जयभीम प्रवर्तक बाबू एल एन हरदास
बाबूएल एन हरदास हे दलित चळवळीचे निष्टावंत लोकप्रिय नेते होते आणि त्यांनी महार समाजातील अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी जनजागृती केली त्यांनी कामठी येथून महारठ्ठा हे वृत्तपत्र सुरु केले १९२२ ला त्यांनी महार समाजाची स्थापना करून त्यांच्यावतीने वीर बालक हे नाटक लिहून त्यांचे अनेक प्रयोग गावोगावीसादर केले स्त्रियांना साक्षर करणारे महिला प्रशिक्षण केंद्र उघडले पुरुषांसाठी रात्रीच्या शाळा काढल्यात बिडी कामगारांसाठी सहकारी तत्वावर उद्योग सुरु केले आणि दलितांसाठी मंदिरेही बांधली
आपण हा आढावा घेतला हरदास यांच्या कामाचा पण अजूनही फार मोठी कामे त्यांच्या हातून घडली त्याचाही आढावा घेवूया
१९२८ साली हरदास बाबू यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट घडून आली व त्यानंतर मात्र बाबासाहेब कामठीला आलेत तेव्हापासून हा महार सेनानी आंबेडकरी चळवळीचा पाईक झाला दुसर्या गोलमेज परिषदेच्या वेळी अस्पुष्य समाजाचे नेते म्हणून गांधी कि आंबडेकर असा वाद उपस्थित झाला तेव्हा हरदास यांनी बाबासाहेब आमचे नेते आहेत अश्या आशयाच्या तारा इंग्रज पंतप्रधान यांना पाठवल्या भारत भर फिरून अशा आशयाच्या ३२ तारा पाठवण्याची पराकाष्टा केली त्यामुळे परिणामत: बाबासाहेब आंबेडकर हेच अस्पुष्य समाजाचे नेते असल्याचे सिद्ध झाले
१९३३ साली अकोला येथील दलित परिषदेत भाषण करीत असताना त्यांना त्यांचा मुलगा निधन झाल्याची तर आली लोकांनी त्यांना परत जाण्यासाठी विनिवणी केली पण ते म्हणाले माझा एक मुलगा मरण पावला तर दुसरा येईल पण मी हा जनसागर सोडून जाणार नाही समाजासाठी मुलांच्या निधनाच्या बातमीची पर्व न करणारे हरदास हे खरोखर महार समाजातील एक आदर्श व्यक्ती ठरले
१९२८ च्या सायमन कमिशन समोर साक्ष देण्यासाठी डॉ आंबेडकर यांनी हरदास यांना तारेने सुचित केले होते त्यांनी त्या सुचनेचे पालन करून ह्या प्रांतात भावी राजकीय धोरणांच्या मजबुती करिता बहुमोल सहकार्य केले ह्या घटनेमुळे हरदास हे मध्य प्रांत वऱ्हाडातील दलित समाजाचे लोकप्रिय नेते झाले
आज सबंध देशात दलित बांधव परस्परांना जयभीम ह्या शब्दाचा प्रयोग करतात त्या शब्दाचा वापर हरदास यांनी १९३७ पासून सुरुवात केली यांच्या समर्थनासाठी ते म्हणाले नमस्कारासाठी एकाने जयभीम तर दुसर्याने बलभीम असे आपण म्हटले पाहिजे ते पुढे म्हणाले जयभीम म्हणजे बाबांचा विजय आणि बलभीम म्हणजे भीम शक्ती अश्या प्रकारे प्रचलनात आणलेला जयभीम हा शब्द सबंध भारतातच काय तर सबंध जगात आदराने स्वीकारण्यात आल आहे यात त्यांची महती लक्षात येते
स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापणे नंतर झालेल्या निवडणुकीत नागपूर कामठी मतदार संघातून हरदास बाबू विधान सभेवर पक्षाच्या तिकिटावर निवडून गेले त्यामुळे मध्यप्रांत वऱ्हाड प्रांताच्या जबाबदारी बरोबर सर्व आमदार यांना संघटीत करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली त्यामुळे त्याच्या कामाचा व्याप वाढला त्यांनी राघोबा {भंडारा ] देवाजी खोब्रागडे {चंद्रपूर } डी के भगत ।{यवतमाळ} दशरथ पाटील {हिंगण घाट }सीताराम पाटील { उमरेड } व श्री जांभोलकर {छिंदवाडा} या सर्व आमदारांना संघटीत केले त्याच वेळी
