ओबीसी
ओबीसी म्हणजे काय : ओबीसी म्हणजे इतर मागास वर्ग म्हणजे हा वर्ग पुढारलेला नाही म्हून तप मागासलेला मनाला जातो भारतात बहुसंख्य लोक आहेत त्या समाजापैकी जो जास्त मागास आहे त्यांना मुख्य मागास म्हटले जाते त्या पेक्षा कमी मागास असलेल्यांना इतर मागास म्हटले जाते भारत देशात समाजात साडे सहा हजार जाती जमाती आहेत आणि या सर्व जाती जमाती पाच वर्गात विभागल्या आहेत भारतीय समजाचे पाच स्तर आहेत ते चार + एक = पाच असे आहेत हिंदू धर्मानुसार यांना वर्ण म्हटले जातात त्यातल्या चार वर व्यवस्थेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र असे आहेत आणि शुद्रामध्ये ओबीसी गणले जातात या ओबीसी मध्ये अनेक जाती येतात त्यात कुणबी माली कोळी कोष्टी तेली भावसार वाणी शिंपी नाभिक पारित गवळी जंगम पांचाल फुलारी सुतार रंगारी लोहार कासार सोनार धनगर आगरी भंडारी तांडेल तांबट मोमीन घडसी विणकर अश्या जाती ओबीसी मध्ये मोडतात
ओबीसी समाज का मागास राहिला : ओबीसी समजाचा आजतागायत फारसा विकास झालेला नाही हि वस्तुस्थिती आहे याला असंख्य कारणे आहेत त्यातले महत्वाचे कारण म्हणजे वर्ण व्यवस्था व त्यावर आधारलेली शेकडो वर्षाची समाज व्यवस्था आणि धर्म व्यवस्था आहे खरे तर या गोष्ठी नवीन नव्हत्याच ६० वर्षापूर्वी संविधान लागू झाल्यानंतर कल्याणकारी लोकशाही समाजवादी राज्यव्यवस्थेचा प्रभाव तच्यावर पडू लागला {आणि हेच उच्चवर्नियांचे मोठे दुख आहे या दुखापोटि ते भारतीय राज्य घटनेवर नाराज आहेत ओबीसी समाजाच्या विकासासाठी उचलल्या जाणार्या प्रत्येक पावलात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतात }
ओबीसी समाज्याच्या उद्धारासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे असे म्हटले जाते काय आहे हे योगदान : हा विषय फार व्यापक असल्याने इथे या दोघांच्याही योगदानाचे स्वरूप अगदी थोडक्यात सांगण्या सारखे नाही आहे महात्मा फुलेंनी आपले सबंध आयुष्य बहुजनांच्या कल्याणासाठी केवळ वेचले नाही तर अक्षरश: झिजवले हे आता सर्वांनाच माहित आहे महात्मा फुले स्वत शेतकरी होते बहुजनाच्या जीवनाशी ते तादात्म्य पावले होते त्यांना शेतकऱ्यांच्या विरत दुखाची दैन्य दारिद्र्याची पूर्ण कल्पना होती शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब इशारा सत्सार तृतीय रत्न इत्यादी पुस्तकात त्यांनी बहुजन समाजाच्या प्रश्नांना आधुनिक भारतच्या इतिहासात पहिल्यांदाच वाचा फोडली एक विलक्षण पोटतिडकितुन त्यांनी शेतकऱ्यांचे अस्पृश्यांचे स्त्रियांचे एवढेच नव्हे तर ब्राह्मण समाजाचेही अनेक प्रश्न ऐरणीवर मांडले
बहुजन समाजाच्या मागासलेपणाचे मुलभूत कारण अविद्या आहे हे सर्वात प्रथम महात्मा फुल्यांनी सांगितले कष्टकरी / शेतकरी / शुद्र समजावर ओढविलेले सर्व अनर्थ एका अविद्येने केले हे त्यांचे प्रसिद्ध विधान म्हणजे शुद्र समाजाच्या मागासलेपणाच्या आजाराचे केलेले अचूक निदान होय वैदिक हिंदू धर्माने शूद्रांना विद्या घेण्यास बंदी घातली होती त्यामुळे शुद्रावर हि आफत ओढवली हे महात्मा फुल्यांनी ओळखले होते म्हणूनच हिंदू नावाच्या धर्म रुपी कारास्थ्यानाविरुद्ध त्यांनी भेदक रणसंग्राम पुकारला
