बुद्धी स्वातंत्र्याचा जनक तथागत गौतम बुद्ध



बुद्धी स्वातंत्र्य देणारा जगातील पहिला धर्म संस्थापक म्हणून जग तथागत बुद्धाकडे पाहते अडीच हजार वर्षापूर्वी मानवाला जे  विचार स्वातंत्र्य दिले ते तथागत बुद्धांनी कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून स्वीकारा अशी शिकवण तथागत बुद्धांनी दिली तसेच मानव समाजाची जडण घडण सुरु झाली अशावेळी ईश्वरवादी धर्मानी मानवाच्या बुद्धीची कुलुपे लावण्यास सुरुवात केली कुणी हि कधी हि न पाहिलेला ईश्वराच्या माध्यमातून मानवाला अज्ञान व अंधश्रद्धेच्या दरीत ढकलण्याचे काम केले ईश्वरवादी धर्मग्रंथात जे लिहिले आहे ते मानण्यास अनेक उपायांनी बांध्य केले धर्मग्रंथ हे ईश्वराने लिहिले आहेत असे शिक्षणाचा मज्जाव असलेल्या बहुसंख्य बहुजन जनतेला ते खरे मानण्यास भाग पाडले व यासाठी इथे अनेक शिक्षांची तरतूद करण्यात आली नरकाची भीती घातली गेली बुद्ध धम्म वगळता इतर ईश्वरप्रणीत धर्म मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देण्यास सक्त मनाई करते चला आपण या धर्माचे मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देण्यास का नाकारत आहे ते पाहूया प्रथम आपण वैदिक धर्माबाबत पाहूया काय वैदिक धर्म मानवाला बुद्धी स्वातंत्र्य बहाल करते का ?
मुलात आपण पाहिलं तर हे न समजलेला विषय शाळेत शिक्षकाला विद्यार्थी विचारतात पण वैदिक धर्माचा हिंदू धर्माचा ग्रंथ मनुस्मृती म्हणतो कि प्रश्न विचारणारे नास्तिक आहेत जो मनुष्य तर्कशास्त्राच्या आधारावर वेद आणि धर्मशास्त्रावर का आणि कसे असे  विचारतो तो नास्तिक आहे त्याचा सामाजिक बहिष्कार करण्यात यावा पहा श्लोक
'' यो वमन्येत ते मुले हेतूशास्त्राश्रयाद जि ।
सा साधूभिर्बहिष्कायो नास्तीको वेदनिन्दका ।। मनुस्मृती  २/ ११
या पुढे जावून मनूचा कायदा म्हणतो कि तर्कशील व्यक्तीला पापी ठरवताना म्हणतो तर्कशील व्यक्ती नास्तिक आहे आणि नास्तिकता मनूच्या दृष्टीने पाप आहे म्हणजेच नास्तिक पापी आहेत पहा श्लोक
'' नास्तिक्यं उपपातकम ।। मनुस्मृती ११/६६
आता असे ला म्हणण्या आले हे कायदे का कारण वैदिक आर्य धर्म यांनी हिंदू धर्म माणसाला बुद्धी स्वातंत्र्याचा हक्कच देत नाही असे यांचा एकच धर्मग्रंथ म्हणत नाही तर पहा गीतेत कृष्ण म्हणत आहे अर्जुनाला सांगतोय जे अज्ञानी आहेत ते दुनियेतील कामात मग्न आहेत त्यांच्यात बुद्धिभेद करू नकामूर्खाना मुर्ख राहूद्या त्यांना असे सांगू नका तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात विद्वान आणि कर्मयोगी स्वतः काम करावे पण मूर्खाना त्यांच्या कामात लावून ठेवावे पहा श्लोक
'' न बुद्धी भेदं   जनयेज्ञानां कर्मर्सानिम ।
जोषयेत्सर्वकर्मांनी विद्वान्युक्त : समाचारन ।। गीता ३/२६
आता कृशांच्या तोंडी असणारे असे वक्तव्य एका ईश्वराला शोभणारे दिसते का असा कसा भगवान जो माणसात  भेद निर्माण करतो
