आम्हाला माहित नसणारे बाबासाहेब : भाग ९
बाबासाहेब यांच्या अनेक पैलूंचा अभ्यास करताना अनेक पैलू समोर येतात त्यापैकी बाबासाहेब यांच्या काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करू यामध्ये या देशात अनेक शास्त्रे आहेत त्यापैकी शिक्षणशास्त्र या बद्दल बाबासाहेब यांचे ज्ञान किती आहे ते पाहूया
महत्वाचे म्हणजे बाबासाहेब जगातील पहिले असे विद्यार्थी आहेत आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगले या जगात असा व्यक्तिमत्वाचा माणूस विरळच आहे असे बाबासाहेब यांनी जन्मभर वाचन केले लहानपणी शिकताना त्यांचे अभ्यासाची पुस्तके वाचण्याकडे लक्ष नव्हते ते नेहमी अवांतर वाचन च जास्त करीत आणि यामुळेच त्यांना बी ए पर्य्नात दुसऱ्या वर्ग कधी मिळालाच नाही नंतर मात्र त्यांची अभ्यास करण्याची पद्धत बदलत गेली आपल्याला काही तरी करायचे आहे या भावनेतून त्यांच्या अभ्यासाच्या तासामध्ये वाढ झाली जवळपास १८ तास अभ्यास करण्याची त्यांची सवय झाली आणि तेव्हा मात्र एम ए परीक्षा बाबासाहेब चांगल्या मार्गाने पास झाले आणि मग पदवी हि त्यांच्या जीवनाचा एक भागच झाली पुढे पी एच डी डी एस सी पदवी घेतलि पुढे बैरीस्टर झाले इतकेच काय तर एल एल डी आणि डी लिट ह्या पदव्याही त्यांनी संपादन केल्या पुढे मात्र शिक्षण घेताना त्यांनी आपला वेळ कधी वाया घालवला नाही
बाबासाहेब यांनी स्वतः शिकलेच पण शिकवण्याचे काम हि केले तेव्हा त्यांचा पगार हा ४५० रुपये होता अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सिडनहम कॉलेज मध्ये शिकवण्याचे काम केले आहे यात महत्वाचे म्हणजे बाबासाहेब विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेत त्यांना शिकवताना बाबासाहेब खूप काळजीपूर्वक शिकवत असत कारण विद्यार्थी घडवायचा असतो या भावनेने बाबासाहेब शिकवत असत आणि बाबासाहेब म्हणायचे कि मी १२ ते १३ वेळा माझे लिहून काढले आहे आणि माझ्या मनाची जेव्हा पक्की खात्री होत असे कि माझ्या व्यक्तिरिक्त आता इतर कोणाला अधिक सांगता येणार नाही तेव्हाच मी माझे लेक्चर देत असतो म्हणून बाबासाहेब यांची अर्थशास्त्रातील लेक्चर हे अतिउत्तम आज हि आहेत आणि बाबासाहेब यांची हि कीर्ती त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली होती कि एल्फिस्टन वुइल्सन व सेंट झेविअर कॉलेज मध्ये इतिहास , अर्थशास्त्र व राज्यघटना हे विषय घेतलेले विद्यार्थी बाबासाहेब यांचे लेक्चर ऐकण्यासाठी वर्गात जमा होत असत आजच्या प्राध्यापकांना बाबासाहेब यांच्याकडून ती शिक्षणाची पद्धत मार्गदर्शन म्हणून आज हि घेण्यासारखी बाब आहे
