगडावर  आले नवीन बांधून झालेल्या गडावर राजांची करडी नजर असे आणि मंदिराच्या उदघाटन दिवशी राजे यांची नजर आपल्या मावळ्यांवर पडली तर मंदिराचे व मूर्तीची घडवणूक करणारे साईनाक महार राजांनी पहिले तर साईनाक आहेत राजांनी साइनाक महार यांना जवळ बोलावले आणि भवानी देवीच्या पालखीला खांदा द्यायला सांगितले पण त्यावेळी विश्वनाथ भट हडप यांनी राजांना सांगितले कि महाराज हि  अस्पृश्य माणसे यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल म्हणून विश्वनाथ भट याने साइनाक यांना थांबायला सांगितले आणि पालखीला पुढे जा सांगितले असता राजे कडाडले पालखी  क्षणभर देखील पुढे सरकता कामा नये व विश्वनाथ भट यांस सांगितले कि विश्वनाथ भट  काय म्हणालात आपण या लोकांच्या सावलीने देवीची मूर्ती भंग पावेल एवढी ताकद आहे यांच्या सावलीत भट इथे राजांनी या लोकांनी ज्यांची सावली पडते म्हणून विटाळ होतो त्या सावलीला शक्तिमान आहे का म्हणून सांगितले . राजे म्हणत आहेत आहो विश्वनाथ भट ऐसे असते तर अफजल खान याने यांच्याच सावलीचा वापर करून सर्व देवांच्या मुर्त्या फोडल्या नसत्या का त्याने सुतकी आणि हातोडे कशाला वापरले असते
आणि आपण ज्या देवीची मूर्तीची प्राण प्रतिष्टापणा करणार आहोत ती मूर्ती आणि हे मंदिर कोणी बांधले एकेक दगडाला छन्नि हातोड्याने आकार कोणी दिला याच हातानी ना यांच्याच  हातून हे  सारे घडले असता त्यांचा क्रीत्येकदा त्या मूर्तीस स्पर्श झाला असेल आता जर का याच हातानी सर्व काही केले असेल तर त्याच हातानी या देवीची मूर्तीच्या प्रतिष्ठापना का करू नये असा सवाल त्यांनी पुजाऱ्य ला विश्वनाथ भट याला केला त्यावर भट निरुत्तर झाला महाराज म्हणाले अरे हि  तर शुद्ध बेईमानी आहे अस्पृश्यांनी घडविलेले मंदिर चालते मूर्ती चालते परंतु त्यांची सावली पडली तर मंदिर व त्याचे पावित्र्य भंग पावते ज्यांच्या घामाने आणि रक्ताने हा देव घडला तो त्यांच्या सावली पडल्याशिवाय का आणि त्यांचा स्पर्श झाल्याशिवाय घडू शकला असता का जे लोक देवाला घडवण्याचे काम करतात त्याच लोकांना तुम्ही देवाचे दर्शन घेण्यावाचून वंचित ठेवता हे योग्य नव्हे विश्वनाथ भट देव घडविण्यात तुमचे योगदान काय आहे तर शून्य तरी हि तुम्ही देवावर हक्क सांगून झोळी भरायला मात्र पुढे येत आहात हि वृत्ती म्हणजे मानवी सभ्यतेला काळिमा फासणारी आहे . या साइनाक पुढे या आणि मूर्तीच्या पालखीला खांदा द्या आणि महाराजांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्टा साइनाक यांच्या हातून केली पण इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी कधी सांगितले नाही महाराजांनी तर अस्पृश्य म्हणून समजल्या जाणार्या लोकांकडून देवीच्या मूर्तीची प्रतीष्टापणा करून एक नवा समानतेचा संदेश या देशास दिला आणि महाराज यांनी सामाजिक रणांगणातील लढाई जिंकली होती या लढाई स पहिली म्हणणे शक्य नाही कारण या अगोदर राजे या लोकांच्या घरी जावून जेवण घेत असत एका ताटात जेवणारा राजा हा त्यावेळी एकच होता ते म्हणजे शिवराय शिवरायांनी जातीप्रथा अशी काय उलथून पडली कि  ब्राह्मण मंडळी च काय  जातीच्या लोकांना आपण श्रेष्ठ आहोत याचे भान राहू दिले नाही असा वचक निर्माण केला होता महाराजांनी अस्पृश्य निवारनेचे काम सर्व ठिकाणी केले आणि किल्ले गानिमांसाठी मात्र कायमचे अशक्य करून ठवले वेळप्रसंगी प्राण देतह होते प्न्ब किल्ला कधी दिला नाही फितुरीने कधी दिला नाहीच पण लढाईत सुद्धा दिला नाही . महाराजांच्या या सामाजिक सुधारणेचा किल्ले बांधणी मोहिमेतुन अस्पृश्यतेचे देशपातळीवर उच्चाटन करणारा किल्लेदार पुढे तीनशे वर्षाने जन्माला आला आणि त्याने खऱ्या अर्थाने महाराजाचांचे स्वप्न पूर्ण केले त्या स्वयंपूर्ण आणि हुशार किल्लेदाराचे नाव होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हजारो वर्षापासून चालत  आलेल्या गुलामगिरीच्या भिंती पाडल्या गेल्या भूमिपुत्रावरील परकीयांचे आक्रमण दूर लोटले गेल आणि मुलनिवाशी  बहुजन समाजाला त्यांचा हक्क  लागला आणि याच गोष्टीची नेहमी आठवण म्हणून आपल्या राजाचे नाव आपल्या लेटर हेड वर  हमेशा राहिले आहे पण काही लोक ते नाकारत आहे आणि त्यासाबंधीचे अप्रकाशित साहित्य लोकांपुढे येवू दिले जात नाही कारण बाबासाहेब हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात म्हणून एकीकडे हा खेळ केला जात आहे महाराजाची वतनदार  यांच्यावर नजर होतीच म्हणून  त्यांनी वतन खालसा केले पगारी नोकर ठेवले असे पगारी नोकर ठेवणारा राजा म्हणून नागवंशी राजा म्हणून शिवराय नागवंशी सम्राटांच्या यादीत अगदी वरचढ ठरतात महाराज वारसा प्रमाणे कोणालाच  जहागिरी देत नव्हते आणि एका प्रदेशात एकच अधिकारी जास्त काल ठेवत हि नसत
महाराज यांनी आपल्या सैन्यात जे खाजगी पथक होते त्याचा प्रमुख नार नाक याची निवड केली  शिवरायांनी समुद्रावर आरमार बांधून समुद्र उल्लघन या बंदिस प्रथम  तडा दिला  आणि समुद्रावर पहिले वर्चस्व बांधल आणि इतक प्रबळ बांधले कि दर्यावर हुकुमत फक्त आणि फक्त राजांची होती असे शिवरायांच्या कार्याची थोडक्यात  माहिती  अशी अनेक उदाहरणे आहेत अनेक प्रसंग आहेत कि शिवरायांची जाती फेकून देण्यास फार मोलाची कामगिरी केली म्हणून आज शिवराय इतिहासात अमर आहेत
संभाजी राजांनी सुद्धा आपल्या [पित्याप्रमाणे जाती मुलासहित फेकून दिल्या पुढे संभाजी राजांचा सुद्धा जाती विच्छेदन यावरील भाग पाहू या
जय शिवराय जय भीमराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र