छत्तीसगड मधील निवडून आलेले सतनाम समाजाचे धर्मगुरू श्री आगमदास यांच्या भेटीला हरदास गेले त्यावेळी ते खुनाच्या आरोपात जेलमध्ये असल्यामुळे हरदास यांनी त्यांच्या बंधू मुक्तादास यांची भेटे घेतली त्यांनी आगमदास यांना खटल्यात मदत करण्याचे आश्वासन दिले श्री मुक्तादास यांची बाबासाहेब यांच्यासोबत भेट घालून दिली बाबासाहेबांनी कोर्टात त्यांची बाजू मांडण्याचे आश्वासन दिले व त्यांचे वकीलपत्र स्वीकारले हा खटला नागपूरच्या हायकोर्टात चालला बाबासाहेबांनी नागपूर मध्ये उपस्थित राहून खटल्यात आगमदास यांची बाजू मांडून त्यांना झालेली फाशीची शिक्षा रद्द केली ह्या खटल्यामुळे छत्तीसगड मधील बहुसंख्य सतनामी समाज आंबेडकरी चळवळीच्या मागे उभे राहिले व हरदास बाबू ऋण माणू लागले
घरची परिस्थती हलाकीची होती त्यांची रात्रंदिवस कामाच्या दगदगीमुळे खालावलेली प्रकृती आणि त्याकडे केलेलं दुर्लक्ष या सर्व कारणामुळे आंबेडकरी चळवळीत अहोरात्र झुंजणारा या झुंझार कार्यकर्त्याला टी बी चा आजार झाला त्यांना दुधातून गोळी घ्यावी असे डॉक्टर यांनी सांगितले त्यावेळी दुध १ पैश्याला मिळत असे त्यावेळी ते आमदार होते हि घटना १९३८ सालची आहे या लढवय्याजवळ एक पैसाही नव्हता कार्यकर्ते त्यांच्याकडे नेहमी असायचे पण कुणालाही याबद्दल सांगायचे त्यांचे धाडस होत नव्हते फक्त त्यांनी त्यांच्या जवळच्या आणि जिवाभावाच्या कार्यकर्ता आणि मित्र धोंडबाजी मेंढे यांना आपली व्यथा सांगितली मेंढे कडे सुद्धा एक पैसा नव्हता परंतु व्यवस्था करतो म्हणून ते निघून गेले मेंढे यांची पत्नी नुकतीच बाळंत झाली होती त्यांनी आपल्या पत्नीचे दुध आणले व हरदास यांना ती गोळी त्या दुधातून देण्यात आली हेच मेंढे पुढे मेंढे गुरुजी म्हणून ओळखण्यात आले नंतर ते धीरधम्म भन्ते झाले { हि घटना धीरधम्म भन्ते यांनी सहज बोलता बोलता विनायक जामगडे यांना सांगितली होती } समाजाच्या उत्थानासाठी दिवस रात्र झटणारे एल एन हरदास बाबू हा महान योद्धा दि १२ जानेवारी १९३९ रोजी अखेर अवघ्या पस्तीस वर्षाच्या तरुण वयात मृत्युमुखी पडले आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या अल्पवयात या महार योद्ध्याने महान पराक्रम करून दाखवला व महारांचा नवीन अध्याय इतिहासात उघडला यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी १५ जानेवारीला कन्हान नदीच्या काठावर असलेल्या समाधीस्थळी हरदास मेळावा भरविण्यात येतो त्याला हरदास घाट म्हणून ओळखण्यात येते आजही हजारो लोक दरवर्षी श्रद्धा सुमने अर्पण करण्यासाठी या घाटावर या घाटावर येवून या थोर महायोध्याला आपला मानाचा मुजरा
आता पण पाहिलं कि तेव्हा आपले नेते किती कर्तुत्ववान होते आमदार असूनही एक पैसा नसणारा आमदार आज आपल्याला भेटणार नाही अरे संगतानेचे पैसे होते त्यांच्याकडे पण आपल्या साठी एकही पैसा संघटनेचा वापरला नाही केवढी महानता आणि स्वाभिमानी व्यक्ती होती हे आपल्याला सांगायला नको
दि ६ जानेवारी हा त्यांचा जन्म दिवस आहे त्यांची जयंती साजरी केली जाते अश्या या महान विराला क्रांतिकारी मानाचा जय भीम
आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
जय शिवराय
जय भीमराय
रविंद्र सावंत
हि तपासनीस
मुसाड ग्रामस्थ बौद्धजन परिवर्तन मंडळ {रजि }मुंबई
टिप्पण्या