बाबासाहेब म्हणजे कृती करून आपले काम सांगणारे महामानव होते त्यांनी १९४५ पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन केली या संस्थेचे ते स्वतः अध्यक्ष होते त्यांनी संस्थेचे मुंबई इथे पहिले कॉलेज चालू केले व पुढे नंतर औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेज आणि मिलिंद हायस्कूल सुरु केले याचा एकाच उद्देश होता तो म्हणजे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शिवाय गरीब विद्यार्थ्याची सोय व्हावी म्हणून वसतिगृह चालू केले शाहू राजांचे विचार त्यांनी पुढे नेले शेवटपर्यंत त्यांनी तो प्रयत्न केला आहे आणि आज आपण पाहत आहोत कि बाबासाहेब यांच्या शिक्षण विषय गोष्टीचे महत्व आज लोकांना पटू लागले आहे
बाबासाहेब ज्यावेळी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्राध्यापक नेमत असत तेव्हा खूप काळजी घेत असत जाहिरात देवून योग्य व्यक्तीस मुलाखतीसाठी बोलाविणे वर्गावर पाठ घेण्यास लावणे त्यांचे लेक्चर विद्यार्थ्यांना आवडते कि नाही हे पाहणे व त्याची नियुक्ती करणे हे ते कटाक्षाने पाहत असत बाकी तो कोणत्या धर्माचा आहे जातीचा आहे प्रांताचा आहे याचा विचार न करता त्याच्यात गुणवत्ता किती आहे याचा निकष लावत आणि हेच आजपर्यंत इतर लोकांना जमले नाही या बाबतीत बाबासाहेब म्हणतात कि माझ्या राजकीय पक्षात मी कोणाची हि नेमणूक करेन पण शिक्षण संस्थात मात्र गुणी ज्ञानी आणी लायक मंडळी नेमणार बाबासाहेब यांच्या औरंगाबाद मिलिंद महाविद्यालात कर्नाटक मधील डॉ मरली हलली व कु पाटील होत्या महाराष्ट्राचे प्राचार्य चिटणीस प्राध्यापक चिखलीकर डॉ वानखेडे डॉ शहारे प्रा रेगे कराल तामिळनाडू मधील प्रा अय्यर प्रा नायर होते शिवाय काश्मीर चे प्रा कुरेशी देखील होते यांच्या नेमणुका बाबासाहेब यांनी गुणवत्तेवर केल्या होत्या त्यांच्या जात धर्म प्रांत पाहून नाही
आज बाबासाहेब यांचे ते विचार कुठेच दिसत नाही त बाबासाहेब यांनी नातीगोतींचा कधी विचार केला नाही पण आज आपल्याला वशिल्याशिवाय आणि डोनेशन चा व्याप इतका कि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेत कोणत्या प्रवेश मिलेने कठीण झाले आहे नात्याचीच लोक संस्थेत भरून वशिलेबाजी केली जाते त्यामुळे आज शिक्षण व्यवस्थेला वाई ट दिवस आले आहेत बाबासाहेब यांची शिक्षण नीती अवलंबली तर कोणता हि भारतीय शिक्षणापासून वंचित राहणार नाही पण बाबासाहेबांचा हा पैलू लोकासमोर येवू दिला नाही हे तितके सत्य आहे
आज बाबासाहेब लोकापर्यंत जावू न देण्याचे कारण आपल्याला समजले असेलच का येवू दिले नाही ते
