विजय दशमी


भारत हा देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो भारतात वर्षभरात अनेक सन उत्सव साजरे केले जातात त्यातील एक सन म्हणजे दसरा म्हणजे विजयादशमी होय . दसरा हा सन म्हणजे सत्याचा असत्यावर विजय असा हिंदू संस्कृतीचा मानला जातो दसरा सणाबाबत पौराणिक ग्रंथात देव देवता या दंतकथेला वास्तविक म्हणून भारतात दसरा या सणाला धार्मिकतेचे रूप देवून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सन उत्सव साजरे करणे हि भारतीयांची हिंदू लोकांची पर्वणी आहे सणाच्या निमित्ताने कामाला राजा देवून मौजमस्तीत दिवस घालवणे हि भारतीय प्राचीन संस्कृती आहे राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी उत्सव साजरे करतात कारण त्यांना त्यामध्ये आपली पोळी भाजून घ्यायची असते पण हे लोकांना समाजात नाही आणि बहुजन समाज  ते जाणून घेण्याचा प्रयत्न हि करत नाही असो आपण आपल्या विषयाकडे वळू या
विजया दशमी म्हणजे काय :
                                     विजयादशमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येत असून याला शुभ मानल जात विजयादशमी म्हणजे दशहरा होय दस म्हणजे दहा आम्ही हरा म्हणजे हरणे होय दशहरा या शब्दाचा अपभ्रंम होवून दसरा हा शब्द प्रचलित झाला विजयादशमी म्हणजे विजया म्हणजे विजय संपादन करणे आणि दशमी म्हणजे दहा असा त्याचा अर्थ होतो प्राचीनकाळी अनेक शब्द हे अर्थपूर्ण अर्थनी संबोधले जायचे नंतर लोकांच्या बोली भाषेतून वेगवेगळे शब्दोच्चार होवून  अश्या अर्थपूर्ण शब्दांचा अपभ्रंम होवून वेगळेच शब्द रूढ होत गेले व नवीन शब्दांची निर्मिती होत गेली तसाच दसरा या शब्दाबाबत घडले
आर्य ब्राह्मणांचे राजकारण :
                                   प्राचीन काळात भारतात अनेक लहान - लहान असंघटीत राज्य होते त्यांची एकमेकांवर आक्रमण करून प्रभुत्व मिळवण्याची स्पर्धा  चालली होती त्याचा फायदा विदेशी आर्यांनी घेतला त्यांनी भारतावर राज्य निर्माण करण्याची लालसा निर्माण केली आर्यांनी सुमारे ३५०० वर्षांनी भारतावर आक्रमण केले व भारतावर आपले राज्य निर्माण केले आपले स्वामित्व टिकवण्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्यव्यवस्था चाली रूढी परंपरा बदलून टाकल्या तेच आर्य म्हणजे आजचे ब्राह्मण होय भारतीय उपखंडावर आपले सतत राज्य असावे यासाठी त्यांनी भारतीयांना राज्य व्यवस्थेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यासाठी त्यांनी  वर्ण  व्यवस्था निर्माण केल्या आणि त्यांनी चार वर्नापैकी बहुजन समजला शुद्र वरणात टाकले जो आजचा मागासलेला समाज आहे तो बहुजनांना त्यांनी शिक्षण धन संपत्ती यापासून दूर ठेवले कारण त्यांना माहित होते कि जर यांना धन भेटले तर हे प्रगती करतील शिक्षण भेटले तर यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल म्हणून त्यांनी या सार्या गोष्टी केल्या आणि लोकांना सांगण्यात आले कि हि वर्ण व्यवस्था आहे हि ईश्वराने निर्माण केली आहे त्यामुळे आजही ब्राह्मणी संस्कृती टिकूनआहे
आर्य ब्राह्मण व्यवस्थेला विरोध :