आता  यापुढे कठोनपिषद १३-२-३ मध्ये ब्रह्माला कोण प्राप्त करू शकत नाही हे सांगताना म्हटले आहे कि त्या ब्रह्माला प्रवचनानि जास्त ज्ञानाने व्यक्ती प्राप्त करू शकत नाही पहा श्लोक
न्यायत्मापा प्रवचनैन लभ्यो न मेघया न बहुना श्रुतेन ।। कठोनपिषद १३-२-३
बुद्धीची साथ सोडून देण्याविषयी कठ उपनिषद ऋचा १-२-९ सांगते कि बुद्धिवादी लोक ब्रह्मज्ञान आय्प्ग्य ते ब्रह्मज्ञानापर्यंत पोहचू शकत नाही जोपर्यंत ते बुद्धीची साथ सोडत नाही पहा श्लोक
'' नैषा तर्केन मत्ति रापनैया । कठ उपनिषद १-२-९
बुद्धिवादी ,म्हणजे ज्ञानी ते ब्रह्मज्ञान प्राप्तीस अयोग्य ठरतात म्हणजे मूर्ख लोक उणी अज्ञानीच ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतात विद्वान व्यक्तींना ते शक्य नाही  आता कृष्ण तर गीतेत सांगतो ऐका नाही तर नष्ट व्हाल असा धाक दाखवण्याचा प्रयत्न गीतेत अध्याय ३-३२ मध्ये म्हणतो कि माझे मत अवश्य  माना जो मानत नाही ते मूर्ख आहेत ते नष्ट होतील पहा श्लोक
'' ये त्वेतदश्यसुयन्तो नानुतीष्टांती मे मतम
सर्वज्ञान विमुढांस्तान्विध्दि नष्टान  चेतस ।। गीता ३-३२
 ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात सुद्धा असाच धाक देण्यात आलेला आहे धाक देण्याची पाली ईश्वरवादी धर्मावर का येत तेच समजत  नाही तर्कशील व्यक्तीचा शब्दाने हि सन्मान करू नये असे सांगताना मनु  आपल्या कायद्यात म्हणतो तर्कशील व्यक्तीचा शब्दाने हि सन्मान करू नये कारण ती व्यक्ती वेद आणि धर्मग्रंथावर का आणि कसे असा तर्क लढविल पहा श्लोक
'' हेतुकण वाडमात्रेनापी नाचंयेत ।। मनुस्मृती ४-३०
आपण वैदिक धर्मातील धर्मग्रंथ मानवाच्या बुद्धी स्वातंत्र्याला प्रखर विरोध करताना पाहायला मिळतात वैदिक धर्मग्रंथ तर्कवादी लोकांना धाक देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपणाला पाहायला मिळते
१} जो तर्क करतो तो नास्तिक आणि बहिष्कृत ठरतो
२} जो तर्कशिल आहे तो नास्तिक आणि पापी आहे
३} अज्ञानी ना अज्ञानीच राहू द्या त्यांना डोळस करू नये
४}फक्त निर्बुद्धच ब्रह्मज्ञानापर्यंत पोहचू शकतात ज्ञानी व्यक्ती नाही
५} बुद्धीची साथ सोडल्याने ब्रह्मज्ञान प्राप्त होते
६} जे कृष्णाचे ऐकत नाहीत ते मूर्ख व नष्ट होणारे आहेत
७} तर्कशिल व्यक्तीचा शब्दाने हि सन्मान करू नये
अशा प्रकारे वैदिक धर्मात बुद्धीजीवी मानवाचा तर्कशिल मानवाला काडीची हि किंमत नाही परंतु वैदिक धर्मात अज्ञानी मूर्ख व्यक्तींचा सत्कार केला जातो म्हणजेच बुद्धी स्वातंत्र्य नावाला हि देत नाही असा हा वैदिक धर्म आपण पहिला
आता इसाई धर्माबाबत पाहूया
यहुदीच्या ओल्ड् टेस्टामेंट मध्ये धर्मगुरू मुसा म्हणतात कि ईश्वराची आज्ञा झाली कि मी त्यांनी सांगितलेल्या धर्माची स्थापना करावी जो ईश्वराचा माझ्याद्वारे दिलेला संदेश मानणार नाहीत तो दोषी ठरेल परमात्मा त्याला दंड देईल मीच सर्वकाही आहे असे सांगताना बायबल न्यू टेस्टामेंट मध्ये येशु मशिहा म्हणतो मीच कर्ता आहे मीच प्रकाश आहे मीच पुनरुस्थान आहे जीवन आणि सत्येतेचा मार्गच मी आहे माझ्या सहाय्याशिवाय कुणी हि परमेश्वराजवळ जावूच शकत नाही { बायबल जॉन १४-६ व यहुन्ना }