बाबासाहेब यांनी स्थापन केलेली सिद्धार्थ आणि मिलिंद कॉलेज यामध्ये उकृष्ट दर्जाचे प्राध्यापक वर्ग होते आणि त्यांचा पगार सुद्धा नियमानुसार दिला जायचा विद्यार्थ्यासाठी कॉलेज मध्ये विविध विभाग होते ग्रंथालायापासून ते प्रयोग शाळे पर्यंत खेळाच्या मैदानापासून ते क्लास रूम पर्यंत सर्व ठिकाणी वेगवेगळे उप्रकम घेतले जात असत आणि औरंगाबाद मधील मिलिंद कॉलेज च्या इमारतीचा कोनशीला बसवण्याच्या वेळी बाबासाहेब म्हणालेहोते '' मुंबई मध्ये १९४६ ला सिद्धार्थ कॉलेज उघडले आणि मला सांगायला आनंद होतो आहे कि अवघ्या चार वर्षात विद्यार्थ्यांची संख्या देशी विदेशी खेळ आणि शैक्षणिक दर्जा या सर्वच बाबतीत सिद्धार्थ कॉलेज राज्यात महत्वाचे स्थान पटकावले या कॉलेज मध्ये ८०० विद्यार्थी आहेत दुसरीकडे विद्यार्थ्यांची संख्या एवढी मोठी संस्ख्या क्वचितच आहे आंतर कॉलेज खेळाच्या सामन्यात असा एकही प्रकार सापडणार नाही त्यात सिद्धार्थ कॉलेज ने विजय मिळवला नाही मुंबई विद्यापीठाच्या नामांकित शिष्यवृत्या आणि बक्षिसे हि कॉलेज ने कधी हाताची जावू दिली नाहीत '' बाबासाहेब यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जितके काही करता येईल तितके ते करीत असत बाबासाहेब हे शिक्षणशात्रामध्ये सर्वाचे बापच होते हे नाकारता येत नाही कारण बाबासाहेब यांची शिक्षण विषयाची भूमिका पहिली तर आपण म्हणू शकतो बाबासाहेब यांची नेहमी हीच भूमिका राहिली आहे कि सर्वाना शिक्षण मिळाले पाहिजे आणि सरकार ने त्यादृष्टीने आपले पाऊल उचलावे असे बाबासाहेब यांना नेहमी वाटे आणि म्हणून बाबासाहेब यांनी १९२० मधेच ब्रिटीश सरकार कडे मागणी केली होती कि प्राथमिक शिक्षण सर्वाना मोफत मिळावे व ते सक्तीचे करावे म्हणून आणि बाबासाहेब यांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली तेव्हा बाबासाहेब यांनी भारतीय संविधान कलाम ४५ अन्वये १४ वर्षापर्यंत च्या मुलामुलींना सक्तीचे आणि मोफत शिक्षण द्यावे असे लिहिले . दिनांक १२ मार्च १९२७ ला मुंबई विधीन मंडळात प्राथमिक शिक्षणाचा उद्देश सांगितला तो असा आहे
'' the object of k primary education is to see that every child that enters the portals of a primary school does leave it only at a stage when it becomes literate and continues to be literate throughout the rest of his life ''
त्या वेळी साधारण ४ इयत्ता पर्यंत केवळ १८ % मुलेच पास होवून पुढे जात होती हि अवस्था बदलावी अशी बाबासाहेब यांची अपेक्षा होती आजच्या घडीला जरि पाहीले तरी १०० मुलांपैकी केवळ ५७ च्या आसपास मुले चार इयत्ता पर्यंत टिकून राहतात व बाकीची मुले नापास होतात त्यामुळे ते साक्षर नाहीत हि वस्तुस्थिती आहे