स्त्री शुद्र अतिशुद्र्ना विद्या घेण्याचा अधिकार नाही हा हिंदू धर्माचा वर्षानुवर्षे पाळला जाणारा आदेश त्यांनी धाब्यावर बसवून ब्राह्मणी दहशतीला अजिबात न घाबरता त्यांनी पुण्यात मुलींसाठी तसेच दलित बहुजन ओबीसी समाजासाठी शाळा काढली धर्म बुडाला म्हणून या उपक्रमाला म्हणून या उपक्रमाला वैदिक धर्म रक्षकाकडून प्रचंड विरोध झाला त्यानंतर त्यांच्यावर मारेकरी पाठवण्यात आले सावित्रीवाई यांच्या तर अंगावर शेन आणि दगड मारण्यात आले पण फुले पतीपत्नी जराही मागे हटले नाही निर्धाराने त्यांनी आपले काम तडीस नेले १८८२ साली हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात महात्मा फुले यांनी बहुजन समजाच्या शिक्षणासंदर्भात अत्यंत बहुमुल्य आणि क्रांतिकारक अश्या सूचना केल्या या सूचना इतक्या मूलगामी होत्या कि त्यांची प्रभावी अमलबजावणी झाली असती तर आज बहुजन समाजाचा विकास कितीतरी उंचावला असता परंतु त्यावेळी ब्रिटीश सरकारला ज्योतीबांच्या या सूचना अमलात आणणे श्याकच झाले नाही सार्वत्रिक आणि सक्तीची प्राथमिक शिक्षणाची तपशीलवार आवश्यकता आणि योजना त्यांनी त्यात मांडली होती आणि सरकारच्या अनिच्छेवर व अपुर्या प्रयत्नांवर प्रहार करून बहुजनांच्या शिक्षणासाठी जोरदार आग्रह धरला होता
शेटजी आणि भटजी यांच्या युतीने इथल्या शुद्रांची कशी पिळवणूक आणि फसवणूक चालवली आहे याचे हृदय द्रावक चित्र पहिल्यांदा त्यांनीच जगासमोर आणले त्यांनी ब्राह्मणी शोषण व्यवस्थेवर निकराचा हल्ला केला आणि स्त्री शुद्र यांना गुलामीची जाणीव करून दिली ब्राह्मणी क्व कसा असतो तो कसा ओळखावा आणि उधळून लावावा यासंदर्भात त्यांनी बहुजन समाजाला अतिशय उत्तम मार्मिक मार्गदर्शन केले गेल आहे महात्मा फुल्यांची ग्रंथ संपदा वाचल्यावर त्यांनी कोणती मूलगामी आणि किती घनघोर होती याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही
ओबीसी समाजाचे आजचे मुख्य प्रश्न कोणते : ओबीसींचे प्रश्न आहेत महत्वाच्या आणि मुख्य प्रश्नांचा उल्लेख इथे करता येईल ज्ञान विज्ञान विरोधी मानसिकता आणि ठेविले अनंते तैसेचि राहणे असा जीवनाचा दृष्टीकोन हा ओबीसींचा सर्वात मुलभूत प्रश्न आहे हा पूर्णतः मानसिक प्रश्न असून तो हिंदू धर्मव्यवस्था परिणाम आहे आपण कोण आहोत यासंबंधी आत्मभान नसणे हा दुसरा महत्वपूर्ण प्रश्न आहे धार्मिक सांस्कृतिक प्रश्न आहे हाही हिंदू धर्म व्यवस्थेच्या प्रभावाचाच होय मागच्या काही वर्षात ओबीसींना काही प्रमाणात राजकीय भान येत असले तरी धार्मिक आणि सांस्कृतिक भान अद्याप आलेल नाही ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेल्या सत्यासोधक समाजाच्या माध्यमातून बहुजन समाजात अभूतपूर्ण जागृतीला प्रारंभ झाला परंतु त्याचा फायदा मराठ्यांनी करून घेतला ओबीसी मात्र मागेच राहिला अनेक प्रश्न आहेत भूतकाळापासून चालत आहेत शिवाय जनगणना क्रिमी लेयर यांसारखे नव्याने निर्माण झालेले काही प्रश्न आहेत ते सूत्ररूपाने क्रमवार सांगता येतील
१ उदासीन मानसिक आणि दृष्टीकोन २ ठेविले अनंते तसेची राहणे हि मनात मुरलेली वृत्ती ३ गावाबाहेर काय चालले आहे हे न पाहणे हि वृत्ती ४ धार्मिक सांस्कृतिकदृष्ट्या आपण कोन आहोत याविषयीचा आत्मभानाचा अभाव ५ सामाजिक राजकीय जीवनात सतत घ्यावा लागणारा पडखाऊ पवित्रा ६ ओबीसींची जातवार जनगणना ७क्रिमी लेयर चा निकष ८ आरक्षणासंदर्भात झालेली दिशाभूल ९ आपले मित्र कोण आणि शत्रू कोण यासंदर्भात अज्ञान १० ओबीसी म्हणून एकत्र यावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा या इच्छेचा अभाव ११ उच्च शिक्षणाविषयी अनास्था १२ दैनंदिन जीवनाला सर्व बाजूनी वेढा बसलेले दारिद्र्य असे काही प्रश्न आपल्याला सांगता येतील
आता ओबीसी लोकामध्ये जागृती झाली पाहिजे बघा आपल्या इतिहासाकडे आणि आपला खरा धर्म शोधा सापडेल उत्तर
जय शिवराय
जय भीमराय
टिप्पण्या