नष्ट व्हायचे नसेल तर येशु वर विश्वास करावा हे सांगताना नवा नियम यहुन्ना ३-१६,७,१८, व ३६ मध्ये सांगितले आहे कि परमेश्वराने एक पुत्राला जगासाठी पाठविले आहे जेणेकरून जो कोणी ईश्वराच्या पुत्रावर विश्वास करील तो नष्ट होणार नाही त्याला आयुष्य खूप लाभेल  इथे ईश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवेल त्याला खुप आयुष्य आहे त्याला दंड हि मिळणार नाही  पण प्रत्येक गोष्टीला तर्काच्या आधारावर का व कशे असे विचारील तर तो दोषी ठरतो जो त्याला नाकारतो त्याला आपले जीवनही पाहता येणार नाही ईश्वराच्या कोप होईल ना ना धमक्या दिल्या जातात
यापुढे जावून येशु सांगतो मानवाची निंदा  नालस्ती केली तरी चालते पण आत्म्याची निंदा करू नये आत्म्याची निंदा करणाऱ्याला क्षमा नाही पवित्र आत्म्याचा विरोधात कोणी काही म्हटले तर त्याचा अपराध या लोकात नाही तर परलोकात हि क्षमा केल्या जाणार नाही इतकी भीती येशु का घालतो याचा उलघडा आपल्याला लगेच होतो कारण येशूचा जन्म पवित्र आत्म्यापासून झाल्याचे बायबल सांगते म्हणूनच येशूला हि धमकी देण्याची गरज पडली अन्यथा अशी धमकी का घातली दिली असती मुळात परलोक स्वर्ग नरकलोक हे पार्शिया देशातील प्रांत आहेत हे पार्शिया चा इतिहास पाहता   लक्षात येते पुढे येशु म्हणतो माझ्यावर जो विश्वास ठेवणार नाही तो ईश्वराच्या दोषी ठरतो त्याला दंड दिला जातो हे सुसमाचाराला मानत नाही त्याचा बदला घेतला जाईल हे सांगताना बायबल { नवा नियम } थिक्सलुनिकियो मध्ये सांगण्यात येते जो परमेश्वराला ओळखत नाही येशूच्या संदेशाला मानत नाही ते त्याच्या शक्तीच्या तेजाने दूर होवून अनंत काळापर्यंत विनाशाचा दंड भोगतील
अशी अनेक धमकी इसाई धर्मात घालण्यात येते ज्याला खुद्द येशु मशिहा ने सुद्धा पहिले नाही अश्या ईश्वरावर कोणताही विचार न करता विश्वास ठेवावा  कोणतेच बुद्धी स्वातंत्र्य देण्यास इसाई धर्म तयार नाही धमकी आणि धाक याच्यावर सार काही आधारलेलं आहे कधी स्वतःच्या बुद्धीचा कोणताच वापर करण्याची अनुमती देण्यास येशु तयार नाही पहा
१} ईश्वराच्या  आदेशाने जो धर्म स्थापन केला आहे तो संदेश म्हणून मानलाच पाहिजे हि मानवावर जबरदस्ती नाही का
२] कृष्णाप्रमाणे इथे येशु सुद्धा म्हणतो कि सर्व काही मीच आहे मग येशु देवाचा पुत्र का सांगतो हाच प्रश्न निर्माण होतो
३]  येशूवर जर विश्वास ठेवला तर नष्ट होणार नाही त्याला खूप आयुष्य भेटेल मग येशु ईश्वरावर विश्वास ठेवण्यास का भाग पडतो
४] आत्म्याची निंदा करणाऱ्याला क्षमा नाही
५] जो येशूच्या सुसमाचाराला मानणार नाही त्याचा बदला घेतला जाईल इतकी धमकी का दिली
६] येशूवर विश्वास न   करणारा दोषी ठरतो
इथे मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देण्यास स्पष्ट नकार देताना आपल्याला खिश्चन धर्म दिसतो
आता इस्लाम धर्माविषयी पाहूया