आता पण पहिले तर आजच्या घडीला प्राथमिक शिक्षणाची दुर्दशा खूप वाईट आहे प्राथमिक शिक्षण स्थानिक संस्थाकडून स्वराज्य संस्थेकडे देवू नये कारण येथील निवडणून जाणारी माणसे enlighteened ज्ञानी नाहीत असे बाबासाहेब यांना वाटत असे आणि बाबासाहेब जे विधान मंडळात बोलले ते योग्यच होते शिक्षणाचे व्यापारीकरण होता कामा नये याची जाणीव बाबासाहेब यांनीकरून दिली आहे . डॉ परांजपे शिक्षण मंत्री असताना १९२० सालचा १६ वा आणि १९२३ सालचा ४ था कायदा असे हे दोन कायदे केले त्यामुळे प्राथमिक शिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे गेले आणि प्राथमिक शिक्षणाची दुर्दशा झाली ती आजतागायत आहे बाबासाहेब यांचा दूरदृष्टीपणा आज हि वाखाणण्याजोगे आहे आजपर्यंत इतका प्रभावशाली नेता या देशाला लाभलेला नाही
बाबासाहेब यांनी १५ ऑगस्ट १९२४ ला मुंबई विद्यापीठाच्या पुनर्रचना समितीपुढे एक लेखी साक्ष दिली होती आणि त्या समितिचे अध्यक्ष चिमणलाल सेटलवाड होते . बाबासाहेब यांनी त्यात विद्यापीठाचे शिक्षणाचे ध्येय आणि कार्ये यंत्रणेतील अभाव इ. बाबतीत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत त्यात त्यांनी व्यवस्थापन परीक्षा विविध विषय प्रकाशन विभाग प्रवेश वित्त व्यवस्था नियम इ. ची माहिती दिलि आहे एकंदरीत शैक्षणिक आर्थिक बाबींचा विचार करून व्यवस्थापन नीट चालवण्याचे बाबतीत आपले विचार ठेवले इतकेच नाही आज आम्ही मुंबई विद्यापीठ इतके महत्वाचे आणि चांगले विद्यापीठ म्हणून नामांकित आहे ते बाबासाहेब यांच्या धोरणामुळे कदाचित बऱ्याच लोकाना हे माहित नाही पण मुंबई विद्यापीठाच्या कायदा दुरुश्त विधेयकावरील चर्चा २७ जुलै १९२७ एकदा झाली परत ती दहाव्या महिन्यात परत झाली दहाव्या महिन्यात १ आणि ३ तारखेला आणि ५ तारखेला अशी झाली यात बाबासाहेब यांचे योगदान खूप मोलाचे आहे शिक्षणाचे काय महत्व असते ते बाबासाहेब यांनी त्यावेळी पटवून दिले आहे आणि त्याच्यावर मुंबई विद्यापीठ कायदा दुरुस्ती करण्यात आली बाबासाहेब यांचा नेहमी शिक्षणाविषयी दृष्टीकोन हा सामान्य जनतेच्या भल्यासाठीच होता पण लोकांना बाबासाहेब माहितच करून दिले नाही त्यामुळे आज शिक्षणामध्ये मागे असणारा समाज हा दलित हिंदू आहे ज्याला धर्माच्या कोणत्याच ठिकाणी जागा नाही तोच आज अस्तित्वहीन आहे आज आदिवाशी म्हणतो आम्हाला राज्यघटनेने वगळले आहे पण त्याचा शिक्षणाचा अधिकार त्यांना अजून कळला नाही त्याला बाबासाहेब यांना का दोषी ठरव्याचे आज शिक्षणाची सोय बाबासाहेब यांनी केली असताना देखील लोकापर्यंत शिक्षण गेले नाही आणि आदिवाशी लोक शिक्षणापासून वंचित आहे मुळात इतर लोक सुद्धा त्यांना चोर म्हणून हिणवतात त्यांना त्यांचा अधिकार द्या त्याना सुद्धा त्यांच्या वाईट परिस्थितीतून वरती उभे राहण्याची संधी बाबासाहेब यांनी दिली आहे त्यामुळे कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून बाबासाहेब यांनी खूप मेहनत घेतली आहे आता याला शिक्षणशास्त्र का