                                         आर्य ब्राह्मण व्यवस्था मुल भारतीय विद्वानांना मान्य नव्हती परंतु त्यांच्याविरोधात आवाज उठवण्याची कुणाची हिम्मत नव्हती वर्ण व्यवस्थेविरुद्ध चार्वाकाने आवाज उठवला त्यानंतर भगवान बुद्धाने ब्राह्मणी वैदिक धर्माची चातुवर्ण व्यवस्थेला प्रखर विरोध केला त्यांनी शांती समानता या गोष्टीना प्राधान्य देणाऱ्या बौद्ध धम्माची निर्मिती केली वर्णव्यवस्था हि मानवी कल्याणासाठी घातक व्यवस्था असून तिला उलथून पाडण्यासाठी बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला समाजातील रूढी परंपरा विषमता ह्यांना विरोध करणारा ब्राह्मण व्यवस्थेला प्रखर विरोध करणारा पहिला महामानव गौतम बुद्ध होय बुद्धाने जगाला शांतीचा व समानतेचा संदेश देवून समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला बुद्धाच्या महापारीनिर्वाना नंतर पुन्हा ब्राह्मणी व्यवस्था पेटून उठली त्यांनी बौद्ध प्रसाराकांवर घातक हल्ले करून बौद्ध धम्माचा प्रसार थांबवला अनेक भिक्षूंची कत्तल करण्यात आल्या  चातुवर्ण व्यवस्थेला विरोध करणर्या बौद्ध धम्माचा विनाश करून चातुवर्ण व्यवस्था पुन्हा मजबूत करण्यात ब्राह्मण यशस्वी झाले ब्राह्मणांना मुल्निवाशी लोकांची प्रगती अजिबात मान्य नव्हती
ब्राह्मणी व्यवस्थेला तडा देवून उलथून पडणारा तिसरा महामानव म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होय मुल निवासी भारतीयांना शुद्र मनात असत आणि आर्य ब्राह्मणांनी शूद्रांना पास सत्ता ज्ञान यापासून वंचित ठेवले शुद्रणी राज्य हातात घेवू नये नाहीतर ईश्वर त्यांना शाप देईल अशी भीती घातली पण चंद्रगुप्त मौर्याने हातात तलवार घेवून प्रथम बहुजनांचे राज्य स्थापन केले आणि सम्राट मार्याने आपल्या पराक्रमाने अनेक राज्ये आपल्या राज्यात घेतली आणि पुढे दहा पिढ्या त्यांनी राज्य केले मौर्य घराण्याने आपल्या पराक्रमावर कर्तुत्वावर राज्य केले
मौर्य घराण्याचा विनाश :
                               मगधवर आक्रमण करून चंद्रगुप्त मौर्याने आपले स्वतंत्र राज्य  स्थापन केले  व आर्यांना जबरदस्त धक्का दिला अशा प्रकारे स्वपाराक्रमावर भारतात मौर्य घराण्याची सत्ता आली व त्यांनी दहा पिढ्या राज्य केले मौर्य घराण्याचा तिसरा शासक सम्राट अशोक हा फार पराक्रमी निघाला त्यांनी प्रचंड साम्राज्य विस्तार घडवून आणला सर्वत्र आपल्या सत्तेचा दरारा निर्माण केला मारी सत्तेत असताना परकीय आक्रमकांना पराभव स्वकारावा लागत असे मार्यानी कल्याणकारी सत्ता निर्माण केली या सत्तेत ब्राह्मणांना महत्व दिले नव्हते सम्राट अशोकाने साम्राज्य विस्तारासाठी कलिंगवर आक्रमण केले व कलिंगवर विजय प्राप्त केला या युद्धात शेकडो सैनिक मारले गेले व निरापधार जनता मारली गेली रक्ताच्या नद्या वाहत होत्या जिकडे तिकडे मृतांचे ढीग पडले होते हे दृश्य पाहून अशोकाचे हृदय परिवर्तन झाले त्यांनी शास्त्राचा त्याग केला व गौतम बुद्धाचा धम्माचा स्वीकार केला त्यांनी हिंसा त्यागून शांतीचा मार्ग स्वीकारला हा दिवस पौर्णिमेचा  होता त्या दिवसास अशोकाने धर्मविजय अर्थात अशोक विजयादशमी म्हणून जाहीर केला म्हणू हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो
             त्याच मुहूर्तावर मौर्य वंशाचा दहावा सम्राट बृह्द्त्त याचा पुष्यमित्र शुंग ह्या ब्राह्मण शेनापातीने कपटाने वाढ केला  व शांती व करुन या तत्वाचा मंत्र देणाऱ्या मौर्य घराण्याचा अंत केला तसेच या दहा सम्राटांनी केलेले लोक्काल्याम्कारी शासन ब्राह्मणांनी कपात नीतीने उधवस्त केले व ब्राह्मणी राज्य व्यवस्था परत उदयास आणली त्याला या लोकांनी दसरा हे नाव देवून तो साजरा करू  लागले ज्या सम्राट अशोकाने धम्म क्रांती करून जगाला नवी दिशा दाखवली आणि