इस्लाम धर्माची स्थापना बौद्ध जैन इसाई व हिंदू धर्मा नंतर आहे त्यामध्ये मनुष्याला कोणते बुद्धी स्वातंत्र्य दिले आहे का हे जाणून घेवूया
प्रथम कुरण जे लिहिले आहे ते मी उतरवले आहे त्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल { कुराण  बकर सुरह -१ }
हे कुराण या प्रकारचे नाही कि अल्लाहच्या शिवाय आम्हाला कोणी बनविले आहे {सुअर  २६ सु -११ } हे कुराण विश्वाच्या ईश्वराने सांगितले आहे {शुअर २६ सु. ११ } या पुढे जावून कुराण मध्ये सांगितले जाते कि  जे लोक अल्लाह आणि त्याचा पैगंबर हजरत मुहम्मद शी भांडतात आणि त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत त्यांची सजा हीच आहे कि ते मारून टाकले पाहिजे त्यांना सुळावर लटकवावे त्यांचे हात पाय कापले जावेत
[ कुराण सुरह ५ मायदा आ. ६} अल्लाचे नाव जे पूर्ण दयावान व उपकार कर्ता आहे कुराण जे पुस्तक आहे त्याचा रचियता ईश्वर आहे यात काहीच  संदेह नाही यावर विश्वास ठेवणाऱ्याला हे नवा मार्ग दाखविते  {सुरह बखर } आकाश आणि जमिनीवर अशी कोणतीच गोष्ट लपवलेली नाही जी कुराण मध्ये नाही { सुरह नम्ल  }
अल्ला विश्वाच्या आरंभापासून आहे आणि राहील तो प्रत्येक वस्तूचा सर्जनकर्ता आहे सृष्टी त्यांचीच निर्मिती आहे सर्व विश्वाची निर्मिती व्यवस्था सुद्धा तोच पाहतो यापुढे जावून अल्लाची गुणव्यवस्था सांगतात तो अवज्ञाकरी व शिरजोरावर सूड उगवणारा आहे जगात उपास्य केवळ तोच आहे यापुढे जावून त्याच्याशिवाय जगात दुसरा कोणी ईश्वर नाही यांनी इस्लाम मध्ये सुद्धा मानवाला कोणतेच बुद्धी स्वातंत्र्य देत नाही  यामध्ये आपण पाही कि कसे धमकी दिली जाते कोणते कारण आहे कि इस्लाम मध्ये इतकी धमकावण्याची गरज का भासली
१] कुराण हे कधी हि न पाहिलेल्या अल्लाने बनवले आहे  त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलाच पाहिजे अन्यथा तो व्यक्ती दंडास प्राप्त होतो
२] अल्ला ने जगाच्या भल्यासाठी आपला प्रेषित महम्मद पैगंबराला पाठवले आहे व जे पैगंबर सांगत असेल तर खुद्द अल्लाने सांगितल्याप्रमाणे ते ऐकलेच पाहिजे न ऐकणाऱ्या अतिशय कडक शिक्षा दिली जावी ती केलीच पाहिजे
३] या जगाची या विश्वाची निर्मिती करणारे एकमेव अल्ला आहे अल्लाने या विश्वाची निर्मिती केली आहे कशी केली आणि कशातून केली हे विचारण्याची परवानगी इस्लाम मानवाला देत नाहीत
४] अल्ला हा जो पैगंबर व त्याची आज्ञा पळत नाही अश्या अवज्ञाकारी व शिरजोर सूड उगवतो म्हणजे जो या अल्लाची आज्ञा मानत नाही त्याचा बदला अल्ला घेतो त्याच्यावर सूड उगवतो म्हणजे बुद्धीजीवी लोकांना शिक्षा करतो
५] जगामध्ये जर कोण पूजनीय असेल तर फक्त अल्लाच आहे त्याच्याशिवाय या जगात पूजनीय कोणीच नाही मग पैगंबर आपली पूजा करा माझ ऐका म्हणण्याचा का आटापिटा करतो
६] जगात अल्ला हाच ईश्वर आहे म्हणजे जगात दुसरा कोणता ईश्वर  हे आपण मानलेच पाहिजे ज्याला आपण पहिलेच नाही