म्हणावे तर यामध्ये अनेक बाबांची विचार केला आहे बाबासाहेब यांनी शिक्षण संस्था आदर्श कश्या असाव्या हे सांगताना त्यांनी प्रथम आदर्श घालून दिला आणी मगच सांगितले आहे शिक्षणासाठी लागणाऱ्या इमारती मैदान लायब्ररी प्रयोगशाळा शिक्षक वर्ग अभ्यासक्रम परीक्षा व्यवस्थापन पगार नियम शिस्त इअतर बाबींचा विचार त्यांनी केला आहे आणि हे एखाद्या कुशल अभ्यासक व्यक्तीकडून केले जाते बाबासाहेब यांनी या भारताला हा दूर दृष्टीकोन दिला आहे पण आमचा भारत तो समजून घेण्यास कमी पडला हि खंत आहे बाबासाहेब यांचे शिक्षणाचे ध्येय च सर्वाना समान शिक्षण संधी निर्माण करून देणे होते आणि आज बाबासाहेबांच्या या विचारांची गरज आहे
विद्यार्थानि सुद्धा बाबासाहेब जरूर अभ्यासावे आधुनिक युगात बाबासाहेब यांच्यासारख्या आदर्श शिक्षक आदर्श शिक्षणसंस्था संस्थापक आदर्श विद्यार्थी आपल्याला मार्गदर्शक म्हणून मिळतील बाबासाहेब यांचा हा पैलू भारतीयांनी जवळून पाहिला तरी भारताची शिक्षण व्यवस्था जगातील सर्वोत्तम व्यवस्था असेल इतके नक्की कारण बाबासाहेब नुसते संविधान निर्माते नसून त्यांचे अनेक पैलू आहे आपण एक एक अभ्यासामध्ये घेत आहोत पुढे आपण बाबासाहेब यांचा दुसरा पैलू हि पाहू या
बाबासाहेब यांचे शिक्षण पाहिले तर या भारतीय हिंदू संस्कृती मधील एकमेव असा मानव आहे जी इतका शिक्षित आहे जगभरात बाबासाहेब यांच्या इतके शिक्षण घेणारे कोणीच नाही आणि ते हि कमी कालावधी मध्ये
बाबासाहेब यांचा शिक्षण क्षेत्रात केलेली प्रगती त्याकाळात करणे म्हणजे वाळवंट मध्ये पाणी शोधण्यासारखे आहे
बाबासाहेब यांच्या शिक्षणाविषयी खूप मोलाचे विचार आहेत प्रत्येकाने ते जाणून घेणे आवश्यक आहे यातच बाबासाहेब यांनी विद्यार्थ्यांना उपदेश केले एक भाषण आपण पाहू या
बाबासाहेब यांचे मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन मधील भाषण काय होते, याचा थोडा भाग पाहू या हे संमेलन १०, ११, व १२ डिसेंबर १९३८ ला मुंबई इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होते आणि त्यांचे भाषण पहा .
बाबासाहेब यांचे भाषण सुरु होते
'' आज मुंबई मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांचे संमेलन घडवून आणले आहे आणि ते सर्व परीने यशस्वी झाले आहे. या कार्यक्रमाबद्दल तुमचे व ज्या विद्यार्थ्यांनी हे संमेलन पार पाडण्यात भाग घेतला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. मी शनिवारी व रविवारी नाशिकला होतो . प्रवासातील दगदगीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे . माझ्यात काही त्राण नाही व भाषण करण्याची ताकद नाही मी इतके सांगू इच्छितो कि आजच्या प्रसंगी हजर राहता आले याबद्दल मला आनंद व धन्यता वाटते.
