एक नारा क्रांतीचा
जगावेगळी परंपरा या भारत देशात आहे अनेक जाती धर्मानी विळखा घातलेला हा देश आणि या देशात अनेक जातींचा अस्तित्व असलेले मुळात त्या जातींना किड्या मुंग्या इतकीही किंमत नसणारा समाज असा ज्याचे कधी कुणी कौतुक च केले नाही अतिहीन म्हणून आयुष्यभर त्या जातीच्या लोकांना जगावे लागत असे जंगलात राहणे म्हणून त्यांच्याकडे लोकांचे पाहणे हि वेगळे असायचे शिक्षणाची तर बोंबाबोंब असे दिवाबत्ती म्हणायचे तर शेकोटी म्हणजे लाकडापासून उजेड निर्माण करायचे त्यांचे जीवन म्हणजे इतके करून असे कि एक वेळचे जेवण म्हणजे त्यांची पराकोष्टी करायला लागायचे पण हा समाज आज जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सांगितला जातो पण त्यांचे आज पर्यंत प्रगती नाही
विकासाचे मुल्यांकन काय असते याचे सोडा विकास म्हणजे काय हेच या समजला माहित नसणारा समाज आज हि अंधारात आपले जीवन जगात आहे कोण्या माणसाला त्यांच्याकडे पाहायला वेळ नाही राजकारणी मात्र निवडणुकांच्या वेळी न चुकता भेट देतात आणि त्यांच्या हातवार शे पाचशे रुपये ठेवून त्यांना मतदानासाठी स्वताच्या गाड्या पाठवून त्यांना मतदानासाठी बोलावले जाते एकदा का मतदान झाले कि ह्या समाजाला विसरणे हाच एकमेव पर्याय आहे आणि हीन म्हणून आज हि त्यांच्याकडे सर्व समाज पाहत आहे मानवतेला लाजवील अशी वागणूक दिली जावी या समाजाला असा समाज मानवाला मानवाचा गुलाम बनून आज हि जीवन जगात आहे त्या समाजाची गोष्ट सांगायची तर आपल्याच डोळ्यात न कळत पाणी येते वास्तव पाहून पुढील यांचा काळ कसा असेल असे जेव्हा विचार येतात नकळत हात पाय थंड पडतात मग मनात येते यांच्यात हि क्रांतीची आग पेटवायला पाहिजे ह्या समाजाला हि माणसात आणले पाहिजे पण कशे आणणार हा समाज इतका अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे कि आपणा त्याच्याकडे पाहूच शकत नाही त्यांच्या भावना अश्या काही देवावर बसल्या आहेत कि आज हि हे लोक देवाला खुश करण्यासाठी आपली रक्ताच्या माणसाला नरबळी दिला जातो कोण समजावर यांना अश्या लोकांना आज हि गवताच्या काडीत बांधलेले झोपड्यात राहावे लागते आज काळ श्रीमंत लोक आपल्या घराची शोभा वाढावी म्हणून गवताची काही काड्या लावतात पण इथे गरीब समाज आज हि गवताच्या झोपड्यात ठेवले आहे आज मानव झोपड्या सोडून मोठ मोठ्या बंगल्यात राहायला आला आणि अजून हा समाज जंगलात राहत आहे आणि याकडे नाही कोणाचे लक्ष आहे कसा जगात आहे हा समाज म्हणून त्यात क्रांतीची आग पेटवायची आहे क्रांतीचा यल्गार करणार आहे तर हा समाज पण जागा करायचा आहे तर कसा करायचे या समाजाला म्हणून एका मुलाने सहज आपल्या आईला विचारतो आहे
मुलगा : आये काय ग हा आपुन जंगलात का ग राहतो बाकीची लोक बघ कशी नवीन कपडे घालून फिरतात आपणच असे का ग राहतो
आई : बाळा आपल्या समाजाच जीवनच आसे हाये तुला जीवन जगायला भेटते हाये ना तेच मोठ आहे
मुलगा : आये मला पण त्यामुलासारखे राहायचे आहे मला बी शाळत जायचे हाय
मुलाच्या हट्टापायी आई त्याला शाळेत घालायला घेवून जाते पण शाळेत हि जातिवाद मुलाला समजेना काय करावे प्रवेश तर मिळाला पण त्या आदिवाशी पाड्यातून एकटाच शिक्षणासाठी शाळेत आलेला मुलगा पाहून इतर मुलेही त्याला हिणवत आदिवाश्याच्या मुलाने शाळा शिकून काय करायचे आहे पण मुलामधे शिकण्याची जिद्द आली शिक्षण घेवु लागला रस्त्याच्या बाजूला अभ्यास करुण तो वर्गात पहिला येत गेला नंतर सर्वात पहिला येत गेला शाला कॉलेज मधे शिक्षण घेत गेला पुढे वाचनात बुद्ध आले शाहू फुले शिवराय आंबेडकर आले मग त्याला जातिवाद कसा संपवायच हा विचार करू लागला क्रांति साठी पावले उचालावी लागणार हे माहित झाल अदिवाशी पाडे सर्व सोयी सुविधा पासून वंचित त्यामुले गावात अडानी पना लोक शिकलेली नसल्याने गावातील सुशिक्षित लोक त्यांचा गैर फायदा घ्यायचे आता त्या मुलाने सुद्धा ठरवले की क्रांति करुनच दाखवायची आपल्या अदिवाशी लोकाना जवळ बोलावून मार्ग संगीताला बाबासाहेब पटवून सांगितले लोकाना बाबासाहेब समजू लागले तसे देव त्यानी फेकून दिले त्यानी बुद्धाकडे वलु लागले बुद्ध धम्म घेतला आणि हे गावाच्या लोकाना सहन झाले नाही अदिवाशी बौद्ध झाले म्हणून जाब विचारायला गावाचे लोक आले मुलगा अणि ते लोक यांच्यात चर्चा झाली तेव्हा गावकरी लोकाना ठासून सांगितले आम्ही बौद्ध झालो जगातील सर्वोत्तम धम्म घेतला तुमच्या काल्पनिक देवांची आता आम्हाला काहीच गरजनाही
गावकरी
रागाने निघाले घरी गेले मुलाने तर जिद्द्च केलि होती कसे झाले तरी हां
अदिवाशी म्हणून जगायाचे नाही त्यांच्या वस्तीला आता बौद्धावादी नाव लागले
होते आणि त्या मुलाने बाबासाहेब यांचे विचार आणि तत्वे समाजात सांगायला
सुरुवात केलि सामूहिक शेतितुन उत्पन्न भेटू लागले बघता बघता ते लोक प्रगत
शेतकरी झाले एक नवी उमेद बाकि च्या आदिवासी पाडे याना दिली नवा क्रांति
चा नारा त्याने या समाजाला दिला म्हणून शिक्षण असे दया की त्यातून एक
क्रांतिकारी जन्मेल
जय शिवराय जय भिमराय
टिप्पण्या