७] अल्ला हा दयाळू आहे उपकार कर्ता आहे तरी हि तो विश्वास  न ठेवणाऱ्या लोकांना शिक्षा करतो यामध्ये खुद्द पैगंबर सुद्धा पाहिले नाही सुद्धा ईश्वरावर विश्वास ठेवलाच पाहिजे
आता आपण पहिले कि कोणतेच बुद्धी स्वातंत्र्य देण्यास इस्लाम तयार नाही उलट ईश्वरावर प्रश्न निर्माण करणाऱ्याला धमकी दिली जाते बुद्धीचा वापर करण्यास स्पष्ट नकार दिसतो
बुद्धी स्वातंत्र्याचा जनक तथागत बुद्ध :
तथागत भगवान गौतम बुद्ध मानवाला आपल्या बुद्धी स्वातंत्र्य देताना बुद्ध सांगतात जे कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्या आणि मगच स्वीकारा   सांगतोय म्हणून स्वीकारू नका आपल्या बुद्धीला पटेल तरच ती गोष्ट स्वीकारा बुद्धाने  मनुष्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे आता बुद्धाची बुद्धी स्वातंत्र्याचा जाहीर नामा म्हणजे कालाम सुत्त  आपण याची थोडक्यात माहिती घेवूया
कालाम लोक तथागत बुद्धाना भेटायला आले व त्यांनी बुद्धाना काही प्रश्न विचारले भगवान केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडताना आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा करतात ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करीत म्हणतात दुसऱ्यांचे मत हीन आहे त्यांची संभावना करतात त्याच प्रकारे दुसरे श्रमण ब्राह्मणही येतात आणि आपापल्या धर्म समजुतीचे प्रवचन करतात आणि महिमा गातात परंतु त्याच प्रमाणे ते दुसऱ्या धर्म समजुतीचे खंडन आणि निर्भिर्त्सना करतात आणि म्हणून भगवान त्या श्रमन आणि ब्राह्मण यांच्यापैकी कोणाचे सत्य मानायचे आणि कोणाचे असत्य मानायचे हेच आम्हाला समजत नाही यावर भगवान म्हणाले कालामानो तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका आहे याला योग्य कारण आहे हे कालामानो जी गोष्ट वारंवार ऐकल्याने तुमच्या मनात ती पक्की बसलेली आहे तिच्यामागे जावू नका हे परंपरा आणि अफवांच्या  मागे जावू नका जी गोष्ट धर्मग्रंथात आहे तिच्यामागे जावू नका कोणता संदेह आणि शान्काच्या मागे जावू नका स्वतः सिद्ध समजल्या जाणाऱ्या गोष्टींच्या मागे हि जावू नका कुणी संन्याशी किंवा भिक्षु आपला गुरु आहे म्हणूनही त्याच्या मागे जावू नका हे  कालामानो जेव्हा तुम्हाला स्वतः माहित असेल कि अमुक गोष्ट वाईट आणि अमुक वस्तू दोषपूर्ण होते तर ते  तुम्ही सोडून द्यावे हे कालामानो जेव्हा मनुष्यात लोभवृत्ती जन्म घेते तेव्हा तिने आपले चांगले होते या  वाईट होते कालामानो तुमचा काय विचार आहे त्यावर कालामांचे उत्तर भंते वाईट  होते कालामानो जी व्यक्ती लोभात पडते तिच्या मनाला लोभाने जिंकलेल असते आणि त्यावेळी ती व्यक्ती कोणाचाही प्राण घेते व्यभिचार चोरी असे अनेक गुन्हे करते व दुसऱ्यांना हि करण्यास प्रवृत्त करते काय हे त्यांच्या विनाशासाठी पुरेशे नाही का पुरेसे आहे भंते कालामानी म्हटले
कालामानो जेव्हा मनुष्यात कुणाचे प्रती घृणा निर्माण होते तेव्हा त्यांच्या चांगल्यासाठी असते कि वाईटा साठी असते  यावर आपले मत काय आहे भंते ती त्याच्या वाईटासाठीच असते