अशाप्रकारची संमेलने फार होतात . त्याप्रसंगी कोणी अध्यक्ष आल - मी नेहमी पाहतो त्याने भाषण केले कि त्यात बिद्यार्थ्याना एक टोमणा मारलेला असतो . तुम्ही शिकून काय करणार ? सरकारी नोकरी ? त्यांना देश सेवा करण्याचा उपदेश करण्यात येतो . पण यात काही हशील नाही . विद्यार्थ्यासंबंधी मो जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे सांगू इच्छितो कि हा उपदेश खोटा आहे आणि मी तसाच उपदेश करणार नाही. विद्यार्थ्याने शिकून नोकरी केली तर त्यात काय पाप आहे ? त्याला आयुष्य आहे, भावना आहेत. प्रत्येक मनुष्याचे अनित्म ध्येय काय आहे ? आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांचा परिपोष होवून त्यास गोड फळे यावीत . हेच ध्येय आहे . म्हणून मी तुम्हाला तो उपदेश करीत नाही . म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करा . मला असा अनुभव आला आहे कि , सरकारी नोकरी हल्ली एकाच जातीचा मक्तेदारी होवून बसली आहे . कलेक्टर ओफिदात किंवा इतर प्रत्येक ऑफिस मध्ये एकाच जातीची माणसे आहेत . पुष्कळ माणसे सांगतात : ' तुम्ही नोकरीसाठी का भांडता ? लायकी असली कि नोकरी मिळते, त्यात जातीचा कशाला प्रश्न ? परंतु सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास नोकरी केल्यावर काय फायदा आहे , असे विचारणारे मूर्खपणाचे आहे . या देशात जातीभेदाचे प्रस्थ फार आहे . आज ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्या हाती खरी सत्ता आहे . तो तिचा सदभावनेने उपयोग न करता आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतो . नोकरीमुळे पगार हाती येतो . ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाहीत , जो समाज अधिकाराच्या जागेवर नाही त्याची उर्जितावस्था होणार नाही . ब्राह्मण समाज सरकारी नोकरीत गुंतलेला आहे . त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू शकतो . तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा पिच्छा पुरवल्यामुळे समाजाची उन्नती होईल . याचा तुम्ही काशोसीने प्रयत्न करा .
शिकलेल्या माणसात काही दोष असतात - शिकल्यावर नोकरीच्या मागे लागणे हा धोश नव्हे . ते दोष व अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाही याची खबरदारी घ्या पहिली गोष्ट : शिक्षण पूर्ण झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो . मनुष्य स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे परंतु शिकलेला मनुष्य स्वतःच्या हिताची काळजी ह्जेतो . मझिनि म्हणतो कि , ' लोकात पारतंत्र्य पसरले , माणसे शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्काची जाणीव जास्त उत्पन्न होते '' आपले कर्तव्य कोणते , याची भावना जागृत होत नाही हा एक शिकलेल्या माणसाचा दोष आहे .
मला खेद वाटतो कि शिकलेला मनुष्यास पदवी मिळाली आणी त्याला निकारी लागली कि त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ सुटतो . विद्येचे महत्व खुंटले जाते . मी प्रवास करीत असताना मजजवळ नेहमी चार पुस्तके व वर्तमान पत्रे असतात . परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात. त्यांच्या हातात पुस्तके, वर्तमान पत्रे यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात . मनुष्य बी. ए झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय ? बि.ए. किंवा एम. ए. झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले . हि भावना चुकीची आहे . अगस्ती मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना वाटते ! बडोदे संस्थानात एक ग्रहस्थ होता तो बि. ए झाला होता महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावात केली होती त्यावेळी बडोदे संस्थानचे दफ्तर गुजराथीतून चालत असे इंग्रजीतून चालत नसे . मनुष्यफार आळशी ! कधी चुकून टाईम्स देखील वाचीत नसे . याचा परिणाम असा झाला कि काही वर्षांनी त्यास ए . बि. सि.ची देखील ओळख राहिली नाही हे अगदी सत्य आहे ; माझासुद्धा असाच अनुभव आहे पि.एच. डी . हि पदवी मिळवण्यासाठी फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे त्यावेळी त्या भाषा मला अवगत होत्या . परंतु आत त्या भाषांचा व्यासंग नसल्याने त्या भाषातून बोलने मला कठीण जाते अलीकडे मी फ्रांस व जर्मनीत जेव्हा गेलो तेव्हा त्या भ्शेतून बोलण्याचा मला त्रास पडू लागला म्हणून विद्येचा व्यासंग नेहमी केला पाहिजे . ज्याप्रमाणे एखादा माणूस दारू प्यावयास लागला तो ती जन्मभर पीत राहतो त्याचप्रमाणे विद्यार्जनाच्या बाबतीत झाले पाहिजे . झाले पाहिजे . विद्येची खरी गोडी कोणाला लागली ? परीक्षेनंतर जो आपली पुस्तके नळ बाजारात विकतो त्याला ? बायकोपेक्षा , पोरापेक्षा ज्याचे विद्येवर जास्त प्रेम असते त्याला विद्येची गोडली लागली , असे मि म्हणेन . माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जब्ती आली व बेलीगाने जर माझ्या पुस्तकाला हात लावला तर मी त्याला गोळी घालून जगाच्या जागी ठार करीन .