बौद्ध धम्माच्या प्रज्ञा शील करुणा सत्य अहिंसा हि शिकवण देणाऱ्या धम्माचा स्वकर केला आणि प्रसार केला त्या धम्माला थांबवण्याचे हे एक षड्यंत्र रचले गेले त्यावर मत म्हणून ब्राह्मणांनी या दिवशी शस्त्रपूजा सुरु केली ती प्रथा आजतागायत आहे ज्या सम्राट अशोकाने त्याग केला त्या शत्राना उचलून बहुजन पुन्हा क्रांती करू नयेत यासाठी दसर्याच्या दिवशी शस्त्रपूजा सुरु केली गेली हा सर्व ब्राह्मण  लोकांनी मांडलेला डाव आहे तॉजुनहि बहुजन समाज समजलेला नाही बहुजनांनी फक्त शस्त्रपूजन करावे ते हातात घेवू नये
दसरा सणाचे महत्व ब्राह्मणांनी बहुजनांचा विकास होवू देणे मान्य नव्हते त्यांनी फक्त मर्यादेपर्यंत राहावे बहुजन शिक्षणापासून वंचित राहावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात बहुजन देशाबाहेर जावू नये तो सीमेचा उल्लंघन असतो असे केल्याने पाप  होते असता पायंडा घातला गेला याचा अर्थ असा होतो कि बहुजन बाहेर गेले तर विदेशी ज्ञान आत्मसात करतील व ब्राह्मणी व्यवस्थेचा विरोध करतील म्हणून हे सर्व पायंडे घालण्यात आले परंतु सम्राट अशोकाने या ब्राह्मणी नियमाना पायदळी तुडवले व चौफेर प्रचंड साम्राज्य विस्तार घडवून आणला सम्राट अशोकाने सीमेबाहेर जावून अनेक देशात बौद्ध धम्माचा प्रसार केला ब्राह्मणांनी बहुजानाचे लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या काल्पनिक कथा रचून या दिवशी दशमुखी रावणाचा विनाश  रामाने केल्याचा देखावा निर्माण केला गेला व दसरा या दिवशी रावण दहन करण्याचा पायंडा घातला या दिवशी मौर्य साम्राज्याचा दहावा सम्राटाचा विनाश करून मौर्य घराणे संपवून टाकले  त्याला कल्पनिकातेच्या भरावर दशमुखी रावण वध केल्याचा बहुजनांना सांगण्यात आले रामायणात रामाने याच दिवशी रावणाला मारल्याची दंतकथा पसरविण्यात आली
        मौर्य राज घराण्यांनी लोककल्याणकारी बहुजन सत्ता प्रस्थापित  केली होती तिला ब्राह्मणांनी आपल्या कुत नीतीने नेस्तनाभूत केली व बहुजन आपल्या विरोधात जावू नये यासाठी त्यांनी रामायणात अनेक काल्पनिक घटनाच वास्तवाशी मिळती जुळती कथा लिहिल्या गेल्या व त्यांना मुल घटकेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला रामायणात दशमुखी खलनाय रावण याला दहा मुख असणे म्हणजे अशक्य प्राय गोष्ट आहे आजही विज्ञान युगात अनेक इंद्रिय असणे शक्य नाही तर दशमुखी रावण प्रचंड शक्तिशाली व पराक्रमी असणे अशक्यप्राय आहे हि काल्पनिक कथा यासाठी रचली गेली कि अशोक विजयादाशामिचे महत्व कमी करण्यासाठी केलेले हे ब्राह्मणांचे षडयंत्र आहे मुल भारतीय काबूत ठेवण्यासाठी रावण जाळणे हा सन साजरा केला जातो
खर तर बहुजनांनी याच अविचार करायला हवा  आणि महत्वाचे म्हणजे ह्याचा दिवशी जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती घडली ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी नागपुरात लाखो लोकांसामुहेत बुद्ध धम्मात प्रवेश केला म्हणून विजयादशमी हि महत्वाची ठरते पण ब्राह्मणी व्यवस्थेने काल्पनिक कथाद्वारे बहुजानाला भरकटवले आहे अजून बहुजन समाज जागा नाही झाला आहे खास त्या लोकांसाठी कि त्यांनी जागे व्हावे आणि डोळे उघडून पाहावे कि कश्या प्रकारे आपली फसवणूक होत आहे ते


जय शिवराय
जय भीमराय



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

आर्य अष्टांगिक मार्गाचा मराठी संतांवर प्रभाव भाग : ४

बळीराजा : एक काल्पनिक पात्र