कालामानो जी व्यक्ती घृणेचे स्वाधीन आहे तिचे मन घृणेने जिंकले आहे ज्या बाबतीत भ्रम निर्माण झाला आहे चोरी व व्याभिचार करणे आणि खोटे बोलताना संकोच करीत नाही आणि ती दुसऱ्याला तसे करण्यास प्रोत्साहन देते काय हे सर्व तिच्या वाईट करण्यासाठी तिचे नुकसान होण्यासाठी आणि तिचा विनाश होण्यासाठी पुरेशे नाही का बुद्ध विचारतात यावर कालामांचे उत्तर होय भन्ते पुरेशे आहे  कालामानो ह्या गोष्टी चांगल्या आहेत कि  वाईट आहेत भन्ते वाईट गोष्टी आहेत कालामांचे उत्तर आले अशा प्रकारे तथागत बुद्धांनी कालामाना सांगितले जो गोष्ट तुम्हाला हितवाह दिसेल ज्या गोष्टीला तुमची स्वतःची संमती असेल तर त्या गोष्टीला स्वीकारा बुद्धाचे हे वचन त्यांचा मनुष्य प्राण्याला बुद्धी स्वातंत्र्य बहाल केल मनुष्याला
आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्यास अनुमती देणारे जगातील पहिले धर्मसंस्थापक तथागत बुद्ध आहेत
 सत्याचा आणि बुद्धी स्वातंत्र्याचा वाचननामा म्हणजे कालामा सुत्त :
ईश्वरवादी धर्माच्या बुद्धी पारतंत्र्यात बुद्धाचे कालाम सुत्त सुजलाम सुफलाम असा भाग आहे बुद्धाने अडीज हजार वर्षापूर्वी सांगितलेले मानवाला अत्त दीप भव सांगून जीवनाचा मार्ग दिला तो आज हि तितकाच प्रभावशाली आहे आणि बुद्धाचा कालामाना दिलेला संदेश त्याकाळी जितका उपयोगी होता तितकाच आज आहे आणि यापुढे हि तितकाच महत्वाचा असणार आहे जोपर्यंत या जगात असत्य आहे तो पर्यंत बुद्धाचा हा बुद्धीचा  जाहीरनामा जगात अस्तित्वात कायम राहील बुद्धाचे कालाम सुत्त म्हणजे मानवाच्या बुद्धी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे मानवी वैचारिक स्वतंत्र्यता सत्ततेप्रत जाण्याची अभेद्य निशाणी आणि विश्वाच्या दर्शन शास्त्रात मानवतेच्या इतिवृत्तात स्वर्णाक्षरांनी लिहाण्यायोग्य असा असा दस्ताऐवज आहे यांच्याद्वारे सत्यापर्यंत सहज पोहचवता येते आणि असे हे बुद्धाचे कालाम सुत्त म्हणजे बुद्धाच्या बुद्धी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे
बुद्धाच्या महापरी निर्वाणा च्या अगोदर बुद्धाने आनंदाला जोर देवून सांगितले होते आनंदा मी सांगितलेला मार्ग हा जन हिताय आहे जर उद्या कोणी माझ्या पश्चात कोणी माझे नाव घेवन सांगत असेल कि हा मार्ग मी सांगितला आहे तर त्याचा शब्द चुकूनही माझा शब्द आहे असे मानु नका स्वताचे दीपक स्वतः बना कुण्या दुसऱ्याला सहा पाहू नका आणि त्या प्रकाशात  पुढे जा येथे बुद्धाने परत एकदा मनुष्याला बुद्धी स्वातंत्र्य बहाल केले आहे कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून मगच स्वीकारा केवळ मी म्हणतो म्हणून सुद्धा कोणतीच गोष्ट स्वीकारू नका इतके औदार्य कोणताच धर्म दाखवत नाही केवळ भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो
अश्या पद्धतीने बुद्धाच्याच मार्गात आपल्याला मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देताना दिसतो इतर कोणताच धर्म आपल्याला बुद्धी स्वातंत्र्य देत नाहीत केवळ भीती आणि धमकी देण्याचा प्रयत्न करतात केवळ न पाहिलेल्या गोष्टीव्बर अंध होवून विश्वास ठेवा मी काही सांगितले तरी ते तुम्हि ते मान्य केलेच पाहिजे अन्यथा विविध भयानक शिक्षा सांगितल्या जातात मानवाला केवळ भीती आणि अंधश्रद्धेच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो याच्या शिवाय कोणताच पर्याय नाही कि  तुम्ही स्वताची बुद्धी वापरण्याचा प्रयत्न कराल कोणताच धर्म तुम्हाला तशी अनुमती देत नाही केवळ बुद्धाचा धम्म सोडला तर इतर ईश्वरवादी धर्म माणसाला कोणतेच बुद्धी स्वातंत्र्य देत नाही म्हणून जगात बुद्धी स्वतंत्र्य देण्याचा पहिला मार्गदाता कोण असेल तर ते तथागत बुद्ध ज्यांनी जगाला करुणेच्या मार्गातून सम्यक दृष्टीकोन दिला म्हणून आज जगाला हि बुद्ध हवा आहे
आपण वर पाहिलेल्या प्रमाणे मानवाला स्वताच्या  बुद्धीचा वापर करण्याचा परवाना बुद्ध धम्माशिवाय  कोणताच ईश्वरवादी धर्म देत नाही म्हणून आज  जगात लोकांना विज्ञान जे सांगते त्याच्याशी निगडीत असा एकाच धम्म  दिसतो तो म्हणजे धम्म बुद्धाचा म्हणून अभिमान असू द्या कि बुद्धिष्ट असल्याचा

जय शिवराय जय भीमराय














टिप्पण्या

अमित म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
अमित म्हणाले…
अरे जय शिवराय म्हणतोस ..शिवाजी महाराज सुद्धा हिंदू - मराठा होते आणि ते हिंदू धर्माच्या सर्व परंपरा पाळत होते ..म्हणजे फक्त नावाला म्हणतोस काय जय शिवराय ..तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप फरक आहे रे ..हिंदू धर्मात धाक दिला आहे कुकर्म करू नये म्हणून ..जसे चोरी , लबाडी , खोटेपणा आणि बरेच काही ..आधी समजून घ्या
अरे मित्रा पहिला अभ्यास कर काय चुकीच् आहे त्यात सत्य झोंबते नाही का शिवराय हिन्दू होते पण समता पाहणारे होते शिवाय त्यानी हिन्दू धर्माचा राज्याभिषेक नाकारला आहे मग कैसे म्हणायचे की ते हिन्दू मराठा होते कैसे आणि हिन्दू मराठा असा शिवरायनचा कधी पासून म्हटले आहे ते तपासून घ्या अभ्यास कच्चा आहे आपला इतिहास पाहून घ्या
अरे पण मी काय चुकीच् लिहल आहे सांग ना हिन्दू धर्म कोणत्या ग्रंथात का नाही सांगू शकशील का मित्रा
अरे मित्रा पहिला अभ्यास कर काय चुकीच् आहे त्यात सत्य झोंबते नाही का शिवराय हिन्दू होते पण समता पाहणारे होते शिवाय त्यानी हिन्दू धर्माचा राज्याभिषेक नाकारला आहे मग कैसे म्हणायचे की ते हिन्दू मराठा होते कैसे आणि हिन्दू मराठा असा शिवरायनचा कधी पासून म्हटले आहे ते तपासून घ्या अभ्यास कच्चा आहे आपला इतिहास पाहून घ्या
शिवरायांचा इतिहास वाच शिवराय यांच्या धर्माचे कधीच गोडवे गायले नाहीत आणि कधी कोणत्या लोकांसाठी धर्म सांगितला नाही शिवराय हे समता नांदावी म्हणूनु प्रयत्नशील होते कारण त्यावेळी असणारी परिस्थिती वेगळी होतो त्यामुळे हा बदल दिसतो

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र