मी तरी पाहतो तुम्हा शिकलेल्या मुलात सौंदर्याची गोडी दिसते लग्नात मुलगी सुंदर आहे काय ? ती आपणास पसंद आहे काय ? वैगरे गोष्टी तुम्ही पाहता . पण त्रोच हक्क मुलीना द्या . बऱ्याच सुंदर स्त्रिया कुरूप माणसाच्या स्वाधीन झालेल्या मी पहिल्या आहेत . या देशात मला कंटाळा आलेला आहे . परन्तु मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे . म्हणून मला इथे राहणे भाग पडले यातील धर्म, सामाजिक रचना सुधारणा व संस्कृती यांचा मला फारच कंटाळा आला आहे . i am at war with civilization .
येथील कोट्याधीश मारवाड्यांच्या घरात काय दिसेल ? त्यांच्या घरात स्टच्यु , फर्निचर पेंटिंग व पुस्तके यापैकि एक हि वस्तू दिसणार नाही , हीच गोष्ट ब्राह्मणांची . एखादा ब्राह्मण कारकुनास पगार झाल्यास तो आपल्या बायकोला एखादी सोन्याची पुतली करण्याच्या गडबडीत असतो . कारण सोने संकट समयी उपयोगी पडते न ! जगात फक्त जगणे हेच ध्येय असेल तर पशु आणि मनुष्य यात फरक काय ? मनुष्य सौदर्याची साठवण करू शकतो ; पशुला ते करता येत नाही . नुसती कॉलर ताठ करून आणि नेकटाय बांधून सौदर्य वाढत नाही मी आतापर्यंत दहा ते अठरावेला विलायतेला गेलो . माझ्याबरोबर बरेच लोक विलायतेला आले होते . त्यांना आता मी पाहतो तो काय त्यांना वर्णाश्रम धर्म मान्य ! त्यांच्यावर काही एक परिणाम झालेला आढळत नाही . काय त्यांचा जन्म ! हिंदू धर्मातील सर्व घाण त्यांना मान्य आहे . तुम्ही घाणीत पडलेली रत्ने आहात . अतंत्य घाणेरड्या पाण्यात अत्तराचा थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे . तुमच्या आईबापाना शिक्षण नाही . अठराविश्वे दारिद्र्य तेव्हा हा मैल साफ करणे हे तुअम्चे कर्तव्य आहे . बायबलात मी वाचले आहे कि मिठाच जर आळणी झाले तर बाकी पदार्थाला चव कशी येणार ! कोणतेही कार्य करण्याकरिता आपल्या अंगचे गुण स्थिरावले पाहिजे . स्वतः सुधारल्याशिवाय इतरांना तुम्ही काय शिकवणार ? सुधारणेचे मुल वंश परंपरा रुजले गेले पाहिजे . तुमच्यात या गुणांचा जर अभाव असेल तर आटोकाट प्रयत्नाने ते मिळवा.
