शेवटचा संदेश
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन
बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विद्वत्तेचा मेरुमणी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात स्वार्थ पहिला नाही
एक घटना आठवते बाबासाहेबांच्या जीवनातील जेव्हा बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर आजारी पडला तेव्हा बाबासाहेबांकडे त्याच्या औषध उपचारासाठी पैसे नव्हते बाबासाहेबांना नोकरी करून पैसे कमवू शकत होते पण बाबासाहेब म्हणाले मी जर माझ्या गंगाधर साठी नोकरी केली आणि पैसे कमावले तर माझ्या समाजाला माझ्या गंगाधारापेक्षा असा अजीर्ण आजार झाला आहे मला त्यांच्या आजाराचे निराकरण करायचे आहे आणि गंगाधर मरण पावला मित्रानो त्या गंगाधराच्या प्रेताला गुंडाळण्यासाठी साधा कापडही विकत घ्यायला बाबासाहेबांकडे पैसे नव्हते शेवटी रमाई मातेने आपल्या लुगड्याचा पदर फाडून गंगाधराचा अंत्यविधी केला गेला अश्या महामानवाच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या घटनेवर घटनेवर प्रकाश टाकत आहे त्यावर लक्ष द्या एकदा नानकचंद रत्तू यांनी एकदा बाबासाहेबांना विचारले कि बाबासाहेब तुम्ही एकसारखे दुःखी का असता त्यावर बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर पाहिलं तर खर आज आपल्याला खूप दुःख वाटेल मित्रानो काय उत्तर दिल होत ते पाहूया
''मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने मी दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही माझी पहिली खंत आहे कि माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलेलो नाही माझे लोक इतर समाजाशी बरोबरी करून राजकीय सत्तेत वाटेकरी होवून सत्ताधारक वर्ग बनलेला पहायची माझी इच्छा होती मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे अडवा पडलो आहे जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशीक्षितानि घेतला आहे पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषिताबद्दल त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागते ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत . ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जगतात . त्यांच्यापैकी एकही जन सामाजिक कार्य करायला तयार नसतो नसतो ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत मला आता लक्ष खेड्यातल्या लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते ते अजूनही हालअपेष्टा भोगत आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती बदललेली नाही पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे मला असे वाटले होते कि माझी सर्व पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावीत बुद्द आणि अन्ड कार्ल मार्क्स रेव्होल्युशन अन्ड काउंटर रेव्होल्युशन इन अन्शियन्ट इंडिया रिडल्स ऑफ हिंदुझम हि माझी यादगार पुस्तके मी प्रकाशित करण्यात मी असमर्थ व असहाय्य ठरत आहे हि नुसती कल्पना सुद्धा मला भयंकर क्लेशदायक होते कारण मी मेल्यावर दुसरे कोणीच हि पुस्तके प्रकाशित करू शकणार नाही " भाव विवशतेने त्यांना पार कोलमडून टाकले होते नानकचंद काही बोलणार परत बाबांनी पुढे म्हणणे चालू केले " कोणी तरी पददलित वर्गातून माझ्या हयातीत पुढे येईल आणि माझ्या पश्च्यात हि चळवळ पुढे चालवण्यासाठी अवजड जबाबदारी पत्करील अशीही माझी अपेक्षा होती पण आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यांपुढे येत नाही हा माझा देश आणि येथील लोक ह्यांची मला आणखी काळ सेवा करण्याची संधी मला हवी होती ज्या देशातील लोक एवढे जातिग्रस्त आणि पूर्वग्रहपिडीत आहेत तेथे जन्म घेणे पातक आहे विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकवून ठेवणे अत्यंत कठीण होवून बसले आहे कारण प्रधानमंत्र्यांच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकूनही घेण्याची येथील लोकांची तयारी नाही किती गालात चाललाय हा देश " उसासा सोडत बाबासाहेब उदगारले
"बाबासाहेब नानकचंद यांना म्हणतात धीर धारा हे आयुष्य आज न उद्या संपणार आहे " नंतर बाबासाहेब नानकचंद यांना म्हणाले " नानक चंद तू माझ्या लोकांना सांग कि मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देवू शकलो ते मी माझ्या एकट्याच्या बळावर मिळवले आहे ते करताना मला पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला सगळीकडून विशेषतः हिंदू वृत्तपत्र सृष्टीकडून माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव सतत होत राहिला जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला माझा स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले त्यांच्याशीही मी दोन हात केले मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन हा काफला आज जेथे दिसतो त्याला आणता आणता मला खूप सायास पडले हा काफला असाच पुढे आणखी चालू ठेवावा वाटेत अनेक अडथळे येतील अडचणी येतील अकल्पित संकटे येतील पण वाटचाल सुरूच ठेवावी त्यांना जर सन्मानाने प्रतिष्टापपूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायालाच पाहिजे जर माझे लोक माझे सहकारी हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर तो आज जेथे आहे तेथे तरी त्यास राहू द्या कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यात परत फिरू देवू नये हा माझा संदेश आहे बहुधा शेवटचा संदेश आहे मी तो अतंत्य गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी माझी खात्री वाटते जा आणि सांग त्यांना ; जा आणि सांग त्यांना ; जा आणि सांग त्यांना असे तीनदा पुनरुक्त करत ते म्हणाले
मित्रानो हा बाबासाहेबांचा शेवटचा संदेश ठरला आणि त्यांची प्राणज्योत ५डिसेंबर च्या मध्यरात्री मावळली पण ती संशयास्पद वाटली काही संशयास्पद घटनाही घडल्या मित्रानो असे बाबासाहेब जेव्हा हे जग सोडून गेले तेव्हा त्यांचा समाज पोरका झाला होता
बाब्साहेबांच्या नंतर मात्र हा समाज कायस्वरूपी पोरका झाला तो आजपर्यंत पोरकाच राहिला आहे त्याला आजही वाली नाही जे भेटले त्यांनी बाबासाहेबांच्या संघटनेची पूर्ण वाताहत केली आजही अमल संघटीत होता आलेल नाही असो अजून किती दिवस पाहायला लागणार आहेत हा समाज एकसंध पाहायला
बाबासाहेबांच्या ह्या शेवटचा संदेश आमचा भीमसैनिक मनावर घेईल आणि बाबासाहेबांनी पुढे आणलेला हा काफला पुढे चालवतील
बाबासाहेबांचे एक गीत आहे
सदधम्माच्या नेईन पातला ३
बौद्धमय मी करीन भारताला २
न्यायासाठी सुरु आम्ही केला
न्यायासाठी सुरु आम्ही केला
न्यायासाठी सुरु आम्ही केला
मी यशस्वी करीन या लढ्याला
बौद्धमय मी करीन भारताला
दीपश्याम सम अनुयायी माझे
दीपश्याम सम अनुयायी माझे
दीपश्याम सम अनुयायी माझे
पुढे नेतील या समता रथाला
बौद्धमय मी करीन भारताला
परत एकदा महामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
रवींद्र मनोहर सावंत
हि. तपासनीस
मुसाड ग्रामस्थ बौद्धजन परिवर्तन मंडळ {रजि } मुंबई

टिप्पण्या