तुमच्या पैकी बहुतेक अविवाहित असतिल. क्रीत्येकांची लग्ने झाली असतील . पण लग्नानंतर तुम्ही काय करणार आहात ? या बाबतीत तुम्हावर फार मोठी जबाबदारी आहे. मी तुमच्या वडिलांच्या उदाहरन घेता माझ्याच वडिलांचे उदाहरण घेतो . त्यांना एकंदर चौदा मुले झाली आणि त्यातले मी चौदावे रत्न परंतु मी एलिफ़िस्टन कॉलेज मध्ये असताना माझी काय दशा होती ? माझ्या पायात वाहणा नव्हत्या !अंगात माजरपाठाचे शर्ट आणि वडिलांचा फाटका कोट ! तुम्ही एलिफ़िस्टन कॉलेजात गेलात म्हणजे तुम्हाला तेथे मुल्लर सहिएबनचे तसबीर दिसेल . त्यांनी मला शेवटच्या वर्षात दोन शर्ट पुरवली . मी विचार करीत असे , माझ्या वडिलांना चौदा ऐवजी चार मुले असती तर माझी किती चंगळ झाली असती . माझ्या या दुःखाला माझे वडिलच कारणीभूत होते . एकदा मी कॉलेजात जात असताना रेल्वेचा पास घरी विसरलो आणि त्याच दिवशी पासाची तपासणी होती . तिकीट घेणाऱ्या मास्तराने मला अडविले ज़वल तर दिडकी नव्हती चार वाजेपर्यंत चर्चगेट च्या स्टेशनवर बसून राहिलो होतो नंतर कैकिण नावाचा माझ्या वर्गातील विद्यार्थी तेथे आला . त्याने विचार ; '' काय रे येथे का बसलात ? मी त्याला सर्व हकीगत सांगितली त्याने चार आणे भरून माझी सुटका केली व त्याच्याच पैशाने तिकीट काढून त्याने मला घरी पाठवून दिले . तेव्हा या बाबतीत मी वडिलांना दोष देतो. कारण त्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही . वडिलांचे चुकत असताना त्यांना सांगणे गैर आहे , असे मला वाटत नाही . तुमच्यावर आता जबाबदारी आहे त्याचप्रमाणे स्त्रियांवर पण आहे मी बोलतो ते केवळ पुरुषांकरिता नव्हे स्त्रियांनी सुद्धा याची जबाबदारी ओळखली पाहिजे याचा तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही नोकरीवर जाल मला वाटते तुम्हापैकी बहुतेक कारकून हितील तर काही ५०-६० रुपये तुम्हास पगार मिळेल आणि त्यात तुम्हाला चौदा पोरे झाली तर त्या पोरांचे काय होणार ? याची जबाबदारी समाजावर टाकणार ? याचा तुम्ही चांगला विचार करा तुम्ही सन्यास घ्यावयास तयार नसाल पण त्यातूनही कोणी घेतला तर फारच चांगले { हशा } हसू नका हि फार महत्वाची गोष्ट आहे . मला पाच मुले झाली त्यापैकी चार मेली याबद्दल आता वाईट वाटत नाही तर उलट आनंदच वाटतो हि मुले जर जगली असती तर त्याचे शिक्षण खाणे राहणे यांचा बोजा माझ्यावर पडला असता व ते मला त्रासाचे झाले असते मला एकच मुलगा आहे माझ्यावर त्याची फार जबाबदारी आहे . त्याच्या एकशतांश जरी जबाबदारी तुम्ही आपल्या मुलाबद्दल दाखवली तरी फार उत्तम हि समजाच्या कल्याणाची गोष्ट आहे तुम्हाला पाच सहा मुले झाली तर त्यांना शिक्षण कसे देणार . त्यांची काळजी कशी घेणार ? मला वाटते हि चढती भाजणीच्या ऐवजी उतरती भाजणी आहे तेव्हा स्त्री पुरुषांचे पशुप्रमाणे जीवन घालवणे माणुसकीला सोडून आहे या गोष्टींचे तुम्ही अवश्य विचार करा .
बाबासाहेबांचे मुंबई येथील भाषण
बाबासाहेब यांचे अशी अनेक रूपे आहेत जी जनमानसाला अजून माहितच नाहीत
पुढील भागात बाबासाहेब यांचे दुसरे रूप पाहू या

टिप्पण्या